सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !
हे योग्य आहे की अयोग्य?
यातून सरकारला उत्पन्न नक्कीच मिळेल. मात्र लोकं जुगाराच्या आहारी जातील का?
यातून काळ्या धण्द्याला चाप बसेल की आणखी राजरोसपणे गैर धंदे होतील?
दारूने जशी कुटुंब उध्वस्त केली तशी भिती यात नाही का?
ईतर देशांत हे चालतही असेल पण भारताचे समाजजीवन पाहता हे ईथे योग्य ठरेल की अयोग्य?
माणूस जुगारात कसा वाहावत जातो याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जर हे अधिकृत झाले तर आजवर ज्या कॉलेजच्या पोरांचा हे आवाक्यात नव्हते ते देखील याच्या नादी लागू शकतात का?
क्रिकेटसारख्या खेळातील मॅच फिक्सिंग बोकाळेल की कमी होईल?
साराच पैश्यांचा बाजार होईल का?
सविस्तर बातमी ईथे वाचा -
http://abpmajha.abplive.in/sports/govt-looking-for-make-online-betting-l...
निवडक मुद्दे -
ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी आता शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबत अनेकांशी चर्चाही सुरु केली आहे.
क्रीडा मंत्रालय ब्रिटनमधील अधिकृत आणि कायदेशीर ऑनलाईन बेटिंगसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. इंग्लंडशी याबाबत सामंजस्य करार करण्याचीही शक्यता आहे.
भारतात सध्या बेटिंगचं अनधिकृत मार्केट अंदाजे 9.6 लाख कोटींचं आहे. यामध्ये स्थानिक बूकी आणि अनधिकृत वेबसाईट्सचा समावेश आहे.
अधिकृत बेटिंगवर जो कर लावला जाईल. तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकार याबाबत गांभार्याने विचार करत आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.
हाब , सहीच पोस्ट्स!
हाब , सहीच पोस्ट्स!
असा पैसा वाईट असतो हे कुणी
असा पैसा वाईट असतो हे कुणी सांगितले...?
>>>>
मला काय माहीत कोणी सांगितले.
मी कुठे म्हणालो असा पैसा वाईट असतो
असा पैसा मिळवायच्या नादात जी वाताहात होते ती वाईट असते. कारण जुगारात माणूस जिंकतच नाही तर हरतोही आणि प्रोबॅबलिटीचा विचार करता हरतोच हरतो कारण जुगार भरवणारा हमखास जिण्कत असतो. त्याला तो पैसा काही उत्पादन विकून नाही मिळत तर या हरलेल्या लोकांच्या खिशातीलच पैसा असतो.
हायझेनबर्ग, तुम्ही तर फिलॉसॉफिमध्ये घुसलात. आयुष्य एक जुगार आहे वगैरे वगैरे.
तुमचे शिक्षणाचे उदाहरण फार आवडले. मी आपली क्षमा मागून त्यावर वेगळा धागा काढू ईच्छितो.
आणि आशा करतो आपल्यालाही तिथे नक्कीच ऊत्तर मिळेल. तसेच आणखी काही उदाहरणे दिल्यास आवडतील.
आणि हो हायझेनबर्ग, वर नानाकळांसाठी लिहिलेला प्रतिसाद वाचा. आपणही जे उदाहरण दिलेत,..
ह्या ऊलट एखाद्या जुगार्याने वडिलांकडून १ लाख रुपये घेवून एका दिवसात १ का ५ करत ५ लाख केले तर सांगा बरं हुशार कोण ठरला?...
हे उदाहरण देखील लावले एक लाख आणि आले पाच लाख टाईप्स आहे.
तुमचे शिक्षणाचे उदाहरण फार
तुमचे शिक्षणाचे उदाहरण फार आवडले. मी आपली क्षमा मागून त्यावर वेगळा धागा काढू ईच्छितो.
आणि आशा करतो आपल्यालाही तिथे नक्कीच ऊत्तर मिळेल. >>> का हो? ह्या धाग्याचे वास्तुशास्त्रं ठीक नाही का ईथेच ऊत्त्तर लिहायला?
हे उदाहरण देखील लावले एक लाख आणि आले पाच लाख टाईप्स आहे. > तुम्ही शिक्षणावरचा खर्च वसूल झाला की नोकरी सोडून देणार आहात की काय
तिथे १ चे ५ तुम्हाला नको आहेत का?
पैसा काही उत्पादन विकून नाही
पैसा काही उत्पादन विकून नाही मिळत तर या हरलेल्या लोकांच्या खिशातीलच पैसा असतो.
>> मग तुम्हाला काय समस्या आहे...? मी तर आधीपासुन तेच म्हणतोय... एकाच्या खिशातला पैसा स्वखुशीने दुसर्याच्या खिशात जातोय तर तुम्ही का बोंबाबोंब करताय फुकट...?
जीवन विमा हा सगळ्यात मोठा
जीवन विमा हा सगळ्यात मोठा जुगार आहे, त्याबद्दल काय विचार आहे ऋ?
दारु, जुगार, सिगरेट ह्या
दारु, जुगार, सिगरेट ह्या गोष्टी वाईट असल्या तरी त्यावर बंदी घालून त्या बंद होत नाहीत. लोकांना त्याचे आकर्षण असतेच. उलट बंदीमुळे ह्या गोष्टींचा अनधिकृत व्यापार फोफावतो. लाचखोरी,
कोणी कुठे धंदा करायचा यावरून टोळ्यांची भांडणे, हाणामार्या, खुनाखुनी वगैरे अनिष्ट प्रकार सुरू होतात. सरकारला त्यातून अधिकृत उत्पन्नही (कर इ.) मिळत नाहीत. दुखण्यापेक्षा उपाय भयंकर होतो.
बंदी घालण्याकरता सरकारला जो खर्च होतो तो लोकांचे प्रबोधन करण्यात खर्च केला तर ह्या वाईट गोष्टी नियंत्रणात राहतील.
अमेरिकेत दारुवर १९२०-१९३० च्या सुमारास बंदी होती तेव्हा असेच दिसले. काही राज्यात आता गांजा (मारिहुआना) कायदेशीर केला आहे. तिथे सगळे लोक गांज्याच्या आधीन झालेले दिसत नाहीत.
पैसा काही उत्पादन विकून नाही
पैसा काही उत्पादन विकून नाही मिळत तर या हरलेल्या लोकांच्या खिशातीलच पैसा असतो. >> हे तर शाळा, कॉलेज, क्रिकेट सिनेमा लाही लागू आहे ना? क्रिकेट, सिनेमे बघून तुम्हाला काय ऊत्पादन मिळते की तुम्ही हजारोंनी खर्च करता?
शाळा कॉलेज तुमच्या नोकरीची/ऊज्वल भविष्याची हमी देतात का? नोकरी न मिळाल्यास फी परत देऊ? मग नोकरी न मिळालेल्यांच्या पैसा शाळा कॉलेजच्याच खिशात गेला ना?
कारण जुगारात माणूस जिंकतच नाही तर हरतोही आणि प्रोबॅबलिटीचा विचार करता हरतोच हरतो कारण जुगार भरवणारा हमखास जिण्कत असतो. >>> ह्या वाक्यात विद्यार्थी आणि नोकरी टाकून पहा बरं.
कॉलेजात टाईम पास करतांना, पास होण्या पुरताच अभ्यास करतांना, मायबोलीवर टाईमपास करतांना तुमच्या मनात असे येत नाही का हो की आपण ईमानदारीने अभ्यास वा काम न केल्यास आपले मायबाप/ बायकापोरे रस्त्यावर येतील.
का हो? ह्या धाग्याचे
का हो? ह्या धाग्याचे वास्तुशास्त्रं ठीक नाही का ईथेच ऊत्त्तर लिहायला?
>>>>>
हायझेनबर्ग,
तो मला वेगळ्या धाग्याचा विषय वाटला म्हणून वेगळा धागा काढला.
http://www.maayboli.com/node/63167
आपण ईथली चर्चा उद्या ईथेच कंटिन्यू करू झरूर. हा येणारया पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. शुभरात्री
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
तुम्ही तर पार खिंडीतच गाठलं बघा.
नवीन धागा काढलाय म्हणजे हा विषय बंद करायचा असावा.
१०० झाले... रूनमेश ची सेंतुरी
१०० झाले... रूनमेश ची सेंतुरी परत
सुप्रभात !
सुप्रभात !
हायझेनबर्ग, आपल्या शिक्षणाच्या मुद्द्यावरून मी काढलेला धागा आपण पाहिलाच असेल. जर आपण वरची शिक्षण आणि जुगार ही तुलना सिरीअसली केली असेल तर माझे उत्तर तिथे मिळालेच असेल. जर आपण ईतर पोस्टींसारखे मला प्रतिवाद करायला गंमतीने लिहिले असेल तर ते इग्नोर करा. त्या निमित्ताने त्या धाग्यावर त्या विषयावर छान चर्चा मात्र होऊ शकते.
असो, आता पुन्हा जुगाराकडे वळूया. जुगाराचे कन्सेप्ट काय असतात ते बघूया. जर तेच क्लीअर नसतील तर मी मांडत असलेले मुद्दे तुम्हाला केवळ स्पर्शून जातील. पोहोचणार नाहीत.
नानाकळा, आपणही वाचा.
तर लाखाचे पाच लाख !
जेव्हा लाखाचे पाच लाख होतात तेव्हा ते होण्याची जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी 20 टक्के असते. किंबहुना त्यापेक्षा कमीच. अन्यथा जो तुम्हाला लाखाचे पाच लाख देतोय त्याचा हमखास फायदा कसा होईल:)
आता उदाहरण देऊन समजावतो.
1 ते 6 आकडे असलेला सापशिडी खेळायचा एक ठोकळा घ्या. तुम्ही त्यातल्या एका नंबरवर एक लाख रुपये लावलेत. तुमच्यासारखेच आणखी पाच जणं जुगार खेळत आहेत. त्यांनीही अनुक्रमे एकेक नंबर पकडला. आता ती समोरची जुगार भरवणारी व्यक्ती तो ठोकळा फिरवून टाकणार. 1 ते 6 पैकी एकच नंबर येणार. त्या सहा व्यक्तींपैकी एकच जण एकाचे पाच लाख करणार. उरलेल्या 5 व्यक्ती आपल्या वडिलांनी दिलेले एक लाख हरणार आणि कंगाल होऊन घरी जाणार. जो जुगार भरवत आहे तो प्रत्येकाकडून एकेक लाख वसूल करून सहा लाख जमवणार आणि त्यातील पाच लाख एकाला देऊन, एक लाख हमखास शंभर टक्के कमावून, पुढच्या सहा हुशार मुलांच्या शोधात जाणार..
तर आता त्या पाच हुशार मुलांचे काय ज्यांनी आपल्या वडिलांचे एक लाख रुपये वाया घालवले?
मी सांगतो.... नैराश्य.. आत्महत्या... चोरी ... नशेचा आधार ...
लगे रहो मुन्नाभाई म्हणून एक छान पिक्चर आहे.. नक्की बघा.. आता काही ताण्त्रिक कारणाने मी नेमका सीन ईथे देऊ शकत नाही, मात्र जिमी शेरगीलचा सीन आहे बघा. त्यात तो असेच वडीलांचे पैसे लाखाचे पाच लाख करायच्या नादात हरतो. पुढे त्याचे काय करायला जाणार असतो आणि मुन्नाभाई त्याला काय सल्ला देतो हे नक्की बघा..
अश्याच काही जिमी शेरगीलना वाचवायच्या प्रयत्नात आहे.
पैश्याचे मोल आयुष्यापेक्षा जास्त नसते..
नानाकळा, हे वरचे वाक्य तुम्हाला समजले आणि पटले तर तुम्ही जीवनविमाबद्दल जो प्रश्न विचारला आहे त्याचे वेगळे उत्तर मला द्यावे लागणार नाही.
पैश्याचे मोल आयुष्यापेक्षा
पैश्याचे मोल आयुष्यापेक्षा जास्त नसते..
>>> अतिशय भोंगळ वाक्य आहे हे....
पैशाशिवाय आयुष्याला काहीच मोल नाही. हे वाक्य तुम्हाला समजले तर तुमचा प्रतिवादही किती तकलादू आहे हे कळेल. सारा जीवनविमाच मुळात पैशावर उभा आहे.
पैशाशिवाय आयुष्याला काहीच मोल
पैशाशिवाय आयुष्याला काहीच मोल नाही
>>>>
हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे .. नोट करून ठेवतो ..
तरी ईथे काही मते माण्डतो.
पैसा हे आयुष्याला सुखकर करणारया अनेक कारणांपैकी एक कारण आहे. आयुष्याला सपोर्ट करणारा एक घटक. जसे बुद्धीबळात राजाला वाचवायला घोडा ऊण्ट वझ्रीर ईत्यादी असतात तसेच. फक्त तुम्ही पैश्याला जास्त महत्व देत असाल तर तो तुमचा वझीर झाला ईतकेच. पण राजा हा तुमचे आयुष्यच राहणार. वझीर नसेल तरी आयुष्य खेळत राहू शकता. राजा गेला खेळ खल्लास.
अर्थात सर्वांच्या आयुष्यात पैश्याची जागा वझीराची नसते. एखाद्यासाठी पैसा म्हणजे प्यादा असेल. वझीर म्हणजे एखादे नाते असेल, एखादा छण्द असेल, एखादे पॅशन असेल, एखादे तत्व असेल, आत्नसन्मान असेल..
मागे तुम्ही म्हणालेलात की क्रिकेटचे सर्व सामने फिक्स असतात आणि सर्वच खेळाडू फिक्सर असतात तेव्हाच मला कल्पना आलेली की तुम्ही पैसा हेच जीवन समजत असावात.
पण तसे नसते. गैर मार्गाने मिळालेला पैसा एखाद्याच्या स्वभावात नसेल तर त्याची मन:शाण्ती घालवू शकतो. आणि हे काही सेंटी डायलॉग नाहीयेत. तर सायकॉलॉजी आहे, हा मानवी स्वभाव आहे.
जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा तुमचा किंवा माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे यावर मत बनवायचे नसते किंवा कुठला निर्णय घ्यायचा नसतो. तर एकंदरीत तो समाज कसा विचार करतो, त्यांच्या भावना कश्याने दुखावतात किंवा सुखावतात, त्यांना कश्याची गरज आहे, त्यांची प्राथमिकता काय आहे वगैरे बरेच बाबी येतात. प्रत्येकाच्या खिश्यात पैसे खुळखुळले म्हणजे रामराज्य आले असे होत नाही सर
so typical
तेव्हाच मला कल्पना आलेली की
तेव्हाच मला कल्पना आलेली की तुम्ही पैसा हेच जीवन समजत असावात.
ह्या ह्या ह्या ... हहपूवा
so typical
so typical
>>>>
जरा ईंग्रजी कच्चे आहे. जर मी चुकत नसेल तर तुम्हाला असे म्हणायचे आहे का? "यात काय वेगळे सांगितलेस तू, हे तर सर्वांनाच माहीत आहे"
बाकी माझ्यावर नेहमी आरोप होतो की मी टिपिकल न बोलता उगाच टीआरपी खेचायला आणि लक्ष वेधायला चारचौघांपेक्षा वेगळं बोलतो
तिकडे तांबाटे ३३ वरच अडकले
तिकडे तांबाटे ३३ वरच अडकले आहेत. त्याचा विचार करा लोकहो! <<<
Pages