काळा रंग आणि भाषा-साहित्यातील वर्णभेद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 November, 2016 - 12:59

काळ्या रंगावरून कोणाला चिडवू नये किंवा कोणाला कमी लेखू नये. असे आपण एकीकडे म्हणतो. पण काळ्या रंगाला रुपक म्हणून वापरताना आपण नेहमीच कमी लेखतो आणि वाईटाचे प्रतीक म्हणूनच दाखवतो, असे का?

जो पैसा भ्रष्ट मार्गाने कमावला जातो तो काळा पैसा ! ब्लॅक मनी ! ज्या मार्गाने तो कमावला जातो तो काळा बाजार !

याऊलट कष्टाचा पैसा मात्र पांढरा पैसा ! तो पैसा कमावणारे पांढरेपेशे ! व्हाईट कॉलर !

एखादे वाईट काम म्हणजे कृष्णकृत्य ! ईथे कृष्ण नावाचा आपला देव असूनही या शब्दाचा अर्थ मात्र वाईटच !

जादू टोणा, अघोरी विद्या, म्हणजेच काळी जादू ! काळी विद्या !

एखाद्याच्या स्वभावाला ग्रे शेड म्हणतानाही पांढरा रंग त्यातील चांगुलपणाचा आणि काळा रंग त्यातील वाईटाचा !

एखादा दिवस आयुष्यात वाईट गेला तर तो काळा दिवस ! ब्लॅक फ्रायडे !

पांढरा रंग शांतींचा, तर काळा रंग निषेधाचा !

एखाद्याच्या तोंडाला फासली जाणारी शाई देखील काळीच !

अगदी मंगलकार्यांमध्येही काळ्या रंगाला नकारच दिला जातो, कारण काळे म्हणजे काहीतरी अमंगल !

ब्लॅक ब्यूटी या शब्दातही मला एक खोचकपणाच जाणवतो.. ब्लॅक असूनही ब्यूटी ! म्हणजे अपवाद !

माझे भाषा-साहित्याचे ज्ञान कच्चे आहे, म्हणून फार उदाहरणे देऊ शकत नाही. पण जगात बहुधा सगळीकडच्या भाषांमध्ये काळ्या रंगालाच कमी लेखले जात असावे. तर हे चुकीचे वाटत नाही का? आणि काळ्या रंगाकडे बघण्याची द्रुष्टीच आपली नकारात्मक आहे असा याचा अर्थ होत नाही का?

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकला केस काळेच पाहिजेत. काळा रंग भरपूर वेळेस style चे प्रतीक मानला जातो. White suite पेक्षा लोक काळ्याला पसंत करतात. आणि राज यांचं गाडीचं उदाहरण.
आणि अजून सांगायचं तर, कृष्ण काळा असून सुद्धा "मदनमोहन" आहे. (मदनमोहन चा अर्थ शोधून घ्यावा)

राज, पद्म,
आपण म्हणता ते वेगळे झाले. भ्रमणघ्वनी, गणकयंत्र, दूरदर्शन संच यासारखी उपकरणे सुद्धा काळ्या रंगातच शोभतात.
हेच कश्याला मी स्वत:ही काळ्या रंगाच्या कपड्यातच शोभतो. माझे निम्मे वॉर्डरोब काळ्या कपड्यांनी भरले आहे.
उलट हा विरोधाभास माझा मुद्दा आणखी स्पष्ट करतो, जर व्यवहारात कित्येक ठिकाणी काळा रंगच शोभतो तर भाषासाहित्यात त्याला नकारात्मक गोष्टींचेच प्रतीक का दाखवले जाते ..

सॉरी ऋन्मेष... पण तू धागा काढताना मनात येईल ते किंवा वाटेल ( वाट्टेल ) ते लिहितोस.. असे होत आहे सध्या.

कृष्णच नव्हे तर रामही काळाच होता.. आणि त्यांचे या रंगाबद्दल भरपूर कौतूक सर्व साहित्यात झाले आहे.
आणि बहुतांशी आफ्रिकन वर्णाचे लोक काळेच असतात, ते स्वतःचा उल्लेख काळे म्हणून अभिमानाने करून घेतात, आणि त्यांचे या रंगावरुन अपमानास्पद उल्लेख करणे ( आता ) सभ्य मानले जात नाही.

धार्मिक कार्यातही काळ रंग निषेधार्य नाही. उदा. शनि संबंधी पूजेत, काळा रंग आवर्जून वापरतात. कालभैरवाला नेवैद्यही बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत असा दाखवतात.

अर्थात तूझ्या लेखन स्वातंत्र्याला माझी हरकत असण्याचे काही कारणच नाही, पण एकदा लेख लिहून झाल्यावर तो शान्तपणे वाचून ( दुसर्‍या दिवशी ) पोस्ट केलास तर जास्त चांगले होईल, असे मला वाटते. आणि या माझ्या मतस्वातंत्र्याला तूझी हरकत नसावी.

मी सहसा तूझ्या अश्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळतो, पण आज राहवले नाही.

ऋन्मेष, रात्रीचा काळोख हा अज्ञानाचं प्रतीक आहे; कारण अस्तित्वात असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला जाणवत नाहीत. आणि त्याचमुळे काळा रंग सुद्धा अज्ञानाचं प्रतीक आहे. and vice a versa

दिनेशदा, हरकत कसली.
पण मुद्दे तितकेसे पटले नाहीत. बाजरीची भाकरी आणि वांग्याचा नैवेद्याला काळ्या रंगाशी जोडणे पटले नाही. शनिदेवाचे म्हणालत तर मुळात आपण त्या देवालाच साडेसाती या नकारात्मक प्रकाराशी जोडले आहे. शनिचा आशिर्वादपेक्षा शनिचा प्रकोपच जास्त प्रसिद्ध आहे. रामकृष्ण यांच्या मुर्त्या काळ्या रंगाच्या क्वचित असतात. तुलनेत निळ्या जास्त असतात. तर कधी गोरयाच. विठ्ठल एक असतो काळा. कदाचित त्यामुळेच विठ्ठल रखुमाई जास्त लोभसवाणी वाटतात. याचा अर्थ हा देखील की काळ्या रंगात सौण्दर्य नसते हे चुकीचेच आहे.

मुळात मला हे म्हणायचेच नाही.
आपल्या उदाहरणांचा सूर पाहता आपण फक्त देवधर्म संस्कृती परंपरांवरच भाष्य केले आहे. कदाचित माझ्या उदाहरणातील अमंगल या शब्दामुळे असेल. कदाचित ते उदाहरणही येथे गैरलागू असेल. पण शीर्षक वाचले तर लक्षात येईल मला भाषासाहित्याबद्दल बोलायचे आहे.

बाकी या शंका आहेत. माझे ज्ञानही याबाबतीत तोकडेच आहे. म्हणून तर चुकल्यास कर्रेक्ट करा लिहिले आहे.

काळा रंग माझा आवडता रंग आहे.
माझ्याकडेपण अर्धा वार्डरोब काळ्या रंगाच्या कपड्यांचा आहे.
माझी टू विलर आणि कार काळ्या रंगाची आहे.
Wink

भारतात काळा रंग शुभप्रसंगी चालत नाही पण ख्रिश्चनांत लग्नात काळा सूट घालायची पद्धत आहे.
काळे शूज, काळा कोट हा अगदी ऑफिशीयल ड्रेस कोड असतो.

इथे मंगल प्रसंगांना काळ्या साड्या चालत नाहीत , पण तिकडे इव्हिनिंग गाऊन्स काळे असतात.
आणि पार्ट्या बिर्ट्यांसाठी LBD म्हणजे लिटिल ब्लॅक ड्रेस असतोच असतो सगळ्या लेडिज बायकांकडे तिकडच्या.
(हल्ली इकडच्याही)

काही समारंभात आपल्याकडेही काळ्या रंगाचे महत्त्व आहे.
उदा. संक्रांत!
'नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरिची' हे गाणं ऐकलंय का?

काळा रंग उष्णता जास्त शोषून घेतो त्यामुळे उष्ण कटिबंधात नकोसा (थंडीचे /संक्रांतीचे दिवस सोडून) तर शीत कटिबंधात हवाहवासा वाटत असणार . त्यामुळेच त्याका पुढे त्या अनुशंगाने धार्मिक संदर्भ प्राप्त झाले असावेत असा माझा अंदाज आहे.

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥

गुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥

मी काळी काचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥

माझ्याकडेपण अर्धा वार्डरोब काळ्या रंगाच्या कपड्यांचा आहे.
>>>
हे एक ईंटरेस्टींग आहे. स्त्रियांबाबत असे कमी असते असा माझा ऑफिसमधील आजूबाजुच्या स्त्रियांचा ऐकलेला अनुभव .
आणि गर्लफ्रेंडबाबत म्हणाल तर त्यांच्याकडे अगदी झिरो ब्लॅक पॉलिसी आहे. तिच्याबरोबर शॉपिंगला जात असल्याने बघतो की काळा रंग हा ईतर रंगाच्या कॉम्बिनेशमध्येही चालत नाही. किंबहुना ती वाट बघतेये की कधी माझ्याशी लग्न होईल आणि मग तिला बिनधास्त डेअर टू वेअर ब्लॅक करता येईल.

काळा रंग उष्णता जास्त शोषून घेतो त्यामुळे उष्ण कटिबंधात नकोसा (थंडीचे /संक्रांतीचे दिवस सोडून) तर शीत कटिबंधात हवाहवासा वाटत असणार . त्यामुळेच त्याका पुढे त्या अनुशंगाने धार्मिक संदर्भ प्राप्त झाले असावेत असा माझा अंदाज आहे.
>>>>
हे पटणेबल आहे. हा साधा फंडा मी सुद्धा फॉलो करतो. दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळा कितीही आवडीचा असला तरी टाळतो.

मी स्वतः जरी गोऱ्या रंगाचा असलो तरीही मला काळा रंग आवडतो.काळ्या रंगाचे कपडे अनेकांना आवडतात,मलाही आवडतात.पण फार काळ्या रंगाची माणसे मला आवडत नाहीत.बर्याचदा काळ्या रंगाचे लोक antisocial tendency ची असतात असे माझे वैयक्तीक मत आहे.अमेरीकेतही कृष्णवर्णीयांचा क्राईम रेट गोर्यांपेक्षा कीती तरी जास्त आहे .आकडेवारी तसेच सांगते.
आफ्रीकेतील बहुतांश देश मागासलेले आहेत व यादवीयुद्धाने ग्रासलेले आहेत.

{{{ कृष्णच नव्हे तर रामही काळाच होता.. आणि त्यांचे या रंगाबद्दल भरपूर कौतूक सर्व साहित्यात झाले आहे. }}}

तरीही आपण कॅलेंडरवरच्या चित्रात, सिनेमांत राम व कृष्ण यांना काळ्या रंगाऐवजी निळ्या रंगात दाखवतो कारण काळ्या रंगात ते चांगले दिसणार नाहीत असे आपल्याला वाटते. धागालेखकाने मांडलेल्या विरोधाभासाच्या मुद्द्याशी सहमत.

तरीही आपण कॅलेंडरवरच्या चित्रात, सिनेमांत राम व कृष्ण यांना काळ्या रंगाऐवजी निळ्या रंगात दाखवतो कारण काळ्या रंगात ते चांगले दिसणार नाहीत असे आपल्याला वाटते.>>>>.
इथे तरीही सुंदरच दिसतात......
download (1).jpgdownload.jpg

खरं तर काळ्या रंगाइतका सत्याच्या जवळ जाणारा रंग दुसरा नाही. काळा रंग म्हणजे दुसरा कुठल्याही प्रकारच्या सिग्नल चा अभाव. त्याच्या उलट पांढरा म्हणजे जे काही शक्य आहे ते सर्व सिग्नल. भारतीय अध्यात्मात अंतिम सत्य म्हणजे काहीच नाही. म्हणजेच काळा रंग. त्याउलट ख्रिस्ती तत्वज्ञानात सत्य म्हणजे पांढरा प्रकाश. मॅट्रिक्स चित्रपटात निओ ला आर्किटेक्ट भेटतो तो सर्व पांढऱ्या रंगात.

काळ्या रंगाचा दुसरा अर्थ म्हणजे अज्ञान. डोळे ह्या ज्ञानेंद्रियांचा अंधार हा शत्रू. तसाच विवेकाचा शत्रू अज्ञान. म्हणून सूर्य किंवा अग्नी हा पूज्य. म्हणून बृह्दकारण्यात ऋषीने प्रार्थना केली
असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय।

व्यवहारी पातळीवर काळा रंग म्हणजे मळलेले कपडे. पवित्र ठिकाणी वा प्रसंगी स्वच्छ कपडे घालून यावे ह्या नियमाचा मूळ अर्थ जाऊन त्याचे आजचे काळ्या रंगाचे कपडे घालू नये हे कर्मकांड उरले.

पण फार काळ्या रंगाची माणसे मला आवडत नाहीत. बर्याचदा काळ्या रंगाचे लोक antisocial tendency ची असतात.>> कदाचित अश्या विचारसरणीमुळे जी कळत नकळत निगेटिव्ह एनर्जी त्यांना Social राहून अनुभवायला मिळत असेल त्यामुळेच ते AntiSocial राहणे पसंत करत असावेत.

रुन्मेषला काय म्हणायचं ते कळतंय .. पटतंय..
माझाही वॉड्रॉब काळ्याने भरलाय, माझ्या बहिणीचा ही ( आमचा वॉड्रॉब एकच आहे हे सिक्रेट आहे). अनेक मैत्रिणींचाही.... स्त्रीयांना काळा रंग आवडत नाही हे तितकंस खरं नाही...

पद्म यांनी लिहिल्याप्रमाणे काळा रंग अशुभाचं लक्षण मानलं जायचं पुर्वी. कारण सोप्पं रात्र काळी असते आणि पुर्वेर्च्या काळी ती नक्कीच विलोभनिय नसणार. या उलट पहाट सुंदर असते म्हणुन भगवा/केशरी रंग उत्साह आणि मांगल्य दाखवतो.
सातीने संक्रांतीचं उदाहरण दिलंय, पण साती - संक्रांतही आपल्याकडे चांगली मानली जात नाही.. म्हणुनच् कोणावर संक्रांत येऊ नये म्हणुन आवर्जुन काळं घातलं जातं त्या दिवशी... नजर लागु नये टाईप्स....

बरं या पुर्वीच्या संकल्पना आहेत.. आताशा रात्र अमंगल नसुन सुंदर मानली जाते तसंच अनेक नवरदेव लग्नात काळे कोटही घालतातच... सो बहुदा पुर्वीच्या गोष्टी फारश्या लागु होत नाहीयेत् आजकाल.... आपण बदलतोय..

मला स्वत:ला काळ्या गोष्टी फार आवडतात म्हणुनच अगदी गोरे चिट्टे मुलं माझे क्रश होऊ शकत नाहीत Proud

@ रीया, सो बहुदा पुर्वीच्या गोष्टी फारश्या लागु होत नाहीयेत् आजकाल.... आपण बदलतोय..>>> आपला मुद्दा आवडला.

काळ्या रंगाचा संबंध अनाकर्षकपणाशी जोडला जातो, त्यामागे काही अंशी नैसर्गिक कारणे असावीत. (संदर्भ - विकिपीडिया). मग त्याजोडीने समाजात परंपरा म्हणा व इतर चुकीच्या विचारांनी म्हणा, हळूहळू इतर नकारात्मक भावना, म्हणजे वाईट वृत्ती अन अशुभ गोष्टी त्याबरोबर जोडल्या गेल्या असाव्या.

सध्या कुठेही वर्णद्वेष उघड-उघड दिसत नाही, पण छुप्या स्वरूपात तो जवळपास प्रत्येकाच्या मनात दिसतोय. नुसत्या लग्नाच्या जाहिराती पहिल्या की त्याची प्रचिती येते. आजवर जितक्या जोड्या जुळताना पहिल्या त्यामध्ये कोणत्याही मुलाने/मुलीने काळ्या वर्णाला प्राधान्य दिलेले नाही. याउप्पर विजोड वर्णाच्या स्त्रीपुरुषांची गाठ जुळली, तरी त्यामागे प्रेम वा आकर्षणापेक्षा इतर बाबी, म्हणजे पैसा, मानमरातब,इज्जत वैगरे गोष्टीच जास्त दिसतात.

हेसुद्धा बऱ्याचदा अनुभवलंय, की आपल्याकडे जे काळ्या वर्णास आकर्षक म्हणून पाहतात त्यातसुद्धा त्यांना सावळा रंग अपेक्षित असतो, संपूर्णपणे काळा नाही. उघडपणे सगळीकडे वर्णभेदाचा विरोध होतो, पण जेव्हा जोडीदार निवडायची वेळ येते, तेव्हा मग प्रत्येकाच्या "जोडीदाराविषयीच्या अपेक्षा" डोकं वर काढतात. जातीभेद नष्ट करण्यासाठी जसे एकेकाळी ठरवून आंतरजातीय लग्ने होत, तशी वर्णभेद नष्ट करण्यासाठी कोणी ठरवून विजोड वर्णाशी लग्न केल्याचे ऐकू येत नाही.

आता तर अशी शंका येतेय, की वर्णभेदाची बोचणी समाजाच्या मनाला लागली, अन त्याचे दुखणे आपल्या समाजाने बाजूला करण्यासाठी कृष्ण -राम -शिव यांसारखे काळ्या-सावळ्या वर्णाचे देव जन्माला घातले, म्हणजे किमान वर्णभेद नष्ट केल्याचा मुखवटा तरी घेता यावा. प्रत्यक्षात तो किती नाहीसा झाला, हा मोठाच प्रश्न आहे....

वर्णभेदाची बोचणी समाजाच्या मनाला लागली, अन त्याचे दुखणे आपल्या समाजाने बाजूला करण्यासाठी कृष्ण -राम -शिव यांसारखे काळ्या-सावळ्या वर्णाचे देव जन्माला घातले, म्हणजे किमान वर्णभेद नष्ट केल्याचा मुखवटा तरी घेता यावा>>

अज्जिबात नाही!

वर्णभेदाची बोचणी समाजाच्या मनाला लागली, अन त्याचे दुखणे आपल्या समाजाने बाजूला करण्यासाठी कृष्ण -राम -शिव यांसारखे काळ्या-सावळ्या वर्णाचे देव जन्माला घातले, म्हणजे किमान वर्णभेद नष्ट केल्याचा मुखवटा तरी घेता यावा>>

अज्जिबात नाही!

>>

साती, आपला मुद्दा अजून स्पष्ट करा. देवतांमधील वर्णभेद मिटवणे हा समाजातील वर्णभेद नष्ट करण्याचा खरोखरीच एक चांगला उपाय होता. पण कदाचित प्रयत्न तीथवरच थांबले. आता जेव्हा जेव्हा वर्णभेदाचा मुद्दा वर येतो, तेव्हा तेव्हा रामकृष्णाची उदाहरणे लोक देतात. पण त्यांनी स्वतःहून यासाठी काय केले, हे मात्र कोणी सांगत नाही.यावरून बऱ्याच जणांना स्वतःहून याबाबत काही करायचेच नाही, जे काही करायचे ते दुसऱ्यांनी, असे मानायला जागा राहते.

अपरीचित यांच्या एका धाग्यावरून हा धागा आठवला आणि तिथे लिंक द्यायला शोधत ईथे आलो आणि प्रतिसाद वाचले.
प्रतिसादांत बरेच जणांनी शोभेच्या काळ्या वस्तू आणि साहित्यातील नकारात्मक काळ्या उपमा यांची सरमिसळ केल्याचे जाणवले. रामकृष्णाचा धार्मिक एंगल तो आणि एक वेगळाच आला...

अप्रतिम लिहिले आहे ....मला स्वतःला अनुभव आहे .. मी रंगाने काळा आहे .. घराबाहेर समाजात वावरताना माणसे स्वतःचा स्वार्थ ठेवून बोलतात .. आणि काम झाल कि ओळख दाखवत नाहीत .. दूरून मार्ग बदलतात.. स्त्रिया मुली तर हा गुंड या नजरेने बघून लांब अंतर ठेवतात ...

Pages