"आज व्हॅलेटाईन डे है ड्युड आज नही तो कभी नही..
आज फुल न फायनल करही दे ये तोफा उसे दे उसने लिया तो ठीक वरना इसी तोफा को तोड दे और तेरे जजबात को भी तोड दे.. प्राॅमिस.." विरल आणि माझे इतर मित्र क्लासच्या बाहेर माझ्याकडून प्राॅमिस घेत होते.. विरलचे शब्द माझ्या कानात घुमत होते..
प्राॅमिस ..त्याने परत एकदा प्राॅमिस मांगितले..
तसे मी ते प्राॅमिस करून त्याच्या हातावर फाय दिली...तिच्यासाठी मी ओम शांती ओममधलं काचेत असलेलं एका कपलच डान्सिंग विथ साॅगवाल गिफ्ट घेतलं होतं..
ते भराभर पॅक करून मी निघालो.
मनात थोडीशी धाकधुक होती..ह्रदयाची धडधडही आता वाढू लागली कसलीतरी एक अनामिक भितीही वाटत होती..
इतक्यात ती आणि तिच्या मैत्रिणी मला येताना दिसल्या..
मी थोड पुढे जाऊन मला तुझ्याशी काही बोलायच आहे असं तिला सांगून साईडला येण्याची खुण केली.
तिनेही जास्त आढेवेढे न घेता साईडला आली..
"बोल लवकर तुला काय बोलायच आहे ते.. क्लास आता सुरू होईलं.." ती उगाचच ओढणी सावरल्याच आव आणत म्हणाली...
अं..ह..अॅक्चुली...मला तुला काही द्यायच आहे..थोडीशी हिंमत करून मी म्हणालो. ..
काय ? खुपमोठ प्रश्नचिन्ह घेऊन तिने मला विचारलं..
" हे बघ..मी हळूच मागे लपवलेलं गिफ्ट तिच्या पूढे केलं..
मला माहीतेय तुझ्या मनात मी नाहीये..पण तरीही हे गिफ्ट घ्याव असं मनापासून मला वाटतं.." एका दमात मी सारं सांगून टाकलं..
"साॅरी जयेश हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. तु प्लिज दुसर्या कुणालातरी हे गिफ्ट दे.." - ती..
" हे गिफ्ट फक्त मी तुझ्याचसाठीच घेतलं आहे आणि ह्या गिफ्टवर फक्त तुझाच अधिकार आहे..तु नाही घेतलेस तर मी हे इथेच तोडून टाकेन" मी तिला आर्जव करत बोललो..
" हे बघ जयेश हे जरा अति होतय..तु आता नाही ऐकलस ना तर सरांना तुझ नाव सांगेन "..
" सांग ना मग..सर येऊन काय करतील फार फार तर माझ्या कानाखाली मारतील पण त्याने तुझ्यावर असलेलं माझं प्रेम थोडीच कमी होणार आहे??"
" लिव्ह ईट ..तुला काय करायच आहे ते कर मी चालले बाय"
इतकं बोलून ती निघूनही गेली..
ती गेल्यानंतर माझे मित्र जवळ आले..काय झाले हे त्यांना दिसले होतेच ..
" जयेश तोड दे इस गिफ्ट को..और तेरे अंदर के चुपे हुए जजबात को भी.." पुन्हा एकदा विरल बोलत होता...
माझ्या मनात चलबिचल सुरू झाली..
हे गिफ्ट नव्हतच मुळी...माझ्या भावना होत्या त्या... माझं प्रेम होत ते..असं कसं मी तोडू शकलो असतो ते गिफ्ट..
"नही यार मै इसे नही तोड सकता चाहे तो तुम तोड दो.."
विरलने ते गिफ्ट घेतलं आणि जवळच असलेल्या गटारावर ठेवलं एक एक करून सगळ्यांनी लाथा मारायली सुरूवात केली...
ते गिफ्ट जेव्हा तुटत होतं तेव्हा ते गिफ्ट तुटत नसून जणू काही माझ्याच ह्रदयाच्या काचा तुटत आहेत असं मला वाटतं होतं...
फायनली सगळ्यांनी लाथा मारून घेतल्यानंतर मलासुद्धा एक लाथ तरी मारायला फोर्स केलं..
तसे मी डोळे बंद करून एक लाथ मारली..
आणि खर्या अर्थाने त्या गिफ्टचा चकणाचुर झाला..
कदाचित त्या गिफ्ट पेक्षा माझ्याच ह्रदयाच्या चकणाचुर झाला होता...
............................................................................ .............................................................................
भर उन्हात मी मुकाट्याने चालत होतो..अंगाची नुसती लाही लाही होत होती ..पण त्याचबरोबर माझ्या मनात लावारस उसळला होता..डोळ्याच्या कड्यात थोडे कोमट अश्रू जमा झाले होते.. ते कसेबसे लपवून मी एकटाच जात होतो.. लहान मुलाला एखादं अविचत काहीतरी सापडावं आणि सगळं काही विसरून
त्याने त्यासोबत रमावं असंच काहीतरी माझं मन तिच्या जुन्या आठवणीत रमतं होतं..एक एक क्षण क्षण मला आठवतं होता..
क्लासचे सर अकांऊट विषयाचे सरावाचे पेपर तपासुन घेऊन आले होते..
एक एक नाव ते उच्चारून ते तपासलेले पेपर वाटत होते..
शेवटी एकच पेपर आता उरला होता..
सरांनी वाजवीपेक्षा जरा जास्तच जोराने तिच नाव उच्चारलं...
"प्रेरणा मानेऽऽऽ. ." तशी एक काळीसावळी मुलगी दबकत बेंचवरून उठून सरांकडे गेली...
"काय ग असा पेपर कुणी लिहत का कधी..?" सर जरा खेकसतच तिला बोलले..
ती तिथेच स्तभ झाल्यासारखी उभी राहीली..
हे तिला अपेक्षित नसावं बहुतेक..
तिला असं बघून सर खुप खळखळून हसले..आणि तिचा पेपर तिच्या हातात दिला..तिने भराभर नजर मार्कावर फिरवली..आणि अत्यांनंदाने तिने हलकीशी उडी मारली...
बस तोच एक क्षण..तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता..त्या क्षणात नक्कीच काहीतरी वेगळं होतं..
त्या क्षणाने जणू माझं मन मंतरल होतं ..तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा तो आनंद हा मला आतापर्यतच्या माझ्या आयुष्यात मिळालेल्या अत्यानंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटत होता..कित्येक वेळा ती मला दिसायची पण तिच्याबद्दल असं कधीच काही वाटलं नाही पण आज मात्र खुप वाटत होतं..
तिला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते..त्यामुळेच ती इतकी खुश झाली होती..मी एकटक वेड्यासारखा तिच्याचकडे बघत होतो..कदाचित सरांच ते लक्षात आलं असावं म्हणूनच की काय सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला..
"काय जयेशराव...सालाबादप्रमाणे यंदाही नापास झालात तुम्ही. .
काय लाज लज्जा आहे की नाही?"
माहीत नाही पण माझ्याही नकळत मी..
" सर अभी तो रास्ता मिला है.. मंझिल भी मिलही जायेगी.."
असं काहीतरी मी पुटपुटलो आणि सरांनी कपाळावर हात मारून घेतला..
ती कुठे राहयची माहीत नाही...मीही तिला काय वाटेल म्हणून कधी फाॅलो केलं नाही पण ती कलासमध्ये यायची..
तेव्हा खुप छान वाटायचं...
ती खुपच साधी होती..तिच्यात असं काही नव्हतंच मुळी..
चारचौघातही ती उठून दिसणारं नाही अशी होती ती..
तरीही मला ती खुप आवडली होती..
असाच एकदा बसस्टाॅपवर बसची वाट पाहत उभा होता..
आज ती दिसावी असा विचारच मी करत होतो की, समोर मला ती येताना दिसली..तिला असं अनपेक्षित समोर आलेलं पाहताना..माझ्या मनात फुलपाखरे भिरभिरत होती..
एकाच बसमधून आम्ही दोघंही गेलो...
आम्ही एकत्र क्लासला जरी असलो तरी आमची ओळखच नव्हती..कधी आम्ही एकमेंकांशी बोललोच नाही..
ती हयाच स्टाॅपला येते म्हणून मी रोजच त्या वेळी तिची वाट पाही पण पुन्हा कधी ती दिसलीच नाही..
ती मला बाहेर जरी दिसली नाही तरी क्लासमध्ये दिसायचीच..
पण क्लासमध्ये तिला पाहणं आणि बाहेर पाहण ह्यात खुप फरक असायचा कारण क्लासमध्ये ती नेहमीच पुस्तकांच्या किंवा मैत्रणीच्या गराड्यात असायची..
तिने वेळ बददली असेल म्हणून मीही वेळ बदलून पाहीली बट तरीही ती परत त्या स्टाॅपवर दिसलीच नाही..
तरही माझं मन एक वेडी आशा घेऊन रोज त्या स्टाॅपवर तिची वाट पाही..
..........................................................................................................................................................
लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार होते...त्यामुळे आमच्या चाळीत होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवसाठी जय्यत तयारी सुरू झाली होती आता मंडळाचा सदस्य या नात्याने संपुर्ण एरियामधून वर्गणी गोळा करण्याचे काम माझ्या वाटेला आले होते...संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी बहुतेक...असेच छोटया छोट्या गल्लीतून रस्ता काढत आम्ही एका घराजवळ पोहचलो मी दारावर टकटक केली..
घराचा पडदा बाजूला सारत एका मध्यम वयाच्या बाईने प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहीले..
"काकू गणपतीची वर्गणी..." असे सगळेच एकदम म्हणाले
"आणते हा"...असं म्हणून काकू आत किचनमध्ये गेल्या ..
मी सहजच आतमध्ये पाहीलं...छोटसच पण नीटनेटक आवरलेलं घर..मस्त गरगर पंखाच्या वार्यावर उडणारे खिडकीचे रेशमी परदे...नुकतीच धुतलेली स्वच्छ फरशी...समोरच खुप मोठ अधिष्ठान ( दत्तात्रय या देवाचा फोटो. बैठकीला जे जातात त्यांना माहीत असेलच)
अगरबत्ती धुपाचा मस्त घरभर दरवळलेला सुवास..
आणि नेमक्या देवार्याच्या पायथ्याशी दासबोध वाचणारी "ती"
मला स्पष्ट दिसत होतं..वार्यावर तिचे केस भुरभुरत होते..
हलक्या पांढर्या रंगाची तिची ओढणी त्या हवेत हलकेच लहरत होती..चेहर्यावर सात्विक भाव..ह्या जगात देव जर कुठे असेल तर तो तिच्याच ह्रदयात असेल हे मी छातीठोकपणे सांगू शकतो...तिच्यात आज नव्याने मला "रब" दिसला होता...
काही डब्बाच्या खडखडाट आवाजानंतर काकू बाहेर आल्या..
"किती द्यायची रे पोरांना??" काकूने प्रश्न केला..
कुणीतरी एकशेएक म्हणण्याअगोदरच मी एक्कावन म्हटलं..
तसे माझ्याकडे सगळे विचित्रपणे पाहू लागले...
आम्ही ते पैसे घेऊन निघालो..तशे सारी मित्रमित्रमंडळी माझ्यावर उखडली...मग मी त्यांना माझी सासुरवाडी असल्याचं सांगितल्यावर कुठे ते शांत झाले..
गणपत्ती बाप्पा येण्याअगोदरच मला पावले होते...
त्यांनीच तिच्या घरची वाट दाखवली होती..
ती माझ्याच एरियात राहत असताना मला ती कधी दिसलीच नाही..पण आज बाप्पाने तिचे दर्शन मला स्वतःहून घडवले होते..
पुढे आमची ओळख झाली..जाता येता स्माईल एक्सेंज होऊ लागल्या.. मीही मुद्दाम कधीतरी तिच्याकडे नोटस मागायचो..
मग नंबर एक्सेंज झाले...मी मुद्दामच रोज सकाळी काॅलेजला थोड्याशा आडवाटेने तिच्या घराजवळून रोज जायचो..ती मला दिसायची..कधी बॅग भरताना, कधी केस विंचरताना, कधी सॅडल घालताना..आणि रोज सकाळी मी तिला मॅसेज पाठवून काॅम्पीमेंट द्यायचो..."गुड माॅर्निंग. आज हिरव्या ड्रेसमध्ये छान दिसतेस तु" ह्या मॅसेंजमध्ये फक्त रोज फक्त रंग बदलायचा..
एव्हाना तिलाच काय अख्ख्या क्लासमध्ये, एरियामध्ये माहीत झालं होतं..फक्त विचारायची देरी होती...
शेवटी एकेदिवशी धाडस करून विचारलच ..ती " नाही " असं बोलली..
आठवडाभर क्लासला नाही गेलो..
जेवणही सोडलं होतं. तब्येत खालावली होती...थोडासा तापही आला होता. संध्याकाळी डाॅक्टरकडे जाताना ती मला दिसली..
तिने मला पाहीलं होतं..कदाचित कुठेतरी तिच्या मनात
दया उत्पन्न झाली असावी म्हणूनच तिने मला दुसर्या दिवशी फोन केला...
" मी थरथरत फोन उचलला..समोरून एक अनोळखी आवाज ऐकू आला..
"तुझी हिंमतच कशी झाली प्रेरणाला प्रो करण्याची ?"
मीपण जरा घुश्यातच "तुला तर नाही केला ना..मग तुझ्या का पोटात दुखतय असं म्हणालो.."
असं बोललो न बोललो तोच प्रेरणा लाईनवर आली...
बहुतेक फोन लाऊडस्पीकरवर होता..
" माझ्यावर प्रेम आहे ना तुझं?? मग माझ्या मैत्रिणीशी असं उद्धट बोलणार तु..हेच का तुझ प्रेम??
हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली...तरीही तिच्या प्रेमापोटी..त्या तिघी चौघीनी मिळून केलेला शाब्दीक आणि मानसिक सामुहीक बलात्कार मी सहन केला होता...
पुढे आमची मैत्री तर कायम राहीली बट मी फक्त युज होत राहलो...तिच्यावर माझं खुप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी
ती आणि तिच्या मैत्रिणीच्या हातातलं बाहुल बनलो होतो मी..
बट तरीही मी हार नव्हती मानली.
कधी ना कधी कळेल तिलाही माझं खरं प्रेम...
आणि आजही तिने गिफ्ट नाही घेतलं म्हणून काय झाले??
पुढे तिला ते घ्यावच लागेलं..
क्रमशः
चर्चिलची आठवण झाली. "तुमचे
चर्चिलची आठवण झाली. "तुमचे मत माझ्या मताशी विसंगत असले तरी ते तुम्हाला मांडता यावे याकरिता तुमची बाजू घेऊन मी इतरांशी भांडेन" अशा अर्थाचे एक विधान त्यांनी केले होते.
इथेही मला कथा अजिबात आवडली नसली तरी लेखकाला ती इथे लिहूच नका असे सांगणे योग्य वाटत नाही. "सामूहिक बलात्कार" सारखे शब्दप्रयोग त्यांनी त्या मैत्रिणींच्या ट्रिटमेंटकरिता वापरले नसते तर कदाचित इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या.
वर कोणीतरी एक रुका हुआ फैसलाची आठवण काढली आहे. त्यात के.के. रैना ज्या संयतपणे प्रत्येक राऊंडमध्ये क्रमाक्रमाने प्रत्येक ज्युरीचे मत पालटवतो त्यातून मायबोलीच्या सदस्यांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे.
इतिहासाचा अभ्यास केला आहे,
इतिहासाचा अभ्यास केला आहे, विस्टन चर्चिल ने स्वातंत्र पूर्व काळात भारतीयांचा किती छळ केला होता हे वाचून अस्वथ झाले होते.
मला तरी बिपीनजी यांची पोस्ट
मला तरी बिपीनजी यांची पोस्ट विषयाला धरून वाटली.. योग्य मुद्दा मांडलाय त्यांनी..
अजय चव्हाण, एक विनंती या
अजय चव्हाण, एक विनंती या धाग्यातली कथा नविन धागा काढून येथून स्थलांतरीत करावी..
कथेचा पुढचा भाग वाचायला आवडेल
कथेचा पुढचा भाग वाचायला आवडेल. कथा पूर्ण झाल्यावरच नेमकं मत देता येईल. पण प्रयत्न चांगलाय.
त्या तिघी चौघीनी मिळून केलेला शाब्दीक आणि मानसिक सामुहीक बलात्कार मी सहन केला होता...>> यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे??? मागे 'बीं'च्या एका धाग्याचे विडंबन झाल्यावर त्यांनीही बलात्कार होत असल्यासारखं वाटलं असं म्हटलं होतं. शब्द इतके बोचरे / जहाल / त्रासदायक असू शकतात कि एखाद्याला ते बोलणं मानसिक बलात्कार होतं आहे असं वाटू शकतं. इथे तीघी चौघी मिळून नायकाला टोचून बोलत आहेत तर नायकाला ते किती टोकाचं होतं हे सांगण्यासाठी हाच योग्य शब्द वाटला असेल. त्यातूनच ती जाणीव अधोरेखित होत असेल तर आक्षेप का असावा??
अरे काय चाल्लय काय इथे. कोण कशाचा संबंध कशाशी लावतंय नि कोण कुठल्या वाक्याचा काय अर्थ काढतंय..

अजय चव्हाण, एक विनंती या
अजय चव्हाण, एक विनंती या धाग्यातली कथा नविन धागा काढून येथून स्थलांतरीत करावी.. >>> हो ना..काहितरी वेगळच चालुये इथे..
फालतू, फडतूस, बंद करा लेखन हे
फालतू, फडतूस, बंद करा लेखन हे सुरुवातीचेच अभिप्राय! म्हणजे आपल्याला इतके निगेटिव्ह बोलायचेच असेल तर किमान इतर चारचौघे आधी काही वेगळे बोलतायत का हेही बघायला थांबायचे नाही. विरोधी प्रतिसाद देणारे अल्पमतीचे असतात हेही ठरवून मोकळे व्हायचे. की आता लेखकाने प्रत्येकवेळी टीप द्यायची की 'ही काल्पनिक कथा आहे'? ही असली कथानके रस्तोरस्ती प्रत्यक्षात होताना आपण पाहतो तेव्हा त्यातील मुलांना जाऊन सांगतो का, तू फडतूस आहेस, फालतू आहेस, तिच्या मागे लागणे बंद कर? तो एखाद्या गुंठामंत्र्याचा पोरगा असला तर काय करेल त्याची कल्पना असेलच. इथे आपलं प्रोटेक्टेड वातावरणात झापडता येतंय तर झापडा बिचार्याला!>>>>>>>>>>
1. आपली प्रतिक्रिया ही आपल्याला काय वाटतेय यावरून असावी की इतर 4 जण चांगले म्हणताहेत म्हणून चांगली आणि इतर 4 जण वाईट म्हणताहेत म्हणून वाईट असावी? मग ती प्रतिक्रिया का केवळ री ला री ओढणे?
2. कथा काल्पनिक नाहीये म्हणून तर विरोध आहे. अमानवीय वर अगदी आत्ताच एक कथा आलीय ज्यात एकाला आपला चेहरा जळलेला दिसतो. असे का? तर त्याला कोणी मुलीने नकार दिला म्हणून तिच्यावर ऍसिड फेकावे हे मनात आले. ती कथा काल्पनिक असली तरीही मुलीने नाही म्हटले की तोंडावर ऍसिड हा आपल्या समाजाचा नॉर्म बनतोय का आता? हे बाहेर समाजात होतंय हो, ते झाले की आपण धागा काढून निषेध करूया. तोवर इथे मुली नाही म्हणत असतानाही तिला एके दिवशी हो म्हणावेच लागेल छापणार्या कथालेखकांचा हिरमोड अज्जिबात करुया नको.
3. मुलाला त्रास देणारी कथेतली मुलगी दिसली नाही - ती अक्षता घेऊन आमंत्रण द्यायला आलेली ना की ये बाबा, मला नको असलं तरी फोन करून बोलत राहा म्हणून. तिने जशास तसे केले. काय चुकले तिचे. याने करावे फोन बंद. ती कशाला येईल मग याच्यावर मानसिक बलात्कार करायला? हाच करवून घेतोय.
4. मुलीने नाही म्हटले तरीही तिला हो म्हणायला लावेनच ही जी वृत्ती आहे तिला माझा विरोध आहे आणि तो कायम राहणारच. हे हो म्हणायला लावेनच हे कुठल्या थराला कधी जाऊन ते कोणालाही सांगता येणार नाही. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या तुमच्या मुलीलाही घराबाहेर कधी असल्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल सांगता येणार नाही. ह्या प्रवृत्तीचा निषेध करायलाच हवा. हल्लीच एका सिबेमातल्या गाण्यावर इथे धागा आलेला, ज्यात हिरो चिवटपणे मुलीचा पाठलाग करत होता. ते जर आज आक्षेपार्ह वाटते तर मुलीला नको असताना तिला फोन मेसेज करत राहणे का चालवून घ्यावे?
<चर्चिलची आठवण झाली. "तुमचे
<चर्चिलची आठवण झाली. "तुमचे मत माझ्या मताशी विसंगत असले तरी ते तुम्हाला मांडता यावे याकरिता तुमची बाजू घेऊन मी इतरांशी भांडेन" अशा अर्थाचे एक विधान त्यांनी केले होते.>
चर्चिलपण म्हणालेले का तसं? ते वाक्य व्हॉल्टेअरचं आहे असा अनेकांचा/बहुतेकांचा समज आहे. नेमके शब्द व्हॉल्टेअरचे नसले, तरी भाव त्यांचाच आहे.
कथेत कुठे असं म्हटलंय की
कथेत कुठे असं म्हटलंय की मुलीने मॅसेज करू नको असं सांगितलंय नायकाला. ती त्याच्या प्रपोजला नाही म्हणालीय. आणि त्याने केलेले मॅसेज/ फोन हे त्याने प्रपोज करायच्या आधीचे आहेत. त्याने प्रपोज केल्यावर आठ दिवसांनी पहिला फोन मुलीने नि तिच्या मैत्रिणींनीच केलाय ना त्याला.
जे काही लिहिलेलं असेल ते नीट वाचावं. उगा स्वतःच्या मनाने त्यात भर घालून वाचू नये. मग वेगळे अर्थ निघतात.
जे काही लिहिलेलं असेल ते नीट
जे काही लिहिलेलं असेल ते नीट वाचावं. उगा स्वतःच्या मनाने त्यात भर घालून वाचू नये. मग वेगळे अर्थ निघतात. >>>> +१
हे महत्वाचं..
मुलीने नाही म्हटले तरीही तिला
मुलीने नाही म्हटले तरीही तिला हो म्हणायला लावेनच ही जी वृत्ती आहे तिला माझा विरोध आहे आणि तो कायम राहणारच. हे हो म्हणायला लावेनच हे कुठल्या थराला कधी जाऊन ते कोणालाही सांगता येणार नाही. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या तुमच्या मुलीलाही घराबाहेर कधी असल्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल सांगता येणार नाही. ह्या प्रवृत्तीचा निषेध करायलाच हवा.
>> फारच ताणताय साधनाताई, विशेषतः पुढचं काहीच माहित नसतांना.... ते पुढचं सोडा, आता जे लिहिलेलं आहे तुम्ही शेवटपर्यंत नीट वाचलं की नाही अशी शंका येत आहे....
स्पष्ट लिहिलंय सगळं, त्यांची मैत्री होती. त्याने प्रपोज केलं, तिने नाही म्हटलं, ते झाल्यावर त्याने आठवडाभर तिच्याशी काही ही संपर्क केलेला नाही. तिचाच फोन आला त्याला... नंतर त्याची मैत्री कायम राहिली... तो युज होत राहिला प्रेमाखातर... पण आपले प्रेम तिला कधीना कधी कळेलच असा आशावाद तो व्यक्त करतोय..... (वर सांगितले आहे अनेकांनी की अशी प्रेमप्रकरणे बरीच बघितली आहेत सगळ्यांनीच.... मी स्वतः तर असेच दोन वर्षे वाट पाहिली होती..
)
'घ्यावेच लागेल' मध्ये मला तरी आशावाद दिसतोय, तो आशावादच आहे, जोरजबरदस्ती किंवा 'अशी कशी नाही म्हणतेस, बघतोच आता' हा भाव नाही हे एवढं आधीची सगळी कथा वाचुन कळते आहे.... तुम्हाला का कळत नाहीये?
जे मुळात कथेत कुठेही नाही ते आणून तुम्ही जाणून-बुजून त्याला वाईट वळणावर हाकलत का नेताय?
मला वाटते काही वाचक एखाद्या
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 July, 2017 - 11:21 >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मला वाटते काही वाचक एखाद्या बाबतीत हळवे वा परखड असतात. यामागे कदाचित त्यांना आलेले वा आसपास पाहिलेले कटू अनुभव असू शकतात. एखादी जहाल प्रतिक्रिया या कारणानेही येऊ शकते. एखाद्या लेखकाला झोडपायचेच असा हेतू क्वचितच कोणाचा तरी असतो. त्यामुळे असे प्रतिसाद देणारयांबद्दलही लगेच टोकाचे मत देता कामा नये.
मी स्वत: दारू या विषयाबाबत सेन्सिटीव्ह आहे. अमिताभने शराबी केला किंचा शाहरूखने देवदास केला म्हणून त्यांच्यावर चिडत नाही, उलट त्यांनी योग्य तोच संदेश पोहोचवला असतो. मात्र कुठल्या लेखात वा कोणाच्या प्रतिसादात दारूची तरफदारी दिसली तर मात्र मी देखील परखड प्रतिसाद देतोच. कारण दारू, जुगार या गोष्टी कसे आयुष्य उध्वस्त करतात हे पाहिलेय जवळून..
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 July, 2017 - 11:21 >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आत्ता वाचले सगळे प्रतिसाद
हाच तो ऋन्मेऽऽष जो सलमान ला ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह केस मधे सुटका झाल्यावर समर्थन करत होता.. त्यावेळी खुप राग आला होता..
लोक इथे काहिह्ही कधिही बोलतात.. विसरतात.. परत बडबडतात
जे मुळात कथेत कुठेही नाही ते
जे मुळात कथेत कुठेही नाही ते आणून तुम्ही जाणून-बुजून त्याला वाईट वळणावर हाकलत का नेताय? >>>
नाना, प्रतिसाद देऊन चुकल्यानंतर वरचं सांगून सारवासारव करताहेत मुळ प्रतिसाददाते.
कथा ही कथा म्हणुन वाचायचं कधी
कथा ही कथा म्हणुन वाचायचं कधी कळणार लोकांना?
एखाद्या कथेत एकतर्फी प्रेमात मुलीवर अॅसिड फेकलंय तर तीही कथा फडतुस आणि लिहिणारा त्या घट्नेचं समर्थन करतोय असा अर्थ निघतो काय?
खरंतर एखाद्या कथेवर फड्तुस, फालतु, आपल्या मुली बहिणीवर वेळ आली तर मजा बघा हे प्रतिसादच त्या कथेतल्या कंटेंट पेक्षा अतिशय गंभीर आहेत.
दिसला नवोदित लिहिणारा की आला ह्यांच्या कीबोर्डाला हुरुप काहीतरी बेक्कार बिनालॉजिकच्या कमेंटी लिहायचा.<<++१११
तुम्ही एका ओळीत लेखकाची लायकी काढता आणि तुमच्या त्याच ओळीला कोणी नाव ठेवली की तो माणूस "विकृत" ठरतो !!<<++१११
अजय... दुसऱ्या धाग्यावर
अजय... दुसऱ्या धाग्यावर संपूर्ण कथा लिहून लवकर पब्लिश कर रे बाबा...
क्रमशः लिहिलंयस ना त्याने वाद वाढतोय...
लेखक आणि वाचक प्रत्येकाचे व्युज वेगळे असू शकतात... लिहिणारा आणि वाचणारा दोघेही मनुष्य प्राणीच ना ? होतात चुका... आता तेच धरून प्रत्येक गोष्ट (इथे धाग्यावरील प्रतिसाद) का ताणायची?
आणि "क्रमश:" लेखन पण किती दिवस अर्धवट ठेवायचे...? पूर्ण करणं खरंच शक्य असेल तर लिहायला सुरुवात करा ना ... निदान पब्लिश तरी नंतरच करा...
हाच तो ऋन्मेऽऽष जो सलमान ला
हाच तो ऋन्मेऽऽष जो सलमान ला ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह केस मधे सुटका झाल्यावर समर्थन करत होता.. त्यावेळी खुप राग आला होता..
>>>>>
ओह खान तुस्सी ग्रेट हो..
उपरोधाने लिहिलेला धागा होता तो
मी ईथे दारू जुगार या व्यसनांना केलेला विरोध त्या आधीही आणि त्या नंतरही हजारोवेळा लोकांनी पाहिला आहे.
चर्चा माझ्यावर, माझ्या विचारांवर, दारूवर, सलमानवर नाहीये म्हणून हा विषय आपण तोच धागा वर काढून तिथे कंटिन्यू केला तर आवडेल.
बलात्कार या शब्दाबाबत निधी
बलात्कार या शब्दाबाबत निधी यांच्याशी सहमत. बी यांचे उदाहरणही चपखल. एखाद्याला घालून पाडून हिणवत बोलणे हा मानसिक बलात्कार नक्कीच म्हणू शकतो. मलाही त्यात वाचताना काहीही गैर वाटले नाही. बहुधा आता मुद्दे शोधून काढले जात आहेत.
माबोच्या सर्व वाचकांना विनंती
माबोच्या सर्व वाचकांना विनंती आहे, की कृपया हा वाद इथेच संपुष्टात आणावा. ह्या सर्व वादामुळे कथालेखकाच्या मनावर किती ताण आला असेल, तो कोणत्या परिस्थितीतून जात असेल याची कल्पनाच न केलेली बरी. एखाद्या नवलेखकाला आपल्या लिखाणामुळे एवढा गदारोळ होऊ शकतो याच्या अनुभूतीने त्याच्यातल्या प्रतिभेचे अकाली मरण होऊ शकते याचा सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा. आपण सर्व माबोकर एक कुटुंब आहोत. येथे लहानथोर सर्वांची काळजी घेतली जाते याचा मला विश्वास आहे.
काळे डोन्ट वरी.... चव्हाण
काळे डोन्ट वरी.... चव्हाण इतके हळवे नाहीयेत.
लेखकांना स्पेशल विनंती, फुडचा भाग टाका!
ओह खान तुस्सी ग्रेट हो..
ओह खान तुस्सी ग्रेट हो..
उपरोधाने लिहिलेला धागा होता तो
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
असं फक्त तुम्हालाच वाटल होतं किंवा वाटतय..
गुन्हा सिद्ध झाला नाही तर तो गुन्हा नाही.. ई.ई. बरच लिहुन झालं होतं तिथे..
अवांतरा बद्दल क्षमस्व..
पण जिथे लोक तारे तोडतात तिथेच त्यांच्या कडुन स्पष्टिकरण घ्यावे वाटले म्हणुन...
गुन्हा सिद्ध झाला नाही तर तो
गुन्हा सिद्ध झाला नाही तर तो गुन्हा नाही.. ई.ई. बरच लिहुन झालं होतं तिथे..
>>>
ते ईत्यादी ईत्यादी बरेच उपरोधाने होते. तेव्हा मी असे लिखाण फार करायचो. कालाण्तराने समजले की कित्येक जणांना त्यातली खोच कळत नसल्याने आपला उद्देश साध्य होत नाही. म्हणून मग तसे लिहिणे कमी केले
असचं असावं .. बाकी तुमचे धागे
असचं असावं .. बाकी तुमचे धागे आणि इतर गोष्टी ... इग्नोर केल्याच आहेत..
आधीचं सलमानचा, आपल्या सिस्टिम्चा येवढा राग आला होता त्यात तुमचा धागा आणि बोलणं..
जाउ दे.. आपलं संपवुया इथेच..
या विषयावर शेवटची पोस्ट इथे..
अवांतर बोलण्याबद्दल सॉरी
हायला! इथे कोण काय कधीचे
हायला! इथे कोण काय कधीचे स्कोर सेटल करताहेत

ऋ धागा कुणाचाही, विषय कुठलाही असुदेत पब्लिक तुला बोलायचं काय सोडत नाही बघ.
आणि पुन्हा तुला आठ्वण करुन
आणि पुन्हा तुला आठ्वण करुन देते की ती तुझी माबो मैत्रीणच हुप्पाहुया असेल हं
घ्या हलकेच. तु आणि माबोमैत्रिण दोघेही. 

हो हुप्पाहुया लाही द्यायलाच हवा
सस्मित..
सस्मित..
आनंदी, आपण ईथे तो विषय काढून
आनंदी, आपण ईथे तो विषय काढून ते मी उपरोधाने लिहिलेले हे क्लीअर करून घेतले याबद्दल धन्यवाद. अजून कोणाचा आपल्यासारखा गैरसमज तेव्हा झाला असेल तर तो देखील या निमित्ताने क्लीअर होईल.
सस्मित

नका हो आणि तो विषय काढू. आधीच हुप्पाहुय्या यांनी ते केले आहे जे मला करायला आवडते. म्हणजेच या विषयावर एक नवीन धागा काढायची संधी साधली. आणि त्यामुळे आधीच माझ्या माबोमैत्रीणीचा संशय बळावला आहे
अरे कोण आहे तरी कोण माबोमै?
अरे कोण आहे तरी कोण माबोमै?
कही ये वो तो नही? जो मै सोच रही हु
आनंदी सलमान चा धागा परत वाचा.
आनंदी सलमान चा धागा परत वाचा... खरच तुम्हाला कळलं नाही की उगाच रुंम्याला त्रास द्यायचा म्हणून काहीपण?
रूनमेश... खरच कौतुक तुझे... कसा हँडल करतोस तू तुलाच माहीत..
चव्हाण साहेब शांत झालेत... होप ते नेक्स्ट भाग लिहितील...
एका लेखकाचा बळी जातोय काही सदशयांच्या कल्पनाविस्तारामुळे...
<<<<अजय... दुसऱ्या धाग्यावर
<<<<अजय... दुसऱ्या धाग्यावर संपूर्ण कथा लिहून लवकर पब्लिश कर रे बाबा...>>>
अनुमोदन.
अहो टीका होणारच. म्हणून लिहूच नये असे थोडेच आहे?
कथेतील पात्र वाईट आहे असे रंगवले म्हणून लेखकालाच शिव्या घालणे असे करणारे लोक श्री रा, ग, गडकरी यांचा पुतळा फोडणार्यांसारखेच.
अहो कित्येक दिग्गज लेखकांवर टीका केलेली आहे. त्यात काय?
मी ते बट बद्दल लिहीले ते खरेच गोंधळून.
खरे तर पेशवा बाजीराव या हिंदी सिरियल मध्ये सुद्धा "पण" वापरलेला ऐकला आहे.
पण "पण" हा शब्द सुद्धा मराठी लोकांना आ़जकाल आठवत नाही, बट, लेकिन असले शब्द आठवतात हे मला खरेच माहित नव्हते.
कथा, पात्रे कशीहि रंगवा, पण निदान "मायबोली" वरील भाषा तरी समजावी अशी माझी माझ्यापुरती किमान अपेक्षा होती.
बट हा शब्द काही लोकांना
बट हा शब्द काही लोकांना बोलताना वापरायची सवय असते.
याच मालिकेतील आणखी काही ईंग्लिश शब्द जे मराठी संभाषणात सर्रास वापरले जातात - अॅक्चुअली, रिअली, एनीवेज, एक्सक्यूजमी, शॉकिंग, मायगॉड, डिअर, लवली ... वगैरे वगैरे...
पण येस्स लिखाणात गरज नसल्यास हे शक्यतो टाळावेत.
आता ईथे पण वरच्या वाक्यात मी सवयीने येस्स लिहिले बघा
येनीवेज, लेखकाने पुढची कथा सुरुवातीपासून नवीन धाग्यात लिहावी आणि प्रकाशित करावे जेणेकरून येथील चर्चा काळाच्या उदरात गडप होईल
Pages