आपल्याला काय करायचय?

Submitted by आर्च on 8 July, 2017 - 15:48

आज शनिवार. सकाळीच उठून आमच्या इथल्या नदिवरच्या नेचर वॉकवर फिरायला जायच हे मी काल रात्रीच ठरवल होतं. आणि चक्क नवरापण यायला तयार झाला होता. नाहीतर माझी एकटीचीच जायची तयारी होती. हा नदीच्या बाजूने केलेला ग्रीनवे कॉरीडॉर फारच सुंदर आहे. निरनिराळी जवळपासची सबर्ब्ज ह्याने जोडली आहेत. सुरेख झाडित लपलेला हा रस्ता फक्त चालण्यासाठी आणि सायकलस्वारांसाठी ठेवलेला आहे. बाहेर कार पार्कींगची मोफत व्यवस्था आहे. साऊथला रहाण्याचा मोठ्ठा फायदा. दुतर्फा मोठी झाडं आणि त्यांची डोक्यावर झालेली कमान त्यामुळे उन्हाळ्यातही चालताना गारवा जाणवतो. तर आम्ही सकाळीच निघालो. घरापासून १० मिनिटांवर एक ट्रॅक सुरु होतो. तो घ्यायचा ठरवला होता.

मजेत गप्पा मारत चाललो होतो. निसर्गाचा आनंद, परत येणार्‍यांशी गुड्मॉर्नींग किंवा नुसतच हात उंचाऊन अभिवादन करत जात होतो. रस्ता अस्फॉल्ट्चा किंवा मधूनच बोर्ड वॉक होता. कुठेही कचरा नव्हता. अर्थात कचरा टाकायला वरचेवर कॅन होतेच आणि लोकं त्याचा वापर करत होते. दोन मैल कसे संपले कळलच नाही. पण मग परत फिरायच ठरलं आणि आम्ही वळलो.

जाताना भेटलेले सगळे फिरायला किंवा पळायला आलेले होते आणि नेहेमीच तेथे जाणार्‍यापैकी वाटत होते. कुणाजवळ आपले पाळीव प्राणि किंवा मुलं बाळं नव्हती. परत येताना मात्र काही आपल्या कुत्र्यासोबत चालेले होते. मला कुत्रा हा प्राणी फार आवडतो. त्यामुळे मालकाला त्याच्या प्राण्याबद्दल हसत काँप्लिमेंट देत आम्ही परत येत होतो.

इतक्यात लांबूनच एक छोटासा सिंहासारखा दिसणारा कुत्रा आपल्या मालकीणीबरोबर येताना दिसला. छान ऐटीत चालला होता. आमच्या थोड्या जवळ आल्यावर तो आपला कार्यभाग उरकायला थांबला. इथे असा कायदा आहे की मालकाने आपल्या प्राण्याची घाण उचलून ठेवलेल्या कॅन्समध्ये टाकून दिस्पोज ऑफ करायची असते. मालकीणीने ह्या कायद्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालायला सुरुवात केली. खरं तर मी तिला तिच्या कुत्र्याला जाता जाता "क्यूट डॉग" म्हणून सांगणार होते. पण माझी नागरीक म्हणून असलेली कर्तव्य जास्त उफाळून आली आणि मी तिला थांबवून सांगितलं, "You are supposed to carry a bag and dispose off your dog’s poop properly. We as citizens are required to keep the city and especially this pathway clean." तिने माझ्याकडे दुर्लक्ष करून चालायला सुरुवात केली.

मला नवरा म्हणाला, " आपल्याला काय करायचय?". तिने दुर्लक्षच केलं न? म्हटलं मी माझी जबाबदारी पार पाडली. मला त्यात आनंद आहे. एखादवेळेस पुढच्या खेपेला ती तिची जबाबदारी पार पाडेल. निदान थोडी तरी तिला लाज वाटली असेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हटलं मी माझी जबाबदारी पार पाडली. मला त्यात आनंद आहे. >> पर्फेक्ट!
रेअर आहे हे ! पण अपवादाने अशी उदाहरण इथेही असतातच.

तुम्ही केले ते अगदी बरोबर केलेत. तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुन्हा असा प्रसंग आल्यास पुन्हा हेच कराल/ प्रश्न विचाराल/ जाब विचाराल अशी अपेक्षा वाटते. आपल्यासारख्या लोकांमुळेच सौजन्य आणि शिस्तं ह्या समाजात टिकून आहेत आणि चांगल्या गोष्टी जास्तं काळ आपला दर्जा टिकवून ठेवतात ज्यात सगळ्यांचे भले सामावले आहे. तुमचे तुमच्या ग्रीनवे प्रती प्रेम तुम्हाला आपसूकच त्या कुत्र्याच्या मालकिणीला प्रश्न/जाब विचारण्याचे धैर्य आणि आधिकार मिळवून देते. मला फार आदर वाटतो खर्‍यासाठी, न्यायासाठी स्टँड घेणार्‍या लोकांचा मग गोष्टं कितीही छोटी वा मोठी असो.

सध्या मायबोलीवरसुद्धा तंतोतंत हाच प्रसंग घडत आहे. ठरवून मायबोली खराब करण्याचा पक्का घाट घातलेल्या काही आयडींकडे मायबोलीकरांनी अशीच दुर्लक्ष करण्याची भुमिका घेतली आहे. त्या काही आयडींनी मजेखातर आपला कार्यभाग ऊरकल्यानंतर त्याला टाळून आपल्याला चालता येते आहे ना ईतपतंच स्वार्थी विचार करण्याची बहुतेकांची भुमिका दिसते. हा ग्रीनवे/ ही मायबोली माझी आहे आणि त्याचे/तिचे वेल बिईंग माझ्यासाठी महत्वाचे आहे, ग्रीनवेने/ मायबोलीने माझ्या जीवनात आणलेल्या आनंदाबरोबरंच त्याच्या/तिच्याप्रती माझी काही जबाबदारी आहे हे मायबोलीकर वेळोवेळी सोयीस्करपणे विसरून जातात.
सगळ्यांना ह्या घाणीचा त्रास होत असतो पण गवर्नमेंट दंड करेल/ कॅमेरे लावेल/ बोर्ड लावेल असे आपल्या अडचणी कायम प्रशासनाने सोडवाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. स्वतः त्रास घेवून/ वाईटपणा पत्करून चांगल्यासाठी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याची, प्रश्न विचारण्याची तयारी फार कमी जण दाखवतात आणि तशी अ‍ॅक्शन घेतात. देशात बदल घडवून आणण्यासाठी काय करावे ह्याबद्दल हातभर पोष्टी लिहिणारे, हे चांगले ते वाईट पटवून देण्यासाठी एकमेकांची बौद्धिकं घेणारे मायबोलीकर मायबोलीवरच त्यांच्या डोळ्यांसमोर चुकीचे काही चालले आहे ते थांबावे ह्यासाठी चकार शब्दं ही लिहितांना दिसत नाहीत हे कटू सत्य आहे. अ‍ॅडमिनची विपू फक्तं वैयक्तिक हेवेदावे/ वादावादी/ आकस/ शिव्याशाप ह्यांनी भरलेली आहे. 'मायबोली' ह्या एंटिटीला निगेटीवली अ‍ॅफेक्ट करणारे, तिचा प्रवाह तिचे स्पिरिट कोणी कायमसाठी वाईट पद्धतीने बदलू पहात आहे त्याबद्दल कोणीही तिथे चिंता व्यक्तं करत नाही हेच मुळात शोचनीय आहे.

मायबोलीप्रती माझ्या भावना व्य्कत करण्यासाठी तुमच्या धाग्याचा ऊपयोग केला त्याबद्दल क्षमा मागते. तुम्हाला आक्षेप असल्यास मी माझी पोस्ट काढून टाकीन.

म्हटलं मी माझी जबाबदारी पार पाडली. मला त्यात आनंद आहे. एखादवेळेस पुढच्या खेपेला ती तिची जबाबदारी पार पाडेल. निदान थोडी तरी तिला लाज वाटली असेल. >> मलाही तुमच्यासारखाच आनंद होतो चांगल्या बदलासाही एखादी भुमिका घेतांना. तुमचे पुन्हा अभिनंदन.

कुठल्या शहर देशातील किस्सा आहे हा?

खरे तर माझ्यासारखे कुत्रा न आवडणारया लोकांना हाच प्रश्न पडतो की कुत्र्याने रस्त्यात केलेली घाण अशी आपल्या हाताने ऊचलून साफ कसे करत असतील लोकं.
अर्थात कुत्रा पाळणारे नक्कीच वेगळ्या मेण्टेलिटीचे असतील आणि त्यांना याचे काही वाटत नसावे.. पण वाटत असल्यास अवघड आहे.. अगदी दादरच्या हिण्दू कॉलनीसारख्या छान एरीयात सुद्धा आवडायचे नाही ते हेच की जागोजाही कुत्र्याण्ची विष्ठा दिसायची..

अमेरिकेत पण असले लोक असतात? इथे तर स्वतःच्या बिल्डिंग मध्ये ,रस्त्याने जाताना वाटेत थुंकणारे लोक आहेत । प्राण्यांची घाण साफ करणे तर दूरची गोष्ट झाली। खरोखर अशा लोकांना मुस्कटात मारावीशी वाटते पण भिडेपायी गप्प बसतो आपण।

<<अमेरिकेत पण असले लोक असतात? >>

सगळ्या देशात सगळ्या प्रकारचे लोक असतात. लोकसंख्या प्रचंड असल्याने भारतात प्रत्येक प्रकारची अनेक उदाहरणे दिसतात.
तसे सभ्य, हुषार, चांगले असेहि लोक संख्येने भारतात अनेक आहेत. पण त्यात काय असे त्या लोकांनाहि वाटते नि बाकीच्यांनाहि, म्हणून त्यांच्याबद्दल लिहीले जात नाही.

बाकी आर्च यांना +१

हुप्प्याहुय्या,
तुमचे म्हणणे पटले. वाईट वाटते, नि केवळ बरे न होणारे व्यसन म्हणून परत परत मायबोलीवर येतो, नाहीतर आजकाल काही राम राहिला नाहीये मायबोलीवर.
ऋन्मेSSष यांच्या असंख्य धाग्यांमुळे मायबोली जरा जिवंत आहे.

अमेरिकेत पण असले लोक असतात? इथे तर स्वतःच्या बिल्डिंग मध्ये ,रस्त्याने जाताना वाटेत थुंकणारे लोक आहेत । प्राण्यांची घाण साफ करणे तर दूरची गोष्ट झाली। खरोखर अशा लोकांना मुस्कटात मारावीशी वाटते पण भिडेपायी गप्प बसतो आपण।>>> +१

नाहीतर आजकाल काही राम राहिला नाहीये मायबोलीवर. >> ही वेळ कशी आली? त्याला आपणच तर जबाबदार नाहीत ना? वेळीच आपली मतं व्यक्त केली नाहीत, त्यांचा पाठपुरावा केला नाहीत तर राम नाही म्हणता म्हणता रावण बोकाळले आहेत म्हणायची वेळ नक्की येईल.

त्या कुत्र्याच्या मागून साफ न करणारीच्या मानसिकतेसारखे केवळ अजून मुठभर लोकं ग्रीनवे वर आल्यास आर्च ह्यांचा ग्रीनवे लवकरंच घाण, दुर्गंधीने माजून जाईल. आणि त्याची ही अवस्था मान्य असणारे लोकंच केवळ त्या ग्रीनवेवर दिसतील. आज एकीलाच समजववावे लागले पण ऊद्या ह्या आततायी, ऊपद्रवी मानसिकतेचे मुठभर लोक झाल्यास आर्च सारख्यांचा आवाज तोपर्यंत दुर्लक्षितंच केला जाईल जोपर्यंत त्यांना त्यांच्यासारख्या समविचारी लोकांचा काही सपोर्ट मिळत नाही.

{नाहीतर आजकाल काही राम राहिला नाहीये मायबोलीवर.
ऋन्मेSSष यांच्या असंख्य धाग्यांमुळे मायबोली जरा जिवंत आहे.}
लोक अर्धवट वाचून एकदम उड्या मारायला लागतात.

अवांतराबद्दल क्षमस्व.

Happy नंन्द्या४३ ह्यांच्या लिखाणातले मर्म /खोच ओळखता न येण्याएवढा तुमचा मायबोली अभ्यास व प्रतिभा नाही ह्यावर तुमच्या लिखाणाचे कट्टर टीकाकार ही विश्वास ठेवणार नाहीत.
असो.

काल फिरायला गेलेलो तेव्हा ट्रेलवर सगळी कडे घाण होती, अचानक सगळ्या श्वानपालकांनी उपोषण करायचं ठरवलं की काय वाटून धक्का बसला. मग लक्षात आले, हा भला मोठा गीजचा थवा येऊन xxx सुटलेला. तिकडून एक श्वान (आणि श्वान पालिका ही) आला तर, त्यालाच ह्या सगळ्या गीजनी मिळून सापासारखे फुत्कार करून हाकलून लावलं. बळी तो कान पिळी.
तुम्ही त्यांना योग्य शिकवण दिलीत हे उत्तम केलेत फक्त हे दुसऱ्याला शिकवायला जाणे परिस्थितीची जाणीव ठेवून करावे.
मी एकदा भारतात असताना ठाण्यात गोखले रोड वर एका मोटार बाईक वरून जाणाऱ्याला ज्ञान शिकवायला गेलो तर ते काका बाईक रस्त्याच्या मधोमध थांबवून मलाच मारायला धावले. Lol आत्ता हसतोय, पण प्रसंग बाका होता, थोडक्यात निभावला म्हणून बरं.
तेव्हा चूज युअर बॅटल असलं काही भारी बोलून कधी पुढे सरकायचं हेही शिकलं पाहिजे.

काही लोकांना जाणिव नसते. ते मुद्दामूनच कायद्याचं उल्लंघन करतात असं नाही. त्यांना थोडसं टोकलं तरी ते सुधारू शकतात. आपल्याला जे शक्य आहे ते करावं अशा मताची मी आहे. मी वर उल्लेख केलेल्या बाईने दुर्लक्ष केलं असेल कारण तिच्याकडे घाण उचलायला काही नसेल. पण ती पुढच्या वेळेला नक्की विचार करेल किंवा तिने करावा.

अमितव, पुष्कळ वेळेला तुम्ही कसं सांगता ह्यावरपण लोकांची रिअ‍ॅक्शन अवलंबून असते.

हुप्पाहुय्या, प्राजक्ता, नंद्या४३, अमितव, रुन्मेष , मी मिनु प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ह्या खेपेला दिवेआगरला गेले असताना, समुद्र किनारा पर्यटकांनी किती घाण केला आहे हे बघून खूप वाईट वाट्लं. मी आणि बहीण सुमुद्रावर मोटर सायकल आण्णार्‍यांना थांबवून सांगत होतो. इथे बोर्ड लावलेले आहेत. गाड्या आणायला बंदी आहे. काही ऐकत होते. काही वाद घालायला लागले. एकाला म्हटलं, "अहो तुम्ही अशी घाण करत राहिलात तर तुमच्या मुलाबाळांना काय राहील?" त्याचं उत्तरः " मला आनंद मिळाल्याशी कारण. मला पुढच्यांची चिंता नाही." ह्या माणसाला तुम्ही काहिच समजावू शकत नाही. कारण त्याला त्याची जबाबदारी उचलायची नाही.

हुप्पाहुय्या, प्राजक्ता, नंद्या४३, अमितव, रुन्मेष , मी मिनु प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

बाकीच्यांचे ( including me ) प्रतिसाद आवडले नाहीत का?

मला आनंद मिळाल्याशी कारण. मला पुढच्यांची चिंता नाही."
>>>>>
घाणीत आनंद कसा मिळवतात देव जाणे Happy
पण खरे तर प्रत्येक जण आपापली सोय बघत असतो.
त्यातही कुठे आसपास झोपडपट्टी असेल वा असे लोकं असतील ज्यांचे घाणीचे निकष आणि व्याख्या आपल्यापेक्षा वेगळी आहे. तर ते तिथेच शौचाला बसण्यासारखे प्रकार सहज करू शकतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

म्हणून स्वच्छतेचा कायदाच हवा..
कारण कसं आहे. घाणीला घाण खेचते. जिथे कमालीची घाण आहे तिथे आपल्यासारखेही थुंकून जातात, जिथे आधीच ढिगभर कचरा आहे तिथे एखादे पुडके आपणही टाकतो. तेच जर साफ स्वच्छ परीसर असेल तर एखादी घाणेरडी व्यक्तीही तिथे कचरा टाकायला धजावत नाही.

बाकीच्यांचे ( including me ) प्रतिसाद आवडले नाहीत का? > असं नाही हो. तुम्हाला, पंडितांना आणि जे इथे वाचून गेले आहेत त्या सर्वांना धन्यवाद.