ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

Submitted by हायझेनबर्ग on 18 July, 2017 - 16:33

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय

ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल

ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय

आमचे प्रेरणास्त्रोत
https://youtu.be/35Bj9Tqy4XY
https://youtu.be/U5npFH8v8a4

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. ती कोणीही असू शकते कारण ती सर्वांसारखी आहे. त्याने ईमानईतबारे शाळा कॉलेजात मस्ती करत आपली ईंजिनीअरींग पुर्ण केली आहे. चारचौघांसारखा नोकरीला लागला आहे. त्याची एक चारचौघांसारखी गर्लफ्रेण्ड आहे. एखाद्या आदर्श भारतीय मराठी मुलाला साजेसा असा त्याचा स्वभाव असून त्याचे आपल्या गर्लफ्रेंड आणि आईवर प्रेम आहे. जो हिरो जगभरातल्या लोकांना आवडतो तोच त्यालाही आवडतो. जे पदार्थ एका टिपिकल मराठी घरात बनले जातात तेच तो देखील खातो आणि त्यावर धागे काढतो.. वगैरे वगैरे .. त्यामुळे कोणावरही चटकन हाच ऋन्मेष असल्याचा आरोप लावणे फार सोपे आहे.

ऋन्मेष,
तुम्ही कृपया लगे हाथो अजून ८ प्रतिसाद लिहा ना. नाही तरी तुम्ही वीकांताला नाही आहात तर कोटा आजंच पूर्ण करून घ्या ना.
आधीच माबो करांनी मला क्षणभर, कल्पनेत का होईना ऋन्मेष समजून माझा जो सन्मान वाढवला आहे त्यावर तुम्ही ८ प्रतिसाद लिहून किंवा किमान ८ प्रतिसाद हमखास येतीलच असे काहीतरी लिहून ह्या सन्मानास चार चांद लावाल का.
प्लीज नाही म्हणून नका. ह्या धाग्याची शंभरी भरल्यास माझाही विकांत अजूनच सुखाचा जाईल.

मला आश्चर्य, हा धागा टिकल्याचं वाटतं!...
बाकी हाब, मी धागा काढला तेव्हा माझ्यावरही तू ऋच असल्याचा आरोप झालेला.. Lol

ऋन्मेष ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. >>>>
माझाच मुद्दा आं Wink मी लिहीलेलं तेव्हा, ऋ ही एक व्यक्तीरेखा आहे..तुमच्या आमच्यात वावरणारी... पण माझं कोण ऐकतो... Uhoh

दु:ख याचं वाटतंय, सेहवाग होणारं मटेरियल होतं यार..पण १० च्या आत आऊट झालो.. Sad
ऋ, शतकी धाव माझी आ..दुधाची तहान ताकावर तरी Wink

माझाच मुद्दा आं 
>>>
बघितलं.. मी विचारही सर्वसामान्यांसारखाच करतो. जसा कोणीही दुसरा करतो..
मी तो व्यण्गचित्रातील कॉमन मॅन आहे.. माझा शोध घ्यायला जाल तर तो तुमच्या स्वत:पाशीच येऊन संपेल

चला सेनच्युरी तर झाली...
आता जरा विकांत रात्रीचा फायदा उचलत यूट्यूबवर गूगाळून सोनू तुला माझ्यावर भरौसा नाय का गाण्याची चाल शोधावी म्हणतो.. म्हणजे लेख पुन्हा वाचायला मजा येईल Happy

<<ऋ ही एक व्यक्तीरेखा आहे..तुमच्या आमच्यात वावरणारी..>>

मायबोलीवर केवळ व्यक्तिरेखा असतात. समाजातील निरनिराळ्या व्यक्तींचे स्वभावदर्शन, खरे तर, अप्रगटपणे होत असते.
नाटकात खलनायक, विदूषक अश्या भूमिका करणारे लोक प्रत्यक्षात तसेच असतात असे नाही. तर कुणि आपल्यावर टीका केली तरी त्या भूमिकेतील व्यक्तिरेखेच्या स्वभावावर टीका मानावी, स्वतःवर नाही.

मायबोलीवर केवळ व्यक्तिरेखा असतात. समाजातील निरनिराळ्या व्यक्तींचे स्वभावदर्शन, खरे तर, अप्रगटपणे होत असते.
नाटकात खलनायक, विदूषक अश्या भूमिका करणारे लोक प्रत्यक्षात तसेच असतात असे नाही. तर कुणि आपल्यावर टीका केली तरी त्या भूमिकेतील व्यक्तिरेखेच्या स्वभावावर टीका मानावी, स्वतःवर नाही.
>>>>> +१११ सहमत

मायबोलीवर केवळ व्यक्तिरेखा असतात. समाजातील निरनिराळ्या व्यक्तींचे स्वभावदर्शन, खरे तर, अप्रगटपणे होत असते.
नाटकात खलनायक, विदूषक अश्या भूमिका करणारे लोक प्रत्यक्षात तसेच असतात असे नाही. तर कुणि आपल्यावर टीका केली तरी त्या भूमिकेतील व्यक्तिरेखेच्या स्वभावावर टीका मानावी, स्वतःवर नाही >>> +१११

+786
तुम्ही डर चित्रपट पाहून आल्यावर त्यात शाहरूखने निभावलेल्या पात्राला शिव्या घाला..
पण शाहरूखला शिव्या घालणे हास्यास्पद आहे..
उलट त्याचे हे कौतुक झाले की जगातला मोस्ट रोमाण्टीक हिरो मटेरीअल असताना त्याने ईतक्या ताकदीने ती भुमिका पेलली की लोकं शिव्या घालतील.
पण दुर्दैवाने बरेच चित्रपट रसिक यात गल्लत करतात....

कमाल असते बाई लोकांची >>>>
असले रिप्लाय बरेचदा येतायत ऋचे!...
हा एखादा स्त्री आयडी तर नाही?.. Wink (ह. घ्या.)

असले रिप्लाय बरेचदा येतायत ऋचे!...
हा एखादा स्त्री आयडी तर नाही?.. >>>> हे नेमके तुच का सांगतोस तु तर नाहिस ना डुआयडि (लइच.ह.घ्या) Proud

हा सोशलसाईटवरचा ऑर्कुटकाळापासूनचा नियम आहे.
जे एखद्यावर ड्यू आयडीचा आरोप करतात ते स्वत:ही संशयाच्या भोवरयात सापडतात. कारण लोकांचा एक साधारण समज असतो, जो चणे खातो त्याचाच पहिला हात नाकावर जातो.

तू नळी (यू ट्यूब) वर म्हणे कुणा ला १०,००० चाहाते भेटले तर रोख बक्षीस देतात. ऋन्मेSSष मुळे जर मायबोलीवर येणार्‍यांची संख्या वाढली तर जाहिराती जास्त मिळतील नि पैसे जास्त मिळतील, मग आपण अत्यंत आनंदाने ऋन्मेSSष ला बक्षीस देऊ!

Pages