Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2017 - 01:57
अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे
भक्त्तांसी करावे, थोडे सूज्ञ II १ II
अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II
कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II
अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II
अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती
जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II
अगा हे विकटा, साथ नवसाची
करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II
विघ्नराजेंद्रा रे, जल आणि वात
दोन्ही प्रदूषित, कैसे झाले II ७ II
अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची
जाणीव भक्तांची, वाढवावी II ८ II
अगा भालचंद्रा, वर्षूदे करुणा
सकळ जनांना, तृप्त करी II ९ II
अगा विनायका ,बुद्धीचा तू देव
भक्तांना वैभव , बुद्धीचे दे II १०II
अगा गणपती , थोर तुझी कीर्ती
अंतरीची शांती , देई भक्ता II ११ II
अगा गजानना , टिळकां समान
दुजा लोकमान्य, धाड आता II १२ II
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अतिशय सुंदर ! अप्रतिम शब्दात
अतिशय सुंदर ! अप्रतिम शब्दात छान उद्बोधन !
अगा गजानना , टिळकां समान
दुजा लोकमान्य, धाड आता II १२ II
खुप छान, आवडली
खुप छान, आवडली
दत्तात्रयजी, प्रतिसादाबद्दल
दत्तात्रयजी, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
सुरेख कविता!
सुरेख कविता!
अतिशय सुरेख कविता..अप्रतिम
अतिशय सुरेख कविता..अप्रतिम शब्द!!
VB, प्रतिसादाबद्दल आभार !
VB, प्रतिसादाबद्दल आभार !
खूप सुंदर.
खूप सुंदर.
अक्षय, आपल्या दिलखुलास
अक्षय, आपल्या दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
आवडली।
आवडली।
जिज्ञासा, आभार!
जिज्ञासा, आभार!
सुंदर!
सुंदर!
मनीमोहोर, मंजूताई, मेघा. -
मनीमोहोर, मंजूताई, मेघा. - आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
अनंत यात्री आपल्या कविता मला
अनंत यात्री आपल्या कविता मला नेहेमीच आवडतात. ही विशेष आवडली.
छान आहे कविता
छान आहे कविता
anjut, thanks for your
anjut, thanks for your feedback !
कविता आवडली.
कविता आवडली.
अप्रतिम रचना..
अप्रतिम रचना..
सोप्या शब्दांतलं अतिशय
सोप्या शब्दांतलं अतिशय प्रभावी उद्बोधन!
खुप छान आहे. आवडली.
खुप छान आहे. आवडली.
जाई, ऑर्किड, सायुरी, सस्मित-
जाई, ऑर्किड, सायुरी, सस्मित- आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
उत्तम जमलीये.
उत्तम जमलीये.
Rahul, thanks for your
Rahul, thanks for your comments!
Piyoo, thanks for your
Piyoo, thanks for your comments!
वा
वा
सुंदर आवडली
सुंदर आवडली
गोदेय, मि. पंडित- आपल्या
गोदेय, मि. पंडित- आपल्या प्रतिसादांबद्दल आभार!
काय बोलू? केवळ अप्रतिम !!
काय बोलू? केवळ अप्रतिम !!
अगा गजानना , टिळकां समान
अगा गजानना , टिळकां समान
दुजा लोकमान्य, धाड आता II १२ II
तथास्तु! क्या बात है..अप्रतिम रचना...
झुलेलाल, सनव आपल्या
झुलेलाल, सनव आपल्या प्रतिसादां बद्दल मनःपूर्वक आभार !
आवडली
आवडली
Pages