कविकल्पना - २ - काहीतरी कारण असावं लागतं

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:23

कविकल्पना - २ - काहीतरी कारण असावं लागतं

तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

दुसरे शीर्षक :
".. काहीतरी कारण असावं लागतं!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता सुचायला काहितरी कारण असाव लागत
वसंताने बहराव किंवा पावसाने पडाव लागत
काहिही कारण नसताना कविता सुचायची असेल
तर त्यासाठी माणसाने प्रेमात पडाव लागत
काहीतरी कारण असाव लागत

कविता सुचायला काहितरी कारण असाव लागत
वसंताने बहराव किंवा पावसाने पडाव लागत
काहिही कारण नसताना कविता सुचायची असेल
तर त्यासाठी माणसाने प्रेमात पडाव लागत
काहीतरी कारण असाव लागत

भातावर घ्यायला गरमगरम वरण असाव लागत
एकाच नाव अर्जुन तर दुसऱ्याच करण असाव लागत
मोदकात भरायला गोडगोड सारण असाव लागत
आणि यमक्याला यमक जुळवायला काहितरी कारण असाव लागत Wink

उशीर झाल्यावर बॉस ला सांगायला
चोरून भेटायला जाताना घरी सांगायला
काहीतरी कारण असावं लागतं
एकच कारण वेगवेगळ्या स्टाईलने सांगायलाही
थोडंफार टॅलेंट असावं लागतं

बाप्पा,

तुझ्यासमोर हात जोडायला आम्हाला
काहितरी कारण असावं लागतं
तुझं अकारण कारुण्य कळायला मात्र
'स्व'ला तुजपाशी तारण ठेवावं लागतं

काय वाटले म्हणून तेव्हा होतिस हसली?
पटली होती सांग नकळता ओळख कुठली?
वय होते वेडे की होतो वेडे आपण?
असते का असल्या वेडांना खरेच कारण?

प्रेमस्पर्श! तुझ्या येण्यानं
बहरलं माझं जिवनगाणं
उदास मलूल चेहर्यावरी
फुललं अकारण शुभ्र हसू ॥१॥

सात जन्मांची आपुली
ठरवलेली संगत होती
तुझ्या माझ्या संगतीला
चांदण्याची सोबत होती ॥२॥

आयुष्याच्या ह्या पैलतीरी
दुर स्मशानी नदीकिनारी
तुला निरोप अखेरचा देताना
दाटले सकारण मूक आसू ॥३॥

―₹!हुल /२६.८.१७

काहीतरी कारण असावं लागतं...........
तूझ्याशिवाय जगण्याला, तूझ्याशिवाय जागण्याला
सारच क्षणभंगूर ,
शाश्वत आहे माझा श्वास आणि तूझा भास
मनाच्या अंधारात मंद प्रकाशापरी तूझा वास
एवढच कारण पुरेसे नाही गं
अजून काहीतरी कारण असावं लागतं मनसोक्त रडायला..........

पापण्यांवर मोतियांच्या तारणांचा भार झाला...
टाळल्यावर तू दिलेल्या कारणांचा भार झाला!

शिकल्या-सवरल्या नातसुनांना आजेसासूंचा जाच आहे
देव्हार्‍यातल्या मातारानीला भारद्वाज फॅमिलीचा काच आहे
कुठे फिरतंय खून झालेल्या निर्मलाचं भूत
तर कुठे तृतीयपंथी सौम्याविरुध्द सासूच्या कटांना उत
सावित्रीदेवी हॉस्पिटलात पेशन्ट नाहीत औषधापुरते
तर कुठे रडकी जुई यशसाठी तोंड वाकडं करून झुरते
आजकाल इडियट बॉक्स टाळते मी
मला नाही वाटत फारसं अडतं
कारण रिमोट शोधशोधून तो लावायला
काही कारण असावं लागतं

पापण्यांवर मोतियांच्या तारणांचा भार झाला...
टाळल्यावर तू दिलेल्या कारणांचा भार झाला! >> सुंदर!

मला कर्जाच्या मोबदल्यात ठेवले जाते ते,'तारण'च म्हणायचे आहे!
पुढचे शेर लिहायचे असतील तर मात्र, 'तोरण' घेवून,काफिया सुलभ होऊ शकेल!

तुझ्या दारी रांग लागते दर मंगळवारी
संकष्टी चतुर्थीला आणि शनिवार रविवारी

नवसाला तू पावतोस असं सगळे म्हणतात
जागृत आणि स्वयंभू आहेस असंही खात्रीने सांगतात

दरवेळी हात जोडताना काही मागितलंच असं नाही
पण आजवर जे मागितलं त्यातलं काहीच मिळालं नाही

लोकांकडे तुझ्या कृपेचा म्हणे ओघ वाहतो
मग मलाच काही देताना तुझा हात का रे आखडतो

सगळे पुण्यवान अन मी पापी असं आहे का काही
पण निष्काम भक्ती करण्याइतकी देवा मी महान नाही

आता तुझ्या राऊळाचा कळस दिसूनही दिसत नाही
सीसीटीव्हीवर तुला मी पाहूनही पहात नाही

माझ्या कुठल्याच वाटेत आता तुझं घर लागत नाही
तुझ्या दारी यायचं मला आता काहीच कारण नाही

काय झालं? काही नाही...
मग असं का? कुठे काय..?
नक्की...? हो, खरंच...

झोपाळ्यावर मंद झुलताना
एकट्याने सूर्यास्त बघताना
डोळे मिटून वार्‍याची झुळूक अनुभवताना
भान हरपून, चांदणं पिताना, किलबिल ऐकताना
पाहिलं आपल्याला की येतंच कुणीतरी...
मोबाईल ऐवजी मन का वापरतेय ही
आनंद टिपायला? असं वाटून बहुतेक...

मैत्री करायला, शेजारघरी डोकवायला,
फोन करायला, ओळखीचं हसायला,
आपलं म्हणायला, सावरून घ्यायला,
दाद द्यायला, समजुतीचं बोलायला,
वाटून घ्यायला, देऊन टाकायला
सगळ्या सगळ्याला लागतं, हल्ली...
पण, स्वतःशी बोलायला, निवांत बसायलाही
काहीतरी कारण असायला लागतं?

जुने स्कोर सेट करायला
काही कारण लागत नाही
दुषित विचारांना मनीच्या
धुण्यास साबण लागत नाही

कोर्ट म्हणतं, वेगळं व्हायला
काहीतरी कारण असावं लागत
ठोस आणि व्हॅलिड'
त्याचं वजन पडावं लागत

भांडण? मारहाण?
अफेअर? व्यसनापायी घर गहाण?

नाही म्हणता यातलं काही!
मग मागणीला तुमच्या बेसच नाही

वेगळं व्हायला कोर्टाला पटेल
असं काही कारणच नाही
आणि,
एकत्रं रहायला काहीतरी कारण लागतं
अस कोर्टालाही वाट्त नाही

Pages