ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

Submitted by हायझेनबर्ग on 18 July, 2017 - 16:33

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय

आमचे प्रेरणास्त्रोत
https://youtu.be/35Bj9Tqy4XY
https://youtu.be/U5npFH8v8a4

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ स्वतःबद्दल इतक्या स्पष्ट शब्दांत कोणी क्वचित लिहितं. }}}

दोनदा च लावून तुम्ही स्वतःबद्दल अस्पष्ट, धूसर लिहिता हे कबूल केल्याबद्दल अभिनंदन.

@आदितीजी
' सोनू तूला सोन्याच घड्याळ घे,
घड्याळाची काच कशी गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल....' << ह्यातच "सोनू तुला सोन्याची माळ घेईन, सोन्यापरीस लेडीज घड्याळ घेईन" आहे का?

होय आदितीजी यातच आहे ते. मला पुर्ण गाण आठवत नाही आत्ता.

हे घ्या मायबोलीवरचे पिकनिक साँग,

सोनु तुला सोन्याची माळ घे ( Chorus माळ घे)
हातामधे Ladies घड्याळ घे ( Chorus घड्याळ घे )
Calico चि साडी घेतो गोल गोल
आता तरी माझ्यासंग गोड बोल

फुटलय आकाशी ताम्बडं ( Chorus ताम्बडं
बोलतया दाराशी कोम्बडं ( Chorus कोम्बडं
थन्डीची लाट तरी जाउदे
दराशी ऊन तरी येवू दे
चाळ सारी जागी तरी होउ दे ( Chorus होउ दे )
नळाला ही पाणी तरी येवु दे ( Chorus येवु दे )
सजणे, तुला जायाची घाई का
थाम्ब होवू दे सकाळ ( Chorus थाम्ब होवू दे सकाळ)

Chorus चा pattern पुढच्या कडव्याना असाच..

Chorus चा pattern असाच...
ऐक माझी लाडाची हौसा
आलाय मला लाटरीच पैसा
ठरलं उद्या बाजारी जायचं
100 नम्बरी सोनं तुला घ्यायचं
चावी तुझ्या हातामधे देवू का?
पैसे तुझ्या हातावर ठेवु का?
सजणे तुला भरवसा नाही का
थाम्ब होवू दे सकाळ

परवा तुझा म्हातारा मेव्हणा
दराशी येईल पाव्हणा
... ही जोडीला येईल गं अन ( .. च्या जागी picnic मधील नावे ... )
... ही डोकावुन जाईल ग
जेव्हा तुला सजलेली पाहतील
आनन्दाने मोहरुन जातील
मिरवू डामदौलाचा डन्का
थाम्ब होवू दे सकाळ

सोनू तुला सोन्याची माळ घेईन, सोन्यापरीस लेडीज घड्याळ घेईन" >> हे ट्रेक चे एक फेमस गाणे आहे... आणि खूप कडवी तयार करता येतात.. अचानक कोणाला तरी हुक्की आली आणि हे काहीतरी नवीन गाणे तयार झाले आहे..

हा ऋन्मेष बरेच धागे काढतो, बरेच प्रश्न विचारतो. पण त्या प्रश्नांचे उत्तर काय हे कधीच तो सांगत नाही. मला तरी त्यात उत्तरे दिसली नाहीत. असे का?

हे म्हणजे - पूर्वी एक जुलुमी राजा होता. त्याला म्हणे शंभराहून जास्त अनौरस मुले मुली होत्या. पण त्या राजाने त्यांना तसेच वार्‍यावर सोडून दिले मग ती मुले मुली समाजात येऊन उपद्र्व बनली. तसे या धाग्यांचे मायबोलीवर होत आहे.

ऋन्मेष चा करिष्मा ओसरला की काय? फक्तं ७० प्रतिसाद Uhoh अपेक्षा होती किमान १७० तरी येतील.
पोष्टीसरशी १०० खेचणारा एकंच तर ब्रँड सुपरहिरो आहे.
१०० नाही झाले तर 'ऋन्मेष से है मायबोली, मायबोली से ऋन्मेष नही' मान्य करावे लागेल. Sad

झक्की अहो त्याला ट्माट्यांपासून तत्वज्ञानापर्यंत मनुष्य योनीतल्या सामान्य जनतेला पडलेले सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरे माहित आहेत. तो फक्तं इथे एकेक अध्याय मांडून आपल्याला मार्गदर्शन करतो. तुमचे अहोभाग्य आहे की त्याच्या अवतारकाळात तुमचा जन्म झाला आहे. Lol

त्याने माझ्या ऑल्टर ईगोला सुद्धा कॉम्प्लेक्स दिला तर बाकीच्यांची काय कथा Proud
http://www.maayboli.com/node/49734

हे ट्रेक चे एक फेमस गाणे आहे... आणि खूप कडवी तयार करता येतात.. अचानक कोणाला तरी हुक्की आली आणि हे काहीतरी नवीन गाणे तयार झाले आहे..>>> करा की सगळ्यांनी अजून कडवी तयार, कुणाचा कॉपी राईट थोडी आहे गाण्यावर.
हिम्स ते वविला व्हिडिओ बनवायचे घ्या राव मनावर Proud

अतिवास +१

तेच तेच irrelevant , spam प्रतिसाद सगळीकडे देणे, धागे derail करण्याचा सतत प्रयत्न - हे सर्व मायबोलीच्या नियमांत बसत नाही. असं करणाऱ्याना warning देणे व न सुधारल्यास आयडी स्थगित करणे हे याआधी झालेले पाहिले आहे. I think it's time admin steps in and takes notice of so many complaints.

सनव मला तर ऊलटे वाटते.
मला वाटते की कायम वादावादी, भांडणे करणार्‍या, लेक चकटफू वाचून प्रतिसाद न देणार्‍या, नवनवीन धागे उघडण्याचे कष्टं न घेणार्‍या, एकाच मतावर अडकून पडलेल्या मायबोलीकरांना चपराक म्हणून 'आदर्श मायबोलीकर कसा असावा' ह्याचे धडे आपल्याला देण्यासाठी अ‍ॅडमिन नेच लिहिलेला रोबो प्रोग्राम म्हणजे "ऋन्मेष" हा आयडी. Wink
फक्तं आता हॉलिवूड सिनेमात दाखवतात तसे तो आयडी रूपी अ‍ॅसेट 'रोग' झाला आहे आणि त्याने माबो चे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच आपल्या हातात घेतल्याने सगळा राडा झाला आहे. Proud

हा ऋन्मेष बरेच धागे काढतो, बरेच प्रश्न विचारतो. पण त्या प्रश्नांचे उत्तर काय हे कधीच तो सांगत नाही. मला तरी त्यात उत्तरे दिसली नाहीत..

>>>>

जसे की???

हे ईथे अवाण्तर असल्यास जिथे मी उत्तर दिले नाही तो धागा वर काढून तिथे तो प्रश्न विचारा आणि माझ्या विपूत लिण्क द्या म्हणजे निसटणार नाही.

एव्हढे उपद्व्याप करण्याइतके महत्वाचे काहीच नसते त्यात.

<<<तेच तेच irrelevant , spam प्रतिसाद सगळीकडे देणे, धागे derail करण्याचा सतत प्रयत्न >>>>
असे करणार्‍यांचे आय डी उडवून दिले तर अर्ध्याहून अधिक आय डी उडवून द्याव्या लागतील.
असे केले नाही तर ऋन्मेSSष च्या धाग्यांना दहा पण प्रतिसाद मिळणार नाहीत. शंभर तर दूरच!

मला वाटते की कायम वादावादी, भांडणे करणार्‍या, लेक चकटफू वाचून प्रतिसाद न देणार्‍या, नवनवीन धागे उघडण्याचे कष्टं न घेणार्‍या, एकाच मतावर अडकून पडलेल्या मायबोलीकरांना चपराक म्हणून 'आदर्श मायबोलीकर कसा असावा' ह्याचे धडे आपल्याला देण्यासाठी अ‍ॅडमिन नेच लिहिलेला रोबो प्रोग्राम म्हणजे "ऋन्मेष" हा आयडी. Wink
फक्तं आता हॉलिवूड सिनेमात दाखवतात तसे तो आयडी रूपी अ‍ॅसेट 'रोग' झाला आहे आणि त्याने माबो चे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच आपल्या हातात घेतल्याने सगळा राडा झाला आहे.>> ही थेअरी अचाट आहे..

ह्यापेक्षा ते जरा नवीन केस कुठपर्यंत आली ते बघा जरा.. Happy

पूर्वी एक जुलुमी राजा होता. त्याला म्हणे शंभराहून जास्त अनौरस मुले मुली होत्या. पण त्या राजाने त्यांना तसेच वार्‍यावर सोडून दिले मग ती मुले मुली समाजात येऊन उपद्र्व बनली. >>

ही गोष्ट काय आहे, हे जाणून घ्यायला मी फार उत्सुक आहे. Lol

ही गोष्ट काय आहे, हे जाणून घ्यायला मी फार उत्सुक आहे
>>>>
त्यांनी नाही सांगितली तर मी बनवून देऊ शकतो.
पण त्याचा मी वेगळा धागा घेणार.. कबूल असेल तर बोला.

<<< मी वेगळा धागा घेणार.. कबूल असेल तर बोला.>>>
अति मरे त्याला कोण रडे!
तुमच्या धाग्यांची आता सवय झाली आहे. भीति वाटत नाही. काही दिवसांनी चक्क आवडायला पण लागतील.
टमाटे घेण्यावरून संपूर्ण मध्यम वर्गाबद्दल अनुमान केले, या धाग्यावरून कुठले जनरलायझेशन करणार?

हायझेनबर्ग २ मिनिटं डोकावण्यासाठी माबो उघडल्यावर एवढं एंटरटेनिंग काही वाचायला मिळावं........... आज लकी डे असावा. ( तेच तेच धागे, विषय आणि टोमणे तक्रारी वाचुन माबोचा थोडासा कंटाळाच आला होता.) मस्त जमलं आहे विडंबन. आणि ती माबो अ‍ॅडमिनने बनवलेल्या रोबोची थिअरी तर एकदम hilarious ......

आणि ऋन्मेषचं पुन्हा एकदा कौतुक. तो फार स्पोर्टिंगली घेतो हे. बाकी कोणावर लिहिलं असतं तर हा धागा हसत खेळत चाललाच नसता. आता पर्यंत कांड होवुन काही आयडींच्या आत्महत्या आणि काही अ‍ॅडमिनने केलेली कत्तल अशी परिस्थिती झाली असती .

काही दिवसांनी चक्क आवडायला पण लागतील.
>>>>
देव तुम्हाला माझ्या वाटणीचेही आयुष्य देवो.. आणि तो दिवस लवकरच येवो.. बोलो आमीन Happy

मला वाटते की कायम वादावादी, भांडणे करणार्‍या, लेक चकटफू वाचून प्रतिसाद न देणार्‍या, नवनवीन धागे उघडण्याचे कष्टं न घेणार्‍या, एकाच मतावर अडकून पडलेल्या मायबोलीकरांना चपराक म्हणून 'आदर्श मायबोलीकर कसा असावा' ह्याचे धडे आपल्याला देण्यासाठी अ‍ॅडमिन नेच लिहिलेला रोबो प्रोग्राम म्हणजे "ऋन्मेष" हा आयडी. Wink
फक्तं आता हॉलिवूड सिनेमात दाखवतात तसे तो आयडी रूपी अ‍ॅसेट 'रोग' झाला आहे आणि त्याने माबो चे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच आपल्या हातात घेतल्याने सगळा राडा झाला आहे. >> हाब, सिक्सर पे सिक्स! Lol

हाब हेच ऋन्मेष आहेत ही एक थिअरी कशी वाटते? Wink
हाब बनून, असा धागा काढून लोकांचा ऋन्मेष बद्दलचा संताप ड्रेन आउट करायचा.... मग परत ऋन्मेष बनून या धाग्यात मिळालेले विषय घेऊन नावे धागे काढायचे Lol

अशीच कविता इथे छान छान, ऋन्मेष इरीटेटींग आहे, पालथ्या घड्यावर पाणी वैगेरे म्हणताहेत त्यांच्यावर लिहा. मग त्यांना अजुन छान छान वाटेल.

Pages