रंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे)

Submitted by हिम्सकूल on 28 August, 2017 - 06:01

कधी नव्हे ते एका बैठकीत गणपती बाप्पा रंगवले आहेत. बाप्पांचे डोळे निळे का? असे विचारले तर बाप्पांचे डोळे निळे असू शकत नाहीत का असा उलटा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आकाशात ढग नव्हते त्यामुळे ते काढण्यात आले आणि बरोबर उडणारे पक्षी आणि पाऊस आणि चमकणार्‍या वीजा ही आल्या. आणि आम्हाला कुठलेच झाड रिकामे आवडत नाही म्हणून त्यावर पिकलेली आणि कच्ची अ‍ॅपल्लस काढण्यात आलेली आहेत. आणि गणपती बाप्पा बर्फात रहातात म्हणून त्यांच्या पायापाशी निळा बर्फ काढलेला आहे.

ganapati bappa.jpg
Group content visibility: 
Use group defaults

एवढा मोठा झाला विभास!!! आता भेटले च पाहिजे एकदा.

मस्त रंगवले आहे. तीनही ऋतू दाखवले आहेत Happy
शाब्बास विभास

मस्त. आकाशाच्या बॅकग्राउंडमधले जास्तीचे बारकावे एकदम भारी Happy

शाब्बास विभास...
चमकणार्‍या विजा खुप आवड्लया...
<<एकाच वेळी सूर्य, ढग, विजा, पक्षी >> Lol

बाप्पा वर्षातून एकदाच येतो. तेव्हा एकाच भेटीत त्याला सूर्य, पक्षी, विजा, लाल आणि हिरव्या सफरचंदांनी लगडलेलं झाड आणि बर्फ हे सर्व दाखवणं भाग आहे. विभास, मला आवडली तुझी आयडीया.
खूप छान रंगवलं आहेस. शाब्बास!