कविकल्पना - २ - काहीतरी कारण असावं लागतं

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:23

कविकल्पना - २ - काहीतरी कारण असावं लागतं

तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

दुसरे शीर्षक :
".. काहीतरी कारण असावं लागतं!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्गुणाच्या रुपा तू,
सगुण झाला आहेस
निराकार तू चैतन्या,
साकार झाला आहेस
तुझ्या भेटीला आता
कष्टावं लागत नाही
अर्धोन्मीलित नेत्रांना,
भ्रूमध्यात स्थिरावण्या
आता कारण लागत नाही

आकलनापलीकडे घडतात,
अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात अकारण.
पण त्याच दुसऱ्यांना उलगडून सांगताना,
काहीतरी कारण असावं लागतं.

कां अचानक अशीं, पानं पडावीं गळून
कातळावरचं कलम , कां लाजावं मोहरून
मृदगंध दबलेला, यावाच कां दरवळून
हिरवळीची हौस, यावी सॄष्टीची उफाळून

ॠतुंच्या या वारकर्‍याना, पडलाय कधीं हा प्रश्न
व्हायला असं, काहीतरी कारण असावं लागतं ?

सुग्रास ताट पुढे आल्यावर
'जाणिजे यज्ञकर्म' आठवून
उदरभरण करावं लागतं...

माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने
पद्याकडे पाहायला...
काहीतरी कारण असावं लागतं Proud

रविवार संध्याकाळची निळाई
नेहमीचीच
सोमवार सकाळची घाई,
ती पण नेहमीचीच,
डबा, फोन, जिमचे कपडे , पेनमधे शाई
तेही नेहेमीचंच
रोज मला उशीर करते ताई
ही तक्रार पण तीच

मग गजराच्या आधीच उठून , वेळे वर तयार कशीकाय जोडगोळी ?
नव्या वर्षाचा पहिला दिवस !!

दिलखुलास 'हो' म्हण किंवा चक्क 'नकार' दे
ते तू एक 'चांगला मित्र' वगैरेचे घोळ नको
आवडतोस किंवा आवडत नाहीस इतकेच पुरे
बाकी काढीव कारणांचे खेळ नको!

Pages