Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा छान वेगळा पॉइंट.
हा छान वेगळा पॉइंट.
सुहासचा ह्या सगळ्यात महत्वाचा
सुहासचा ह्या सगळ्यात महत्वाचा रोल असेल कदाचित..
रागिणी जेव्हा शिवाच्या घरी जाते तेव्हा बाईक वरुन एक मुलगा येताना आणि जाताना दाखवलाय तो सुहास असेल का?
रागीणीने खूप मूर्खपणा केलाय
रागीणीने खूप मूर्खपणा केलाय किंवा खूप धूर्त चाल खेळली आहे. मला दुसरी शक्यता जास्त वाटते आहे.>>>>>>> ती impulsive आहे, धूर्त वगैरे नाहीय. तिने कमेऱ्यासमोर यायला नकारच दिलेला, एडिटर व मंदार दोघांनाही. पण अचानक तिला वाटते की हे सगळे घडायला तीच कारण आहे व त्यामुळे बातमी तिनेच देणे गरजेचे आहे. कमेऱ्यासमोर जे बोलते तेही आधी ठरवून नाही तर मनातला उद्वेग बाहेर पडतो.
कमेऱ्यासमोर जे बोलते तेही आधी
कमेऱ्यासमोर जे बोलते तेही आधी ठरवून नाही तर मनातला उद्वेग बाहेर पडतो. .हो ना त्यापुढ्चा परिणाम काय होईल हा विचारही करत नाही ती..
सुहासचे वडील "अनुराधा" मधे
सुहासचे वडील "अनुराधा" मधे जाणारे असतील आणि त्यांनी काही पाहीले \ ऐकले असेल का ?
सुहासचे वडील "अनुराधा" मधे
सुहासचे वडील "अनुराधा" मधे जाणारे असतील आणि त्यांनी काही पाहीले \ ऐकले असेल का ?
>>> पॉईंट आहे! तसेही ते दारूबाज दाखवलेच आहेत.
हो मलाही वाटतंय पण मला सुहास
हो मलाही वाटतंय पण मला सुहास नाव आठवतंच नव्हतं, म्हणून मी आ. कु. चे बाबा लिहीलं होतं माझ्या पोस्टमधे.
तसेही ते दारूबाज दाखवलेच आहेत
तसेही ते दारूबाज दाखवलेच आहेत..गेस बरोबर असू शकतो.
पण कुणी तरी सांगा ना की.. रागिणी जेव्हा शिवाच्या घरी जाते तेव्हा बाईक वरुन एक मुलगा येताना आणि जाताना दाखवलाय तो सुहास असेल का?
तो स्पेसिफीक एपिसोड परत
तो स्पेसिफीक एपिसोड परत बघायला लागेल, मलातरी.
इतके उघडउघड दाखवले आहे म्हणजे
इतके उघडउघड दाखवले आहे म्हणजे कथेत काहीतरी खुप मोठे होणार आहे ज्यातुन रागिणी सध्यातरी वाचेल >> हेच जास्त शक्य वाटतंय, आज सदा रागिणीला भेटून ती ज्या ज्या लोकांबद्दल त्याबद्दल विचारेल असं वाटतंय
सदा प्रामाणिक दाखवलाय
सदा प्रामाणिक दाखवलाय त्यामुळे तो सत्य शोधण्याचा प्रयत्न करेल, असं वाटतंय. नाहीतर त्याचाच गेम नाही झाला म्हणजे बरं.
किरण करमरकर वकील असणारे वाटतं. कारण तो वकीलाचा डगला घालून दाखवलाय.
सुखी१२३, मी ही मालिका
सुखी१२३, मी ही मालिका भारताबाहेरुन apalimarathi.com वर बघते.>>>
धन्यवाद शुगोल
बाप रे...रागिणी आता स्वतःला
बाप रे...रागिणी आता स्वतःला MPD multiple personality disorder आहे असं चित्र निर्माण करतेय का काय??
काय झालं ? मुलीसमोर बघता येत
काय झालं ? मुलीसमोर बघता येत नाही त्यामुळे ओझी चा आधार, पण उत्सुकता बसू देत नाही स्वस्थ.
रागिणी एकदम कुल. सुमडीत
रागिणी एकदम कुल. सुमडीत राजीनामा देऊन बाहेर पडते. मोहन आगाशेना सगळं सांगते.
विवेक लागु वाईट आणि कि क
विवेक लागु वाईट आणि कि क चांगला
मोहन आगाशेंना पण ती सगळंच
मोहन आगाशेंना पण ती सगळंच नाही सांगत . त्याची पण दिशाभूल करतेच आहे. तीच नीट ठरत नाहीये खर सांगायचं का नाही . आधी म्हणते समजा मी खून केलाय असं तुम्हाला म्हटलं तर? मग म्हणते नाही ती कोणी तरी वेगळीच बाई होती. म्हणजे तिला सांगायचं आहेच कि मीच खून केलाय पण "खून करणारी पूर्वीची रागिणीं नव्हती ती माझ्या अंगात संचारलेली वेगळीच रागिणीं होती " असं काही तरी तिला सुचवायचं आहे . त्यामुळे डॉक्टारांना हि ती कन्फयुज करून सोडते
या सगळ्यात डॉक्टरांचा हात आहे
या सगळ्यात डॉक्टरांचा हात आहे असंच वाटतंय, कारण काल त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली अंधुकशी अस्वस्थता दिसत होती. एरवी मानसोपचार तज्ज्ञ स्थितप्रज्ञ असतात. मोहन अगाशें चा , मुक्ता चा अभिनय नेहेमीप्रमाणे अप्रतिम. कालचा आई सोबतचा सिन पण मस्त, वाटतच नाही अभिनय चालू आहे, मुक्ता म्हणते डोकं चेप, हे इथे side ला, एकदम घरेलू संवाद.
कालचा आई सोबतचा सिन पण मस्त,
कालचा आई सोबतचा सिन पण मस्त, वाटतच नाही अभिनय चालू आहे, मुक्ता म्हणते डोकं चेप, हे इथे side ला, एकदम घरेलू संवाद >> अगदी अगदी संवाद तर छान आहेतच पण कलाकारांचा अभिनय पण एकदम स्वाभाविक
कालचा भागही छान झाला. एडिटरचा
कालचा भागही छान झाला. एडिटरचा संताप, अभिनय मस्त!
सायलीचाही अभिनय मस्त. ती जेव्हा मामाला बिलगून रडू लागते तेव्हा टचकन पाणी आलं डोळ्यात..
पुढच्या भागात पोलिसांना कळतं.. ती आशिष ची बायको आहे ते..
पण तो पोलिस म्हणतो.. ती जे बोलतेय ते बरोबर आहे.. पण हे हिला कसं माहित.... म्हणजे पोलिसांना काय माहित ही बरोबर बोलतेय ते? खूनांचे कनेक्शन कुठे सिध्द झालेत..
ती पावरफुल माणसं का गप्प बसलेत अजून.. शिवा, अभय यांचा खून.. कोणत्या तरी अज्ञात बाईचा प्रायव्हेट नंबरवर फोन, टीवी वर आलेली बातमी एवढं होऊनही ते शांतच..!
आता सगळ्यात पहिले रागिणीने तो विग, बंदुक आणि अभय चा फोन फेकून द्यायला हवा..
मला नाही वाटत की रागिणी
मला नाही वाटत की रागिणी मुद्दाम असे करतेय. लहानपणी नाटकात काम करताना ती प्रेशरखाली येऊन सगळे विसरायची. तिच्या म्हणण्यानुसार ती ती राहायची नाही, तसेच आता झालेय तिचे. तिने जे काही केलेय ते प्रेशरखाली येऊन केलेय. मानसिक ताण खूप आला व तिच्या हातून घटना घडल्या. आता डॉक्टरांच्या समोर बसून ते सांगताना हे सगळे आपणच केले यावर तिचा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये. ते करणारी रागिणी वेगळी, ही स्वतःला तिच्याशी identify करू शकत नाहीय. तिला स्वतःलाच स्वतःचे विचार, वागणे, दिसणे सगळे वेगळे वाटतेय, घरेलू रागिणीशी रुद्रम रागिणीची सांगड घालणे तिलाच अवघड झालेय. तिला बहुतेक या ताणामुळे अजून त्रास होणार असे वाटतेय. आईच्या अल्झेमरचा काही संबंध तिच्याशीही जोडता येईल.
डॉक्टर सामील आहेत की नाही याबद्दल मला तरी काही सांगता येत नाही. मला वाटत नाही ते यात असावेत.
पॉवरफुल गप्प आहेत की कसे हे आपल्याला कसे कळणार? आपल्याला ते कोण आहेत हेच माहीत नाही. आपल्याला फक्त रागिणी माहीत आहे आणि रागिणी चे अस्तित्व त्यांना कालच कळले. त्यातही त्यांनी सबुरीचा निर्णय घेतलाय. तिला लगेच गप्प नाही करायचे बोलला ना फोनवरचा पलीकडचा बाबा , जो कोण ते आपल्याला अजून माहीत नाही.
कोणत्या तरी अज्ञात बाईचा
कोणत्या तरी अज्ञात बाईचा प्रायव्हेट नंबरवर फोन >>>
सातवच्या डोक्यावरची माणसं आणि सातवची बिटकॉईन्समधली गुंतवणूक-मिठबावकर हे (अजूनतरी) वेगवेगळे ट्रॅक्स आहेत. रागिणीने मिठबावकरला पब्लिक बूथवरून फोन केला. मिठबावकरचा सातवच्या डोक्यावरच्या माणसांशी संबंध आहे अथवा नाही हे अजून कळलेलं नाही.
बरोबर. मिठबावकर हा प्रायव्हेट
बरोबर. मिठबावकर हा प्रायव्हेट स्विस बँक आहे

प्रायव्हेट नंबरवर फोन..हे
प्रायव्हेट नंबरवर फोन..हे त्यांच्यासाथी सिरीयस असू शकतं..कारण राँग नंबर चाही चान्स नाही..ती म्हण्ते तुमचा नंबर सेव आहे माझ्याकडे.. त्याला समझतं..ती खोटं बोल्तेय..कारण नंबर फक्त ५ जणांनाच माहित आहे..
खरं मिठबावकर च्या लक्षात
खरं मिठबावकर च्या लक्षात यायला हवं की ५ पैकी नुकताचं गेलेला अभय सातव आहे. पुन्हा त्याचा खून झालायं, म्हणजे ह्या फोनचा त्याच्याशी संबंध असणार.
पण स्वीस बॅंक पोलीसांकडे जाऊ
पण स्वीस बॅंक पोलीसांकडे जाऊ शकत नाही कारण तो बेकायदेशीर आहे. आकु, त्याचे वडिल, डाॅॅक्टर आणि राची आई यांचा काही सहभाग नाही असे वाटते. असाची बायको म्हणते की तो असं करू शकत नाही आणि कोणीतरी हे करून घेतले आहे, जसं काही तोही अल्पवयीनच आहे. रागिणीने जाताना मंदारला टोमणा मारला का, मौलिक सल्ले वगैरे.
ह्या मालिकेत सगळेचं संशयास्पद
ह्या मालिकेत सगळेचं संशयास्पद वाटायला लागले आहेत आता. दर वेळी रागिणी किल्लीने घर उघडून येते तेव्हा मला घरात कोणीतरी तिची वाट बघत असेल \ तिच्या आईला मारहाण झाली असेल असं का कोण जाणे वाटतं राहतं.
ओझी वर "पुढील भागात" दिसत नाही त्यामुळे आज काय होणारे त्याचा अंदाज नाही येत
ओझी वर "पुढील भागात" दिसत
ओझी वर "पुढील भागात" दिसत नाही.. दिसतं की..
मी पण ओझी वरच बघते..
ह्याचा दुपारी रीपीट किती
ह्याचा दुपारी रीपीट किती वाजता असतो
पुढील भगात नाही दिसत ओझीवर.
पुढील भगात नाही दिसत ओझीवर.
Pages