दहशतवाद आणि त्याची मानसिकता

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 22:24

मानवाने आपल्यातील विचार करण्याच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून स्वतःची सुरक्षितता सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असूनही आजचा आधुनिक मानव पूर्णपणे सुरक्षित आहे का, की तो अधिकच असुरक्षित झालेला आहे? अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव अधिक सुरक्षित वाटत असला तरी आज माणसाच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका हा माणसापासूनच आहे.

आजमितीला आपल्या देशातल्या ६०८ जिल्ह्यांपैकी २३१ जिल्ह्यांना आज घुसखोर, दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हल्ले माओवाद्यांचे असोत वा जिहाद्यांचे, दोन्हीतील हिंस्रता समान आहे. ज्या प्रमाणात अफाट शस्त्रास्त्रनिर्मिती आणि त्यांची जग भरात सुरू असलेली बेकायदा खरेदी-विक्री पाहता सारे जगच दहशतवादाच्या कचाट्यात सापडलेले आहे एवढे मात्र नक्की. मग त्याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या अतिप्रगत देशांचाही आता अपवाद राहिलेला नाही हे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते. पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे भारतीय उपखंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अनेक जणांनी अधोरेखित केली आहे. भारतात एक मोठा राजकीय विचारप्रवाह असा आहे, की ज्यांच्या मते पाकिस्तान पूर्णत: नेस्तनाबूत करायला हवा. या विचारप्रणालीनुसार बहुसंख्य मुस्लीम हे ‘मनाने’ पाकिस्तानी आहेत. मागील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लीम दंगे उसळले नाहीत हा काही प्रमाणात नशिबाचा आणि काही प्रमाणात त्या त्या समाजातील राजकीय जाणतेपणाचा भाग मानायला हवा; परंतु तो जाणतेपणा आळवावरच्या पाण्यासारखा असतो. समाजात अजूनही तीव्र गैरसमज, विद्वेष आणि विखार आहे. आणि ह्याचाच फायदा अशा दहशतवादी संघटना उचलत असतात. अनेक देशातून आय एस सारख्या कुख्यात संघटनेत सहभागी होण्यासाठी नव युवकांची चाललेली धडपड पाहून हे प्रकर्षाने दिसून येते.

दहशतवाद हा ‘हिरवा’ आहे, की ‘भगवा’, की ‘लाल’ याबाबत बरीच चर्चा चालते. परंतु जेव्हा परदेशात शिया आणि सुन्नी या दोन मुस्लीम पंथातील अतिरेक्यांनी परस्परांच्या मशिदी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या कानावर पडतात तेव्हा एकच निष्कर्ष निघतो कि - दहशतवादाला कुठलीच जात व धर्म नसतो , त्याची ओळख निव्वळ अमानवी क्रूरता एवढीच उरते. म्हणूनच अशी मंडळी नेहमीच निष्पाप निरपराध लोकांना वेठीस धरून व धमकावून आपले कार्य साधून घेतात आणि मागण्या पूर्ण होणार नसतील तर बिनदिक्कतपणे ह्या ओलिसांची हत्या करतात. बहुतांश दहशतवाद हा इस्लाम धर्मीय देशातच फोफावलेला दिसतो व तेथून तो जगभरात पसरतो असे दिसते. आजही अल-अझहर, नगाफ आणि झासटोन या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जिहाद हा गैर मुसलमानांविरूद्धचा कायदेशीर आदेश आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो चालू राहील अशीच शिकवण दिली जाते. सध्या तर सोशल मिडीयाचाही बेमालूम परिणाम कारक वापर अशा दहशतवादी संघटनांकडून केला जातो. दहशतवादी फक्त शहरी भागातच सक्रिय असतात हा समज अलीकडे खोटा ठरू लागला आहे. याचे कारण दहशतवाद्यांचे ग्रामीण भागाशी असणारे कनेक्शन वेळोवेळी उघड होत आहे. ह्या घटना थांबवण्यासाठी कारणाच्या मुळाशी जावून बघता दोन गोष्टी आवश्यक ठरतात - १) मूळ धर्माची योग्य शिकवण व प्रसार त्या त्या धर्माच्या अधिकारी लोकांकडून जन मानसात खोलवर रुजवणे आणि २) दहशतवादात प्रमुख टार्गेट ठरवलल्या गेलेल्या मंडळींच्या सुरक्षेवर अधिक मेहनत करणे. अशी मंडळी म्हणजे लहान मुले (शाळा इत्यादी ठिकाणे), स्त्रिया (सामाजिक परीवाहानातील राखीव डबे वगैरे) आणि हॉस्पिटल सारखी आपद्ग्रस्त व्यवस्थेची ठिकाणे.

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढा देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर ज्या उपाययोजना राबवित आहे त्यांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या लष्कराची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी लष्कर ड्रोन विमाने, फायटर विमाने, प्रचंड हिंसाचार घडवणाऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या शस्त्रास्त्र वापरामुळे आजवर तीन लाख स्थानिकांना आपल्या घरादारावर पाणी सोडायला लागले आहे. जम्मू-काश्मीर मध्ये सुद्धा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर कधीच झालेला नाही. येथे एक फरक आपणास प्रकर्षाने जाणवतो ते म्हणजे देशाच्या सैन्याप्रमाणेच आधुनिक हत्यारांनी सज्ज असलेला दहशतवादी बाह्यगणवेशात एखाद्या सैनिकाप्रमाणे सजला तरी त्याची मानसिकता कधीच सैनिकाची असू शकत नाही. कुठल्याही देशाचा जवान आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची पर्वा न करता लढत असतो व प्रसंगी युद्धात हौतात्म्य स्वीकारत असतो. दहशतवादी मात्र आपल्याच देश बांधवांवर बंदूक चालवतो ते स्वत:चे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात व भीत्र्या मानसिकतेमुळे. ह्यांची हीच कमकुवत मानसिकता समाजातील कमजोर दुव्यांचा शोध घेते आणि छोटी मुले, स्त्रिया व वृद्ध नागरिक ह्यांचे सहज सोपे टार्गेट ठरवले जाते. म्हणूनच कुठलाही दहशतवादी हल्ला हा "भ्याड हल्ला" म्हणूनच अधोरेखित होतो कारण त्यात कसलेच शौर्य नसते …. असते ती फक्त स्वत:च्या विकृत विचारसरणीच्या अस्ताची भीती.

-अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अपेक्षित होताच हा प्रश्न. एखाद्याचे राज्य रितसर जिंकून स्वत:चे राज्य प्रस्थापित करणे आणि आपल्या बेटकुळ्या दाखवत इतरांना दहशतीत ठेवणे यात फरक असतो.<<

पण तुम्हि दिलेलं उत्तर, (प्रश्न अपेक्षित असुनहि) परत एकदा विसंगत आहे. इतिहासात बड्या देशांनी/राज्यकर्त्यांनी दहशती शिवाय इतर देश्/राज्ये "रितसर" कशी जिंकली ते जरा समजवा...

माझ्यामते खरे दहशतवादी हे अमेरिका चीन रशिया यासारखे देश आहेत >> काही अंशी सहमत. अमेरिकेने जगातील इतर राष्ट्रांच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करणे वेळीच थांबवले असते तर दहशतवाद (अतिरेकी कारवाया) कमी फोफावल्या असत्या. स्वतःच्या भुमीवर/ नागरिकांवर हल्ला झाला तर प्रतिकार करणे योग्य आहे. पण दुसर्‍या देशात दोन गटात मतभेद/ तणाव असताना, आणि त्याचा कोणताही direct impact स्वतःच्या देशावर/ नागरिकांवर होत नसताना, एका गटाची बाजू घेणे आणि त्यांना शस्त्रास्त्रे पुरवणे हे दहशतवादापेक्षा पण भयानक आहे.

एखाद्या भागाच्या सत्ताधार्‍याशी 'रितसर' लढाई करुन, जिंकून 'रितसर' राजे, सम्राट, शहंशाह वगैरे झालेले मुस्लिम 'राज्यकर्ते' म्हणजे दहशतवादीच असा समज ज्यांचा घट्ट आहे त्यांना समजवण्यात अर्थ नाही. मध्ययुगीन इतिहास बराच फ्रॅक्चर करण्यात आला आहे, मध्ययुगीन इतिहासाचा स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावण्याची प्रत्येकाला सूट आहे. म्हणूनच मी म्हटले की अशा चर्चेत रस नाही मला.

सोहा, चांगला प्रतिसाद.

दहशत आणि साम्राज्यकांक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत किंवा ते एक्मेकांना काँप्लिमेंट करतात असं म्हणा हवं तर. दहशत मग ती पॉझिटिव (आदर्युक्त भिती) असो वा निगेटिव (तिरस्कार मिश्रित भिती), ती प्रस्थापित केल्याशिवाय कोणावरहि वर्चस्व (साम्राज्यकांक्षा) गाजवता येत नाहि. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. यावर कोणाचंहि दुमत नसावं अशी आशा करतो.

राजे, सम्राट, शहेंशाह इत्यादिंनी लढाया शत्रुला मिठ्या मारुन, गुदगुल्या करुन जिंकल्या नाहित तर रितसर त्यांच्या सामर्थ्याची दहशत बसवुन, युद्धात रक्तपात घडवुन जिंकल्या. आता तुम्हाला हे मान्य नसेल तर ह्या मुद्द्यावरची चर्चा थांबलेलीच बरी... Happy

<<<<एखाद्याचे राज्य रितसर जिंकून स्वत:चे राज्य प्रस्थापित करणे आणि आपल्या बेटकुळ्या दाखवत इतरांना दहशतीत ठेवणे यात फरक असतो >>>>>
फरक दाखवा आणि १०० रु मिळवा !!

milind.jpg

हे वैयक्तिक उचकवणारे मिलिंद जाधव यांचे बोलण्याकडे "अ‍ॅडमिन" जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत असा अर्थ इतर मायबोलीकरांनी घ्यावा का?
तसे स्पष्ट करावे. या आधीही इतर आयडींनी तक्रार केली आहे परंतू ज्या गोष्टींवरुन इतरांना वॉर्निंग आयडीरद्द करने इत्य्यादी अ‍ॅक्शन घेतली जाते ते मात्र या विशिष्ट आयडींनीबद्दल केले जात नाही.

बिन लादेन आणि त्याच्या अल कायदा संस्थेच्या दहशतवादी कारवायांकडे बघू या. त्यांनी अफ्रिकेतील अमेरिकन वकिलात, येमेन येथील अमेरिकन युद्धनौका, ९/११ चा हल्ला हे सगळे का केले? तर अमेरिकन काफिर सैनिक अरबी भूभागात तैनात केले म्हणून. पवित्र अरब जमिनीवर अपवित्र अमेरिकन लोक उतरवले म्हणून. हे कुणी केले बरे? सद्दाम हुसेनने १९८९ साली कुवेतवर हल्ला केला आणि तो देश बळकावला तेव्हा सौदी राजाने अमेरिकन मदत मागवली. त्यानंतर अमेरिकन सैनिकी तळ हा कायमचाच सौदी अरेबियात मुक्काम ठोकून आहे.

आता ही पवित्र अरब भूमी, त्यावरील अपवित्र अमेरिकन सैनिक (ज्यात महिलाही असतात) इत्यादी सगळे जुनाट, कालबाह्य इस्लामी तत्त्वज्ञानातून निघालेले विषारी विचार आहेत. त्याला काहीही भौतिक पुरावा नाही. अरबांपेक्षा अमेरिकन हे अपवित्र हे सिद्ध कसे करणे शक्य तरी आहे का? केवळ धार्मिक भावना. अशा भावनिक मुद्द्यावर दहशतवाद करणे कितपत योग्य आहे?
इथे अमेरिकेने सौदी सरकारच्या विनंतीनुसार केलेली ढवळाढवळ खरे कारण आहे का कट्टर वहाबी, सलाफी इस्लामचे भूत डोक्यावर बसलेल्या बिन लादेन सारख्या डोकेफिरू लोकांचे माथेफिरू तत्त्वज्ञान हे खरे कारण आहे?

गेल्या वर्षी आतंकवाद्याना मदतगार अशा ध्रुव नावाच्या स्ंघाच्या कस्र्यकर्ताला पकडले होते ना ?

काल कुणीतरी शर्मा सापडलाय.

NCSTRT संस्थेच्या माहितीनुसार, 2016 मध्ये जगभरात जवळपास 11 हजार 72 दहशतवादी हल्ले घडविण्यात आले. यामध्ये भारतात 927 (16 टक्के) दहशतवादी हल्ले झाले. तर, 2015 मध्ये भारतात हीच संख्या 798 होती. त्यावेळी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 500 च्या आसपास होती. तर 2016 मध्ये वाढ होऊन जखमींची संख्या 636 इतकी झाली. दुसरीकडे, या सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. पाकिस्तानमध्ये 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये दहशतवादी हल्ले 27 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 2015 मध्ये पाकिस्तानमध्ये 1010 दहशतवादी हल्ले झाले होते, तर 2016 मध्ये 734 हल्ले झाल्याची नोंद आहे.
विशेष म्हणजे, या सर्वेक्षणामध्ये जगभरातील सर्वाधिक घातक तिस-या क्रमांकाची संघटना म्हणून नक्षलवाद्यांना घोषित करण्यात आले आहे. तर, पहिल्या नंबरवर इसिस ही दहशतवादी संघटना असून दुस-या स्थानावर तालिबान संघटना आहे. नक्षलवाद्यांना बोको हराम या दहशतवादी संघटनेपेक्षा जास्त उपसंहारक असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या 334 दहशतवादी हल्ल्यांमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात होते.
2016 मध्ये भारतात जास्तीत जास्त दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणीपूर आणि झारखंडमध्ये झाले आहेत.
गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 93 टक्कांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 54.81 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Pages