"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण करमरकर कोण? अजून त्याची एंट्री झालेली नाहीये ती कदाचित सगळ्यात शेवटच्या काही एपिसोड मध्ये असेल तोपर्यत एक एक कडी पार करत रागिणी त्याच्या पर्यंत पोचेल त्याला बराच वेळ लागेल . तोच या सगळ्याच सूत्रधार असावा किव्वा आणखीन कोणी तरी . अजून त्या विवेक लागूंची पण एन्ट्री व्हायची आहेच Happy

निरीक्षण छान आहे निधी. पण माझ्यामते या सगळ्या रेकॉर्डींग्स मध्ये यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या लोकांची नावं येणं अपरिहार्यच आहेत. मग ते कीर्तिकर असोत वा अभय सातव वा चंदुदादा वा ते मानसोपचारतज्ञ. जेव्हा केव्हा ती क्लिप / व्हिडीओ रेकॉर्डिंग कोणाच्याही हाती लागेल तेव्हा (ट्रेलरमध्ये रागिणीचं स्टेटमेंट होतं तसं) सगळं संपलेलं असेल ऑलरेडी. त्यावेळी हे उरलेले सगळे फार महत्वाचे राहणार नाहीत कोणाहीसाठी.

जर चंदूदादांची या रॅकेटच्या मास्टर माईंड किंवा पोलिसांच्या दृष्टीने काही न्यूसंस व्हॅल्यू असती.. तर संदीप पाठकने बाबूच्या बायकोसोबत चंदू दादांनाही उडवलं असतं किंवा पोलिसांनी त्यांच्या घरात खून झालाय आणि त्यांच्याकडे त्याचं काहीही नीट स्पष्टीकरण नाहीये (बाबूची बायको अशी घरात कशी राहायला आली, चंदू दादांकडेच का आली, पिस्तुल कुठून आलं, बाळ कुठे आहे) यासाठी त्यांना सहज अटकही केली असती.

जेव्हा केव्हा ती क्लिप / व्हिडीओ रेकॉर्डिंग कोणाच्याही हाती लागेल तेव्हा (ट्रेलरमध्ये रागिणीचं स्टेटमेंट होतं तसं) सगळं संपलेलं असेल ऑलरेडी. त्यावेळी हे उरलेले सगळे फार महत्वाचे राहणार नाहीत कोणाहीसाठी.>> असं नाहीये ते.
कदाचित रागिणी मेलेली असेल, कदाचित सगळं संपलेलं असेल (रागिणीने सगळ्यांना शोधून मारलेलं असेल/आशिषला मिळालेली माहिती जगासमोर आणलेली असेल), किंवा तिला पोलिसांनी पकडलेलं असेल.
या कोणत्याही शक्यतेत चंदूदादांचं नाव येणं योग्य नाहीच. कारण तिला मुख्य मदत चंदूदादांनीच केलीय हे सिद्ध होतंय त्यामुळे आणि म्हणूनच चंदूदादांना त्यांचं नाव कुठेही यायला नकोय.

जर चंदूदादांची या रॅकेटच्या मास्टर माईंड किंवा पोलिसांच्या दृष्टीने काही न्यूसंस व्हॅल्यू असती.. तर संदीप पाठकने बाबूच्या बायकोसोबत चंदू दादांनाही उडवलं असतं >> मुळात यामागे रागिणी आहे हेच चंदूदादा सोडून कोणालाही माहित नाही. मग चंदूदादांची न्यूसंस व्हॅल्यू या लोकांच्या कशी काय लक्षात येणार. ते रागिणीला मदत करतायत हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हाच त्यांचा रोल किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल.

पोलिसांनी त्यांच्या घरात खून झालाय आणि त्यांच्याकडे त्याचं काहीही नीट स्पष्टीकरण नाहीये (बाबूची बायको अशी घरात कशी राहायला आली, चंदू दादांकडेच का आली, पिस्तुल कुठून आलं, बाळ कुठे आहे) यासाठी त्यांना सहज अटकही केली असती.>> सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली होती त्यांनी पोलिसांना. पिस्तुल चंदूदादांनीच तिला दिलेलं पण ते पोलिसांनी खोदून विचारलंच नाही त्यांना. आणि छायाचं बाळ चंदूदादांकडेच आहे, एकदा रागिणी त्यांना भेटायला येते तेव्हा ते त्याला खायला भरवत असतात.

कांदेपोहे यांनी त्यांचा एपिसोड बघून होईपर्यंत हा धागा बघणार नाही असे सांगितल्यामुळे स्पॉयलर फोडतेय.

आजचा भाग बऱ्यापैकी फास्ट होता नै?

तरी समहाऊ पोलीस असून सातवच्या मेव्हण्याने लक्षात न घेतलेल्या काही शक्यता बघून (खुनी बाईचे वेषांतर करण्याची शक्यता, सातवच्या मुलीने घरात शिरलेल्या बाईची माहिती देऊनही त्याकडे फार लक्ष न देणं, फोटोवर क्रॉस आहेत म्हणजे यांचा काटा काढला असावा ही शक्यता) आश्चर्य वाटलं. आपण बोललो तसं स्केच बिच पण बनवलं नाही सातवच्या मुलीकरवी.

आता मिठबावकर रागिणीला शोधू शकतो का आणि सातवच्या बायकोला स्क्रीनवर काय दिसलं हे जाणून घेण्यात उत्सुकता आहे.

शिवाय केबिनमध्ये अजून कायकाय सापडेल? दोन वर्षांपूर्वी भेटायला आलेल्या सतीश राजवाडेच्या फोटोवरून त्याला नक्की काय फायदा होणार? त्यापेक्षा काही लेटेस्ट फोटो बघून आणि ही माणसं जिवंत नाहीत हे कळल्यावर तरी सातव काहीतरी कृष्णकृत्य करत होता हे लक्षात आलं तर बरं होईल. (अर्थात ते सीडीज बघूनही लक्षात येईल बहुतेक).

रागिणीने आईला तात्पुरतं गुंडाळलं असलं आणि सातवच्या मुलीला मेव्हण्याने सिरियसली घेतलं नसलं तरी आजच्या भागात रागिणीने पुन्हा चूक केली आहे. ती ज्या पीसीओवरून फोन करत होती तिथल्या पानवल्याला काहीतरी गडबड आहे हे व्यवस्थित लक्षात आलंय.

आजचा भाग जबरदस्त होता, बरंच काही घडलंय, आता मालिका अभय सातवच्या वरच्या लेवलला जाईल बहुतेक

आधी शिवा नंतर अभय सातवचा खून झाल्याने त्याच्या बॉसला शंका येऊन, जसा पोलिसांचा तपास सुरू आहे तसा ते लोकं संदीप पाठक करवी रागिणीला ट्रॅक करतील असं वाटतंय

मालिका अभय सातवच्या वरच्या लेवलला जाईल बहुतेक >> नक्कीच. आता अभय सातव चा मेहुणा पण या केस मध्ये इन्व्हॉल्व्ह झालाय .. आधी सातव चा वरचा बॉस एका पाठोपाठ एकाला संपवून सगळ्यांचे काटे काढत होता पण आता स्वतः सातव मेल्यामुळे या प्रकरणात सातव च्या मेहुण्याचा सहभाग असणार आहे . या आधी शिवाचा खून झाला तो पण पोलिसांच्या रेकॉर्ड ला असेल ना . त्याचा खून कोणी केला ? काय कस ? याचा पोलीस तपास करत असतील ना ? का नाही ? सातव च्या ऑफिस मधल्या केबिन मध्ये शिवाच्या फोटो वर पण फुली मारली आहे म्हणजे या माणसाचा खून झालाय आणि आपल्या मेहुण्याच्या ड्रावर मधल्या फोटोमध्येपण हा मनुष्य. ( म्हणजे शिवा ) म्हणजे अभय सातव कुठल्या तरी बेकायदेशीर धंद्यात होता हे त्याच्या मेहुण्याला नक्की कळून चुकेल . आता पुढच्या भागात बघूया

रागिणी सगळे फोन एकाच पीसीओवरून का करते. तिला कसलीच भीती वाटत नाही पण आपला जीव ईथे वरखाली होतो. मिताली तो चोरकप्पा नवरा जीवंत असताना कधीच बघत नाही हे अविश्वसनीय आहे कारण बायकांना उचकपाचक करायची ब-यापैकी सवय असते. रागिणी जेव्हा आईला तो वीग घालून दाखवते तेव्हा ती कमळाबाई घरातच असते. खून करणारी बाई अशी सरळ घरात घुसेल असं सदाला वाटत नसेल. एकंदरीत तो अॅडमीन पोलीसांपेक्षा जास्त हुशार आहे जो मोबाईल अनलाॅक करायचा मुद्दा मांडतो.

ती ज्या पीसीओवरून फोन करत होती तिथल्या पानवल्याला काहीतरी गडबड आहे हे व्यवस्थित लक्षात आलंय. >>> एक्झाक्टली पियु. मी नव-याला म्हणाले पण, ही असं काय करतेय. तो पानवाला लक्ष ठेऊन आहे तिच्यावर, त्याला संशय आलाय.

मिताली तो चोरकप्पा नवरा जीवंत असताना कधीच बघत नाही हे अविश्वसनीय आहे >>> हो ना!

त्या सीडीज बघून ती अस्वस्थ होते, भावाला फोन करते, त्यावरून आता परत ती अप्रत्यक्षपणे रागिणीला मदत करण्याच्या शक्यतेला बळकटी मिळते आहे.

सातवच्या आल्बममधल्या फुली मारलेल्या फोटोतल्या व्यक्ती कोणकोण आहेत ते इन्स्पेक्टर मेहुण्याने शोधून काढणं अपेक्षित आहे. (नाहीतर तो जसं त्याच्या हाताखालच्या हवालदारांना झापत असतो, तसं त्याच्या वरचे त्याला झापतील Proud )

तपासाचे धागेदोरे पुढे जेव्हा रागिणीपर्यंत पोचतील आणि तिच्या आईची चौकशी होईल, तेव्हा ती त्या विगबद्दल अजाणतेपणी काहीतरी उलटसुलट माहिती देऊ शकते, तिच्या विस्मरणाच्या विकारामुळे, असं काल मला वाटलं.

आणि पोलिसांच्या आधी बहुतेक मिठबावकर रागिणीपर्यंत पोचेल असंही वाटलं.

कथा आणि स्क्रिप्ट एकदम कॉम्पॅक्ट आहे. त्यामुळे बघायला मजा येतेय. नाहीतर सातवच्या बायकोला त्या सीडीज सापडण्यात महिना-दोन महिन्यांचे एपिसोडस घालवले असते Proud

हम्म।।। पोलिसांना आशिषचा फुली मारलेला फोटो मिळाला, आता त्याचे नाव गाव व घर शोधण्यात वेळ जाईल थोडा. घरही विकले गेलेय. आशिष ला शोधणे थोडे कठीण पण बाबुचा फोटो असता तर लगेच कळले असते. पण बाबू, त्याची बायको यांचे फोटो नाहीत, कीर्तिकारांचा असू शकतो.

सातवची बायको सीडी बघून भावाला फोन करतेय, भाऊ सीडी बघेल आता पण त्यातून रागिणीला मदत काशी होईल हे कळले नाही.

रागिणीने ज्याला फोन केला तो मिठबवकर नसणार. ज्याला अभय भेटून पैसे ठेवत होता तो मिठबावकर असणार, तोच ज्याने बिटकोईन बद्दल सांगितलेले. आपल्यानंतर बायकोला पैसे मिळावेत म्हणून अभय योजना करणार ना. बायकोला त्याच्या boss चा फोन देऊन काय मिळणारे .

तरी समहाऊ पोलीस असून सातवच्या मेव्हण्याने लक्षात न घेतलेल्या काही शक्यता बघून (खुनी बाईचे वेषांतर करण्याची शक्यता, सातवच्या मुलीने घरात शिरलेल्या बाईची माहिती देऊनही त्याकडे फार लक्ष न देणं, फोटोवर क्रॉस आहेत म्हणजे यांचा काटा काढला असावा ही शक्यता) आश्चर्य वाटलं. आपण बोललो तसं स्केच बिच पण बनवलं नाही सातवच्या मुलीकरवी.>>>>>>

नर्सला बोलावलंय की पोलीस स्टेशनला, तिथे जो आर्टिस्ट स्केच बनवणार आहे त्याला माहिती द्यायला. फोटोवर क्रॉस म्हणजे काटा हे आपल्याला माहीत आहे, पण फोटोतली माणसे मेलीत हे त्याला कळल्यावर त्याच्या लक्षात येईल. खुनी बाईने वेषांतर केलेय हेही त्याला नंतर कळेल जेव्हा बाहेर पडायला कुठूनही मार्ग नाही हे ठामपणे समजेल. तोवर कसे लक्षात येणार? आपण चित्र सलग बघतोय म्हणून आपल्याला कळतेय. शिवाय तो दोन्ही बाजूने तणाव ग्रस्त आहे. मेहुणा गेलाय, बहीण सतत फोन करतेय आणि वर ऑफिस ड्युटी.

त्याने सगळीकडचे फुटेज मागवले त्यात त्या गोदामाचेही येईल असे मला वाटलेले जिथे रागिणी परत नर्सला भेटते. सगळे फुटेज बघून नंतर कळेल त्याला.

रागिणीने ज्याला फोन केला तो मिठबवकर नसणार. ज्याला अभय भेटून पैसे ठेवत होता तो मिठबावकर असणार, तोच ज्याने बिटकोईन बद्दल सांगितलेले. >> त्यालाच फोन केला रागिणीने. आणि तिचं खोटं बोलणं पकडलं त्याने. कारण ती ज्या नंबरवर काॅल करते तो नंबर फक्त 5 जणांकडेच आहे, असं तो सांगतो.

बाबुचा फोटो असता तर लगेच कळले असते. पण बाबू, त्याची बायको यांचे फोटो नाहीत, कीर्तिकारांचा असू शकतो. >> अभय सातवच्या हाॅटेलातल्या पर्सनल केबिनच्या ड्राॅवरमध्यल्या अल्बममध्ये बाबू, शिवा आणि इतर कोणी लोक यांचे फुली मारलेले फोटो सापडतात की मेव्हण्याला.

अभय सातवच्या हाॅटेलातल्या पर्सनल केबिनच्या ड्राॅवरमध्यल्या अल्बममध्ये बाबू, शिवा आणि इतर कोणी लोक यांचे फुली मारलेले फोटो सापडतात की मेव्हण्याला>> शिवाचा फोटो नाही दिसला,मला वाटत ज्यांची प्रॉपर सुपारी घेतलेली त्याने त्यांचे फोटो आहेत त्या अलब्म मध्ये,शिवा,कीर्तिकर ,बाबुची बायको ह्या लोकांना ऑन द फ्लाय मारलंय, त्यांचे फोटो नसतील.

मी सिरीयल पहिल्यापासून बघत नाहीये. सातव च्या बायकोला dvd वर काय दिसतं तेच सिरीयल चं मुख्य सिक्रेट आहे का? तुम्हा रेग्युलर सिरीयल बघतात त्याना तिला काय दिसलंय ते माहीत आहे Happy
Btw, तुम्ही सगळे सिरीयल बघून इथे चर्चा करणारे सिरीयल पेक्षा जास्त इथेच interesting वाटतंय Happy

मला आठवतंय सातव शिवाला बाबूचा फोटो आहे का म्हणून विचारतो, शिवा नाही म्हणतो.
पण अल्बम मध्ये 1 फोटो 2 दा दाखवलाय जो बाबूसारखा वाटला मला.

<< चंदूदादाने रागिणीला सांगितलेलं ना की अभय सातव शुद्धीवर आल्याआल्या पहिल्यांदा त्याच्या वर जे लोक आहेत त्यांना रागिणीबद्दल सांगेल आणि ते रागिणीला संपवतील त्यामुळेच अभय शुद्धीवर येण्याच्या आधीच त्याला मारायला हवं. त्यामुळे रागिणीला हे माहित असणारचं की अभय सातव हा यातली छोटी कडी आहे आणि त्याच्या फोनमधून ती काॅन्टॅक्ट मिळवायचाच प्रयत्न करत असते. >>निधी ग्रेट पॉइंट, माझ्या लक्षात नव्हतं आलं ते.

सिरियल ३ महिनेच असल्यामुळे तो चोरकप्पा सातवच्या बायकोला सापडायला २-३ महिने घालवले नाहीयेत. लगेच सापडला.
२ वर्षांपुर्वी हा माणुस ईथे येऊन गेलाय हे बरं आठवलं त्या manager ला. शिवा व किर्तीकरांचा फोटो नव्हता त्या अल्बम मधे.

तिला कसलीच भीती वाटत नाही पण आपला जीव ईथे वरखाली होतो आणि एकंदरीत तो अॅडमीन पोलीसांपेक्षा जास्त हुशार आहे जो मोबाईल अनलाॅक करायचा मुद्दा मांडतो.>> दोन्हीला अनुमोदन.

पण त्यातून रागिणीला मदत काशी होईल हे कळले नाही.
>> सातवच्या काळ्या धंद्यांविषयी त्याच्या मेव्हण्याला कळले की पोलिसही त्यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या इतर लोकांना पकडण्याच्या मागे लागतीलच ना. इंडायरेक्टली त्यांना शिक्षा होण्याचे, ते पकडले जाण्याचे चान्सेस वाढतील. रागिणीला हेच तर हवे आहे. की सरा ज्या प्रोजेक्टवर काम करत होता ते लोकांसमोर यावे आणि दोषींना शिक्षा व्हावी.

त्यालाच फोन केला रागिणीने. आणि तिचं खोटं बोलणं पकडलं त्याने. कारण ती ज्या नंबरवर काॅल करते तो नंबर फक्त 5 जणांकडेच आहे, असं तो सांगतो.
>> बरोबर निधी. कदाचित त्या माणसाचं खरं नाव मिठबावकर नसेलही (डमी नाव घेतलं असेल किंवा सेव्ह केलं असेल).. पण तो बिटकॉईनवाला माणूस तोच आहे.

तुम्हा रेग्युलर सिरीयल बघतात त्याना तिला काय दिसलंय ते माहीत आहे >> नाही. कसलंतरी बेकायदेशीर रॅकेट आहे एवढंच माहितीये. पण नक्की ड्रग्स की तस्करी की ह्युमन ट्रॅफिकिंग की अजून काही ते काही अजून उघड झालेलं नाहीये.

Btw, तुम्ही सगळे सिरीयल बघून इथे चर्चा करणारे सिरीयल पेक्षा जास्त इथेच interesting वाटतंय
>> थँक्स. मालिका पण वेगवान आहे म्हणून मजा येतेय. इतकेच एपिसोड्स झाले तरी धागा धावतोय अगदी.

२ वर्षांपुर्वी हा माणुस ईथे येऊन गेलाय हे बरं आठवलं त्या manager ला.
>> मला ते जरा विचित्रच वाटलं. इतकी माणसं रोज बघणाऱ्या माणसाला एक रँडम 2 वर्षांपूर्वी येऊन गेलेला माणूस बरा नीट आठवतोय? आणि 2 वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या त्या एकाच माणसाचे व्हेअरअबाऊट्स तो मेव्हणा मिळवत बसणार आहे का? एक लॉजिकल विचार म्हणून तो सगळ्याच फोटोंमधल्या व्यक्तींपैकी कोणाची ओळख पटतेय का हे बघेल ना? त्यामुळे एव्हढ्याश्याने तो रागिणीपर्यंत पोहोचेल असं मलातरी वाटत नाहीये.

गुलबकावली, सॉरी.. सध्या मोबाईलवर आहे. लॅपटॉप लावल्यास अपडेट्स द्यायचा प्रयत्न करेन. शक्य असल्यास ओझीवर स्वतः बघा एपिसोड. इतके वेगवान एपिसोड्स बघायला मजा येते.

मस्त चर्चा चालू आहे.

नर्स पोलिसांकडे पोचायच्या आत तिला नाही पोचवली तर स्केच काढलं जाईल मुक्ताचं. त्यामुळे बिचारी नर्स आता.

तो प्रत्यक्ष पैसे व्यवहार करणाराच मिठ्बावकर असणार आणि फक्त पाच जणांकडे हा नं आहे म्हणाला म्हणजे अ सा शिवाय अजून चार जण असणार इन्वॉल्व्ड.

Pages