प्रेमात असंच का होतं ?

Submitted by अजय चव्हाण on 25 July, 2017 - 03:56

"आज व्हॅलेटाईन डे है ड्युड आज नही तो कभी नही..
आज फुल न फायनल करही दे ये तोफा उसे दे उसने लिया तो ठीक वरना इसी तोफा को तोड दे और तेरे जजबात को भी तोड दे.. प्राॅमिस.." विरल आणि माझे इतर मित्र क्लासच्या बाहेर माझ्याकडून प्राॅमिस घेत होते.. विरलचे शब्द माझ्या कानात घुमत होते..

प्राॅमिस ..त्याने परत एकदा प्राॅमिस मांगितले..

तसे मी ते प्राॅमिस करून त्याच्या हातावर फाय दिली...तिच्यासाठी मी ओम शांती ओममधलं काचेत असलेलं एका कपलच डान्सिंग विथ साॅगवाल गिफ्ट घेतलं होतं..
ते भराभर पॅक करून मी निघालो.

मनात थोडीशी धाकधुक होती..ह्रदयाची धडधडही आता वाढू लागली कसलीतरी एक अनामिक भितीही वाटत होती..

इतक्यात ती आणि तिच्या मैत्रिणी मला येताना दिसल्या..
मी थोड पुढे जाऊन मला तुझ्याशी काही बोलायच आहे असं तिला सांगून साईडला येण्याची खुण केली.

तिनेही जास्त आढेवेढे न घेता साईडला आली..
"बोल लवकर तुला काय बोलायच आहे ते.. क्लास आता सुरू होईलं.." ती उगाचच ओढणी सावरल्याच आव आणत म्हणाली...

अं..ह..अॅक्चुली...मला तुला काही द्यायच आहे..थोडीशी हिंमत करून मी म्हणालो. ..

काय ? खुपमोठ प्रश्नचिन्ह घेऊन तिने मला विचारलं..

" हे बघ..मी हळूच मागे लपवलेलं गिफ्ट तिच्या पूढे केलं..
मला माहीतेय तुझ्या मनात मी नाहीये..पण तरीही हे गिफ्ट घ्याव असं मनापासून मला वाटतं.." एका दमात मी सारं सांगून टाकलं..

"साॅरी जयेश हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. तु प्लिज दुसर्‍या कुणालातरी हे गिफ्ट दे.." - ती..

" हे गिफ्ट फक्त मी तुझ्याचसाठीच घेतलं आहे आणि ह्या गिफ्टवर फक्त तुझाच अधिकार आहे..तु नाही घेतलेस तर मी हे इथेच तोडून टाकेन" मी तिला आर्जव करत बोललो..

" हे बघ जयेश हे जरा अति होतय..तु आता नाही ऐकलस ना तर सरांना तुझ नाव सांगेन "..

" सांग ना मग..सर येऊन काय करतील फार फार तर माझ्या कानाखाली मारतील पण त्याने तुझ्यावर असलेलं माझं प्रेम थोडीच कमी होणार आहे??"

" लिव्ह ईट ..तुला काय करायच आहे ते कर मी चालले बाय"
इतकं बोलून ती निघूनही गेली..

ती गेल्यानंतर माझे मित्र जवळ आले..काय झाले हे त्यांना दिसले होतेच ..
" जयेश तोड दे इस गिफ्ट को..और तेरे अंदर के चुपे हुए जजबात को भी.." पुन्हा एकदा विरल बोलत होता...

माझ्या मनात चलबिचल सुरू झाली..
हे गिफ्ट नव्हतच मुळी...माझ्या भावना होत्या त्या... माझं प्रेम होत ते..असं कसं मी तोडू शकलो असतो ते गिफ्ट..

"नही यार मै इसे नही तोड सकता चाहे तो तुम तोड दो.."

विरलने ते गिफ्ट घेतलं आणि जवळच असलेल्या गटारावर ठेवलं एक एक करून सगळ्यांनी लाथा मारायली सुरूवात केली...
ते गिफ्ट जेव्हा तुटत होतं तेव्हा ते गिफ्ट तुटत नसून जणू काही माझ्याच ह्रदयाच्या काचा तुटत आहेत असं मला वाटतं होतं...

फायनली सगळ्यांनी लाथा मारून घेतल्यानंतर मलासुद्धा एक लाथ तरी मारायला फोर्स केलं..

तसे मी डोळे बंद करून एक लाथ मारली..
आणि खर्या अर्थाने त्या गिफ्टचा चकणाचुर झाला..
कदाचित त्या गिफ्ट पेक्षा माझ्याच ह्रदयाच्या चकणाचुर झाला होता...

............................................................................ .............................................................................

भर उन्हात मी मुकाट्याने चालत होतो..अंगाची नुसती लाही लाही होत होती ..पण त्याचबरोबर माझ्या मनात लावारस उसळला होता..डोळ्याच्या कड्यात थोडे कोमट अश्रू जमा झाले होते.. ते कसेबसे लपवून मी एकटाच जात होतो.. लहान मुलाला एखादं अविचत काहीतरी सापडावं आणि सगळं काही विसरून
त्याने त्यासोबत रमावं असंच काहीतरी माझं मन तिच्या जुन्या आठवणीत रमतं होतं..एक एक क्षण क्षण मला आठवतं होता..

क्लासचे सर अकांऊट विषयाचे सरावाचे पेपर तपासुन घेऊन आले होते..
एक एक नाव ते उच्चारून ते तपासलेले पेपर वाटत होते..
शेवटी एकच पेपर आता उरला होता..
सरांनी वाजवीपेक्षा जरा जास्तच जोराने तिच नाव उच्चारलं...

"प्रेरणा मानेऽऽऽ. ." तशी एक काळीसावळी मुलगी दबकत बेंचवरून उठून सरांकडे गेली...

"काय ग असा पेपर कुणी लिहत का कधी..?" सर जरा खेकसतच तिला बोलले..
ती तिथेच स्तभ झाल्यासारखी उभी राहीली..
हे तिला अपेक्षित नसावं बहुतेक..
तिला असं बघून सर खुप खळखळून हसले..आणि तिचा पेपर तिच्या हातात दिला..तिने भराभर नजर मार्कावर फिरवली..आणि अत्यांनंदाने तिने हलकीशी उडी मारली...
बस तोच एक क्षण..तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता..त्या क्षणात नक्कीच काहीतरी वेगळं होतं..
त्या क्षणाने जणू माझं मन मंतरल होतं ..तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा तो आनंद हा मला आतापर्यतच्या माझ्या आयुष्यात मिळालेल्या अत्यानंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटत होता..कित्येक वेळा ती मला दिसायची पण तिच्याबद्दल असं कधीच काही वाटलं नाही पण आज मात्र खुप वाटत होतं..

तिला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते..त्यामुळेच ती इतकी खुश झाली होती..मी एकटक वेड्यासारखा तिच्याचकडे बघत होतो..कदाचित सरांच ते लक्षात आलं असावं म्हणूनच की काय सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला..

"काय जयेशराव...सालाबादप्रमाणे यंदाही नापास झालात तुम्ही. .
काय लाज लज्जा आहे की नाही?"

माहीत नाही पण माझ्याही नकळत मी..

" सर अभी तो रास्ता मिला है.. मंझिल भी मिलही जायेगी.."
असं काहीतरी मी पुटपुटलो आणि सरांनी कपाळावर हात मारून घेतला..

ती कुठे राहयची माहीत नाही...मीही तिला काय वाटेल म्हणून कधी फाॅलो केलं नाही पण ती कलासमध्ये यायची..
तेव्हा खुप छान वाटायचं...
ती खुपच साधी होती..तिच्यात असं काही नव्हतंच मुळी..
चारचौघातही ती उठून दिसणारं नाही अशी होती ती..
तरीही मला ती खुप आवडली होती..

असाच एकदा बसस्टाॅपवर बसची वाट पाहत उभा होता..
आज ती दिसावी असा विचारच मी करत होतो की, समोर मला ती येताना दिसली..तिला असं अनपेक्षित समोर आलेलं पाहताना..माझ्या मनात फुलपाखरे भिरभिरत होती..
एकाच बसमधून आम्ही दोघंही गेलो...
आम्ही एकत्र क्लासला जरी असलो तरी आमची ओळखच नव्हती..कधी आम्ही एकमेंकांशी बोललोच नाही..

ती हयाच स्टाॅपला येते म्हणून मी रोजच त्या वेळी तिची वाट पाही पण पुन्हा कधी ती दिसलीच नाही..
ती मला बाहेर जरी दिसली नाही तरी क्लासमध्ये दिसायचीच..
पण क्लासमध्ये तिला पाहणं आणि बाहेर पाहण ह्यात खुप फरक असायचा कारण क्लासमध्ये ती नेहमीच पुस्तकांच्या किंवा मैत्रणीच्या गराड्यात असायची..
तिने वेळ बददली असेल म्हणून मीही वेळ बदलून पाहीली बट तरीही ती परत त्या स्टाॅपवर दिसलीच नाही..
तरही माझं मन एक वेडी आशा घेऊन रोज त्या स्टाॅपवर तिची वाट पाही..

..........................................................................................................................................................

लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार होते...त्यामुळे आमच्या चाळीत होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवसाठी जय्यत तयारी सुरू झाली होती आता मंडळाचा सदस्य या नात्याने संपुर्ण एरियामधून वर्गणी गोळा करण्याचे काम माझ्या वाटेला आले होते...संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी बहुतेक...असेच छोटया छोट्या गल्लीतून रस्ता काढत आम्ही एका घराजवळ पोहचलो मी दारावर टकटक केली..
घराचा पडदा बाजूला सारत एका मध्यम वयाच्या बाईने प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहीले..
"काकू गणपतीची वर्गणी..." असे सगळेच एकदम म्हणाले
"आणते हा"...असं म्हणून काकू आत किचनमध्ये गेल्या ..
मी सहजच आतमध्ये पाहीलं...छोटसच पण नीटनेटक आवरलेलं घर..मस्त गरगर पंखाच्या वार्यावर उडणारे खिडकीचे रेशमी परदे...नुकतीच धुतलेली स्वच्छ फरशी...समोरच खुप मोठ अधिष्ठान ( दत्तात्रय या देवाचा फोटो. बैठकीला जे जातात त्यांना माहीत असेलच)
अगरबत्ती धुपाचा मस्त घरभर दरवळलेला सुवास..
आणि नेमक्या देवार्याच्या पायथ्याशी दासबोध वाचणारी "ती"
मला स्पष्ट दिसत होतं..वार्यावर तिचे केस भुरभुरत होते..
हलक्या पांढर्‍या रंगाची तिची ओढणी त्या हवेत हलकेच लहरत होती..चेहर्‍यावर सात्विक भाव..ह्या जगात देव जर कुठे असेल तर तो तिच्याच ह्रदयात असेल हे मी छातीठोकपणे सांगू शकतो...तिच्यात आज नव्याने मला "रब" दिसला होता...
काही डब्बाच्या खडखडाट आवाजानंतर काकू बाहेर आल्या..
"किती द्यायची रे पोरांना??" काकूने प्रश्न केला..
कुणीतरी एकशेएक म्हणण्याअगोदरच मी एक्कावन म्हटलं..
तसे माझ्याकडे सगळे विचित्रपणे पाहू लागले...
आम्ही ते पैसे घेऊन निघालो..तशे सारी मित्रमित्रमंडळी माझ्यावर उखडली...मग मी त्यांना माझी सासुरवाडी असल्याचं सांगितल्यावर कुठे ते शांत झाले..
गणपत्ती बाप्पा येण्याअगोदरच मला पावले होते...
त्यांनीच तिच्या घरची वाट दाखवली होती..

ती माझ्याच एरियात राहत असताना मला ती कधी दिसलीच नाही..पण आज बाप्पाने तिचे दर्शन मला स्वतःहून घडवले होते..
पुढे आमची ओळख झाली..जाता येता स्माईल एक्सेंज होऊ लागल्या.. मीही मुद्दाम कधीतरी तिच्याकडे नोटस मागायचो..
मग नंबर एक्सेंज झाले...मी मुद्दामच रोज सकाळी काॅलेजला थोड्याशा आडवाटेने तिच्या घराजवळून रोज जायचो..ती मला दिसायची..कधी बॅग भरताना, कधी केस विंचरताना, कधी सॅडल घालताना..आणि रोज सकाळी मी तिला मॅसेज पाठवून काॅम्पीमेंट द्यायचो..."गुड माॅर्निंग. आज हिरव्या ड्रेसमध्ये छान दिसतेस तु" ह्या मॅसेंजमध्ये फक्त रोज फक्त रंग बदलायचा..

एव्हाना तिलाच काय अख्ख्या क्लासमध्ये, एरियामध्ये माहीत झालं होतं..फक्त विचारायची देरी होती...
शेवटी एकेदिवशी धाडस करून विचारलच ..ती " नाही " असं बोलली..
आठवडाभर क्लासला नाही गेलो..
जेवणही सोडलं होतं. तब्येत खालावली होती...थोडासा तापही आला होता. संध्याकाळी डाॅक्टरकडे जाताना ती मला दिसली..
तिने मला पाहीलं होतं..कदाचित कुठेतरी तिच्या मनात
दया उत्पन्न झाली असावी म्हणूनच तिने मला दुसर्या दिवशी फोन केला...

" मी थरथरत फोन उचलला..समोरून एक अनोळखी आवाज ऐकू आला..

"तुझी हिंमतच कशी झाली प्रेरणाला प्रो करण्याची ?"

मीपण जरा घुश्यातच "तुला तर नाही केला ना..मग तुझ्या का पोटात दुखतय असं म्हणालो.."

असं बोललो न बोललो तोच प्रेरणा लाईनवर आली...
बहुतेक फोन लाऊडस्पीकरवर होता..

" माझ्यावर प्रेम आहे ना तुझं?? मग माझ्या मैत्रिणीशी असं उद्धट बोलणार तु..हेच का तुझ प्रेम??

हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली...तरीही तिच्या प्रेमापोटी..त्या तिघी चौघीनी मिळून केलेला शाब्दीक आणि मानसिक सामुहीक बलात्कार मी सहन केला होता...

पुढे आमची मैत्री तर कायम राहीली बट मी फक्त युज होत राहलो...तिच्यावर माझं खुप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी
ती आणि तिच्या मैत्रिणीच्या हातातलं बाहुल बनलो होतो मी..

बट तरीही मी हार नव्हती मानली.
कधी ना कधी कळेल तिलाही माझं खरं प्रेम...

आणि आजही तिने गिफ्ट नाही घेतलं म्हणून काय झाले??
पुढे तिला ते घ्यावच लागेलं..

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सवयीने येस्स लिहिले बघा
ते काय विचारता? सवयीच वाईट - दोन्ही भाषा येत असल्या तरी भाषांची मिसळ करून बोलायचे ही भारतीय लोकांची सवयच.

पुरे झाला आता वादविवाद...बस करा...

मी पुढची कथा लिहणारच नाहीये आणि लिहली तरी इथे टाकणार नाही..

एका भागामुळे इतका मनस्ताप आणि गदारोळ होत असेल तर न लिहलेलच बरं...

आणि लिहणं मी थांबवू शकत नाही, मी लिहत राहणारचं.
पण इथे मी केलंलं लिखाण टाकणार नाही..

माफ करा मला,मी पळ वैगेरे काढत नाहीये किंवा मी नाउमेदही झालो नाहीये पण मला वादावादी, गदारोळ आवडत नाही...मला आधी माहीत असतं तर ..

मी टाकलीच नसती ही कथा..

आता परत परत किस नका काढू कथेचाही आणि माझ्या प्रतिक्रियेचाही...

माझ्याकडून मायबोलीकरांना शेवटचा निरोप...

neglect the sarcastic comment which are negligible against the positive approach shown by true Maybolikars...those always encourage and appreciate new comers as family members Happy
waiting for next part now...

अजय चव्हाण,
झाल्या प्रकारातून मनस्ताप होणे साहजिकच आहे. कथेच्या आशयावरून वा त्यातून आपल्या तर्काने वा आपल्या सोयीने अर्थ काढल्यास त्रास हा होतोच. कारण त्यातून अप्रत्यक्षपणे लेखकाचे विचार, चरीत्र वा व्यक्तीमत्व ठरवले जाते.
अश्या प्रसंगाला प्रत्येक लेखक आपल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट करतो. त्यामुळे तुमच्या निर्णयाचा आदर करणे भागच आहे. फक्त ज्यांनी आपल्याला किंबहुना आपल्यातील लेखकाला सपोर्ट केला त्यांना आपला हा निर्णय बघून नक्कीच वाईट वाटणार. मला वाटले. शक्य असल्यास फेरविचार करा. तुमची संपूर्ण कथा ईथेच मायबोलीवर स्वतंत्र धाग्यात वाचण्यास उत्सुक.. शुभेच्छा Happy

अजय चव्हाण,
तुम्ही माघार घेत आहात, ज्या काही दोन-तीन लोकांनी आक्षेप घेतला, त्या लोंकाचा हा विजय आहे, तुम्ही कथा इंटरनेट वर कोठे ही पोस्ट केली तरी अशी लोक येणारच, वाद घालणार, गदारोळ करणार, त्यांना तेच हवे असते,
तुम्ही कुठे ही जा, किती ही चांगले काम करा, तुम्हाला चार लोक नाव ठेवणारच, पाय मागे ओढणारच, पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कसं निभावून घेता.
तुम्हाला जर एक चांगला लेखक बनायचा असेल, तर या गोष्टींना सामोरे जावंच लागेल, लढा द्यावाच लागेल, शांतपणे आपला मुद्दा पटवून द्यावा लागेल.
तुम्ही प्रतिक्रिया वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल, फक्त तीन ते चार लोकं विरोधात आहेत, बाकी सगळ्यांनी तुम्हाला पाठींबा दिला आहे आणि देत राहतील, मायबोलीचे काही मातब्बर लेखकांनी तुमची बाजू घेतली आहे, तुम्ही परत एकदा या सगळ्याचा विचार करावा ही मनापासून विनंती करतो.
तुमच्या पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

ऋन्मेश आनि टीटी यांच्याशी सहमत...
अजयजी तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा...आनि नेक्स्ट भाग इथे पोस्ट करावा हि विनंती...

ऋन्मेश आनि टीटी यांच्याशी सहमत...
अजयजी तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा...आनि नेक्स्ट भाग इथे पोस्ट करावा हि विनंती. ++११११११११

Submitted by अजय चव्हाण on 30 July, 2017 - 15:40
पुरे झाला आता वादविवाद...बस करा...
मी पुढची कथा लिहणारच नाहीये आणि लिहली तरी इथे टाकणार नाही..
एका भागामुळे इतका मनस्ताप आणि गदारोळ होत असेल तर न लिहलेलच बरं...
आणि लिहणं मी थांबवू शकत नाही, मी लिहत राहणारचं.
पण इथे मी केलंलं लिखाण टाकणार नाही..
माफ करा मला,मी पळ वैगेरे काढत नाहीये किंवा मी नाउमेदही झालो नाहीये पण मला वादावादी, गदारोळ आवडत नाही...मला आधी माहीत असतं तर ..
मी टाकलीच नसती ही कथा..
आता परत परत किस नका काढू कथेचाही आणि माझ्या प्रतिक्रियेचाही...
माझ्याकडून मायबोलीकरांना शेवटचा निरोप...
>>>>
अजय, असं करू नये. Happy

माझ्या स्टोरीवर जर एवढा गदारोळ झाला असता तर मी आणखी हुरूप येऊन अशाच सो कॉल्ड वादग्रस्त चार स्टोर्या सगळी कामं बंद ठेवून लिहील्या असत्या आणि सगळ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चून येथे पोस्ट केल्या असत्या... Happy
आम्हाला लिहीण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे... कथेत नसणारी बिजं चर्चेत आणण्यात आलीयेत... जाहीर निषेध..

माझ्या स्टोरीवर जर एवढा गदारोळ झाला असता तर मी आणखी हुरूप येऊन अशाच सो कॉल्ड वादग्रस्त चार स्टोर्या सगळी कामं बंद ठेवून लिहील्या असत्या आणि सगळ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चून येथे पोस्ट केल्या असत्या... Happy>> हे ऋ.. नेहमीच करत असतो की. आता तुम्ही पण. Wink

अजय, आयुष्यात कुठेही गेलात तर ट्रोलिंग, बुलिंग होणारच.
माबो तर फक्त एक सोशल वेबसाईट आहे. रियल लाईफ मध्ये पण गैरसमज झालेले, तुमच्या चुका काढणारे, तुम्ही जे बोललात किंवा नाही बोललात त्यातून भलते सलते अर्थ काढणारे भरपूर सापडतील तेव्हा काय कराल ??
अशांना प्रतिक्रियांना एक तर उत्तर द्या नाही तर हसून, दुर्लक्ष करून पुढे निघा.

लिखाणासाठी शुभेच्छा.

अजय, अहो असं नका करू . नका नाउमेद होऊ .
इथेच येऊ दे दुसरा भाग .

ऋ कडून घ्या स्फुर्ती थोडी . त्याच्यावर इथे काय कमी तुटून पडतात लोकं ! तो किती थंड डोक्याने हाताळतो . तसंच करा .

अजय, अहो असं नका करू . नका नाउमेद होऊ .
अनुमोदन.
एका कथेवर टीका झाली म्हणून एव्हढे ना उमेद होऊ नका. अभिताभ बच्चन नावाचा नट माहित आहे का? तो जेंव्हा नोकरी शोधत होता तेंव्हा त्याला एका मॅनेजरने सांगितले तुझा आवाज सिनेमाला ठीक नाही!
शाहरुख खानचेहि काही सिनेमे ऋ खेरीज कुणाला आवडले नसतील, पण आता बघा -
तुम्ही प्रसिद्ध होऊन तुमची मुलाखत घ्यायला लोक आले की त्यांना ही कहाणी सांगा! मज्जा वाटेल लोकांना.

अजय, दुर्देवाने येथे गदारोळ झाला पण आपण सुदैवी आहात. आपली वाचकसंख्या अफाट वाढलेली आहे...ही संधी समजा..नविन लिखाण आणा येथे..
प्रतिक्षेत अन् शुभेच्छा!

शाहरुख खानचेहि काही सिनेमे ऋ खेरीज कुणाला आवडले नसतील, पण आता बघा -
>>>.
येस्स उत्तम उदाहरण!
शाहरूख खान सुपर्रस्टार होता, सुपर्रस्टार आहे, आणि सुपर्रस्टार राहील.. पण त्याने आपल्या काराकिर्दीत जितकी बॅशिंग झेललीय तेवढी जगभरात कुठल्या सुपर्रस्टारला झेलावी लागली नसेल. तरीही त्याने त्यावर मात करूनही यशाचे शिखर गाठले, आणि आपले स्टारडम टिकवून ठेवलेय.
तर तो देखील या प्रकरणात आदर्श म्हणून घ्यायला चांगले उदाहरण आहे

ये भावा कथा खूप चांगली आहे ,,,,,
आपल्याला आवडली कथा,,,,
येऊदे पुढचा भाग ,,,,,
जो होगा देखा जायेगा
पुढच्या भागासाठी good luck,,,
And tackcare by,,,,,,,,

Pages