ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

Submitted by हायझेनबर्ग on 18 July, 2017 - 16:33

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय

आमचे प्रेरणास्त्रोत
https://youtu.be/35Bj9Tqy4XY
https://youtu.be/U5npFH8v8a4

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

सगळीकडे सोनूची हवा Wink

>>ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल<<

हा हा. इतर वर्शन्स प्रमाणेच हे हि बॅक्फायर व्हायचे चांसेस आहेत. हे वाचुन यापुढे थोडंसच बोलायला लागला तर तो ऋन्मेष कसला?..

संपादित Proud

राज, तुम्ही अजून 'बोलायला लागला' असं म्हणायचं धाडस करु शकता?
पैशापासरी उघडून ठेवलेले बीबी हे कमी बोलण्याचं प्रूफ आहे का?

ह्या पहिल्या व्हिडिओ मधल्या सारखा वविला विडिओ बनवून टाकायचे मनावर घ्या रे कोणी तरी, भलेह्वी मग सगळ्यांनी शाहरुख, स्वप्निल, सई चे मुखवटे लावा. Wink
म्हणजे माबोकरांची आर्त हाक ऋन्मेष पर्यंत पोहोचेल. Lol

अमित ! सध्या व्हायरल आहे म्हणे व्हिडीयो हा, मला ओरिजनल नाही दिसला कुठे , का तो वरच्या लिन्कचाच ओरिजनल आहे?

हाब, छान जमलय.
@सायो, पैशापासरी उघडून ठेवलेले बीबी हे कमी बोलण्याचं प्रूफ आहे का?>>>>>>> अहो ऋ फक्त आपल्याला बाफावर मुद्दा देतात. आपणच हिरीरीने लिहीत असतो धागे वाढवणे ही "माबो जबाबदारी " (पक्षी नैतिक जबाबदारी ) असल्यासारखे. महागुऋ मग मधुन मधुन डोकावून योग्य शाखे(खा) कडे वाट दाखवतात. का बिचार्‍यांवर असा आरोप करता? Lol Wink

हे हे हे
मस्त हाब
एकदम समयोचित Happy

>>आपणच हिरीरीने लिहीत >> आपण नाही. तुमच्यासारखे अनेक आयडी त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात टुकार धागे चालवायचं.

कायपं असो रुन्मेषभाऊ चे धागे भारी असतंयत... अन त्या चर्चमडून भारी मुद्दे कळतात... हायझेनबेर्ग आणि रुमणेश चे संभाषण खूप मस्त आहे त्या धाग्यावरच ..येकदम वाड विवाद स्पर्धाच जणू...

भारी Lol Lol

मी हे अजून ऐकले नाही. फक्त व्हॉटसप वर्जन वाचले आहेत. त्यामुळे नेमकी चाल माहीत नाही. तरी वाचायला भारी वाटले Happy

मी तुमच्या पोस्टचा संदर्भ घेत नवीन धागा काढला याचा आपण त्रागा, आकांडतांडव न करता आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवत असा मजेशीर धागा काढला याबद्दल __/\__

बर्ग Rofl

ऋन्मेष तू माबोशी थोडं कमी बोल असं लिहायचं होतं का ? >>> +१

भावना पोचल्या.
तरी परत 'पालथ्या घड्यावर पाणी' हीच स्थिती राहणार....
सार्वजनिक जागेत मनमानी करणं काही लोकांसाठी किती सोपं असतं आणि उरलेले आपण किती हतबल असतो हे अशा वेळी पुन्हा एकदा जाणवतं....

सार्वजनिक जागेत मनमानी करणं काही लोकांसाठी किती सोपं असतं आणि उरलेले आपण किती हतबल असतो हे अशा वेळी पुन्हा एकदा जाणवतं.... >> well said.

हाब,
मस्तं जमलय.
पण मी एकदाच काय ते सांगून ठेवतेय,
माजा कुनावर भरवसा नाय हाय.

Pages