दहशतवाद आणि त्याची मानसिकता

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 22:24

मानवाने आपल्यातील विचार करण्याच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून स्वतःची सुरक्षितता सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असूनही आजचा आधुनिक मानव पूर्णपणे सुरक्षित आहे का, की तो अधिकच असुरक्षित झालेला आहे? अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव अधिक सुरक्षित वाटत असला तरी आज माणसाच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका हा माणसापासूनच आहे.

आजमितीला आपल्या देशातल्या ६०८ जिल्ह्यांपैकी २३१ जिल्ह्यांना आज घुसखोर, दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हल्ले माओवाद्यांचे असोत वा जिहाद्यांचे, दोन्हीतील हिंस्रता समान आहे. ज्या प्रमाणात अफाट शस्त्रास्त्रनिर्मिती आणि त्यांची जग भरात सुरू असलेली बेकायदा खरेदी-विक्री पाहता सारे जगच दहशतवादाच्या कचाट्यात सापडलेले आहे एवढे मात्र नक्की. मग त्याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या अतिप्रगत देशांचाही आता अपवाद राहिलेला नाही हे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते. पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे भारतीय उपखंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अनेक जणांनी अधोरेखित केली आहे. भारतात एक मोठा राजकीय विचारप्रवाह असा आहे, की ज्यांच्या मते पाकिस्तान पूर्णत: नेस्तनाबूत करायला हवा. या विचारप्रणालीनुसार बहुसंख्य मुस्लीम हे ‘मनाने’ पाकिस्तानी आहेत. मागील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लीम दंगे उसळले नाहीत हा काही प्रमाणात नशिबाचा आणि काही प्रमाणात त्या त्या समाजातील राजकीय जाणतेपणाचा भाग मानायला हवा; परंतु तो जाणतेपणा आळवावरच्या पाण्यासारखा असतो. समाजात अजूनही तीव्र गैरसमज, विद्वेष आणि विखार आहे. आणि ह्याचाच फायदा अशा दहशतवादी संघटना उचलत असतात. अनेक देशातून आय एस सारख्या कुख्यात संघटनेत सहभागी होण्यासाठी नव युवकांची चाललेली धडपड पाहून हे प्रकर्षाने दिसून येते.

दहशतवाद हा ‘हिरवा’ आहे, की ‘भगवा’, की ‘लाल’ याबाबत बरीच चर्चा चालते. परंतु जेव्हा परदेशात शिया आणि सुन्नी या दोन मुस्लीम पंथातील अतिरेक्यांनी परस्परांच्या मशिदी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या कानावर पडतात तेव्हा एकच निष्कर्ष निघतो कि - दहशतवादाला कुठलीच जात व धर्म नसतो , त्याची ओळख निव्वळ अमानवी क्रूरता एवढीच उरते. म्हणूनच अशी मंडळी नेहमीच निष्पाप निरपराध लोकांना वेठीस धरून व धमकावून आपले कार्य साधून घेतात आणि मागण्या पूर्ण होणार नसतील तर बिनदिक्कतपणे ह्या ओलिसांची हत्या करतात. बहुतांश दहशतवाद हा इस्लाम धर्मीय देशातच फोफावलेला दिसतो व तेथून तो जगभरात पसरतो असे दिसते. आजही अल-अझहर, नगाफ आणि झासटोन या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जिहाद हा गैर मुसलमानांविरूद्धचा कायदेशीर आदेश आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो चालू राहील अशीच शिकवण दिली जाते. सध्या तर सोशल मिडीयाचाही बेमालूम परिणाम कारक वापर अशा दहशतवादी संघटनांकडून केला जातो. दहशतवादी फक्त शहरी भागातच सक्रिय असतात हा समज अलीकडे खोटा ठरू लागला आहे. याचे कारण दहशतवाद्यांचे ग्रामीण भागाशी असणारे कनेक्शन वेळोवेळी उघड होत आहे. ह्या घटना थांबवण्यासाठी कारणाच्या मुळाशी जावून बघता दोन गोष्टी आवश्यक ठरतात - १) मूळ धर्माची योग्य शिकवण व प्रसार त्या त्या धर्माच्या अधिकारी लोकांकडून जन मानसात खोलवर रुजवणे आणि २) दहशतवादात प्रमुख टार्गेट ठरवलल्या गेलेल्या मंडळींच्या सुरक्षेवर अधिक मेहनत करणे. अशी मंडळी म्हणजे लहान मुले (शाळा इत्यादी ठिकाणे), स्त्रिया (सामाजिक परीवाहानातील राखीव डबे वगैरे) आणि हॉस्पिटल सारखी आपद्ग्रस्त व्यवस्थेची ठिकाणे.

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढा देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर ज्या उपाययोजना राबवित आहे त्यांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या लष्कराची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी लष्कर ड्रोन विमाने, फायटर विमाने, प्रचंड हिंसाचार घडवणाऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या शस्त्रास्त्र वापरामुळे आजवर तीन लाख स्थानिकांना आपल्या घरादारावर पाणी सोडायला लागले आहे. जम्मू-काश्मीर मध्ये सुद्धा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर कधीच झालेला नाही. येथे एक फरक आपणास प्रकर्षाने जाणवतो ते म्हणजे देशाच्या सैन्याप्रमाणेच आधुनिक हत्यारांनी सज्ज असलेला दहशतवादी बाह्यगणवेशात एखाद्या सैनिकाप्रमाणे सजला तरी त्याची मानसिकता कधीच सैनिकाची असू शकत नाही. कुठल्याही देशाचा जवान आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची पर्वा न करता लढत असतो व प्रसंगी युद्धात हौतात्म्य स्वीकारत असतो. दहशतवादी मात्र आपल्याच देश बांधवांवर बंदूक चालवतो ते स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात व भीत्र्या मानसिकतेमुळे. ह्यांची हीच कमकुवत मानसिकता समाजातील कमजोर दुव्यांचा शोध घेते आणि छोटी मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक ह्यांचे सहज सोपे टार्गेट ठरवले जाते. म्हणूनच कुठलाही दहशतवादी हल्ला हा "भ्याड हल्ला" म्हणूनच अधोरेखित होतो कारण त्यात कसलेच शौर्य नसते …. असते ती फक्त स्वत:च्या विकृत विचारसरणीच्या अस्ताची भीती.

-अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक देशातून आय एस सारख्या कुख्यात संघटनेत सहभागी होण्यासाठी नव युवकांची चाललेली धडपड पाहून हे प्रकर्षाने दिसून येते.
<<
हाय्ला!

ही आय एस नावाची नवी संघटना कोणती?

आपल्या अभ्यासाला विदा? या संघटनेचे किती सद्स्य आहेत? किती व कोणत्या देशातून आलेले आहेत? प्रत्येक देशाच्या लोकसंख्येपैकी यांची टक्केवारी किती?

असो. अभ्यासपूर्णचे सर्टफुकट मिळालेले आहेच Wink

बाकी नंतर लिहीन.

आरारा
isis लिहीण्याऐवजी type करताना ते is झालेलं लक्षात आलंच असेल.

शुद्धीत असताना त्यांच्या लक्षात अश्या छोट्या गोष्टी येत नाहीत , तिथे संध्याकाळ नंतर अपेक्षा करणच चुकीच आहे !!

चांगलं लिहिलंय. पण दुर्दैवाने होतं काय कि या टेररिस्ट्/जिहादिंचा बंदोबस्त करताना बरेच निरपराधी, ब्रेनवॉश्ड युवक त्या चळवळीत ओढले जातात, हाराकिरीत मारले जातात - मग त्यांचे जवळचे मित्र्/नातेवाईक त्वेषाने त्याच चळवळीत सुडभावनेने उडी टाकतात आणि हे चक्र पुढे चालु रहातं...

नेटफ्लिक्सवर ब्रॅड पिटचा एक सिनेमा आहे - वॉर मशिन म्हणुन. "वॉर अगेंस्ट इन्सर्जंट्स कॅनॉट बी वन" ह्या धाग्यावर आधारीत आहे हा सिनेमा. आवर्जुन बघा...

>>
मुस्लीम पंथातील अतिरेक्यांनी परस्परांच्या मशिदी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या कानावर पडतात तेव्हा एकच निष्कर्ष निघतो कि - दहशतवादाला कुठलीच जात व धर्म नसतो , त्याची ओळख निव्वळ अमानवी क्रूरता एवढीच उरते.
<<
हा अत्यंत घाईघाईने काढलेला निष्कर्ष आहे. शिया सुन्नी ह्या धर्मातील संघर्ष हा शुद्ध धार्मिक आहे. निव्वळ क्रूरता नाही. सुन्नी पंथाने एका विशिष्ट प्रकारचा इस्लाम स्वीकार केलेला आहे. शिया तो मानत नाहीत. सुन्नी विचार असा आहे की केवळ अल्ला सर्वश्रेष्ठ आहे. महंमद हा प्रेषित असला तरी त्याच्या नातेवाईकांना कुठलाही वारसा हक्क नाही. महंमदाच्या वंशजांना आदरणीय मानणे ही एक प्रकारची मूर्तीपूजा आहे. कडवे सुन्नी ज्यांना वहाबी म्हणतात त्यांना महंमदाची कबरही नष्ट करायची आहे. कारण अशा प्रतिकांमुळे मूर्तीपूजा बळावते आणि मुस्लिम लोक खर्‍या इस्लामपासून ढळतात. अशा लोकांच्या मते शिया हे काफिरांपेक्षा नीच आहेत कारण ते धर्महीन नसून धर्मभ्रष्ट आहेत. त्यामुळे अरबी जगात शिया लोकांवर अत्याचार केले जातात. इराण हा देश शक्तीमान असल्यामुळे तिथे ते शिया वरचढ आहेत. उरलेल्या अरब जगात होणार्या गळचेपीमुळे ते ही खवळतात आणि उलटे आक्रमण करतात. पण हा संघर्ष १००% धार्मिक आहे. आमचाच इस्लाम खरा आणि खोटा इस्लाम नष्ट करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे ह्या भावनेतून वहाबी डोकेफिरू अत्याचार, कत्तली, आत्मघातकी हल्ले करतात.

>>
दहशतवादी मात्र आपल्याच देश बांधवांवर बंदूक चालवतो ते स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात व भीत्र्या मानसिकतेमुळे
<<
हाही अत्यंत आततायी निष्कर्ष. जेव्हा ९/११ घडवून आणणारे अतिरेकी मोहिमेवर निघाले तेव्हा आपण जिवंत परत जाणार नाही हे त्यांना माहित होते. ९/११ चा हल्ला अत्यंत निंद्य होता. पण ते घडवून आणणारे अतिरेकी भित्रे नक्कीच नव्हते. २६/११ चा हल्ला करणारे अतिरेकी भित्रे नव्हते. आपण मरायचेच आहे. पण जितके जास्त नुकसान करता येईल ते करुन मग मरायचे ह्या विचाराने ते आले होते.
अशी अनेक अनेक उदाहरणे देता येतील जिथे इस्लामी अतिरेकी जिवावर उदार होऊन , स्वतःची पर्वा न करता दहशतवादी कृत्य करते झाले आहेत. त्यांना भित्रे म्हणणे हे चूक आहे.

<<समाजात अजूनही तीव्र गैरसमज, विद्वेष आणि विखार आहे. आणि ह्याचाच फायदा अशा दहशतवादी संघटना उचलत असतात. >>
------- द्वेष, विखार आहेच... त्याला योजनाबद्ध रितीने खतपाणी घालण्याचे 'पवित्र' कार्य नकळत होते आहे... कार्य (हत्या, खुन) करणारी व्यक्ती अज्ञानी, भोळी, बावळट, दिशा भरकटलेली असेल किव्वा स्वत: च्या (राजकिय, धार्मिक, व्यक्तीगत) स्वार्थासाठी त्यान्ची पुर्णत: दिशाभुल केली गेली असेल.

<<<दहशतवादी मात्र आपल्याच देश बांधवांवर बंदूक चालवतो ते स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात व भीत्र्या मानसिकतेमुळे. >>>
------ दहशतवादी हे भित्रे असतात किव्वा प्राण वाचवाण्याचे प्रयत्न करतात हे मला पटत नाही. २६-११ ला मुबईवर हल्ला करणारर्‍या दहशतवाद्यान्ना त्यान्चा अन्त काय आहे हे माहित होता, प्रत्येक कारवाईत त्यान्ना त्यान्चा शेवट माहित असतो, पण तो होण्यापुर्वी समोरच्या समुहाचे जास्तित जास्त नुकसान करणे हा उद्देश होता.... त्यासाठी ३ दिवस पुरेल असा खाद्य पदार्थान्चा साठा ते सोबत ठेवुन आले होते. काही घटनात, शरिराला बॉम्ब लावुन मरणाला आमन्त्रण देणार्‍यान्ना भित्रे समजायचे कसे? पठाणाकोटात (काश्मिरात अजुन कुठेतरी) लष्करी छावण्यान्ववर सशस्त्र हल्ला करणारे भित्रे कसे? अशा घटना एक नाही अनेक वेळा घडत आहे... Sad आपण शब्दान्ची कसरत करुन त्यान्ना भित्रे, किव्वा भ्याड हल्ला केला असे म्हणायचे... पण त्याने पुढचे हल्ले टळत नाहीत.

डोक्यातला मेन्दू काढुन, त्याला स्वच्छ केले गेल्यावर जगणे आणि मरणे यातला फरकच त्यान्ना समजत नाही. करता- करविता रहातो बाजूला, हजारो कोसे दुर... पण हे कसाब रुपी बावळट हकनाक ३००-४०० निरपराध्यान्ना मारुन जातो. आपण कोट्यावधी लोक कसाबला फासावर चढवले यातच समाधान मानतो... आणि योजनेचा शिल्पकार सुरक्षित रहातो, आणि पुढची योजना बनवण्यात व्यस्त असतो...

याने अमके खाल्ले, त्याने तमके खाल्ले, याने पवित्र प्राण्याचे मान्स बाळगले, त्याने त्या पवित्र जनावराच्या मान्साची वाहतुक केली.... असल्या भम्पक कारणासाठी हल्ले करणारे पण दहशतवादीच आहेत... या घटना तुरळक जरुर वाटतात... पण त्याने सबन्ध शरिरात द्वेषाचे विष पसरण्यात हात-भार लागतो.

देशात कायदा सुव्यावस्था राखण्याचे काम पोलिसान्चे आहे. जनतेने कायदे हातात घेणे, आणि मनाला सुयोग्य अशी 'अपराध्याला' (त्याचा दोष काय आहे हे सिद्ध होण्यापुर्विच) शिक्षा देणे हा पण दहशतवादाचाच प्रकार आहे असे मला वाटते. कुणी काय खावे याचे स्वातत्र्य ज्याला-त्याला असायला हवे....

भारतापुरते बोलायचे झाल्यास जाती ह्या कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत.धर्म हा फक्त घरापुरता मर्यादित केला पाहिजे. धर्म आणि जातींंवर लगाम कसला तरी दहशतवाद बर्यापैकी कमी होईल. बाँम्बब्लास्ट, गोळीबार, हल्ले म्हणजेच दहशतवाद असा एक ढोबळ समज आहे पण दहशतवाद हा सांस्क्रुतिक, सामाजिक, मानसिक व राजकियही असतो.

सचिन पगारे, परफेक्ट बोललात. सध्या दहशतवादाला जगभरात अमेरिकन दृष्टीकोनातून व त्यांनीच घडवलेल्या व्याख्येतून बघितले जात आहे. दहशतवाद ह्या शब्दांची फोड केली तर दहशत हा शब्द व त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. दहशत म्हणजे एखादी गोष्ट घडेल व वाईट होइल याची घडण्यापूर्वीच वाटणारी भीती. अशा भीतीने खुल्या वावराला, मुक्त व्यवहारांना चाप बसतो. सर्व वावरावर, व्यवहारावर, व्यक्त होण्यावर एक भीतीचे सावट असते तो म्हणजे दहशतवाद. समाज एखाद्या अनामिक दबावाखाली, प्रभावाखाली जगत असतो. हा दहशतवाद योग्य ठिकाणी केलेल्या स्ट्रॅटेजिक हल्ल्याने प्रस्थापित होतो. यात इन्वेस्टमेंट कमी पण रिटर्न्स भरपूर असतात. आज देशोदेशात मोठी युद्धे होत नाहीत तर दहशतवाद वापरला जातो. 'मुस्लिम अतिरेक्यांचे', (लक्षात घ्या मी अतिरेकी हा शब्द वापरत आहेत, मुस्लिम दहशतवाद हा शब्द चुकीचा आहे. अतिरेकी हा शब्द योग्य आहे) तर मुस्लिम अतिरेक्यांचे जे काही हत्यासत्र, बॉम्बस्फोट, चालले आहेत त्या अतिरेकी कारवाया आहेत, दहशतवाद नव्हे.

माझ्यामते खरे दहशतवादी हे अमेरिका चीन रशिया यासारखे देश आहेत. जे पैसा, संस्कृती, शस्त्रे, व्यापार यांच्या जोरावर जगावर अघोषित हुकूमत गाजवू इच्छितात, उर्वरित जग आपल्या आज्ञेत राहिले पाहिजे म्हणून ना ना प्रकारच्या भीती, युद्धाची भीती इत्यादींचे रोपण इतर देशांच्या समाजमनात करत राहातात. कोणत्याही प्रकारे आपण ह्या दिग्गज देशांसमोर टिकू शकणार नाही अशी भीती इतर देशांच्या समाजमनात उतरवण्यात हे यशस्वी झाले आहेत. खरा दहशतवाद हा आहे.

मुस्लिम दहशतवाद हा खरेतर अतिरेकीपणा आहे. त्यांच्यातले 'काही' खुळचट व अतिरेकी धार्मिक संकल्पनांना धरुन युटोपियामध्ये जगत अतिरेकीपणा करत राहातात, याचा फायदा घेणारे बरोबर फायदा करुन घेतात. धार्मिक संकल्पनांना धरुन अतिरेकीपणा करण्यात एकटे केवळ मुस्लिम नाहीत, प्रत्येक धर्मात असे फनेटीक्स, माथेफिरु असतातच. केवळ हत्या करतात म्हणून अमूक माथेफिरु चुकीचे आणि जे हत्या करत नाहीत ते माथेफिरु चांगले असे काही नसते.

दहशतवादाच्या चर्चांमध्ये एखाद्याच्या जीव घेणे, बॉम्बस्फोटात माणसे मरणे ह्याला फक्त महत्त्व दिले जात आहे. त्याच्यापेक्षा अजून खूप वेगवेगळ्या पद्धतीने अतिरेक माजवला जातो, तिथे माणसे मरत नाहीत म्हणून त्याला अजिबात महत्त्व दिले जात नाही. पण जगणं मुशकिल करणारे ते सगळे अतिरेकीच. मग कोणत्या का धर्माचे, जातीचे, पंथाचे, देशाचे असेना.

'मुस्लिम अतिरेक्यांचे', (लक्षात घ्या मी अतिरेकी हा शब्द वापरत आहेत, मुस्लिम दहशतवाद हा शब्द चुकीचा आहे. अतिरेकी हा शब्द योग्य आहे) तर मुस्लिम अतिरेक्यांचे जे काही हत्यासत्र, बॉम्बस्फोट, चालले आहेत त्या अतिरेकी कारवाया आहेत, दहशतवाद नव्हे. >>>
नानाकळा, औरंगजेब आणि त्याच्या पुर्वसुरींनी म्हणजे अगदी बाबरापासून इस्लाम चा जो धार्मिक साम्राज्यविस्तार केला तो 'दहशतवाद' होता कि त्याही फक्त 'अतिरेकी' कारवायाच?? आणि दहशतवाद असेल तर मग 'मुस्लिम दहशतवाद' हा शब्दप्रयोग कराल का??

इस्लामच्यि धार्मिक साम्रिज्यविस्तारात एतद्देशीय हिंदूधर्मी राजे, सरदार इ. का बरं सामील झाले? तो धार्मिक साम्राज्यवाद आहे हे त्या बिचाऱ्यांना कळले नव्हते का?

भारतापुरते बोलायचे झाल्यास जाती ह्या कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत.धर्म हा फक्त घरापुरता मर्यादित केला पाहिजे. धर्म आणि जातींंवर लगाम कसला तरी दहशतवाद बर्यापैकी कमी होईल.

--
भारतात जाती व धर्मावर लगाम कसून, जगभरातला "इस्लामी दहशतवाद/आतंकवाद" कसा कमी होणार सचिनजी पगारेजी.

इस्लामच्यि धार्मिक साम्रिज्यविस्तारात एतद्देशीय हिंदूधर्मी राजे, सरदार इ. का बरं सामील झाले? तो धार्मिक साम्राज्यवाद आहे हे त्या बिचाऱ्यांना कळले नव्हते का?>>>

हाच तो दहशतवाद होता; तोंड दाबून बुक्क्यांचा मार! राजकीय,लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर माजवलेला....

भारतापुरते बोलायचे झाल्यास जाती ह्या कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत.धर्म हा फक्त घरापुरता मर्यादित केला पाहिजे. धर्म आणि जातींंवर लगाम कसला तरी दहशतवाद बर्यापैकी कमी होईल. >>>
धर्म घरापुरता मर्यादित

विविधतेत एकता, धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक विविधता या सगळ्यांच काय होईल मग???
आणि समान नागरी कायदा तर नकोच आहे ना! त्याच्या नुसत्या विचारंनही त्रास व्हायला सुरूवात होते.

{हाच तो दहशतवाद होता; तोंड दाबून बुक्क्यांचा मार! राजकीय,लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर माजवलेला....}
मग अशा दहशतवादाची अनेक ठळक उदाहरणं आपल्या इतिहासात आणि वर्तमानातही आहेत.
जातींची उतरंड हाही दहशतवाद. त्याला तर धार्मिक आधार आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार हेही लागू आहे.

हाच तो दहशतवाद होता; तोंड दाबून बुक्क्यांचा मार! << आर्थिक ताकद?? सोन्याचा धूर निघत होता आपल्याकडे मग मुस्लिम आक्रमकांकडे कशी काय आर्थिक ताकद?? राजकीय आणि लष्करी ताकद म्हणावी तर ते काही लाखोंच्या संख्येने आले नव्हते. तत्कालीन राज्यकर्ते (काहीसन्माननीय अपवाद वगळता) हे नेभळट होते हे मान्य करावे.

धार्मिक वगैरे गुरूंची संस्थाने निर्माण करून 'आमच्या गुरूंना काही बोलाल, तर खबरदार!' अशी दहशत निर्माण करणे, हेही दहशतवाद आणि त्याच्या मानसिकतेत बसते का?

>>> स्पष्ट कराल?>>>

तसं असतं तर आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत गेलो नसतो. आलेल्या मुठभर वसाहतवाद्यांनी 'बुद्धीभेदा'चं राजकारण करून आपल्याला गुलाम बनवलं.
दुसर्या महायुद्धात जपानची लष्करी ताकद लोकसंख्येच्या तुलनेत अफाट होती.
इस्त्राइल चं उदाहरण डोळ्यांसमोर आहेच..

धार्मिक वगैरे गुरूंची संस्थाने निर्माण करून 'आमच्या गुरूंना काही बोलाल, तर खबरदार!' अशी दहशत निर्माण करणे, हेही दहशतवाद आणि त्याच्या मानसिकतेत बसते का? >>>
हो ही सुद्धा नक्कीच दहशतच आहे..नाकारत नाही.

राहूल, तुम्ही विठ्ठल यांच्याच मुद्द्याला सहमती देत आहात का? इंग्रजांच्या गुलामगिरीत जायचे कारण काय?

आसेतुहिमाचल मराठ्यांचे राज्य पेशवाईच्या नेतृत्वात झळकत होते. मग इंग्रजांनी काय केलं असं की हे राज्य कोसळले?

---- खरेतर मला इतिहासावर आता चर्चा करायची नाहीच. ते म्हणजे सगळे धागे उसवत बसावे लागते आणि धाग्याचा विषय तो नाहीच, तेव्हा इत्यलम् ----------

दहशतवाद आणि साम्राज्याकांक्षा यात गल्लत होऊ नये. जग पहिल्या महायुद्धानंतर भयंकर बदलेलं आहे. माणसाच्या इतिहासाचे सरळ सरळ दोन भाग पडतात, आणि आता जगात जे काही प्रॉब्लेम सुरु आहेत त्यांची पाळेमुळे पहिल्या महायुद्धापासून आहेत. त्या आधीच्या इतिहासाबद्दल आज बोलण्यात काहीच पॉइन्ट नाही. आजचे प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर आजच्या स्थितीबद्दल चर्चा झाली पाहिजे.

निव्वळ कॉफीटेबल चर्चांमध्ये असते तसे 'हे मुस्लिम असलेच, यांचा धर्मच असा' वगैरे निरुद्देश चघळणे यात वेळ घालवणे पटत नाही.

१. >>माझ्यामते खरे दहशतवादी हे अमेरिका चीन रशिया यासारखे देश आहेत. <<
२. >>दहशतवाद आणि साम्राज्याकांक्षा यात गल्लत होऊ नये.<<

नानाकळा, नक्कि काय ते ठरवा...

अपेक्षित होताच हा प्रश्न.

एखाद्याचे राज्य रितसर जिंकून स्वत:चे राज्य प्रस्थापित करणे आणि आपल्या बेटकुळ्या दाखवत इतरांना दहशतीत ठेवणे यात फरक असतो.

Pages