सरकारी जन्म

Submitted by र।हुल on 13 August, 2017 - 18:02

श्वास कुंठित होता त्या
अभागी साठ बालकांचे
मृत्यूही असेल हेलावला
पाहुनी प्रसंग गुदमरण्याचे ॥१॥

हयगय ती का व्हावी
लहानग्या बालकांप्रती
इतके कसे कोडगे झाले
अधिकारी, राघवपती
॥२॥

दोष काय तो बाळांचा
उठला असे जिवावरी
आहे का तो जन्म घेणे
आश्रय दारी सरकारी ॥३॥

मुक्ताफळे ती उधळणे
निच! आईबाप भिकारी
प्रतिबंध करावा काय
जन्म देण्या-घेण्यावरी ॥४॥

निष्ठुर ते राजकारण
उठले आहे जिवावरी
शासन प्रशासन सारेच
मतांचेन् पैशांचे भिकारी ॥५॥

उद्वेग माझ्या दाटतो मनी
हतबल मी लाचार झालो
गुणगाण पुढार्यांचे गाऊनी
पापात त्यांच्या भागी झालो ॥६॥

―₹!हुल / १३.८.१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users