काळे पांढरे

Submitted by अपरिचित on 2 October, 2017 - 07:42

काळे पांढरे

बऱ्याच दिवसापासून लिहितं व्हावंसं वाटत होतं. फक्त लिहावंसं वाटत होतं. विषय कसला वा कशाशी संबंधित वा किती गरजेचा वा कशासाठी वा कोणासाठी, असे काहीही मनात नव्हतं. फक्त काहीतरी लिहायचं होतं.
नाही. नाही. मला माझ्या मनातलं काहीही ह्या आभासी जगतात मांडायचं, असं काहीही नाही. तर दिवसरात्र संगणकावर/मोबाईलवर निव्वळ डोळ्याने काम करत असल्याने त्यापल्याड काहीतरी लिखाणकाम करावं, इतकंच वाटलेलं. सबब लिखाणप्रपंच.
आता लिहायचं म्हटलं तर काय लिहावं ह्यावर काहीतरी विषय असायलाच हवा. तसा विचार केला तर तसे आले काही विषय मनात. पण त्यावर विचारपुर्वक लिहावं की जसजसं मनात येईल तसतसं लिहित जावं हे काही उमजेना. तर मनात ह्यावर जरा विचारांचा उहापोह होत गेला तसे मी कंटाळून सोशल मिडीया सुरु केलं आणी काही वेळाने एक पोस्ट वाचण्यात आली. आवडली. मग तीच मुळ ईंग्रजी पोस्ट येथे मराठीत "लिहीते व्हा" उक्तीनुसार लिहीत आहे
.

खालील वाक्ये/मत/विचार हे झिंबॉब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे ह्यांचे आहे. त्यांनी सदर विचार वर्णभेदावर मांडलंय

जगातून वर्णभेद तोपर्यंत नामशेष होणार नाही जोपर्यंत पांढऱ्या मोटारगाड्यांना काळे टायर लावत राहतील. वर्णभेद तोपर्यंत नष्ट होणार नाही जोपर्यंत लोकं काळा रंग म्हणजे अपशकुन आणी पांढरा रंग म्हणजे शुभशकुन मानत राहतील. वर्णभेद कसा निघेल जर समाज लग्नकार्यासाठी पांढरेशुभ्र वेशभूषा परिधान करतील आणी दु:खद प्रसंगासाठी काळे कपडे घालत राहतील. वर्णभेद तोपर्यंत लोकांच्या मनात राहील जोपर्यंत थकित रकमेचा भरणा न केलेले कर्जदार, बँकेचे कर्जासंबंधित नियमावलीची पूर्तता न केलेले परिसर, एखाद्या कंपनीची सेवा घेण्यासाठी नियमात न बसणारे व्यक्ती, एखाद्या संस्थेने सेवेतून निष्कासित केलेले कर्मचारी ह्यांना काळ्या यादीतील संबोधले जातील आणी ह्याउलट नियमांची पूर्तता करणारे पांढऱ्या यादीतील असेल. स्नुकर खेळात सुद्धा जोपर्यंत तुम्ही काळा चेंडू खड्डय़ात टाकत नाही आणी पांढरा चेंडू वरती राहत नाही तोपर्यंत तुम्ही खेळ जिंकत नाही. पण मला ह्या वर्णभेदाची/रंगभेदाची काहीही अडचण तोपर्यंत तरी वाटणार नाही जोपर्यंत मी माझे काळे ढुंगण पांढऱ्या टॉयलेट पेपरने साफ करत राहील".

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंढर्यापेक्षा काळ्या कार्स जास्त खपतात.. आणि पांढरे रबर पेक्षा कार्बन ब्लॅक घातलेले काळे रबर जास्त चांगले आहे सर्वच बाबतीत. जास्त टिकणे, आणि दुरेबिलिटी.

च्रप्स , येथे कोणत्या कारचा खप जास्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न नाहीये तर पांढरी शुभ्र कार असली की नजर लागु नये म्हणून काळे टायर लावले जाते.
रंगभेदाबद्दल लिहिलंय