"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु व मंडळी जाऊदेत.. तुम्ही इपिसोड बघुन झाला की दुसर्‍या दिवशी तो झी किंवा ओझीवर येतो. त्यामुळे एक दिवसाचा खंड पडतोच. माझ्यासारख्या भारताबाहेर रहाणार्‍यांना (उदा. परागने पण विनंती केली) आहे. आधीच कळले तर त्यातला नेमका सस्पेंसच जातो आहे. त्यामुळे आम्ही विनंती केली होती की फोडु नका. पण तुम्हाला अगदीच रहावत नाहीये असे दिसते. त्यामुळे चालुदे. तुम्हाला रहावत नसले तर संपदाने सुचवल्याप्रमाणे निदान माझ्यासारख्यांना हा बीबी वाचणे बंद करावे लागेल.

दुसर्या दिवशी कधीपर्यंत येतो ओझीवर वगैरे? दुपारी का संध्याकाळी? १अंदाज दिलात तर तोपर्यंत थांबू. पण निदान दुसर्या दिवशीचा फ्रेश एपि दाखवायच्या आधी तरी ईथे बोललेलं चालायला हवं..

कांदापोहे, बीबी वाचणं अगदी बंद करू नका, एपिसोड बघेपर्यंत फिरकू नका इतकचं. तुमच्या वेळा माहीत नाहीत पण भारताच्या दुसर्‍या दिवशी सकाळी ओझी वर येतो बहुतेक एपिसोड. तसही ऑफिस मधे पोचेपर्यंत कोणी लिहीत नाही इथे.

रागिणीच्या आईच्या हातात पुरावा (हिंट) पडणारच आहे, रागिणीचं काय चाललय त्याचा. काय रिएक्शन असेल त्यांची?

कांपो, तू किंवा परागने वेळच्यावेळी एपिसोड बघितला आहे ते आम्हांला कसे बरे कळणार Wink असंही होऊ शकतं ना की तुला एखाद्या दिवशी अपलोड झालेला एपिसोड बघायला वेळच झाला नाहीये. मग तेव्हा इथे लिहिण्यासाठी कितीवेळ थांबायचं हे आम्हांला कसं कळणार? असंही प्रेक्षकांना ही मालिका जरा जास्तच आवडल्याने अगदी रोजच्यारोज इथे चर्चा होतेय Happy

मी फक्त समजावण्याचा प्रयत्न करतेय. उगाच किस काढतेय वाटत असेल तर सोडून द्या विषय, गणपतीचे दिवस आहेत Happy

काल इन्स्पेक्टर जेव्हा दोघींना अभय सातवच्या फोन कॉल्सबद्दल विचारतो, तेव्हा मला वाटलं होतं, की त्याची मुलगी त्या एका फोनकॉलबद्दल सांगेल, ज्यात अभय सातव म्हणालेला असतो, "अरे वा! कीर्तीकरची ऑर्डरही निघाली का? व्हेरी गूड" आणि मग तो गोड पदार्थ भरपूर खाणार, असं आनंदात म्हणतो.

त्या फोनच्या वेळी तिथे टेबलावर त्याची मुलगीही बसलेली असते ना?

आणखीन एक . रागिणी फोटो काढून त्यात काय शोधतं असते. ? रागिणीच्या आईला कपाटात लपवून ठेवलेलं पिस्तूल मिळाल आहे . आता ती त्या घरात सोबतीला ठेवलेल्या बाईशी बोलेल ना ? रागिणीच्या आईला पण सध्या विस्मरण होत आहेच.

रागिणीच्या आईच्या विस्मरणाच्या आजाराचा कथेत पुढे काहीतरी संबंध असेल बहुतेक.

फोटो परत परत पाहून तेव्हा साधे वाटून दुर्लक्स केलेले पण आता महत्वाचे वाटणारे डिटेल्स शोधतेय ती. आशिष किचनमध्ये तिला संगणारच असतो त्याला काय सापडलंय ते, पण तिच्याकडे बघून तो म्हणतो की तुला तसाही रस नसणारच. तिला ही दोन्ही वाक्ये ऐकू येत नाहीत इतकी ती तिच्या कामात दंग असते.

ओझी रात्री 10.30 च्या सुमारास अपलोड करतात. माझ्याकडे टिव्ही नाहीय पण काल रात्री मी 11 च्या सुमारास 29 व 30 चे भाग पाहिले मोबाईलवर.

मी पण भारताबाहेरुनच ही मालिका फॉलो करतीय. त्या त्या दिवसाचा एपिसोड बघून होईपर्यंत मी हा धागा उघडत नाही. भारताबाहेरच्या वेळांचा ट्रॅक ठेवणे खरंच शक्य नाहीये. असो.
अभय सातवच्या बायकोला 'अजून' काहीतरी माहित असावं . ती ज्या प्रकारे मुलीकडे बघते त्या वरुन असं वाटतं.
मुक्ता काही सराईत गुन्हेगार नाही. शिवाय वयानेही लहान. त्यामुळे तिच्या हातून खूप चुका घडताना दाखवत असावेत.
सस्पेन्स आणि थ्रील दोन्ही शाबूत ठेवण्यात दिग्दर्शक नक्कीच यशस्वी झालाय आत्तापर्यंत तरी.

मंडळी,
मी फक्त एपिसोड झाल्या झाल्या (त्याच रात्री) लिहू नका अशी विनंती केली होती, कारण आम्ही इथे भारतातल्या प्रमाणेच रात्री तो एपिसोड पहातो. आणि ते सगळेजण पाळत आहेत, त्याकरता धन्यवाद. Happy भारतातल्या दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर लोकं इथे लिहीत असतील ह्याची कल्पना आहे. शिवाय कधी कधी एपिसोड बघायचा राहून जातो, (कालचा नाही पाहीलेला पण पोस्टी वाचल्या) तेव्हा इथे आधी वाचलं जातं, जे ठिक आहे. प्रत्येकवेळी प्रत्येकसाठी थांबणं शक्य नाही.
त्यामुळे माझ्या टाईमझोनला काही प्रॉब्लेम नाहीये.

ओझीवर रात्री 10:30 नंतर येतो एपिसोड. मी साडेनऊला पाहू शकत नाही त्यामुळे ओझीवरच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघते. Happy

चंदूदादाने रागिणीला सांगितलेलं ना की अभय सातव शुद्धीवर आल्याआल्या पहिल्यांदा त्याच्या वर जे लोक आहेत त्यांना रागिणीबद्दल सांगेल आणि ते रागिणीला संपवतील त्यामुळेच अभय शुद्धीवर येण्याच्या आधीच त्याला मारायला हवं. त्यामुळे रागिणीला हे माहित असणारचं की अभय सातव हा यातली छोटी कडी आहे आणि त्याच्या फोनमधून ती काॅन्टॅक्ट मिळवायचाच प्रयत्न करत असते.

अजूनही कांदेपोहे यांनी सांगितलं नाहीये की दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत म्हणजे नक्की किती वाजेपर्यंत. कारण मी माझी पोस्ट दुपारपर्यंत थांबूनच टाकली होती. असो..

अरे हो.. ते रागिणीच्या आईला तिच्या खोलीत कट्टा (गावठी पिस्तुल) सापडतं ते विसरलेच मी.

पियू जास्त लोड घेऊ नको ग. अगदी खूप काही महत्वाचं लिहू नको पण आजचा एपिसोड खूप फास्ट होता. खूपकाय काय घडलं आणि सगळंच इंटरेस्टिंग होत इतपत लिही कि . ती सातव ची मुलगी मात्र स्मार्ट दाखवलेय. असायलाच पाहिजे आजच्या काळातली मुलगी आहे ती. रागिणीच्या आईला तिच्या खोलीत कट्टा (गावठी पिस्तुल) सापडतं च आणि ती ते हातात पण घेते हे महत्वाचं . जनरली हात लावत नाहीत असं मनात येत . पण ती तर बऱ्याच गोष्टी विसरतेच आहे त्यामुळे संशय तिच्यावर जाण्याची पण खूप शकयता आहेच Happy

वंदना गुप्ते पण मस्त अ‍ॅक्टींग करतायत. एकीकडे मुलीबद्दल वाटणारी तळमळ, दुसर्‍याच क्षणी तिच्या विक्षिप्तपणाबद्दल वाटणारा राग, काळजी, सगळं खूप छान दाखवतात. मधेच काहीतरी गुढ झलक दिसते काल त्या डॉक्टरसमोर खरी उत्तरं का देत नसतील?

अ‍ॅडमधे सर्वात मधे मुक्ता आणि तिच्या एका बाजुला मोहन आगाशे आणि एका बाजुला किरण करमरकर आहे म्हणजे ह्या दोघांचे रोल मुक्ताखालोखाल महत्वाचे आहेत. बाकी सर्वजण तिथपर्यंत जाणारे दुवे असावेत.

भारतातल्या रात्री ११ वाजता जरी ओझीवर आले तरी इथे तेव्हा रात्रीचे २.३० असतात. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिस असल्याने बघता येत नाही. त्यामुळे भारतीय वेळेनुसार साधारण दुपारी ३ नंतर इपिसोड बघितला जातो. त्यामुळे तुम्ही तोवर कंट्रोल करणे जरा अवघड आहे.

मीच मनावर दगड ठेऊन हा बीबी न उघडण्याचा प्रयत्न करतो Proud

संपदा थंड घे Happy

रागिणी तिच्या आईला investigative journalism म्हणून काहीतरी थाप ठोकेल असा माझा अंदाज आहे.

रागिणीचा मूर्खपणा वाढत चालला आहे.>> बरोबर आहे . पण माझ्या मते तो त्यांना वाढलेलाचं दाखवायचा आहे. एक तर ती मुद्दामून गोळ्या घेत नाहीये . गोळ्या ना घेण्याचे काय परिणाम आहेत हे तिला माहिती आहे . "असू दे वेडी . असा वेडेपणा अंगात असल्याशिवाय जे काही करायचं असत ते करू शकणार नाही" असं काहीतरी मागच्या एका भागात ती बोललीच होती . त्यामुळे तीच स्वतःच "भिरभिरलंपण" तिला स्वतःलाच थांबवायचं नाहीये आणि दुसरं म्हणजे साधना म्हणाली त्याप्रमाणे तिला मारले जाणे, पकडले जाणे यापैकी आता कशाचीच भीती राहिली नाहीये " . त्यामुळेच भिरभिरल्या अवस्थेत ती आईला तो विग पण घालून दाखवते Proud

तिला पकडले जायची भिती नाहीये हे ठिके. पण सत्य शोधुन काढेसतोवर तरी डोकं ठिकाणावर ठेव. हे सातव प्रकरण थंड होईस तोवर तरी गप्प बसायला हवं होतं तिने.
सातवच्या वरची जी माणसं आहेत, ती पण alert झालीच असतील की त्याच्या खुनामुळे.
आत शिरल्यावर तिथल्या परिस्थिताचा अंदाज घ्यायला हवा होता फक्त तिने. पुढे जे केलं, मुलीने टोकल्या नंतर ही तेो मुर्खपणाच होता.
ऊद्या रस्त्यात, येता जाता कुठे ह्यांची टक्कर झाली,मुलीने ओळखलं तर, तो भाऊ पोलीस आहे, तो channel वाल्यांना ओळखतच असेल. सातवची बायको भावाला हे सांगणारच की.
बाकी, रागिणीने आत जाण्यासाठी काढलेली आयड्या भारी होती. Lol

पोलिसांकडे अशी माणसं असतात ना जी वर्णनावरून त्या व्यक्तीचं स्केच काढू शकतात. असं झालं तर तो पोलीस तिला लगेच आोळखू शकतो कारण त्याने तीला अभयच्या गाडीजवळ बघितलं आहे जेव्हा ती कानातलं शोधत होती.

हो ना, अभय सातवच्या घरी घुसणं शुद्ध वेडेपणा होता. तसही आधी त्या चंदूदादांनी सांगितलेलं असतं की असं कोणी लिहून ठेवत नसतं. खरं त्याच्या घरात पोलिस असायला हवा होता ना एक, नुकताच खून झालाय आणि भाऊ पोलिसात आहे तर.

ही आणि इतर झी च्या मालिका live ditto.com वर पहाता येतात. एपिसोड अपलोड होण्याची वाट बघण्याची गरज नाही.

पोलिसांकडे अशी माणसं असतात ना जी वर्णनावरून त्या व्यक्तीचं स्केच काढू शकतात.

>>> काल आमच्याकडेही हीच चर्चा झाली.

सातवच्या मेहुण्याने व्यवस्थित तपास केला तर रागिणी 2 मिनिटात पकडली जाईल, पण मग आपल्याला आशिषच्या खुनाचे रहस्य कधीही कळणार नाही. त्यामुळे केवळ नशिबाने का होईना, रागिणी पोलिसांच्या कचाट्यात न सापडणे योग्य.

ती जी कोणी पॉवरफुल माणसे आहेत ती हे सगळे प्रकरण कसे हाताळताहेत हे बघणे रंजक असेल. त्यांनी शिवाची ऑर्डर काढली, शिवा त्या आधीच मारला गेला, सातवची ऑर्डर काढण्याआधीच तोही गेला. आता ह्या दोन हत्यामागे सातवचा वैयक्तिक दुश्मन आहे की कोणी आपल्यामागेच लागलेय असा विचार ती माणसे नक्कीच करतील. त्यामुळे येत्या एपिसोड मध्ये त्या पॉवरफुलांवरचा पडदा उठून त्यांना समोर यावेच लागेल. आजवर किरण हाच एकजण दिसलाय ज्याने कीर्तिकारांची ऑर्डर निघाल्याचे वर्तमान सातवला दिलेले. आता त्याच्यावरचे सगळे दिसतील. कालच एपिसोड पहिला नाही अजून. उद्या दोन्ही एकत्रच पाहीन.

तिला पकडले जायची भिती नाहीये हे ठिके. पण सत्य शोधुन काढेसतोवर तरी डोकं ठिकाणावर ठेव. हे सातव प्रकरण थंड होईस तोवर तरी गप्प बसायला हवं होतं तिने. >> +१

पोलिसांनी सातवच्या मुलीकरवी स्केच तयार केलं की पाचव्या मिनिटाला रागिणी जेलमध्ये जाऊ शकते. अर्थात तसं होणार नाही कारण मग मालिका संपून जाईल.

आत शिरल्यावर तिथल्या परिस्थिताचा अंदाज घ्यायला हवा होता फक्त तिने. पुढे जे केलं, मुलीने टोकल्या नंतर ही तो मुर्खपणाच होता. >> +१

मोहन आगाशे पुन्हा कधी दिसतील माहीत नाही.
किरण करमरकर कोण? Uhoh आय मीन अजून एकदाही तो या मालिकेत दिसला नाहीयेना कोणत्याच रोल मध्ये?
मिसिंग चंदुदादा.

रागिणीने तो फोन अनलॉक करून घेतला. आता त्यातल्या प्रत्येक नंबरला बहुतेक वेड्यासारखी फोन करत सुटणार. कोणीतरी तिला फोनवर दमात घेताना बघितलं बहुतेक जाहिरातीत किंवा पुढील भागात मध्ये.

आईला तो विग आणि कट्टा सापडल्यावर आता तिच्या मनाची काय अवस्था असेल/ राहील काय माहित? ती कोणाला बोलून दाखवणार नाही ना याची भीती वाटते. रागिणीला आबाचा कल्यू कधी कळणार?

रागिणी जे रेकाॅर्डींग करतेय त्यात ती सरळसरळ चंदूदादांचा नाव घेऊन उल्लेख करतेय. चंदूदादांनी या मॅटरमध्ये त्यांचं नाव कुठेही येऊ नये म्हणून मोबाईल नंबर बदलून घेतलाय आणि ही त्यांना अजाणतेपणी का होईना अडकवतेय. Uhoh

Pages