प्रेमात असंच का होतं ?

Submitted by अजय चव्हाण on 25 July, 2017 - 03:56

"आज व्हॅलेटाईन डे है ड्युड आज नही तो कभी नही..
आज फुल न फायनल करही दे ये तोफा उसे दे उसने लिया तो ठीक वरना इसी तोफा को तोड दे और तेरे जजबात को भी तोड दे.. प्राॅमिस.." विरल आणि माझे इतर मित्र क्लासच्या बाहेर माझ्याकडून प्राॅमिस घेत होते.. विरलचे शब्द माझ्या कानात घुमत होते..

प्राॅमिस ..त्याने परत एकदा प्राॅमिस मांगितले..

तसे मी ते प्राॅमिस करून त्याच्या हातावर फाय दिली...तिच्यासाठी मी ओम शांती ओममधलं काचेत असलेलं एका कपलच डान्सिंग विथ साॅगवाल गिफ्ट घेतलं होतं..
ते भराभर पॅक करून मी निघालो.

मनात थोडीशी धाकधुक होती..ह्रदयाची धडधडही आता वाढू लागली कसलीतरी एक अनामिक भितीही वाटत होती..

इतक्यात ती आणि तिच्या मैत्रिणी मला येताना दिसल्या..
मी थोड पुढे जाऊन मला तुझ्याशी काही बोलायच आहे असं तिला सांगून साईडला येण्याची खुण केली.

तिनेही जास्त आढेवेढे न घेता साईडला आली..
"बोल लवकर तुला काय बोलायच आहे ते.. क्लास आता सुरू होईलं.." ती उगाचच ओढणी सावरल्याच आव आणत म्हणाली...

अं..ह..अॅक्चुली...मला तुला काही द्यायच आहे..थोडीशी हिंमत करून मी म्हणालो. ..

काय ? खुपमोठ प्रश्नचिन्ह घेऊन तिने मला विचारलं..

" हे बघ..मी हळूच मागे लपवलेलं गिफ्ट तिच्या पूढे केलं..
मला माहीतेय तुझ्या मनात मी नाहीये..पण तरीही हे गिफ्ट घ्याव असं मनापासून मला वाटतं.." एका दमात मी सारं सांगून टाकलं..

"साॅरी जयेश हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. तु प्लिज दुसर्‍या कुणालातरी हे गिफ्ट दे.." - ती..

" हे गिफ्ट फक्त मी तुझ्याचसाठीच घेतलं आहे आणि ह्या गिफ्टवर फक्त तुझाच अधिकार आहे..तु नाही घेतलेस तर मी हे इथेच तोडून टाकेन" मी तिला आर्जव करत बोललो..

" हे बघ जयेश हे जरा अति होतय..तु आता नाही ऐकलस ना तर सरांना तुझ नाव सांगेन "..

" सांग ना मग..सर येऊन काय करतील फार फार तर माझ्या कानाखाली मारतील पण त्याने तुझ्यावर असलेलं माझं प्रेम थोडीच कमी होणार आहे??"

" लिव्ह ईट ..तुला काय करायच आहे ते कर मी चालले बाय"
इतकं बोलून ती निघूनही गेली..

ती गेल्यानंतर माझे मित्र जवळ आले..काय झाले हे त्यांना दिसले होतेच ..
" जयेश तोड दे इस गिफ्ट को..और तेरे अंदर के चुपे हुए जजबात को भी.." पुन्हा एकदा विरल बोलत होता...

माझ्या मनात चलबिचल सुरू झाली..
हे गिफ्ट नव्हतच मुळी...माझ्या भावना होत्या त्या... माझं प्रेम होत ते..असं कसं मी तोडू शकलो असतो ते गिफ्ट..

"नही यार मै इसे नही तोड सकता चाहे तो तुम तोड दो.."

विरलने ते गिफ्ट घेतलं आणि जवळच असलेल्या गटारावर ठेवलं एक एक करून सगळ्यांनी लाथा मारायली सुरूवात केली...
ते गिफ्ट जेव्हा तुटत होतं तेव्हा ते गिफ्ट तुटत नसून जणू काही माझ्याच ह्रदयाच्या काचा तुटत आहेत असं मला वाटतं होतं...

फायनली सगळ्यांनी लाथा मारून घेतल्यानंतर मलासुद्धा एक लाथ तरी मारायला फोर्स केलं..

तसे मी डोळे बंद करून एक लाथ मारली..
आणि खर्या अर्थाने त्या गिफ्टचा चकणाचुर झाला..
कदाचित त्या गिफ्ट पेक्षा माझ्याच ह्रदयाच्या चकणाचुर झाला होता...

............................................................................ .............................................................................

भर उन्हात मी मुकाट्याने चालत होतो..अंगाची नुसती लाही लाही होत होती ..पण त्याचबरोबर माझ्या मनात लावारस उसळला होता..डोळ्याच्या कड्यात थोडे कोमट अश्रू जमा झाले होते.. ते कसेबसे लपवून मी एकटाच जात होतो.. लहान मुलाला एखादं अविचत काहीतरी सापडावं आणि सगळं काही विसरून
त्याने त्यासोबत रमावं असंच काहीतरी माझं मन तिच्या जुन्या आठवणीत रमतं होतं..एक एक क्षण क्षण मला आठवतं होता..

क्लासचे सर अकांऊट विषयाचे सरावाचे पेपर तपासुन घेऊन आले होते..
एक एक नाव ते उच्चारून ते तपासलेले पेपर वाटत होते..
शेवटी एकच पेपर आता उरला होता..
सरांनी वाजवीपेक्षा जरा जास्तच जोराने तिच नाव उच्चारलं...

"प्रेरणा मानेऽऽऽ. ." तशी एक काळीसावळी मुलगी दबकत बेंचवरून उठून सरांकडे गेली...

"काय ग असा पेपर कुणी लिहत का कधी..?" सर जरा खेकसतच तिला बोलले..
ती तिथेच स्तभ झाल्यासारखी उभी राहीली..
हे तिला अपेक्षित नसावं बहुतेक..
तिला असं बघून सर खुप खळखळून हसले..आणि तिचा पेपर तिच्या हातात दिला..तिने भराभर नजर मार्कावर फिरवली..आणि अत्यांनंदाने तिने हलकीशी उडी मारली...
बस तोच एक क्षण..तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता..त्या क्षणात नक्कीच काहीतरी वेगळं होतं..
त्या क्षणाने जणू माझं मन मंतरल होतं ..तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा तो आनंद हा मला आतापर्यतच्या माझ्या आयुष्यात मिळालेल्या अत्यानंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटत होता..कित्येक वेळा ती मला दिसायची पण तिच्याबद्दल असं कधीच काही वाटलं नाही पण आज मात्र खुप वाटत होतं..

तिला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते..त्यामुळेच ती इतकी खुश झाली होती..मी एकटक वेड्यासारखा तिच्याचकडे बघत होतो..कदाचित सरांच ते लक्षात आलं असावं म्हणूनच की काय सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला..

"काय जयेशराव...सालाबादप्रमाणे यंदाही नापास झालात तुम्ही. .
काय लाज लज्जा आहे की नाही?"

माहीत नाही पण माझ्याही नकळत मी..

" सर अभी तो रास्ता मिला है.. मंझिल भी मिलही जायेगी.."
असं काहीतरी मी पुटपुटलो आणि सरांनी कपाळावर हात मारून घेतला..

ती कुठे राहयची माहीत नाही...मीही तिला काय वाटेल म्हणून कधी फाॅलो केलं नाही पण ती कलासमध्ये यायची..
तेव्हा खुप छान वाटायचं...
ती खुपच साधी होती..तिच्यात असं काही नव्हतंच मुळी..
चारचौघातही ती उठून दिसणारं नाही अशी होती ती..
तरीही मला ती खुप आवडली होती..

असाच एकदा बसस्टाॅपवर बसची वाट पाहत उभा होता..
आज ती दिसावी असा विचारच मी करत होतो की, समोर मला ती येताना दिसली..तिला असं अनपेक्षित समोर आलेलं पाहताना..माझ्या मनात फुलपाखरे भिरभिरत होती..
एकाच बसमधून आम्ही दोघंही गेलो...
आम्ही एकत्र क्लासला जरी असलो तरी आमची ओळखच नव्हती..कधी आम्ही एकमेंकांशी बोललोच नाही..

ती हयाच स्टाॅपला येते म्हणून मी रोजच त्या वेळी तिची वाट पाही पण पुन्हा कधी ती दिसलीच नाही..
ती मला बाहेर जरी दिसली नाही तरी क्लासमध्ये दिसायचीच..
पण क्लासमध्ये तिला पाहणं आणि बाहेर पाहण ह्यात खुप फरक असायचा कारण क्लासमध्ये ती नेहमीच पुस्तकांच्या किंवा मैत्रणीच्या गराड्यात असायची..
तिने वेळ बददली असेल म्हणून मीही वेळ बदलून पाहीली बट तरीही ती परत त्या स्टाॅपवर दिसलीच नाही..
तरही माझं मन एक वेडी आशा घेऊन रोज त्या स्टाॅपवर तिची वाट पाही..

..........................................................................................................................................................

लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार होते...त्यामुळे आमच्या चाळीत होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवसाठी जय्यत तयारी सुरू झाली होती आता मंडळाचा सदस्य या नात्याने संपुर्ण एरियामधून वर्गणी गोळा करण्याचे काम माझ्या वाटेला आले होते...संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी बहुतेक...असेच छोटया छोट्या गल्लीतून रस्ता काढत आम्ही एका घराजवळ पोहचलो मी दारावर टकटक केली..
घराचा पडदा बाजूला सारत एका मध्यम वयाच्या बाईने प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहीले..
"काकू गणपतीची वर्गणी..." असे सगळेच एकदम म्हणाले
"आणते हा"...असं म्हणून काकू आत किचनमध्ये गेल्या ..
मी सहजच आतमध्ये पाहीलं...छोटसच पण नीटनेटक आवरलेलं घर..मस्त गरगर पंखाच्या वार्यावर उडणारे खिडकीचे रेशमी परदे...नुकतीच धुतलेली स्वच्छ फरशी...समोरच खुप मोठ अधिष्ठान ( दत्तात्रय या देवाचा फोटो. बैठकीला जे जातात त्यांना माहीत असेलच)
अगरबत्ती धुपाचा मस्त घरभर दरवळलेला सुवास..
आणि नेमक्या देवार्याच्या पायथ्याशी दासबोध वाचणारी "ती"
मला स्पष्ट दिसत होतं..वार्यावर तिचे केस भुरभुरत होते..
हलक्या पांढर्‍या रंगाची तिची ओढणी त्या हवेत हलकेच लहरत होती..चेहर्‍यावर सात्विक भाव..ह्या जगात देव जर कुठे असेल तर तो तिच्याच ह्रदयात असेल हे मी छातीठोकपणे सांगू शकतो...तिच्यात आज नव्याने मला "रब" दिसला होता...
काही डब्बाच्या खडखडाट आवाजानंतर काकू बाहेर आल्या..
"किती द्यायची रे पोरांना??" काकूने प्रश्न केला..
कुणीतरी एकशेएक म्हणण्याअगोदरच मी एक्कावन म्हटलं..
तसे माझ्याकडे सगळे विचित्रपणे पाहू लागले...
आम्ही ते पैसे घेऊन निघालो..तशे सारी मित्रमित्रमंडळी माझ्यावर उखडली...मग मी त्यांना माझी सासुरवाडी असल्याचं सांगितल्यावर कुठे ते शांत झाले..
गणपत्ती बाप्पा येण्याअगोदरच मला पावले होते...
त्यांनीच तिच्या घरची वाट दाखवली होती..

ती माझ्याच एरियात राहत असताना मला ती कधी दिसलीच नाही..पण आज बाप्पाने तिचे दर्शन मला स्वतःहून घडवले होते..
पुढे आमची ओळख झाली..जाता येता स्माईल एक्सेंज होऊ लागल्या.. मीही मुद्दाम कधीतरी तिच्याकडे नोटस मागायचो..
मग नंबर एक्सेंज झाले...मी मुद्दामच रोज सकाळी काॅलेजला थोड्याशा आडवाटेने तिच्या घराजवळून रोज जायचो..ती मला दिसायची..कधी बॅग भरताना, कधी केस विंचरताना, कधी सॅडल घालताना..आणि रोज सकाळी मी तिला मॅसेज पाठवून काॅम्पीमेंट द्यायचो..."गुड माॅर्निंग. आज हिरव्या ड्रेसमध्ये छान दिसतेस तु" ह्या मॅसेंजमध्ये फक्त रोज फक्त रंग बदलायचा..

एव्हाना तिलाच काय अख्ख्या क्लासमध्ये, एरियामध्ये माहीत झालं होतं..फक्त विचारायची देरी होती...
शेवटी एकेदिवशी धाडस करून विचारलच ..ती " नाही " असं बोलली..
आठवडाभर क्लासला नाही गेलो..
जेवणही सोडलं होतं. तब्येत खालावली होती...थोडासा तापही आला होता. संध्याकाळी डाॅक्टरकडे जाताना ती मला दिसली..
तिने मला पाहीलं होतं..कदाचित कुठेतरी तिच्या मनात
दया उत्पन्न झाली असावी म्हणूनच तिने मला दुसर्या दिवशी फोन केला...

" मी थरथरत फोन उचलला..समोरून एक अनोळखी आवाज ऐकू आला..

"तुझी हिंमतच कशी झाली प्रेरणाला प्रो करण्याची ?"

मीपण जरा घुश्यातच "तुला तर नाही केला ना..मग तुझ्या का पोटात दुखतय असं म्हणालो.."

असं बोललो न बोललो तोच प्रेरणा लाईनवर आली...
बहुतेक फोन लाऊडस्पीकरवर होता..

" माझ्यावर प्रेम आहे ना तुझं?? मग माझ्या मैत्रिणीशी असं उद्धट बोलणार तु..हेच का तुझ प्रेम??

हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली...तरीही तिच्या प्रेमापोटी..त्या तिघी चौघीनी मिळून केलेला शाब्दीक आणि मानसिक सामुहीक बलात्कार मी सहन केला होता...

पुढे आमची मैत्री तर कायम राहीली बट मी फक्त युज होत राहलो...तिच्यावर माझं खुप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी
ती आणि तिच्या मैत्रिणीच्या हातातलं बाहुल बनलो होतो मी..

बट तरीही मी हार नव्हती मानली.
कधी ना कधी कळेल तिलाही माझं खरं प्रेम...

आणि आजही तिने गिफ्ट नाही घेतलं म्हणून काय झाले??
पुढे तिला ते घ्यावच लागेलं..

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, ईथेच तर तुमची गल्लत होतेय. तो त्रास आहे की नाही हा वेगळा मुद्दा झाला. पण त्याला कोण ईथे मिटक्या मारत वाचतेय का किंवा त्या कॅरेक्टरला वाचकांनी हिरो म्हणून गौरवले आहे का? खुद्द लेखकाने तसे केले आहे का? किंबहुना कथेत त्याचे मित्र त्या मुलीला विसरायचे सल्ले देत आहेत. कोणी असेही बोलत नाही की भिड भावा, वहिनी पटलीच पाहिजे वगैरे वगैरे..

विचार करतोय जर व्यासांनी मायबोलीवर महाभारत लिहायला घेतले असते तर कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या. द्रौपदी वस्तहरणाच्या भागानंतर तर महाभारत बंदच पाडले असते. किंबहुना मागे वळून पाहता असा आचरट सीन व्यासांना का लिहावासा वाटला हा प्रश्न आता मलाही पडू लागलाय. ते आवडलेल्या राजकन्येचे हरण करणे हे तर अचाट होते. तर्हेतर्हेच्या रासलीलांबद्दल बोलायलाच नको. आणि कहर म्हणजे यांना आपण धार्मिक ग्रंथांचा दर्जा देत ते लहान मुलांनाही वाचायला देतो.

ऋ +१
अगदी हेच लिहायला आलेलो. एखादा अतंगवादी असल्यासारखं फायरिंग चालू केलंय.

लिखाणावर प्रतिसाद देतांना चांगलं/वाईट असे प्रतिसाद येणारच याचा वाचकांना अधिकार आहे. पण "लेखकाने यापुढे लिखाण करूच नये" हे सांगण्याचा अधिकार माझ्या मते तरी वाचकांना नाहीये.

जेव्हा मुलगा तिच्या कपड्यांवर मेसेज करतोय तेव्हा तिने हरकत कुठे घेतली आहे? आणि हो प्रपोज नंतरचा पहिला फोन तिने केलाय त्याला ते पण एक आठवड्यानंतर त्याला ओरडायला.

१) एकाच भागावरून मत तयार करणे म्हणजे, "शितावरून भाताची परीक्षा करणे"

२) कथेतलं पात्र आवडलं नाही म्हणून लेखकाला दोष देणे, त्याला नायलक ठरवणे, जाहीरपणे त्याचा अपमान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

३) कथा आवडली नाही, राग आला, तर तो योग्य शब्दात तुम्ही लेखकापर्यंत पोहचवू शकता, त्याला फडतूस म्हणून त्याचा तिरस्कार करणे, त्यावरून आदर्श मतवादी असल्याची आगपाखड करणे, ही इंटरनेट वरील दादागिरी वाटते.

४) तुम्ही एका ओळीत लेखकाची लायकी काढता आणि तुमच्या त्याच ओळीला कोणी नाव ठेवली की तो माणूस "विकृत" ठरतो !!

लेखकाला नालायक, वाचकांना विकृत ठरवून तुम्ही स्वतःला आदर्श समजता?
का तर त्याने तुम्हाला आवडेल असे लिखाण केलं नाही म्हणून?
तुम्ही जसा जाहीर अपमान केला आहे, तशी जाहीर माफी मागण्याची वेळ आली आहे

कथेतलं पात्र आवडलं नाही म्हणून लेखकाला दोष देणे, त्याला नायलक ठरवणे, जाहीरपणे त्याचा अपमान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
+११११११

कथा वाचून जर एकतर्फी प्रेमाला वाव मिळत असेल तर "रमण राघव" सिनेमा बघून काय झाले असते??

टकमत टोक यांच्याशी सहमत. नुसत्या प्रोमो वरून पुढची सिरीयल कशी असेल हे आपण लगेच सांगू शकत नाही. त्या साठी पुढचे दोन तीन भाग बघणे गरजेचे असते. तसच लिखाणाच आहे. एका भागा वरून पुढच लिखाण लिहूच नका हे सांगणे बरोबर नाही.

कथा ही कथा म्हणुन वाचायचं कधी कळणार लोकांना?
एखाद्या कथेत एकतर्फी प्रेमात मुलीवर अ‍ॅसिड फेकलंय तर तीही कथा फडतुस आणि लिहिणारा त्या घट्नेचं समर्थन करतोय असा अर्थ निघतो काय?
खरंतर एखाद्या कथेवर फड्तुस, फालतु, आपल्या मुली बहिणीवर वेळ आली तर मजा बघा हे प्रतिसादच त्या कथेतल्या कंटेंट पेक्षा अतिशय गंभीर आहेत.
दिसला नवोदित लिहिणारा की आला ह्यांच्या कीबोर्डाला हुरुप काहीतरी बेक्कार बिनालॉजिकच्या कमेंटी लिहायचा.

ही केवळ कथा म्हणून वाचावी इतकीच माफक अपेक्षा आहे...
Submitted by अजय चव्हाण on 28 July, 2017 - 02:07>> हेच काही विचक्षण लोकांना कळत नाही इथे.

हम्म! बरेच प्रतिसाद आहेत म्हणून कथा वाचायला आले तर इथे वेगळाच वाद सुरु आहे.
आत्तापर्यंत जी कथा लिहिलेय ती कथा आवडली नाही तर तसा प्रतिसाद द्यावा पण पुढे लिहूच नका हे सांगणे मला तरी योग्य वाटत नाही.
एकतर्फी प्रेमातून ज्या दुर्घटना घडतात ते लक्षात घेता अशी एकतर्फी प्रेमाची कथा वाचून मनात कटूता दाटून येणे आणि अशी कथा इथे नको वाटणे अगदी साहाजिक आहे पण तरीही लेखक एका विशिष्ठ वयोगटातल्या, साधारण परीस्थितीतल्या , प्रेमाबद्दल चुकीच्या कल्पना असलेल्या मुलाचे मनोगत मांडतोय असा विचार केला तर त्याने उभे केलेले कॅरॅक्टर अगदी सुसंगत आहे. खरे तर 'यक्क! काय फालतू वर्तन आहे या मुलाचे! ' असे आपल्या मनात येतेय म्हणजे कथा नायक/न -नायक चांगला उभा केलाय. कथेत जे काही सुरु आहे ते योग्य नाही म्हटले तरी अशा प्रकारच्या कथेच्या ओघात हे असेच वर्णन येणार ना? लेखक जर का सत्य घटनेवर आधारित म्हणत आहेत तर त्यांना त्यांची कथा पूर्ण करु द्या. अमुक कारणांसाठी ही कथा आवडली नाही असे प्रतिसादकर्त्याने जरूर सांगावे पण एकदम पुढे लिहूच नका असे सांगणे मला तरी योग्य वाटत नाही. मायबोलीवर लेखनात जर का काही मजकूर आक्षेपार्ह, अश्लिल वाटला तर तसे अ‍ॅडमिनना कळवल्यास ते त्यावर योग्य ती कारवाई करतात. त्यामुळे वाचकांना तो मार्ग उपलब्ध आहेच.

'सामुहिक बलात्कार' वगैरे शब्दं वापरतांना जी सेन्सिटिविटी, जबाबदारपणा अपेक्षित आहे त्याचं मातेरं केलेलं आहे आणि वर 'त्रास झाला असल्यास क्षमा मागतो' वगैरे अघळपघळ बोलत टोलवाटोलवी केलेली आहे. तुम्ही हा शब्दं एवढ्या कॅजुअली वापरतांना तुमच्या विचारांच्या कुवतीचं केलेलं केलेलं प्रदर्शन खटकू नये अशी तुमची अपेक्षा आहे का? पात्रं,कथा सत्य किंवा काल्पनिक असले तरी शब्दांची जबाबदारी तुमचीच आहे ना?

तुमचे आधीचे लेखन बरे आहे पण ईथे तुम्ही चुकलात. हा शब्द/वाक्यं काढून टाकावा ही तुम्हाला विनंती..

मला वाटते काही वाचक एखाद्या बाबतीत हळवे वा परखड असतात. यामागे कदाचित त्यांना आलेले वा आसपास पाहिलेले कटू अनुभव असू शकतात. एखादी जहाल प्रतिक्रिया या कारणानेही येऊ शकते. एखाद्या लेखकाला झोडपायचेच असा हेतू क्वचितच कोणाचा तरी असतो. त्यामुळे असे प्रतिसाद देणारयांबद्दलही लगेच टोकाचे मत देता कामा नये.

मी स्वत: दारू या विषयाबाबत सेन्सिटीव्ह आहे. अमिताभने शराबी केला किंचा शाहरूखने देवदास केला म्हणून त्यांच्यावर चिडत नाही, उलट त्यांनी योग्य तोच संदेश पोहोचवला असतो. मात्र कुठल्या लेखात वा कोणाच्या प्रतिसादात दारूची तरफदारी दिसली तर मात्र मी देखील परखड प्रतिसाद देतोच. कारण दारू, जुगार या गोष्टी कसे आयुष्य उध्वस्त करतात हे पाहिलेय जवळून..

मी एकाच बाजूला आहे च्रप्सभाऊ, फक्त मला जेव्हा समोरचा चुकीचा वागला असे वाटते तेव्हा मी त्याला झाडण्याऐवजी त्याची चूक लक्षात आणून देतो आणि त्यानंतर ती चूक त्याने का केली असावी, वा कोणत्या परीस्थितीत त्याकडून झाली असावी याचे कारण शोधायचा प्रयत्न करतो ईतकेच Happy

मायबोलीवर प्रतिसाद देणारे काही जण घरी प्रचंड भांडून वगैरे आलेले असतात का? की काहीच जमत नसल्यामुळे उपद्रव तरी करून बघू अशी वृत्ती झालेली असते? ह्या अजय चव्हाणांनी एक कथा सुरू केली आहे. पन्नासच्या आसपास प्रतिसाद पोचले म्हणून धागा उघडला आणि अजिबात अपेक्षाभंग झाला नाही. फालतू, फडतूस, बंद करा लेखन हे सुरुवातीचेच अभिप्राय! म्हणजे आपल्याला इतके निगेटिव्ह बोलायचेच असेल तर किमान इतर चारचौघे आधी काही वेगळे बोलतायत का हेही बघायला थांबायचे नाही. विरोधी प्रतिसाद देणारे अल्पमतीचे असतात हेही ठरवून मोकळे व्हायचे. की आता लेखकाने प्रत्येकवेळी टीप द्यायची की 'ही काल्पनिक कथा आहे'? ही असली कथानके रस्तोरस्ती प्रत्यक्षात होताना आपण पाहतो तेव्हा त्यातील मुलांना जाऊन सांगतो का, तू फडतूस आहेस, फालतू आहेस, तिच्या मागे लागणे बंद कर? तो एखाद्या गुंठामंत्र्याचा पोरगा असला तर काय करेल त्याची कल्पना असेलच. इथे आपलं प्रोटेक्टेड वातावरणात झापडता येतंय तर झापडा बिचार्‍याला!

अतीआक्रमक प्रतिसाद दिवसातून एकदाच देता येतील असा नियम असायला हवा. Lol

>>की काहीच जमत नसल्यामुळे उपद्रव तरी करून बघू अशी वृत्ती झालेली असते? --
हीच वृत्ती बोकाळलेली आहे सध्या इथे. अजय चव्हाण, तुम्ही बिनधास्त लिहा, आम्ही वाचु. आवडले, नाही आवडले ते सांगु.

इथे आपलं प्रोटेक्टेड वातावरणात झापडता येतंय तर झापडा बिचार्याला!>>१११•+++
.
अतीआक्रमक प्रतिसाद दिवसातून एकदाच देता येतील असा नियम असायला हवा. >> Lol Lol खरेच ह्या अपडेट चा सुद्धा विचार करावा लागेल बहुतेक प्रशासनाला Wink

लेखकराव,लिहीत रहा.
इथल्या मराठी मध्यमवर्गिय पांढरपेशांची संस्कृतीची गळवे कशानेही ठसठसू लागतात,इग्नोर करा.

अजय, चांगला प्रयत्न.
तोंडचे संवाद वेगळ्या ओळीत लिहिले जातात. पण इतर वाक्ये सरळ एकापुढे एक लिहिली नाहीत तर तुटक तुटक वाटतं वाचताना. जे इथे होत आहे. तसच प्रत्येक वाक्याच्या शेवटी तीन टिंब दिल्यानेही रसभंग होतो. पुढे काय होईल याची मला उत्सुक्ता वाटली सो तुमची स्टोरी टेलिंग चांगली आहे. लिहित रहा. पुलेशु.

ही कथा आहे. सत्यघटनेवर आधारित असली तरी 'कथा' आहे.
कथा हाय मोराल असलीच पाहिजे आणि त्यातून चांगली शिकवणच दिली पाहिजे असं मला अ_जि_बा_त वाटत नाही. 'नो मीन्स नो' ला आणि या 'कथेला' दोघांना पाठिंबा.

कथा आवडली आहे. आजकालच्या तरुण-किशोरांची भाषा व भावविश्व अचूक टिपले आहे, सत्यघटनेवर आधारित असल्याचा चांगला गंध आहे कथेला. पुढचा भाग टाका. अशा कथा जास्तीत जास्त पुढे आल्या पाहिजेत. दाबून ठेवल्याने काही सुर्य उगवायचा राहत नाही.

वाचकांना आपल्या प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे. पण लेखकाने पुढे लिहूच नये असे म्हणणे सर्वथा गैर आहे.

--- शेवटच्या वाक्यामुळे थेट अ‍ॅसिड हल्ल्यापर्यंत चिथावणी देणारी कथा आहे असे वाटावे हे जरा जास्तच ताणले आहे, या वयात असे फिल्मी विचार आणि डायलॉग असतातच आयुष्यात. पण त्या वाक्यांचे इथल्या काही वाचकांनी आपल्या सोयीने इन्टरप्रिटेशन केले आहे, कथेत असे काही आढळलेले नाही आतापर्यंत, पुढचे माहित नाही. जर पुढचे माहित नाही तर आत्ताच तांडव करण्यात हशील नाही -----

<<<बट मी फक्त युज होत राहलो... बट तरीही मी हार नव्हती मानली.>>>>
हे "बट"काय? म्हणजे इथे दुसरा शब्द कथालेखनाच्या तंत्रात बसत नाही म्हणून का?
कधी कधी इतर भाषेतील शब्द जास्त चपखल रीत्या बसतात कथेत, पण इथे तसे काही असेल असे वाटत नाही. मग बट काय?

बट म्हणजे पण.
चालतात असे फ्रेक्वेन्ट use वाले शब्द...

लेखक... नाउमेद वायचे नाही... येऊ देत अजून लिखाण

"पुढे आमची मैत्री तर कायम राहीली बट मी फक्त युज होत राहलो...तिच्यावर माझं खुप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी
ती आणि तिच्या मैत्रिणीच्या हातातलं बाहुल बनलो होतो मी.."
मी काय म्हणते ह्या वाक्यावर काय मत आहे?? म्हणजे मुलाच एकतर्फी प्रेम यावर ईतके प्रतिसाद पण त्याच मुलाचा वापर केला गेला यावर एकही प्रतिसाद नाही. अस का??

वाचकांना आपल्या प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे. पण लेखकाने पुढे लिहूच नये असे म्हणण खरच चुकिच आहे.

Pages