वूडलँडचे सँडल आणि BMW 1300S

Submitted by अतरंगी on 12 July, 2017 - 08:23

" बाबा, मला वूडलँडचे सँडल घ्यायचेत"

"अरे आत्ताच कॉलेज चालू व्हायच्या आधी सँडल घेतले होतेस ना?"

"हो पण ते साधे आहेत, मला वूडलँडचे हवेत"

" का ?"

"तेच चांगलेत, सॉफ्ट असतात, त्या साध्या सँडल ने मला चालताना त्रास होतो...." उगाच काहीच्या काही कारणे द्या मोड मध्ये मी.

"बरं बरं घेऊ "

"कधी?"

"दिवाळीला...."

"नाही नाही मला आत्ताच पाहिजेत"

वडिलांनी किती समजूत काढली पण तरी मी तो सँडल घ्यायला लावलाच. का ? तर आमच्या वर्गातली मोजकी श्रीमंत टाळकी तेव्हा वूडलँडचे सँडल वापरायची आणि मला पण त्यामुळे तोच हवा होता...

वीस बावीस वर्षांपूर्वी मुलाच्या हौसेसाठी इतका महाग सँडल घेताना वडिलांना काय वाटलं असेल? आपली परिस्थिती काय? आपण काय मागतोय ? याची अजिबात जाणीव मला नव्हती....

--------------------------------------------------------------
फास्ट फॉरवर्ड वीस वर्षे.....

"बाबा मला अर्जुन सारखी BMW ची बाईक घ्यायची" आमचे सुपुत्र या आठवड्यात तिसऱ्यांदा...

"आँ? BMW? " बऱ्याच दिवसांनी घरी आमचे संवाद ऐकत असलेले त्याचे आजोबा उर्फ आमचे पिताश्री.

" अहो खेळण्यातली म्हणतोय तो."

"अरे मग द्या की आणून, काय शंभर सव्वाशेच्या गोष्टी साठी पोराचा हिरमोड करायचा"

"शंभर सव्वाशे ??? अहो खेलियाड मध्ये दहा हजार रुपयाला आहे, ऑनलाईन घेतली तरी साडे आठ हजाराच्या खाली मिळणार नाही. बॅटरी वर चालते ती. त्यावर बसून चालवायची असते. "

"इतकी महाग खेळणी मिळतात ? "

"हो, साधी मागितली असती तर मी नाही म्हणालो असतो का त्याला ?"

--------------------------------------------------------------

"अरे या विकेंडला तुझी बऱ्याच दिवसाची पेंडिंग शॉपिंग संपवून टाकू.......वूडलँडमध्ये मॉन्सून सेल पण चालू आहे. " इति बायको.

" नको जाऊ दे, आजच बाळराजांसाठी बाईक ऑर्डर केली मी. सध्याचा सँडल पिदडतो अजून दोन चार महिने आणि जीन्स पण घ्यायलाच पाहिजे असं काही नाही... तसंही कोण बघतेय आता या वयात माझ्याकडे....मागच्या महिन्यातल्या कामाचे पैसे येतील मग बघू"
------------------------------------------------------------

एक पिढी सरली तरी बापाच्या गरजा आणि मुलांची हौस एक वेळी कशी पूर्ण करता येईल याचे गणित काही सुटेना, कदाचित ते न सुटणं यातच मध्यमवर्गीय असण्याचे सुख लपले आहे.....

Group content visibility: 
Use group defaults

भारतात फुटवेअरच्या बाबतीत वुडलँडच 'फर्स्ट लव' होते, जे अजूनही विसरता येत नाहीये Happy . २६ जुलैच्या पावसात माझा आवडता वुडलँड खराब होईल म्हणून मित्राचा टाकायलाच झालेला बूट घालून पाण्यातून गेलो आणि त्याला हट्टाने नवा वुडलँडच घ्यायला लावला.
ईथे वुडलँड मिळत नाही पण स्केचर्स वुडलँडच्या जास्तं जवळचे वाटले.

जसे तुम्ही अजूनही वुडलँड वापरता तसे मुलाची बायको २० वर्षांनी 'बीएमडब्ल्यू मध्ये दिवाळी सेल लागला आहे तर तुमची दीड वर्ष जुनी बीमर बदलून लेटेस्ट बीमर घेवू' म्हणेल तेव्हा तुमचा मुलगा 'सध्या लेटेस्ट बीमर नको, मुलासाठी दीड लाखाचे 'मार्स ऑर्बिटर स्पेसशटलचे' मॉडेल आणू या म्हणेल. ' Wink

जसे तुम्ही अजूनही वुडलँड वापरता तसे मुलाची बायको २० वर्षांनी 'बीएमडब्ल्यू मध्ये दिवाळी सेल लागला आहे तर तुमची दीड वर्ष जुनी बीमर बदलून लेटेस्ट बीमर घेवू' म्हणेल तेव्हा तुमचा मुलगा 'सध्या लेटेस्ट बीमर नको, मुलासाठी 'मार्स ऑर्बिटर स्पेसशटलचे' मॉडेल आणून या म्हणेल. ' Wink>>>>>

हेच मांडायचा प्रयत्न होता Happy
आमच्या तरुणपणी पालकांच्या मते ब्रँडेड फूट वेअर ही luxury होती

Luxury आणि नेसेसिटी च्या व्याख्या प्रत्येक पिढी मध्ये बदलत जातात. आणि प्रत्येक वेळेस आधीची पिढी स्वतःच्या नेसेसिटी वर तडजोड करत मुलांच्या luxury पुरवायचे प्रयत्न करते. Happy

Avadala lekh.
Dhani, I think middle class is all about making adjustments in limited resources.

{सगळा लेख वाचला, पण यात काहीच मध्यमवर्गीय आहे असे वाटले नाही. ना त्या काळचे वुडलँड ना आताची बीएमडब्ल्यु}
+१

{I think middle class is all about making adjustments in limited resources.}
Johnny Depp could not sustain his $२ million per month lifestyle. I am sure he had to make lot of adjustments because of limited resources. Poor middle class fellow.

The likes of Johnny Depp are called stupid and broke not middle class. In case you find Amit's definition of middle class too difficult to underhand let me give you a rather simple one,

a class occupying a position between the upper class and the lower class; a fluid heterogeneous socioeconomic grouping composed principally of business and professional people, bureaucrats, and some farmers and skilled workers sharing common social characteristics and values, which often involves making rational budgetary decisions towards utility maximization.

>>rational budgetary decisions towards utility maximization.

हाच मुद्दा धनी मांडतो आहे असं मला वाटतंय. ना त्या काळचे वुडलँड ना आताची बीएमडब्ल्यु काहीच utility maximization चे rational budgetary decisions वाटत नाहीत.

अतरंगींची आणि त्यांच्या वडिलांची युटिलिटी आणि रॅशनॅलिटी धनि, तुम्ही किंवा मी कशी ठरवणार?

Utility is a term used by economists to describe the measurement of "useful-ness" that a consumer obtains from any good. Utility may measure how much one enjoys a movie, or the sense of security one gets from buying a deadbolt. The utility of any object or circumstance can be considered.
The four types of economic utility are form, time, place and possession. "Utility" in this context refers to the value, or usefulness, that a purchaser receives in return for exchanging his money for goods or services. Purchaser seek to receive maximum satisfaction through addressing all of the four types of utility – or as many as possible.

युटिलिटी फक्तं मॉनेटरी थोडीच असते? भूक लागल्यावर पहिल्या रोटीची युटिलिटी जास्त म्हणुन हॉटेल मध्ये पहिल्या रोटीची किम्मत १० रुपये, दुसरीची ८ रुपये तिसरी ५ रुपये असते का?
तुम्हाला अतरंगी वुडलँड आणि बीएमडब्ल्यू 'ब्रँडस' बद्द्ल बोलत आहेत म्हणुन ते मिडल क्लास नव्हेत असे म्हणावयाचे आहे का?

अहो मी खेळण्यातल्या BMW बाईक विषयी लिहिले आहे. Happy मला वाटलं खेळण्यातली BMW घेताना पण ज्याला विचार करावा लागतो तो मध्यमवर्गीय असतो Wink

धनि आणि व्यत्यय यांच्या मते ह्या लेखात काही मध्यमवर्गीय वाटत नाही. पण मग यात काय हे गरीब! साधी खेळण्यातली BMW घेता येत नाही असा विचार आहे की, काय हे श्रीमंतांचे/उच्च मध्यमवर्गीयांचे सो कॉल्ड प्रॉब्लेम्स असं म्हणायचं आहे ते मला नक्की कळले नाही. Happy

Luxury आणि नेसेसिटी च्या व्याख्या जशा पिढीनुसार बदलतात तशाच व्यक्ती आणि परिस्थिती नुसार सुद्धा बदलतात.

हायझेनबर्गचा युटिलिटीचा मुद्दा तोच आहे. ती सुद्धा सापेक्ष असते.

माझ्या खिशात जर खर्च करायला 500 रुपये असतील आणि मला भूक लागली असेल तर माझ्यासाठी स्वच्छता आणि चव ही पण गरज या सदरात मोडू शकेल पण माझ्या कडे जर 25 रुपयेच असतील तर माझी गरज फक्त उदर भरण नोहे असेल.

{मुलाची बायको २० वर्षांनी 'बीएमडब्ल्यू मध्ये दिवाळी सेल लागला आहे तर तुमची दीड वर्ष जुनी बीमर बदलून लेटेस्ट बीमर घेवू' म्हणेल तेव्हा तुमचा मुलगा 'सध्या लेटेस्ट बीमर नको, मुलासाठी 'मार्स ऑर्बिटर स्पेसशटलचे' मॉडेल आणून या म्हणेल}

हे २० वर्षांनंतर होण्याऐवजी आत्ता या क्षणी कोणा घरात होत असेल तर त्या घराला आपण मध्यमवर्गीय म्हणणार का?

{माझ्या खिशात जर खर्च करायला 500 रुपये असतील आणि मला भूक लागली असेल तर माझ्यासाठी स्वच्छता आणि चव ही पण गरज या सदरात मोडू शकेल } आणि जर मी एका वेळी ५०,००० रुपये खर्च करायला तयार असणारा सेलिब्रिटी असेन तर माझी गरज अजुनच वेगळी असेल. अगदी मान्य. मुद्दा हा आहे की हा सेलिब्रिटी त्याच्या मुलाच्या हट्टासाठी अख्खं प्ले-ग्राउंड विकत घेताना त्याच्या स्वतःच्या खर्चात तडजोड करत असेल तर आपण त्याला मध्यमवर्गीय म्हणणार का? श्रीमंत लोकं आर्थिक तडजोडी करत नाहीत असे म्हणावयाचे आहे का?

तुम्हाला १० हजारांचं खेळणं घ्यायला इतर खर्च re-prioritize करावे लागले. दुसर्‍या कोणाला हे re-prioritization १ लाखाच्या खेळण्यासाठी किंवा १० लाखाच्या खेळण्यासाठी करावं लागेल. या re-prioritization ला "मध्यमवर्गीय सुख" असा मुलामा देणं मला खटकलं

मी जर हा लेख 100 रुपयांची गोष्ट घेण्याकरता एखादे re-prioritization करावे लागले त्याबद्दल लिहिला असता तर खटकलं नसतं का ?

प्रत्येकाची फुटपट्टी वेगळीच असणार ना ?
कोणाला तरी मी श्रीमंत वाटतो आणि मला कोणीतरी श्रीमंत वाटतं.
तसंच कोणीतरी मला गरीब वाटतो आणि कोणाला तरी मी.

हे सर्व सापेक्ष असते. एकाच घरात राहून माझी, भावाची, वडिलांची फुटपट्टी वेगवेगळी असू शकते ना ?

तुम्हाला लेख खटकला यावर आक्षेप नाही माझा, तुम्हाला लेख न आवडण्याचं, टीका करण्याचे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त त्यामागच्या भावनेवर आक्षेप घेतल्यासारखे वाटतंय म्हणून इतक्या सर्व प्रतिक्रिया....

त्यामागच्या भावनाच मध्यमवर्गीय वाटल्या नाहीत असे वाटले. कारण मध्यमवर्गीय हा नेहमी गरजेला प्राधान्य देणारा आणि चैनीची वस्तू पै पै करून जोडून मगच घेणारा असा एक (मे बी जूनाट) विचार / कल्पना डोक्यात होती. त्या कल्पनेमध्ये हा लेख बसत नाही.

लेख आवडला.
पण धनि व व्यत्यय यांचे मुद्देही पटले. बेसिक गरजा भागवतानाही proritize करावं लागतं तो मिडल क्लास असं मला वाटतं. Needs-wants मधील फरक. काही ग्रे एरिया असू शकेल पण इथे ब्रँडेड शूज किंवा महागडे खेळणे घेणे ही क्लियरली want आहे need नव्हे. मुलाला बेसिक शिक्षण देण्यासाठी किंवा नवर्याच्या आजारपणसाठी कर्ज काढावं लागणं आणि मग पैसे वाचवायला आईने जुन्या साड्या विकत घेऊन वापरणं हे उदाहरण contrast म्हणून देता येईल.

मागच्या भावनाच मध्यमवर्गीय वाटल्या नाहीत असे वाटले. कारण मध्यमवर्गीय हा नेहमी गरजेला प्राधान्य देणारा आणि चैनीची वस्तू पै पै करून जोडून मगच घेणारा असा एक >> असे काही नसते रे धनि. बँकेत, कॉर्पोरेट मध्ये बर्‍या हुद्द्यावर काम करणारे, छोटा मोठा बिझनेस असणारे बेसिक गरजा भागवून विमा, थोडी सहल, थोडे सेविंग करणारा ही मिडल क्लासच असतो. त्याला पै-पै जोडायची आवश्यकता नसते पण वर्षातून सरासरी २०० रुपये फुटवेअर मधे खर्च करणार्‍याला मायेपोटी अचानक २००० खर्चायची वेळ आली तर तो प्रेमाच्या माणसाचे मन न मोडता एखादी कौटुंबिक सहल वा आपला एखादा पर्सनल खर्च टाळून मुलाचे/बायकोचे मन राखतो ईतकेच. 'ब्रँड' घेतला म्हणून तो श्रीमंत वा अपर क्लास होत नाही.

एकंदर मिडल क्लासची फिल्मी व्याख्या आणि ईकॉनॉमिक्स संदर्भाने व्याख्या असा फरक दिसतो आहे प्रतिसादांमधल्या दोन व्ह्यू पॉईंट्समध्ये.

आवडला लेख. आणि "मध्यमवर्गीय" सिच्युएशनही वाटली. नेहमीच्या गरजांचा प्रश्न नसणे पण इतर आवडीनिवडीकरता खर्च करताना हे करावे का विचार केला जाणे - आपल्याला अनेकांना असे कित्येक प्रसंग आठवत असतील. आणि मध्यमर्गीय ही एक मोठी बॅण्ड्/रेंज आहे - त्याच्या एका टोकाला दैनंदिन गरजांचा प्रॉब्लेम नसेल, पण २०० रू ची गाडी सुद्धा विचारपूर्वक घ्यावी लागेल, तर दुसर्‍या टोकाला एखादी १ लाखाची बाईक तशीच प्रयत्न करून घ्यावी लागेल व इतर राहणी टीपिकल मध्यमवर्गीयच असेल. हे दोन्ही वर्ग मला मध्यमवर्गीयच वाटतात.

लेख आवडला. मध्यमवर्गाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते हे ही खरं. इथे तर म्हणतात भारतात दोन टक्के सुद्धा मध्यमवर्ग नाही.
https://scroll.in/article/740011/everyone-in-india-thinks-they-are-middl...

लेख आवडला आणि त्यामगच्या भावनाही पोहोचल्या. मात्र बापाच्या गरजा आणि मुलांची हौस एक वेळी कशी पूर्ण करता येईल याचे गणित सोडवताना बापाच्या गरजा मागे सारुन मुलांची हौस भागवणे याची मुळातच फॅन नसल्याने पुढल्या पिढीत गणित वेगळ्या पद्धतीने सोडवलेले बघायला जास्त आवडले असते.

लेख आवडला आणि त्यामगच्या भावनाही पोहोचल्या. मात्र बापाच्या गरजा आणि मुलांची हौस एक वेळी कशी पूर्ण करता येईल याचे गणित सोडवताना बापाच्या गरजा मागे सारुन मुलांची हौस भागवणे याची मुळातच फॅन नसल्याने पुढल्या पिढीत गणित वेगळ्या पद्धतीने सोडवलेले बघायला जास्त आवडले असते. >>>> +१

Pages