"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टोरी अपेक्षित आहेच. पण यात नावीन्य हेच आहे की एक सामान्य स्त्री जी पूर्णपणे खचलीय तिला ती समजतेय ते खरे नसून प्रत्यक्ष सत्य वेगळे आहे कळल्यावर ती चवताळून उठते व सत्य शोधायला ती कुठल्याही थराला जाऊ शकते हे दाखवणे. आशीषला जे कळले ते तितके धक्कादायक नसावे तर त्यात गुंतलेल्यांची यादी खूप मोठी असावी व ती बाहेर येणे जास्त धक्कादायक असावे आणि म्हणून त्याला संपवणे गरजेचे पडले असावे. अजून 3 पात्रांची एन्ट्री व्हायची आहे.

उपवन परिसरातलं वरवर साधंसं ८-१० रूम्सचं बी/सी ग्रेड हॉटेल होतं आणि त्याच्या खाली बेसमेंटमध्ये तब्बल २००+ खोल्या, (एसी, इतर सर्व सोयीसुविधांसकट) पोलिसांना सापडल्या होत्या. तेव्हा पोलीसही चक्रावले होते. आजकाल त्या केसबद्दल पेपरमध्ये काही छापून येत नाही.>> तेच आठवलेलं काल बघताना

इथला धागा वाचून गेले 3-4 दिवस सर्व एपिसोड्स पाहिले ओझी वर.. जबरदस्त आहे मालिका आणि सस्पेन्स...काही ठिकाणी रागिणी साठी तर काळजाचा ठोका चुकला होता.. अरे ही पकडली जाते की काय..
सलग भाग बघायला मजा आली.. आता उद्यापासून रोजच्या भागाची आतुरतेने वाट बघावी लागेल...
पुढील भागात रागिणी स्वतः न्यूज देणार आहे.. दिस इज सो रिस्की..!

स्पाॅईलर अलर्ट.
राहावत नाहीये म्हणून लिहीतोय. आजच्या एपिसोडमध्ये मुक्ताचे डोके फिरले आहे का? वेड्यासारखी वागली आज.

बघायला मिळाला नाहीये, उद्या बघेन. स्पॉईलर अलर्ट देऊन लिहिता का कोणी काय झालं ? उत्सुकता वाटत्ये.

हो सुजा. कालपासून लललो दाखवताहेत अकरा वाजता आणि मग अंजली. रूद्रमचा रिपीट रात्री किती वाजता असतो काय माहित

हो ना, मी अकरा वाजता बघते हल्ली. एनिवे माझा टीव्हीचा वॉल्युम बिघडलाय म्हणून सध्या ओझीवर बघतेय.

११ वाजताच पुनर्प्रसारण बंद केलं कि काय ? >> रात्री 12.30 ला आहे रिपीट,प्राईम टाइम चा trp कमी होऊ नये म्हणून बंद केला असावा 11चा स्लॉट

चांगला झाला आजचा भाग. रागिणीने सगळे सोपे केले पोलिसांसाठी. फक्त ती कसा सूड घेणार ते पाहू आता.

थरारक एपिसोड होता आजचा. सुन्न व्हायला झालंय.
मुक्ता चे काम नेहेमीप्रमाणे दमदार ! ह्यानंतर इतर सीरिअल पाहायची अजिबात इच्छा होत नाही .
मुक्ताने समजून उमजून अडचणीत टाकलेय स्वतःला ...!

वाटलेली भीती(त्या) खरी ठरली.

१. तिने वेड्यासारखे भावनेच्या भरात जास्तीचे डिटेल्स दिले.
२. सातवच्या मुलीने तिला ओळखले. आता रागिणी सदाच्या रडारवर पण आली.
३. मिठबावकरला (त्याच्या माणसाला) लक्षात आलंय की रागिणीला जरा जास्तच माहिती आहे आणि तिला लवकर संपवणे गरजेचे आहे.

ओझीवर मिठबावकर नाही दिसला. त्या शेजारच्याचे (आ.कु.) बाबापण तिथे जात होते का, गायब असतात अधूनमधून ते.

मुक्ता उगाच जास्त सांगतेय हे चुकंच आहे पण फार टची वाटलं तिचं ते सांगणं, डोळ्यातून पाणी आलं.

अ सा चा मेव्हणा खरंच प्रामाणिक आहे. छान तपास करतोय. शोभाताई म्हणून नाव येतंय समोर त्या मुलींकडून. मुक्ताने ज्यांना खेळणी नेऊन दिली त्यांचं नाव काय होतं. कोणीतरी संस्थेची बाई यात इन्वॉल्व्ड आहे. खूप मोठं रॅकेट असणार अर्थातंच. ते भाऊ म्हणून नेते कोण होते त्यांचं नाव आज सारखं येत होतं. तेही असणार की काय.

आजच्या एपिसोडमधे मिठबावकर नव्हता. मात्र चंदूदादांनी रागिणीचं बातमीपत्र ऐकलं आहे.
अ सा चा मेव्हणा चांगला पोलीस आहे हे रागिणीच्या लक्षात आलं आहे. ती त्याला सॉरी तर म्हणतेच , शिवाय आता ती त्याला ह्या केस संदर्भात आणखी माहिती पुरवतीय. म्हणजेच तिचा स्वतंत्र तपास सोडून ती पोलीसांच्या मदतीनी तिचा तपास चालू ठेवणार असे संकेत असावेत. त्यामुळे कदाचित संशयाची सूई तिच्याबाजूला न वळण्याची शक्यता पण वाढते.

सातवची बायको भावाला कदाचित सांगणार नाही. ही रिपोर्टर बाईच आहे, त्यासाठीच ती घुसलेली असे वाटेल तिला हे एक व तीला सध्या तिथून लाम्ब निघून जायचे, त्या घाईत ती आहे. नवऱ्याबद्दल जे बाहेर आलेय ते जास्त धक्कादायक आहे. हे रिपोर्टर घरी येऊन पोचले तर निघणे कठीण होईल हे माहिती आहे. बघू काय होते ते. छायाताई हे एक नाव आले पुढे. अनाथालयाशी संबंधित असेल ती.

अनाथालये व आश्रमशाळा संबंधित इतके लैगिक गुन्हे बाहेर आलेले आहेत, किती विकृत माणसे भरलेली आहेत जगात!! आणि कितेक वेळा तिथल्या स्त्रिया ज्यांच्यावर मुलांची जबाबदारी असते त्याच ह्या कृत्यात मदत करत असतात. सबंधित मुलांचा विचारही करवत नाही. आधीच अनाथपणाची तलवार डोक्यावर, तो एक ट्राउमा त्यांना असतो, त्यात जिथे विश्वासाने डोके टेकवायला जावे तिथे हे असले प्रकार. कसले आयुष्य जगतात ही मुले.

सातवच्या मुलगी सांगणार आहे की मामाला. त्याला तिची बाजू कळली तर दोघं मिळून शोध घेतील कदाचित..
रागिणी अ सा बद्दल बोलत असताना तो वाईट माणुस होता वगैरे तरी त्याच्या बायकोला राग, िचड आलेली दिसली नाही. आपल्या नवर्या बद्दल हि बाई ईतकं वाईट कसं बोलतीये, हे खोटं आहे वगैरे. किती शांत होती ती बातम्या ऐकताना.

११ चा रिपीट टेलिकास्ट बंद केला ? १२. ३० दाखवताहेत . हुशार आहेत झी वाले त्यांना ९.३० चे प्रेक्षक गमवायचे नाहीयेत.
माझ्या मते भले सातव च्या मुलीने तिला ओळखले असेल तरी ती पोलिसांना सांगेल ( का सांगितले ) मी चॅनल ची क्राईम रिपोर्टर आहे. सातव त्यांच्या बद्दल संशय होता म्हणून तिने " मी सातव च्या सीएची असिस्टंट आहे असं मुलीला सांगितलं " असं काही तरी . समांतर ती तिचा ( किव्वा चॅनल चा) तपास चालूच ठेवेल . अगदी तपासाच्या शेवटच्या स्टेज मध्ये ती पोलिसांना गुन्हेगार म्हणून सापडू शकते

अंदाज सगळेच बरोबर वाटताहेत, बघू काय होते ते पुढे.

हो, शोभाताई. अजून 3 पात्रे यायचीत ज्यात 1 स्त्री होती, ती ही शोभाताई बहुतेक. आता विवेक लागू व किरण करमरकर कुठल्या रोल मध्ये दिसताहेत ते पहायचे.

काल रागिणीने मंदारला चांगलेच गप्प केले. ती सायको झाली की कोणाचेच ऐकत नाही. बिचारा मंदार!!

पुढच्या भागात आहे मुलगी मामाशी बोलतेय व मिठबवकाराच्या माणसाला कळते ते. आता रागिणीला पोलीस व गुन्हेगार दोघेही एकत्र पिडणार.

काल दाखवला तो मिठबावकरचा माणूस नव्हे. तो माणूस म्हणजे सातव आणि त्याच्या वरच्या माणसांमधली एक कडी आहे. सुरूवातीच्या एका एपिसोडमध्ये हा माणूस दाखवला होता. सातव त्याच्याशी फोनवर बोलतानाचा एक सीन होता. (त्या माणसाचं काम करणारा कलाकार म्हणजे `रेगे' सिनेमातला `एम भाई' आहे.)

एकदम भारी झाला कालचा भाग. रागिणी भरपूर काही सांगून बसली. आता त्या गुन्हेगारांना कळणार की ही आशिष ची बायको आहे. आणि त्या पोलिसांनाही प्रश्न पडेल की बाबू, छाया, किर्तीकर यांच्या खुनाचा अभय शी संबंध हिला कसा माहित? आता रागिणी ची ओळख लपून रहाणार नाही. तिला ह्याच प्रश्नांची उत्तरे चॅनेल ला पण द्यावी लागतील.

रागीणीने खूप मूर्खपणा केलाय किंवा खूप धूर्त चाल खेळली आहे. मला दुसरी शक्यता जास्त वाटते आहे.

अ.सा. मेल्यामुळे तिचा तपास खुंटला होता. आता तिने जाहीरपणे हिंट्स दिल्या आहेत की तिला बरीच माहिती आहे. त्यामुळे ती माणसे तिचा काटा काढायला तिच्या समोर येतीलच. कदाचीत त्यामुळेच ती अचानक मंदारकडचा माईक स्वतःकडे घेते. अर्थात ती हल्ल्याचा प्रतिकार कसा करणार हा मोठा प्र्श्न आहेच.

Pages