अच्छे दिन ! सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 July, 2017 - 03:11

सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !

हे योग्य आहे की अयोग्य?

यातून सरकारला उत्पन्न नक्कीच मिळेल. मात्र लोकं जुगाराच्या आहारी जातील का?
यातून काळ्या धण्द्याला चाप बसेल की आणखी राजरोसपणे गैर धंदे होतील?
दारूने जशी कुटुंब उध्वस्त केली तशी भिती यात नाही का?
ईतर देशांत हे चालतही असेल पण भारताचे समाजजीवन पाहता हे ईथे योग्य ठरेल की अयोग्य?

माणूस जुगारात कसा वाहावत जातो याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जर हे अधिकृत झाले तर आजवर ज्या कॉलेजच्या पोरांचा हे आवाक्यात नव्हते ते देखील याच्या नादी लागू शकतात का?

क्रिकेटसारख्या खेळातील मॅच फिक्सिंग बोकाळेल की कमी होईल?
साराच पैश्यांचा बाजार होईल का?

सविस्तर बातमी ईथे वाचा -
http://abpmajha.abplive.in/sports/govt-looking-for-make-online-betting-l...

निवडक मुद्दे -

ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी आता शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबत अनेकांशी चर्चाही सुरु केली आहे.

क्रीडा मंत्रालय ब्रिटनमधील अधिकृत आणि कायदेशीर ऑनलाईन बेटिंगसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. इंग्लंडशी याबाबत सामंजस्य करार करण्याचीही शक्यता आहे.

भारतात सध्या बेटिंगचं अनधिकृत मार्केट अंदाजे 9.6 लाख कोटींचं आहे. यामध्ये स्थानिक बूकी आणि अनधिकृत वेबसाईट्सचा समावेश आहे.

अधिकृत बेटिंगवर जो कर लावला जाईल. तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकार याबाबत गांभार्याने विचार करत आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकार टँक्स गोळा करण्यासाठी चुकीचा निर्णय घेत आहे. जुगारात माणुस कसा वहावत जातो हे महाभारतातही आले आहे. आपल्या ह्या महान ग्रंथापासुन शिकवण घेउन सरकारने हा निर्णय करू नये असे वाटते.

लायसेन्स कुठे मिळतं ह्याचं....?
>>>>>
मला माहीत असते तरी सांगितले नसते. जुगार खेळणारयापेक्षा भरवणारा वाईट असतो. खेळणार्यांची मला दया येते. आणि जो भरवतो त्यांचा राग.

म्हणजे सरकारचा राग येतोय का तुम्हाला? सरळ तसे म्हणा की मग?
>>>>
आणखी सरळ काय बोलणे अपेक्षित आहे Happy
अर्थात हे माझे मत आहे. चुकीचेही असू शकते. म्हणून असे करण्यामागे सरकारची नेमकी काय भुमिका आहे हे जाणून घ्यायचे आहे.

शेअर घेणे आणि विकणे हे जुगार नाही असे मानले तरी
शेअर बाजारात एखाद्या शेअर चा भाव पुढील दोन महिन्यात किती जाईल, , लॉटरी, घोड्याची रेस हे वर्षानुवर्ष (ब्रिटीशाच्या काळापसुन) चालु आहे तर मग क्रिकेट च्या बेटींग ला काय प्रोब्लेम आहे. कारण ते ब्रिटीशानी चालु केले नाही म्हणुन?
जरी भारतात अधिकृत बेटिंग नसले तरी परदेशात बेटिंग लिगल आहे आणि पुर्ण बॅकिंग ऑनलाईन असल्याने ज्याना बेटींग क्र्रायचे आहेत ते परदेशात लिगली करु शकतात. (साईट ब्लॉक केल्या तरी VPN वापरुन लोक बेंटिंग करतात)
भारतात पण आजुनपर्यन्त कुठल्याही सरकारला अनधिक्रुत बेटिंग बंद करता आले नाही. आधी मटका चालायचा आता क्रिकेट बेटिंग चालते. बेटिंग करणारे लोक वाढतच आहेत. लिगल असेल तर सरकारला उत्पन्न मिळेल, मॅच फिक्सिंग बंद होईल आणी खेळाचा खरा आंनंद मिळेल. ( मॅच फिक्स होणारच नाही असे सांगता येणार नाही पण झाली तर बेटिंग पॅटर्न बघुन फिक्स करण्याराल्या पकडता येते. सिंगापुर /मलेशिया मध्ये ब्रिटीश फुटबॉल लिग, सिंगापुर किंवा मलिशियन लिग चे बेटिंग अधिक्रुत आहे त्यात अधुन मधुन बेटींग पॅटर्न बघुन फिक्स करण्यार्या ला पकडले जाते).

मी कधीच बेटींग करत नाही पण ज्याना करायचे त्याना करु देण्यास काय प्रोब्लेम आहे. बर्याच देशात बेटिंग लिगल आहे आणि ग्लोबलयाझेशन मुळे भारतातिल लोकाचे परदेशात होण्यार्या बेटींग ला सरकार काही करु शकत नाही

इतर देश आणि आपला महान भारत देश यांच्यात काही फरक आहे की नाही?

मी कधीच बेटींग करत नाही पण ज्याना करायचे त्याना करु देण्यास काय प्रोब्लेम आहे.---------- .ह्याच न्यायाने
इतर देशात एक वेगळी खाद्यसंस्क्रुती आहे म्हणुन आपल्या देशात पण ती सुरु करूया ज्यांना ह्या खाद्यसंस्क्रुतीचे पालन करायचे त्यांना करु द्या त्यात इतरांना काय प्रोब्लेम आहे असे म्हणने हे योग्य राहील का?

हाहा साहिल, आता बघा तुम्ही आयडिया दिलीत - शेअर मार्केट बंद करा आंदोलनासाठी !
१९६९ पासून महाराष्ट्र राज्य लॉटरी व तत्सम इतर राज्य लॉटऱ्या सरकारच स्वतः चालवते ना? तो जुगार नाही? का फक्त खासगीकरणाला विरोध आहे? असो.

हाहा साहिल, आता बघा तुम्ही आयडिया दिलीत - शेअर मार्केट बंद करा आंदोलनासाठी !
१९६९ पासून महाराष्ट्र राज्य लॉटरी व तत्सम इतर राज्य लॉटऱ्या सरकारच स्वतः चालवते ना? तो जुगार नाही? का फक्त खासगीकरणाला विरोध आहे? असो.

लाँटरी हा निरुपद्रवी प्रकार आहे. त्यात नशिबाचा भाग जास्त आहे. क्रिकेट बेटिंगचे भयानक स्वरुप जगाने अनुभवले आहे. ह्या प्रकाराशी त्याची तुलना करणे हास्यास्पद आहे.

ज्याच्या त्याच्या मेहनत चा किंवा मालकीचा पैसा, त्याचे त्याने बेटिंग करावे नाहीतर बार्बालेवर उडवावे कोणाला काय हरकत असावी?

लायसेन्स ओपन झाले की सांगा, दोन पाच हजार कोटी मी पण कमवेन म्हणतो! Wink

कोणाला काय हरकत असावी?
>>>
समाजाविषयी कळकळ!
अर्थात प्रत्येकाचे विचार आणि याकडे बघण्याचा दृष्टीकोन एकदम भिन्न असू शकतो हे एकदम मान्य.

शेअर घेणे आणि विकणे हे जुगार नाही असे मानले तरी........, हे असे मानले तर पुढे अर्थच उरत नाही ना. मुळात कोणता जुगारी हा जुगार खेळायच्या हेतूने शेअर बाजारात जातो.
पुढच्या पोस्टमधील मुद्द्यावर विचार करतो पण शेअर बाजाराचे उदाहरण घेत समर्थन पटले नाही.

लॉटरी आणि रेसची उदाहरणे येतील हे वाटलेलेच.
लॉटरीत कोणी बरबाद झालाय याची उदाहरणे विरळीच. कारण तो खूप स्लो जुगार आहे. लॉटरी काढणारयांनाही मजा येत नाही.
रेस हा जुगारच आहे. पण एका ठराविक वर्गापुरताच. आणि त्यांनी ठराविक रक्कम त्यात उधळली तरी फरक पडत नसावा. एखादा मध्यमवर्गीय त्या नादाने कंगाल झालाय असेही फार नसावेतच.

मला वाटते ईथे प्रश्न नुसता तत्वांचा नाही. तर व्यापक परीणामांचाही आहे. त्यामुळे जर हे चालते तर ते का नको, जाओ पहले ऊस आदमी की साईन लेके आओ असे मुद्दे त्यामुळे नसावेत.

तसे खरेच असेल तर 95 टक्के व्यवसाय बंद करावे लागतील!
>>>>
कुठले व्यवसाय?
दारू, जुगार ईत्यादी बंद केले तरी पुरेसे आहे मला. तुम्हाला कुठले 95 टक्के घातक वाटतात,

Single digit online लॉटरीला सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे. खूप मजा येते ही लॉटरी खेळायला. सरकारने फक्त कर वसूल करावे , हे करू नका ते करू नका शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. पैसा बाजारात फिरता राहिला पाहिजे.

डॉक्टरानी कट घेतला तर गुन्हा.
बेटिंग कायदेशीर होणार.

त्यामुळे डॉक्टरानी कट घेणे बंद करून पेशंट बरा होइल का यावर बेटिंग करावे.

Proud

लॉटरीत कोणी बरबाद झालाय याची उदाहरणे विरळीच
>>>

हे चुकीचे विधान आहे. दारूच्या व्यसनाईतकेच लॉटरीचे व्यसन भयानक आहे. अनेक कुटुंबे यात बरबाद होतात. असंख्य उदाहरणे पाहीली आहेत.

बेटिंग कायदेशीर करावे. ते जोवर बेकायदेशीर आहे तोवर सरकारलाही काही मिळणार नाही व गुन्हेगारी पकड त्यावर राहील. लोक सट्टा, जुगार, आकडा लावणे कधीही सोडणार नाहीत

Pages