अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे मठ्ठपणा, पोरकटपणा, थिल्लरपणा आणि सोबतीला वेडेपणा फार क्वचितच एकत्र येतात. पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हुशार, परिपक्व, स्थितप्रज्ञ, शहाणा वगैरे बिरुदं मिरवणाऱ्या माणसाचा तद्दन बिनडोक, बावळट आणि मूर्खपणा असा काही समोर येतो की सगळी ओळख पुसून जाईल की काय असंच वाटावं ! इम्तियाझ अलीचा मो., पो., थि. आणि वे.पणा एकत्र आल्यावर त्याने ठरवलं की अमुक एका स्क्रिप्टवर काम करायला हवं. चुकलेल्या वाटेवर वर्षानुवर्षं मनापासून भरकटत चाललेला शाहरुख खान त्याला ह्यासाठी जोडीदार म्हणून लाभला. आणि ह्या ढवळ्या-पवळ्याच्या सोबतीला 'प्रीतम' नावाचा टवळासुद्धा आला ! ह्या अभूतपूर्व संगमाच्या पवित्र ठिकाणाचं अप्रतिम सुंदर असं नावसुद्धा अस्सल ओरिजिनालिटी मिरवेल असं ठरवलं गेलं - 'जब हॅरी मेट सेजल'.
नाव, ट्रेलर, म्युझिक आणि लोकांकडून मिळालेले अभिप्राय, ह्या सगळ्यानंतर खरं तर सिनेमा पाहायलाच नको होता. पण पाहिला. कारण पहिल्या तिन्ही बाबींना फक्त आणि फक्त इम्तियाझ अलीसाठी दुर्लक्षित करून रिलीजच्या तीन दिवस आधीच बुकिंग्स सुरु झाल्या झाल्या तिकिटं काढून ठेवली होती. अक्कलखाती जमा झालेल्या गडगंज संपत्तीत अजून काही शे रुपयांची भर टाकली आणि मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.

पर्यटकांच्या एका समूहाला सफर घडवणाऱ्या 'हॅरी' (शाहरुख खान) पासून सिनेमाची सुरुवात होते. पहिल्या एका मिनिटात अशक्य पांचट प्रकारात मोडणारे ३-४ बकवास विनोद-प्रयत्न पुढे येणाऱ्या फुटकळपणाची नांदी ठरतात. आधी डोक्यावर आपटून परिणाम झालेली आणि टप्पा पडून नंतर तोंडावर आपटल्याने चपटी झाल्यासारखी दिसणारी 'सेजल' (अनुष्का शर्मा) ह्या टूअर गाईड 'हॅरी'ला हाताशी धरून आपली हरवलेली एंगेजमेंट रिंग शोधण्यासाठी मुंबईला परत जाणारं विमान आणि आपलं संपूर्ण कुटुंब सोडून मागे थांबते. 'हॅरी'ची इच्छा नसताना, तो मुलींच्या बाबतीत 'कॅरेक्टर-ढिला' आहे हे समजल्यावरसुद्धा तिला तोच सोबतीला हवा असतो. नंतर हे दोघं अॅमस्टरडॅम, बुडापेस्ट, बर्लिन, लिस्बन वगैरे अनेक शहरांत एक अंगठी शोधत फिरतात. हॉटेलांतल्या टेबलांखाली, सोफ्यांत, हिरवळीत, रस्त्यांवर, पेव्हर ब्लॉक्समध्ये अश्या रॅण्डम जागांवर वाकून, झोपून, खरवडून वगैरे बघतात. ह्या दरम्यान रात्र झाल्यावर अर्धे कपडे घालून रेड लाईट क्लब्समध्ये बागडायची हुक्की सेजलला येत असते. ह्या अर्ध्या कपड्यांत ती सेक्सी दिसते आहे, असं तिला आणि दिग्दर्शकालाच केवळ वाटतं.
मूर्खपणाच्या सगळ्यात वरच्या पायरीपर्यंत चढून लिहिलेले बाष्कळ प्रसंग अंगठीशोधमोहीम आणि हॅरी-सेजल प्रेमप्रकरण दोन्हीला व पर्यायाने संपूर्ण सिनेमालाच असह्य रटाळ व कंटाळवाणेपणाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन प्रेक्षकाचा कडेलोट करतात. ही कडेलोट करेपर्यंतची मिरवणुक कानठळ्या बसवणाऱ्या भुरट्या संगीतावर नाचत नाचत काढली जाते.
माझं एक मत होतं की सिनेमात गाण्यांचा अत्यंत चतुरपणे कसा वापर करावा ह्याचा इम्तियाझ अली हा एक वस्तुपाठ आहे. आग लागली त्या वस्तुपाठाला ! 'एसीची हवा लागून कुणाला झोप वगैरे लागली, तर खाडकन कानाखाली आवाज काढावा' ह्या एकमेव हेतूने ही गाणी बनवलेली आहेत. मेलोडीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला कल्लोळाच्या डोहात ढकलून दिल्यानंतरच 'प्रीतम'ने चाली बनवल्या आहेत. त्यांवर इर्शाद कमिलचे शब्द स्वत:चे हातपाय तोडून घेतात. कुठलंही गाणं कथानकाला खारीएव्हढाही हातभार लावत नाही. अर्थात, कथानकच मुंगीएव्हढं असल्याने इतका मोठा हातभार लावण्यासारखा वाटा तरी कुठून मिळणार, नाही का !
गेल्या काही सिनेमांतून वेगळ्या अपेक्षा निर्माण करणारा शाहरुख पुन्हा एकदा त्याच माकडचाळ्यांत नव्याने रमलेला पाहून अगदी मनापासून वाईट वाटलं. रईस, गौरव-आर्यन आणि जहांगीर खान अश्या ठोस व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 'हॅरी'सारखा पिचकवणी रोल शाहरुखला करावासा वाटतो, ही खरोखर दु:खाची गोष्ट आहे. तो कुठेही कमी पडत नाही, नक्कीच. पण कमी पडलं जाऊ शकेल, असं आव्हानात्मक काही नव्हतंच तर !
अनुष्का शर्माबाबतही तसंच. त्यात तिला गुजराथी ढब काही नीटशी जमलेलीही नाही. त्याची गरजही काय होती, कुणास ठाऊक !
शाहरुख आणि अनुष्काबाबत माझी सध्याची मतं जरी सकारात्मक असली, तरी मी फक्त इम्तियाझ अलीसाठी तिकीट काढलं होतं. कधी तरी कुणी तरी त्याला विचारायला हवं, Et tu, Brute ? 'कॉफी विथ करण' च्या एका भागात रोहित शेट्टी, कबीर खान आणि इम्तियाझची एकत्र मुलाखत होती. पडद्यावर असणाऱ्या चौघा दिग्दर्शकांमध्ये इम्तियाझ एलियनच वाटत होता. त्याची उत्तरं, त्याचे विचार खूपच भिन्न होते. आता मला कळत नाहीय की इम्तियाझचं नाव लावून 'जब हॅरी मेट सेजल' दुसऱ्याच कुणी बनवला आहे की तो मुलाखतीत दिसलेला इम्तियाझ खोटारडा होता ? सवडीनुसार आपली बोलायची ढब सर्रास बदलणारी सेजल त्याने सहनच कशी केली ? 'तू तिकडून चालत ये.. मला कॉफी प्यायला ने' वगैरे भंकस प्रसंग, असंबद्ध गाणी हे सगळं त्याला पचलंच कसं ? एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी ढिसाळ, पसरट पटकथा त्याने लिहिलीच कशी ? असे सगळे प्रश्न मलाच निरुत्तर करत आहेत. राम गोपाल वर्मा आणि मधुर भांडारकरप्रमाणे इम्तियाझ अलीसुद्धा एक 'स्पेंट फोर्स' होतो की काय, अशी भीती वाटतेय.
'जब तक हैं जान' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे शाहरुखच्या तमाम सुमारपटांमध्ये आघाडीवर समजायला हवे. 'जतहैंजा'च्या वेळेस तरी शाहरूखची बऱ्यापैकी हवा होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. सुंदर सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतील म्हणून तिकिटं काढेल इतका प्रेक्षक बिनडोक राहिलेला नाही आणि हळूहळू का होईना त्याची स्टारशरणताही कमी कमी होत चालली आहे. रविवार असूनही नाईट शोसाठी थिएटर जेमतेम १५-२०% भरलेलं होतं आणि त्यातही १०-१२ लोक अर्ध्यातून उठून गेले. एखाद्या आठवड्यातच 'जहॅमेसे'ला गाशा गुंडाळावा लागला, तर मला आश्चर्यही वाटणार नाही आणि वाईटही.
रेटिंग - *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/08/movie-review-jab-harry-met-sejal....
ह्म्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म
आता मला कळत नाहीय की
आता मला कळत नाहीय की इम्तियाझचं नाव लावून 'जब हॅरी मेट सेजल' दुसऱ्याच कुणी बनवला आहे की तो मुलाखतीत दिसलेला इम्तियाझ खोटारडा होता ? सवडीनुसार आपली बोलायची ढब सर्रास बदलणारी सेजल त्याने सहनच कशी केली ? 'तू तिकडून चालत ये.. मला कॉफी प्यायला ने' वगैरे भंकस प्रसंग, असंबद्ध गाणी हे सगळं त्याला पचलंच कसं ? एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी ढिसाळ, पसरट पटकथा त्याने लिहिलीच कशी ? असे सगळे प्रश्न मलाच निरुत्तर करत आहेत. राम गोपाल वर्मा आणि मधुर भांडारकरप्रमाणे इम्तियाझ अलीसुद्धा एक 'स्पेंट फोर्स' होतो की काय, अशी भीती वाटतेय.>>> रसप, या वाक्यांकरता +१११! शारूक आणि अनुष्काने पाट्या टाकल्या यापेक्षा इम्तियाझने असं का केलं याचं दु:ख जास्त आहे. कमर्शिअल सक्सेसच्या मागे शेवटी सगळेच लागतात का? आपल्या टर्म्स वर यशस्वी होऊनही इम्तियाजसमोर अशी कोणती अपरिहार्यता उभी ठाकली असेल की त्याने इतका सुमार चित्रपट करावा?
विक्रम गोखलेंनी एका सुमार टीव्ही मालिकेत काम केलं होतं पूर्वी. ती संपल्यानंतर त्यांनी चक्क माफी मागितली होती, की माझी चूक झाली. अशी मालिका मी परत करणार नाही. बाकी काही नाही, तर इम्तियाजने कमीतकमी धाडस दाखवून इतकं तरी करावं!
'मॅडम, मला वाचवा' 'जब हॅरी
'मॅडम, मला वाचवा' 'जब हॅरी मेट सेजल' च्या प्रेक्षकाचे स्वराज यांना "ट्विट'
http://dhunt.in/2FuqP?s=a&ss=pd
via Dailyhunt
वरची न्यूज मात्र उगाचच .
वरची न्यूज मात्र उगाचच .
पहिल्या ओपनिंग डेला या चित्रपटाने केवळ 15.25 कोटींची कमाई केली. >> काय मराठी आहे .
{{{ विक्रम गोखलेंनी एका सुमार
{{{ विक्रम गोखलेंनी एका सुमार टीव्ही मालिकेत काम केलं होतं पूर्वी. ती संपल्यानंतर त्यांनी चक्क माफी मागितली होती, की माझी चूक झाली. अशी मालिका मी परत करणार नाही. }}}
"डरनेका नै" या हिंदी नावाची ती एक मराठी मालिका होती ज्यात विक्रम गोखलेंनी लालभडक टी शर्ट काळी टाईट पँट वगैरे पोशाखात बंबैय्या हिंदी भाषेत बोलणार्या टपोरी गुंडाची भूमिका केली होती.
आनंदी छान,
आनंदी छान,
कुठलाही रिव्यू आपण चित्रपट पाहताना उचललेला आनंद हिरावून नाही घेऊ शकत.
या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
बहुतांश लोकं टिपिकल शाहरूखपट वा ईम्तियाज अली टच असलेला चित्रपट पाहायच्या अपेक्षेने गेले असावे आणि या पेक्षा काही वेगळे बघावे लागल्याने अपेक्षाभंग झाला असावा.
संमिश्र प्रतिसादात नकारात्मक प्रतिसाद जास्त असण्याचे कारण हे की जेव्हा एखाद्याचा अपेक्षाभंग होतो तेव्हा तो आवर्जून चारचौघांना सांगून अपेक्षाभंगाचे दुख हलके करायला बघतो.
भाऊ, आमच्या अपेक्षा फारच
भाऊ, आमच्या अपेक्षा फारच माफक असतात. बालन बाई म्हणतात तसे "एंटरटेंमेंट, एंटरटेंमेंट, एंटरटेंमेंट" पण तेच मिळत नसेल तर आम्ही पिक्चर ला शिव्या घालणार.
आता ऐतिहासीक दृष्टीने विचार करता शारूख किंवा इम्तियाज चे पिक्चर एंटरटेंमेंट देत होते. याने दिली नाही !
एंटरटेंमेंट, एंटरटेंमेंट,
एंटरटेंमेंट, एंटरटेंमेंट, एंटरटेंमेंट
>>>>>
धनि, तुमचे म्हणने अगदी रास्त आहे. आणि यात काही गैरही नाही. आपण शे दोनशे रुपये खर्चून जातो तर चार घटका मनोरंजन व्हावे ही अपेक्षा काही गैर नाही. पण यामुळे आपल्याकडे असे वेगळे प्रयोग फार कमी होतात. ज्यांना ते रुचत नाही ते त्या चित्रपटाला झोडपणारच मग त्यात कितीही मोठा सुपर्रस्टार का असेना ही रिस्क घेऊनच मैदानात ऊतरावे लागते. त्यासाठी तरी मी ईंतियाज अलीचे कौतुक करेन
भाऊ, प्रयोग केले तरी कौतुक
भाऊ, प्रयोग केले तरी कौतुक केले असते रे. पण इथे तर जुनीच दारू, ती सुद्धा खराब झालेली नविन बाटलीत भरण्याचा प्रयत्न आहे. उगीच कसले ही कौतुक नाही करणार.
चांगले आहे तर चांगले म्हणणार , नसले तर शिव्या घालणार. उगीच आपला तो शारूख म्हणून त्याला काही बोलायचेच नाही असे अजिबात करत नाही
रुन्मेषभाऊ... काही मुद्दा
रुन्मेषभाऊ... काही मुद्दा नाही उगाचच का...
ऋन्मेषच्या प्रतिसादानंतर
ऋन्मेषच्या प्रतिसादानंतर अचानक विश्वरुपदर्शनाचा अनुभव आला आणि हॅरी मेट सेजल हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला एकदम वेगळ्या वाटेवर नेणारा मैलाचा दगड (मैल्याचा नाही) असल्याचा साक्षात्कार झाला. हा चित्रपट इतका दर्जेदार आणि गहन आहे की दिग्दर्शक आणि शाखा सोडून कोणालाच याची कथा, पटकथा समजत नाहीये.यावरुन त्याच्या उच्च बौद्धिक पातळी, उच्च अभिरुची आणि उच्च अभिजाततेचा अंदाज यावा. असा चित्रपट लाखो वर्षातून एकदाच बनतो. ज्यांना असे चित्रपट कळत नाहीत ते बुद्धिहीन, कळाहीन, रुचीहीन असे लोक आहेत. इतक्या महान चित्रपटाला समजून घ्यायला तितकीच प्रचंड बुद्धिमत्ता आणि आकलनशक्ती लागते जी सध्या ऋन्मेष सोडला तर भूतलावर कोणाकडेच नाही.
धनि, why you are opening can
धनि, why you are opening can of worms ?
Let it be
हा सिनेमा पाहण्याऐवजी
हा सिनेमा पाहण्याऐवजी त्रिखंडात गाजणार्या सप्तर्षी बाईंच्या मांजराला भेटून या.
हमखास पैसे वसूल....
आणि हो,
खालच्या प्रतिक्रीया चुकवू नका!
छान पोस्ट नानाकळा!
छान पोस्ट नानाकळा!
उपरोध कॉमेडी जे काही असेल ते.. मांडलेत मात्र वैश्विक सत्यच!
आता हे तुमचे वाक्य
"
ईतक्या महान चित्रपटाला समजून घ्यायला तितकीच प्रचंड बुद्धिमत्ता आणि आकलनशक्ती लागते जी सध्या ऋन्मेष सोडला तर भूतलावर कोणाकडेच नाही.
"
फक्त यात तुम्ही एक गल्लत केली आहे म्हणजे सर्वच प्रकारच्या बुद्धीमत्तेला एकाच तागडीत तोलले आहे. पण तसे नसते. जसे आपला व्यवसाय कसा वाढवावा यासाठी अंबानीकडे असलेली बुद्धीमत्ता आणि भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधारपद भूषवत असताना धोनी वापरत असलेली बुद्धीमत्ता या वेगळ्या आहेत. चित्रपट बनवायला आणि समजायला एक बुद्धीमत्ता लागतेच. पण चित्रपटाच्या जातकुळीनुसारही आवश्यक बुद्धीमत्तेचा प्रकार बदलतो. जसे धोनीला उद्या अंबानीसारखा बिजनेस करता आला नाही म्हणून तो माठ ठरत नाही किंवा अंबानीला कप्तानी जमली नाही म्हणून तो लीडर म्हणून नालायक ठरत नाही तसेच एखाद्या जातकुळीचा चित्रपट समजायची बुद्धीमत्ता आपल्याकडे नसेल तर आपण चित्रपटातील "ढ" होत नाहीत. फक्त ते तसे असते हे तरी किमान समजून घेणे गरजेचे.
आपल्याकडे अंगावर येणारे वास्तव आणि लार्जर दॅन लाईफ कथानक या दोन टोकांमध्येच बहुतांश चित्रपट बनतात. यांना जोडणारया सरळ रेषेपासून फार दूर जाऊन विचार आपण करत नाही. लव्ह ए स्टोरी म्हटले की प्यार ईश्क मोहोब्बत रोमान्स त्याग सॅक्रीफाईस या भावनांना हात घालायलाच हवा. नाही तर आम्ही त्या चित्रपटाला लव्हस्टोरी बोलणारच नाही. हे मला कुंबळेचा बॉल टर्न होत नाही म्हणून त्याला आम्ही स्पिनर बोलणार नाही असे वाटते. काही हरकत नाही. नका बोलू. पण रेकॉर्ड कॉलममधील त्याचे आकडे बोलके आहेत.
आपण चित्रपट बघायला जातानाच त्यावर शिक्का मारून जातो. हा कमर्शिअल चित्रपट आहे. आणि याने आपले मनोरंजन एके मनोरंजनच करायला हवे. हे आपण स्वत:च ठरवतो आणि मग आपली फसगत झाली हा न्यायनिवाडा देखील स्वत:च करतो. पण ईथे क्षणभर थांबायला हवे. विचारांना थोडे रिवाईंड करायला हवे. या चित्रपटाने आपल्याला जे अपेक्षित होते ते नाही दिले. बरं मग त्याने काय दिले? हा विचार करायला हवा. जर ते ओळखता आले तर उत्तमच. अन्यथा ते ओळखण्यासाठी ज्या जातकुळीची बुद्धीमत्ता लागते ती आपल्याकडे नाही हे प्रामाणिकपणे मान्य करता यायला हवे. आणि वर उल्लेखल्याप्रमाणे यात काहीच, म्हणजे अगदी काहीच कमीपणाचे नाहीये
सप्तर्षी बाईंच्या मांजराला
सप्तर्षी बाईंच्या मांजराला भेटून या.>>>>> हे काय आहे आता ????.;
movie has flopped.
movie has flopped.
I am not getting the option to write in Marathi.
ऋन्म्या,
ऋन्म्या,
बेसिकली तुझं म्हणणं काय आहे ? मूव्ही चांगला आहे, असं म्हणतोयस का ?
ज्यांना इंग्रजी समजते
ज्यांना इंग्रजी समजते त्यांच्यासाठी सुंदर परीक्षण माझ्या मित्राने लिहिलेले . ऋन्मेष तुम्ही समजले नाही असे सांगू शकता
Rarely does it happen in life that people/ events match up to your expectations. So imagine the state of ecstasy when those people/ events exceed those expectations!
I had walked into the movie hall having been warned by quite a few that #HarryMetSejal was an absolute disaster. Even with such low expectations, the movie managed to beat my low expectations by a mile. And how! 15 min into the movie and you immediately realise you need to lower the bar of expectation...but another 15 minutes later you try to lower the bar and realise that 15 min ago you had already reached rock bottom. So you are left with another 2 hours of nauseating performances by one trying her best to fake an accent and one trying his best to fake his age. Both fail so miserably that even the plush locales can't soothe the very real headache you are having!
In short, if you don't have anything better to do, EVEN THEN, don't go and watch the movie! Listening to my old maths professor giving a lecture on differential calculus was far more entertaining...
मनावर सलमान खान ठेवून सिनेमा
मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.>>>>> भारीच!
Listening to my old maths
Listening to my old maths professor giving a lecture on differential calculus was far more entertaining...
>>>>
वरचे नाही वाचले, पण मॉरल ऑफ द स्टोरी वाचताना तुम्ही नेमका माझाच मुद्दा क्लीअर केला आहेत.
माझे मॅथस चांगले होते. कमीत कमी श्रमात मी त्यात फुल स्कोअर करायचो. मला मॅथ्स हा सब्जेक्ट ईण्टरेस्टीण्ग वाटायचा.
मात्र ज्याला ते नाही झेपत. त्यांच्या अखण्ड शैक्षणिक कारकिर्दीचा तो दुश्मन असतो. त्यांच्यासाठी जगात त्यापेक्षा काही बोअर नसते. मी अश्यांच्या भावनांचा आदर करतो. कारण माझे हेच ईंग्लिशबाबत होते.
@ रसप,
पिक्चर चांगला की वाईट हे न बघता कसे सांगू?
@ रसप,
@ रसप,
पिक्चर चांगला की वाईट हे न बघता कसे सांगू?
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 9 August, 2017 - 13:14
>>
पण मग म्हणणं का आहे ?
अन्यथा ते ओळखण्यासाठी ज्या
अन्यथा ते ओळखण्यासाठी ज्या जातकुळीची बुद्धीमत्ता लागते ती आपल्याकडे नाही हे प्रामाणिकपणे मान्य करता यायला हवे. आणि वर उल्लेखल्याप्रमाणे यात काहीच, म्हणजे अगदी काहीच कमीपणाचे नाहीये Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 August, 2017 - 10:21
>>> मी काय म्हणतो शेठ.... हे जे तुम्ही लिहिले आहे ते तुम्ही स्वतः कधी पाळणार आहात की नाही?
रसप,
रसप,
आनंदी यांची खालील पोस्ट. याच्या अनुषंगाने पुढे लिहित गेलो.
"
पण येवढा डब्बा नव्हता वाटला मुव्ही.. सगळे रिव्ह्यु वाचुन वाटायला लागला..
कधी कधी वाटतं रिव्ह्यु लिहुच नये कोणी..
ज्याला जे वाटेल जे बघितल्यावर ते तसच वाटत रहाव..
"
पुढे मग नानाकळा यांनी माझ्या पोस्टवर काही लिहिले, त्याला एक उत्तर दिले.
हॅरी मेट सेजल हे केवळ एक निमित्त. चर्चा जनरल होती. मलाही हा पिक्चर ट्रेलरवरून माझ्या बुद्धी आणि आवडीला अनुसरून बंडलच वाटला हे आधीच नमूद केलेय.
हे जे तुम्ही लिहिले आहे ते
हे जे तुम्ही लिहिले आहे ते तुम्ही स्वतः कधी पाळणार आहात की नाही?
>>>>
उदाहरणार्थ ??
Picture na baghata pan itkya
Picture na baghata pan itkya Bata marlya ... Mage eka dhagyawar lihile hote tasech mhanave vatate. Aadhi jaun picture pahun ye mag gondhal ghaal
सप्तर्षी बाईंच्या मांजराला
सप्तर्षी बाईंच्या मांजराला भेटून या.>>>>> हे काय आहे आता ????.
>>>>>>>
सप्तर्षी बाईंचं मांजर माहीत नाही?
अरे ये PSPO नहीं जानता!
हे वाचा -http://www.esakalglobal.com/NewsDetails.aspx?NewsId=4612028515630603865&...(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)
लेख वाचला नाही तरी चालेल, खालच्या प्रतिक्रीया चुकवू नका!
Picture na baghata pan itkya
Picture na baghata pan itkya Bata marlya ...
>>>>>
लोकं देव न बघताही देवावर ईतक्या बाता मारतात, तर शाहरूख माझा देव आहे, मी त्याच्या पिक्चरला न बघता त्याबद्दल बोलू शकत नाही का
Picture na baghata pan itkya
Picture na baghata pan itkya Bata marlya ...
>>>>>
लोकं देव न बघताही देवावर ईतक्या बाता मारतात, तर शाहरूख माझा देव आहे, मी त्याच्या पिक्चरला न बघता त्याबद्दल बोलू शकत नाही का Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 9 August, 2017 - 23:04
>>
http://maharashtratimes
http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/...
आता उतारा म्हणून सोचा न था
आता उतारा म्हणून सोचा न था पाहा सगळ्यांनी. मी इतक्यांदा पाहिलाय तरी अजून प्रत्येक सिन पाहताना तितकीच उत्सुकता असते. अजूनही कंटाळा आलेला नाहीय. >> अगदी अगदी, सोचा ना था आणि जब वी मेट.. दोन्ही सुपर्ब आहेत.. कितीही वेळा पहा, पण कंटाळा येत नाही बिलकुल
Pages