काल सकाळी दिवस उजाडलाच ते एक टेंशन घेऊन. मी काम करत असलेल्या एका प्रोजेक्टमध्ये एक गोंधळ झाला होता. काही लाख युरोंचा क्लेम येण्याची शक्यता दिसत होती. ज्यात चूक कोणाची म्हणून पाठपुरावा करायचा झाल्यास सारी बोटे माझ्याच दिशेने येऊन थांबली असती. आणि ती चूक माझीच होती. छोटीशीच होती, थोडासा धांदरटपणा, थोडा हलगर्जीपणा. पण त्याचे परीणाम फार मोठे होते. जर युरोचे रुपयांत गुणोत्तर मांडले तर मला आयुष्यभर याच कंपनीत फुकट राबावे लागले असते ईतके मोठे.
सकाळचा चहा माझ्या घश्याखाली एवढ्यासाठीच उतरला की अजून त्या गोंधळाचा मेल तीन लोकांच्या बाहेर गेला नव्हता. तातडीने प्रोजेक्ट मॅनेजरने संध्याकाळी एक ईंटरनल स्काईप मिटींग ठेवली. ज्यात एक मी, दुसरे माझे सर, तिसरा तो प्रोजेक्ट मॅनेजर स्वत: आणि क्लायंटची दोन वरच्या लेव्हलची माणसे असे पाचच जण असणार होते. त्या मोठ्या लोकांसमोर काय घोळ झालाय, कश्यामुळे झालाय, कोणामुळे झालाय, हे सारे मलाच सांगावे लागणार होते. त्यानंतर आम्ही सर्व मिळून तो घोळ कसा निस्तरावा याची चर्चा करणार होतो.
दुपारचे जेवण एवढ्यासाठीच घश्याखाली उतरले की माझ्या बॉसने मला सांगितले की वाईटात वाईट म्हणजे तुझी नोकरी जाईल. "यूह कॅन लूज युअर जॉब !".. पण पैश्याचा क्लेम आल्यास कंपनीचा इन्शुरन्स असतो. नुकसानभरपाईसाठी कोणी तुझी कॉलर धरणार नाही.
नोकरी गेली अशी मनाची तयारी केल्यावर जेवण तर घश्याखाली उतरले. पण पोटात ढवळू लागले. दुपारी मी नेहमी जेवल्यावर एकटाच वॉल्कला जातो. हल्ली अॅसिडीटीचा त्रास वाढल्याने ही चांगली सवय लावली आहे. दहा मिनिटे चालतो, दहा मिनिटे एका बाकावर बसतो, दहा मिनिटे पुन्हा परतीचे चालून ऑफिसला पोहोचतो. टोटल अर्धा तास. आज मात्र दोन मिनिटे चालत होतो, दोन मिनिटे बसत होतो. फार काळ स्वस्थ बसता येत नव्हते. दोन मिनिटांनी पुन्हा उठून चालत होतो. चालता चालता डोक्यात त्याच नकारात्मक विचारांना पुन्हा चालना मिळत होती आणि डोके शांत करायला पुन्हा दोन मिनिटे बसत होतो. बसल्यावर पुन्हा दोनच मिनिटांत, ‘आपण असे हातावर हात धरून स्वस्थ बसूच कसे शकतो’ या विचाराने, या भितीने उठून पुन्हा चालत होतो. अगदी वेडा झालो होतो. "आता पुढे काय?" हे विचार डोक्यात येताच छातीतील धडधड वाढत होती. पण ते विचार थोड्याच वेळात प्रत्यक्षात घडणार असल्याने डोक्यातून काढूनही टाकता येत नव्हते.
एखाद्या वडिलधार्या माणसाने पाठीवर आश्वासक थोपटावे, आईने कुशीत घ्यावे, गर्लफ्रेंडने ‘सारे काही ठिक होईल रुनम्या’ म्हणत हात हातात घ्यावा, असे आणि बरेच काही वाटत होते. पण त्यांच्यापैकी कोणीही आता माझ्या जवळ नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. रोज मी एक ते दिड फेरफटका मारतो, पण आज दोन वाजत आले तरी ऑफिसबाहेरच होतो. ठिक पाच वाजता मिटींग होती. पण मला आज पाच वाजूच नये असे वाटत होते. शेवटी सर मला शोधत बसतील आणि जागेवर न दिसल्यास आणखी चिडतील म्हणून नाईलाजाने उठलो आणि पावले ऑफिसच्या दिशेने वळली.
आता पर्यंत ऑफिसमध्ये सर्वांना हे समजून गोंगाट झाला असेल का? लंचटाईममध्ये सोबत जेवताना सरांनी सेक्शन मॅनेजरला याबद्दल सांगितले असेल का? ऑफिसमध्ये पाय ठेवताच मला केबिनमध्ये बोलावणे येईल का? कोणाच्या नजरेत सहानुभुती असेल, कोणाच्या नजरेत कुत्सितपणा, कोण अरेरे म्हणत असेल, कोण म्हणत असेल बरे झाले जिरली याची... एखाद्या फाशीच्या कैद्याला वधस्तंभाकडे जाताना जे काही वाटत असेल अगदी तसेच मला ऑफिसमध्ये परतताना वाटत होते. पावले जड होत होती, छातीतील धडधड कुठल्याही क्षणी मी हार्ट अॅटेक येऊन जमिनीवर कोसळेन ईतकी वाढली होती. मला खरेच त्याक्षणी गरज होती ती कुठल्यातरी मानसिक आधाराची. अजून काही वेळ ही धडधड अशीच राहिली तर माझी छाती फाडून बाहेर येईल. नाही नाही, नोकरी जाईल ते परवडले.. पण जीव नाही गेला पाहिजे.. माझी आई, माझे बाबा, माझी गर्लफ्रेंड... माझे कित्येक मित्र.. या सर्वांना मी हवा आहे. आयुष्यात आलेला हा फक्त एक प्रॉब्लेम आहे. आज आहे तर उद्या नसेल. मी मात्र असलोच पाहिजे. ही छातीतली धडधड कमी झालीच पाहिजे. सारे काही समजंसपणाचे सुचत होते, पण ती धडधड त्या विचारांनी काही कमी होत नव्हती. कारण मी स्वत:च स्वत:ला मुर्खासारखा धीर देतोय हे जाणवत होते. आयुष्य फार किंमती आहे हे माझ्या मनात येणारे विचार अगदी बरोबर असले तरी माझे मीच मला पटवून देऊ शकत नव्हतो. येणार्या संकटाशी लढायची हिंमत, मानसिक बळ मला कुठूनही मिळत नव्हते, आणि अश्यातच त्याची आठवण झाली...
हो त्याच, परमशक्तीशाली म्हणून गौरवल्या गेलेल्या परमेश्वराची. सर्व शक्यतांचा विचार करता आता एखादा देवाचा चमत्कारच मला यातून बाहेर काढू शकत होता. पण जगात देव नाही यावर माझा ठाम विश्वास असल्याने तसे होणार नाही हे देखील मला माहीत होते. आणि अचानक मला फार वाईट वाटले. कारण आज जर माझा देवावर विश्वास असता, तर त्याचा मी धावा केला असता. त्याला साकडे घातले असते. आणि अद्रुश्य रुपात तो आपल्या पाठीशी उभा आहे असा विश्वास स्वत:ला मिळवून दिला असता,. आणि भले प्रत्यक्षात कोणीही देव नसला तरी, निव्वळ त्या देवावरच्या विश्वासाने माझ्या छातीतील धडधड नक्कीच कमी झाली असती.
एक क्षण असेही वाटले की हीच योग्य वेळ आहे देवावर विश्वास ठेवायची. आज आत्ता ताबडतोब, बोलूयाच देवाला नवस. आणि ठेवूयाच त्यावर विश्वास. घेऊया तर आज देवाची परीक्षा. काढ मला या संक्टातून बाहेर. मग मानतो तुला...
पण मुळातच विश्वास नसल्याने उगाच आव आणून खोटा विश्वास भासवण्यात अर्थ नव्हता. कारण ते स्वत:लाच पटणारे नव्हते. स्वत:च स्वत:ला असे फसवता येत नाही. थोडक्यात छातीतली धडधड काही कमी होणार नव्हती. आणि ती शेवटपर्यंत झाली नाहीच.
आजवर मी समजायचो की नास्तिक लोकं म्हणजे फार डेअरींगबाज. त्यांना देव नावाच्या कुबड्यांची गरज पडत नाही. पण आज मला समजले, संकटात सापडले की ज्याची गाळण उडायची त्याची ती उडतेच. मग आस्तिक असो वा नास्तिक. फरक ईतकाच, की आस्तिक लोकं देवाचा जप करत मन:शांती मिळवतात. पण त्याचवेळी नास्तिक विचारांचा माणूस छातीतील धडधड टाळू शकत नाही. भले देव जगात नसला तरीही आस्तिकांना मिळणारी मन:शांती मात्र खरीखुरी असते. पण तीच नास्तिक ईतक्या सहजी मिळवू शकत नाही. खर्रंच, नास्तिकत्व हा एक शाप असतो.
__________________________________________
लेख ईथेच संपला, पण किस्सा अनुत्तरीत राहायला नको.
__________________________________________
छातीतल्या त्याच धडधडीसह मी ऑफिसला पोहोचलो. क्लायंटची माणसे संध्याकाळी हजर राहू शकत नसल्याने मीटींग दुसर्या दिवशी संध्याकाळी ठेवण्यात आली असे समजले. छातीतली धडधड तात्पुरती थांबली. दुसर्या दिवशी म्हणजे आज पुन्हा एकदा ती मिटींग तासभर पुढे ढकलली गेली. अखेर सहा वाजता एकदाची झाली. अर्ध्या तासांतच संपली. निव्वळ आश्चर्यकारकरीत्या मी यातून सहीसलामत सुटलो. या आधी मला कल्पना नसलेली काही नवीन माहीती समोर आली, ज्यानुसार फार मोठा आर्थिक फटका बसला नव्हता. आणि जो थोडाथोडका बसला होता त्यात माझी एकट्याचीच चूक नव्हती, थोडीफार क्लायंटचीही चूक असल्याचे पुढे आले. तसेच माझी चूक देखील "बडे बडे प्रोजेक्ट मे ऐसी छोटी छोटी गलतिया होती रहती है" म्हणून सोडून देण्यासारखी होती.
मिटींग संपल्यावर मला क्षणभर विश्वासच बसत नव्हता. मी तसाच बॉसच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांच्यासमोर केवळ एक समाधानाचा सुस्कारा टाकून परत आलो. एकीकडे आनंद होत होता, तर दुसरीकडे मनात विचार येत होते.. जर मी काल देवावर विश्वास ठेवायचा असे ठरवून त्याचे नामस्मरण केले असते, तर आजच्या चमत्कारानंतर माझा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला असता. आणि कदाचित ते चांगलेच झाले असते. कारण नास्तिक असणे हा शाप असतो हे मला काल उमगले होते.
- समाप्त -
ईतर नास्तिकांनी आपापले विचार झरूर मांडा
शुभरात्री शब्बाखैर....
शुक्रिया,
- ऋन्मेष
हा हा हा , चालायचंच. पृथ्वी
हा हा हा , चालायचंच. पृथ्वी गोल आहे हे सांगणार्यालाही ते पटत नाही सांगणारे होतेच.
आणि पृथ्वी सपाट आहे
आणि पृथ्वी सपाट आहे सांगणारयालाही कोणी विरोध केला की सांगणारा समोरच्याची खिल्ली उडवायचा
आता प्रश्न असा आहे की तुमचा तर्क पृथ्वी सपाट वाला आहे की गोलवाला आहे. आणि तो गोलवाला म्हणजेच योग्य आहे हे तुमचे तुम्हीच ठरवून टाकले आहे
हे म्हणजे अखेर मला दिसला तोच देव, मला कळला तोच देव असे नाही झाले का ..
स्वत:ला समजलेय तेच सत्य समजणे हीच तर आहे आस्तिकता.
आणि समोरच्याचा तर्क न पटल्यास त्याला तर्कानेच विरोध करणे ही झाली नास्तिकता
माणसाला अहंकार नसतो असे मानणे
माणसाला अहंकार नसतो असे मानणे ही तुमची श्रद्धा! असो.
तुम्हाला तुमच्या धाग्यावर तुमचेच कौतुक झालेले हवे असते.
यु वॉन्ट टू बी हिरो ऑफ पीपल विद आयक्यु बिलो दॅन द अॅवरेज!
दॅट्स अ ग्रेट गोल! कीप इट अप!
माणसाला अहंकार नसतो असे मानणे
माणसाला अहंकार नसतो असे मानणे ही तुमची श्रद्धा! असो.
>>>>
माणसाला वा माणसांना अहंकार नसतो हे मी कुठे म्हणालो..
माणसाचा अहंकार हा देव या संकल्पनेला जन्म देण्यास कारणीभूत आहे हे मला नाही पटले.
उद्या तुम्ही म्हणाल माणसाला राग येतो म्हणून महागाई वाढते. मी नाही पटले म्हणालो तर उलट मलाच विचाराल, काय माणसांना राग येत नाही?
बघा पटतेय का..
बाकी तुमची पुढची हिरो वगैरे पोस्ट का लिहिली हे जराही समजले नाही. ज्यांचे पटते त्यांना मी पटलेच म्हणतो. वर मानव यांनी जनावरांबाबत लिहिलेले पटलेय. तुमच्याही काही ईतर धाग्यावरील पोस्टींना पटलेय वा आवडलेय म्हणून लिहिले आहेच. पण तुमचे सारेच पटावे असा आग्रह असेल तर ते कठीण आहे. कारण मग ते तुम्हाला देव बनवल्यासारखे होईल. आणि देव मी मानत नाही
पीपल विद आयक्यु बिलो दॅन द अ
पीपल विद आयक्यु बिलो दॅन द अॅवरेज!
>>>>
यासाठी आपण स्वतण्त्र धागा काढू. उधार राहिला हा धागा. शुभरात्री
>>पीपल विद आयक्यु बिलो दॅन द
>>पीपल विद आयक्यु बिलो दॅन द अॅवरेज!>>
म्हणजे प्रेमळ हो! सर्व गोष्टी लाभाच्या चष्म्यातून न पाहणारे.
सांप्रत देवाबद्दल लोक जे जे
सांप्रत देवाबद्दल लोक जे जे विचार करतात तो मनुष्याच्या अहंकाराचेच विस्तृत स्वरुप आहे.
>>>
हे एकदम पावलो कोहेलो, दीपक चोप्रा फेम स्पष्टीकरण झाले देवाचे. ही क्लिप पाहिली असेलच. https://youtu.be/Z17sIJyQ3oY
त.टी.: म्लॉडिनॉव पण ग्रेटच. हॉकिन्ग्ज बरोबर पुस्तक लिहिताना दीपक चोप्रा बरोबर पण पुस्तक लिहिले.
टवणे सर, ते तसे नाहीये... मी
टवणे सर, ते तसे नाहीये... मी देव मानणारा माणूस नाही. क्लिप पहिली, दीपक चोप्रा काय म्हणाले ते स्पष्ट नाही कळले
दिपक चोप्रा ठग आहे.त्याची
दिपक चोप्रा ठग आहे.त्याची लेक्चर्स ऐकल्यावर कळून येईल.
दिपक चोप्रा ठग आहे.त्याची
दिपक चोप्रा ठग आहे.त्याची लेक्चर्स ऐकल्यावर कळून येईल.
टवणे सर, ते तसे नाहीये... मी
टवणे सर, ते तसे नाहीये... मी देव मानणारा माणूस नाही. क्लिप पहिली, दीपक चोप्रा काय म्हणाले ते स्पष्ट नाही कळले
जरा गंमत इतकेच - तुमची अध्यात्मीय नास्तिकतेबद्दलची मते आधी वाचली आहेत म्हणून.
>>>
मला तुमचा प्रतिसाद 'अध्यात्मीय' / स्पिरिच्युअल टाइप रिझनिंग देणारा वाटला म्हणून तशी कमेंट केली. हे दोन लेखक न्यु एज स्पिरिच्युअलिझमचे मशालधारी आहेत
या धाग्यावर काय व इतर अनेक धाग्यांवर 'रग जिरवण्यापेक्षा' अजून काही फारसे हाती लागणार नाही म्हणून इथेच थांबतो. धन्यवाद.
मला तुमचा प्रतिसाद
मला तुमचा प्रतिसाद 'अध्यात्मीय' / स्पिरिच्युअल टाइप रिझनिंग देणारा वाटला म्हणून
>> नाही नाही, तसं काहीही रिझनिंग नाहीये हो. माझे मत असे की देव वगैरे मानणे हे मानसशास्त्रीय कंडिशन आहे. त्यात आबराकाडाबरा..छूछूछू-तुमकोनहिसमजेंगा टाईप काही झोलझाल मी सांगत नाहीये. षडरिपु हे नैसर्गिक बेसिक इन्स्टिन्क्ट्स आहे मनुष्याचे. त्यासाठी विज्ञा विरुद्ध आध्यात्म वगैरे इतक्या लांब जायची गरज नाही.
हे दोन लेखक न्यु एज स्पिरिच्युअलिझमचे मशालधारी आहेत

>> मै इन दोनों को नही जानता जी!
>>पीपल विद आयक्यु बिलो दॅन द
>>पीपल विद आयक्यु बिलो दॅन द अॅवरेज!>>
म्हणजे प्रेमळ हो! सर्व गोष्टी लाभाच्या चष्म्यातून न पाहणारे.
=====
छान पॉईण्ट आहे. माझ्या आयक्यूच्या धाग्यात टाकेन
@ हा धागा आणि आयक्यू, जर आयुष्यात यशस्वी लोकांचा आयक्यू जास्त असतो असे ढोबळमानाने मानले तर अश्या लोकांचा देवावर विश्वास जास्त असतो.
जे कलाकार असतात, ज्यांच्या अंगात एखादी कला असते, त्यांचा देवावर विश्वास जास्त असतो असेही आढळून येते. आपल्याला जी कला येते, जे सुचते, जे स्फुरते, ते सारे गॉड गिफ्ट म्हणजे देवाची देणगी आहे असे समजण्याकडे कल असतो. अर्थात त्यांच्यात अहंकाराची मात्रा जास्त नसावी ही अट.. यावरून असेही म्हणू शकतो की अहंकार माणसाला देव या संकल्पनेपासून दूर नेऊ शकतो. आणि म्हणूनच मला वर नानाकळा यांनी अहण्काराची जी नेमकी उलटी सांगड घातली ती पटली नाही
जे कलाकार असतात, ज्यांच्या
जे कलाकार असतात, ज्यांच्या अंगात एखादी कला असते, त्यांचा देवावर विश्वास जास्त असतो असेही आढळून येते. आपल्याला जी कला येते, जे सुचते, जे स्फुरते, ते सारे गॉड गिफ्ट म्हणजे देवाची देणगी आहे असे समजण्याकडे कल असतो. अर्थात त्यांच्यात अहंकाराची मात्रा जास्त नसावी ही अट.. यावरून असेही म्हणू शकतो की अहंकार माणसाला देव या संकल्पनेपासून दूर नेऊ शकतो.
>>> तू काय लिहितो हे तुला कळते काय भौ.... उगाच कायतरी टायपत बसायचे.
नानाकळा आपला प्रामाणिकपणा
नानाकळा आपला प्रामाणिकपणा आवडला.
सविस्तर रात्री समजावतो
नास्तिक हा १०० टक्के कधीही
नास्तिक हा १०० टक्के कधीही नास्तिक नसतो असे एक वाक्य कुठेतरी वाचलेले. अस्तिक या संकल्पनेशिवाय नास्तिक जन्मालाच येत नाही,
अस्तिक या संकल्पनेशिवाय
अस्तिक या संकल्पनेशिवाय नास्तिक जन्मालाच येत नाही,
नवीन Submitted by भुषण. on 3 October, 2017 - 16:21
>>>
हे अगाध ज्ञान कुठुन मिळाले आपल्याला?
लहानपणापासून देव धर्मावर विश्वास ठेवायला सांगणे हे चाईल्ड ॲब्युज आहे असे रिचर्ड डॉकिन्स म्हणतात ते खरे असल्याचे वरील प्रतिसाद वाचून पटते. हॅड एनफ????
सिंजी, ते बरोबर बोलत आहेत.
सिंजी, ते बरोबर बोलत आहेत. समजा देव ही संकल्पनाच नसती तर आस्तिक नसते, आस्तिक नसते तर नास्तिक कुठुन आले असते.
जर आयुष्यात यशस्वी लोकांचा
जर आयुष्यात यशस्वी लोकांचा आयक्यू जास्त असतो असे ढोबळमानाने मानले तर अश्या लोकांचा देवावर विश्वास जास्त असतो.
>>> असे कोणी म्हटले आहे का की यशस्वी लोकांचा आयक्यू जास्त असतो? उगाच काहीही. इथे केवळ इतकेच म्हटले आहे की जे नास्तिक असतात त्यांचा आयक्यू आस्तिकांपेक्षा तुलनेने जास्त असतो. त्याचा आयुष्यातल्या यशापयाशावर ढिम्म फरक पडत नाही.
--------------------------
बरं आयु क्यु कमी जास्त असतो म्हटल्याने कमी असणारा लगेच मतिमंद मूर्ख वगैरे ठरत नाही की जास्त असल्याने लगेच आइन्स्टाईन होत नाही. आस्तिकांनी इतकं ऑफेन्ड होण्यासारखं काय आहे त्यात?
सिंजी, ते बरोबर बोलत आहेत.
सिंजी, ते बरोबर बोलत आहेत. समजा देव ही संकल्पनाच नसती तर आस्तिक नसते, आस्तिक नसते तर नास्तिक कुठुन आले असते.
नवीन Submitted by नानाकळा on 3 October, 2017 - 22:16
>>>>>आधी नास्तिकवाद होता हो! आस्तिकता प्रगत (?)मेंदूचा कल्पनाविलास आहे.माणुस रानटी अवस्थेत असतानाचि भित्तीचित्रे सापडतात,काय आहे त्यात ? प्राणि पक्षी वेली यांची चित्रे आहेत पण देव नावाचं काहीच नाही.त्यामुळे मानव बायडीफॉल्ट नास्तिक आहे.आस्तिकता नंतर जन्मला आली आहे.
जर कुणाला आपण आस्तिक आहोत
जर कुणाला आपण आस्तिक आहोत म्हणजे आपला आय् क्यू कमी आहे अथवा आपण नास्तिक आहोत म्हणजे आपला आय क्यू जास्त आहे असे वाटत असल्यास:
भारीच हा मा पृ. लाइक दॅट!!!
भारीच हा मा पृ. लाइक दॅट!!!
देव, आस्तिकता इ. सर्व मनाचे
देव, आस्तिकता इ. सर्व मनाचे खेळ आहेत. अति विचार करून जरा भरकटल्यासारखे झाले की असे अचाट विचार डोक्यात येतात.
मी फक्त एव्हढेच मानतो की नीट वागावे - षड्रिपूंना काबूत ठेवावे, होता होईतो दया, क्षमा, दान, परोपकार, अहिंसा या तत्वांचे पालन करावे.
हे जर विसरायला होत असेल तर अधून मधून जरा जगातून लक्ष काढून घेऊन, पाच दहा मिनिटे चिंतन करावे की काय केल्याने मा़झे आयुष्य सुखसमाधानाचे नि आनंदाचे जाईल. मग त्याला ध्यान म्हणा, देवाची प्रर्थना म्हणा, काही म्हणा. आस्तिक असा किंवा नसा. कुण्णाला काSSहीहि फरक पडत नाही. तुम्हाला स्वतःला जे काय बरे वाटेल ते समजा.
Theist and atheist
Theist and atheist
यापैकी काय आस्तिक आणि काय नास्तिक? मराठी भाषाण्तर प्लीज
बरं आयु क्यु कमी जास्त असतो
बरं आयु क्यु कमी जास्त असतो म्हटल्याने कमी असणारा लगेच मतिमंद मूर्ख वगैरे ठरत नाही की जास्त असल्याने लगेच आइन्स्टाईन होत नाही. आस्तिकांनी इतकं ऑफेन्ड होण्यासारखं काय आहे त्यात?
>>>>
सिरीअसली? यात ऑफेन्ड होण्यासारखे काहीच नाही असे तुम्हाला खरेच वाटते?
आस्तिक गटाचा सरासरी आयक्यू कमी असतो आणि नास्तिक गटाचा सरासरी आयक्यू तुलनेत जास्त असतो असे ऐकल्यावर मी जर आस्तिक असतो तर मला नक्कीच ते खटकले असते. भले मग फॅक्ट जे काही असेल ते असेल. एखद्याचा आयक्यू काढणे म्हणजे माझ्यामते तरी अक्कल काढणे. काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा.
नास्तिक हा १०० टक्के कधीही
नास्तिक हा १०० टक्के कधीही नास्तिक नसतो असे एक वाक्य कुठेतरी वाचलेले. अस्तिक या संकल्पनेशिवाय नास्तिक जन्मालाच येत नाही,
>>>>
हे असे फिलॉसॉफिकल वाक्य आहे की यात तुम्ही काहीही टाका. चालून जाईल
लहानपणापासून देव धर्मावर
लहानपणापासून देव धर्मावर विश्वास ठेवायला सांगणे हे चाईल्ड ॲब्युज आहे असे रिचर्ड डॉकिन्स म्हणतात
>>>>>
मी तरी माझ्या मुलांना देवासमोर हात जोडायला शिकवेन. मला वाटते या मार्गाने संस्कार लावायला सोपे पडते. त्यानंतर त्यांना जेव्हा अक्कल येईल तेव्हा ते आपले आपण ठरवतीलच. अन्यथा त्यांच्या सोबतचे मित्र देवाच्या पाया पडत आहेत आणि आपण त्यांना देवबिव सारे झूठ आहे सांगणार, ते देखील त्या वयात जे त्यांना स्वत:ला देव खरा की खोटा हे समजायची अक्कल आली नाहीये. अश्याने मुलांचा गोंधळ वाढण्याचीच शक्यता आहे. उद्या त्यांना कोणी विचारले तू का नाही देव मानत तर त्यांना ते स्वत:च्या अकलेने सांगता यायला नको का?
सिरीअसली? यात ऑफेन्ड
सिरीअसली? यात ऑफेन्ड होण्यासारखे काहीच नाही असे तुम्हाला खरेच वाटते?
आस्तिक गटाचा सरासरी आयक्यू कमी असतो आणि नास्तिक गटाचा सरासरी आयक्यू तुलनेत जास्त असतो असे ऐकल्यावर मी जर आस्तिक असतो तर मला नक्कीच ते खटकले असते. भले मग फॅक्ट जे काही असेल ते असेल. एखद्याचा आयक्यू काढणे म्हणजे माझ्यामते तरी अक्कल काढणे. काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. >>>>
जाऊदे हो ऋन्मेष!
जेथे समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महायोगी अरविंद इ. 'असामान्य' आस्तिकांचा कमी आयक्यू काढला जातो, तेथे आम्ही 'सामान्य' आस्तिक किस झाड की पत्ती? चालायचंच... पाडा अजून कीस..
>>> आपल्याला जी कला येते, जे
>>> आपल्याला जी कला येते, जे सुचते, जे स्फुरते, ते सारे गॉड गिफ्ट म्हणजे देवाची देणगी आहे असे समजण्याकडे कल असतो. <<<< ऋनमेश, छान विवेचन
तुम्चाचि आयडि हॅक झालीये काअ?
लहानपणापासून देव धर्मावर
लहानपणापासून देव धर्मावर विश्वास ठेवायला सांगणे हे चाईल्ड ॲब्युज आहे असे रिचर्ड डॉकिन्स म्हणतात ते खरे असल्याचे वरील प्रतिसाद वाचून पटते. हॅड एनफ???? >>> हे वाक्य रिचर्ड यांनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात म्हटलेले. मुलांना धर्माचे शिक्षण देणे हे सर्वात जास्त घातक आहे असे काहीसे. इथली चर्चा तितकी खोल नाही त्यामुळे हे वाक्य येथे काही कामाचे नाही.
Pages