हजारो रुपयाच्या नुकसानीचे काही वाटत नाही पण सातशे रुपये हातून गेल्याची रुखरुख आहे

Submitted by एक मित्र on 6 July, 2017 - 02:52

हि माझ्या बाबतीत जरा विचित्रच अशी मानसिक समस्या उद्भवली आहे. तुमच्यापैकी कुणाला असे काही अनुभवला आले असल्यास कृपया सल्ला द्यावा हि विनंती. मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

माझी एक सदनिका आहे जी मी भाडेतत्वावर वापरायला देतो. मागच्या महिन्यात एक भाडेकरू सोडून गेला. त्याची फायनल सेटलमेंट करून अनामत रक्कम (deposit) परत देताना सदनिकेतील किरकोळ नुकसानी, मागच्या महिन्यात आलेले वीज बिल (जे त्याने भरले नव्हते), बिल आल्यानंतरच्या काळात त्याने वापरलेल्या विजेचे अंदाजे बिल इत्यादी सगळ्या गोष्टी वजा करून deposit परत द्यायचे ठरले होते. पण तो पैसे घ्यायला दरवाजात आला तेंव्हा ऐनवेळी आकडेमोड करताना बाकीच्या सर्व गोष्टीचे पैसे वजा केले. पण मागच्या महिन्यातील वीज बिल त्यात मी चुकून पकडायचेच विसरलो व अनामत रक्कम त्यास परत देऊन टाकली. माझ्याकडून हे गडबडीत व चुकून झाले. ती वीजबिलाची रक्कम काहीतरी सातशे रुपयेच्या आसपास असेल.

त्यानंतर त्याच दिवशी माझ्या ते लक्षात आल्यावर लगेचच त्याला फोन करून मी हि गोष्ट त्याच्या निदर्शनास आणून दिली. पण त्याने आपण ड्रायविंग करत असल्याची सबब सांगून नंतर फोन करतो म्हणाला. पण नंतर त्याने फोन करायचे दूरच, मी केलेल्या फोनला सुद्धा तो टाळाटाळ करू लागला. उडवाउडवीची उत्तरे देणे किंवा फोन न घेणे असे प्रकार. माझ्या एस एम एस ला सुद्धा नीट उत्तरे देत नव्हता. मला कळून चुकले हि रक्कम केवळ माझ्या चुकीमुळे मी गमावली आहे आणि ती आता काही केल्या मला परत मिळणार नाही. पण हि रुखरुख मला मनाला खूप लागून राहिली आहे. माझ्या हातून असे झालेच कसे असे वाटणे इत्यादी.

दुसरीकडे, तो माझी सदनिका सोडून जाऊन आज आठ दिवसाहून अधिक काळ झाला. सदनिकेत अजून कोणीही राहायला आलेले नाही. सदनिकेचे महिन्याचे एकूण भाडे विचारात घेता तसे मला हे दिवसाकाठी शेकडो रुपयांचे नुकसानच आहे. म्हणजे आजवर मला काही हजार रुपयांचे तसे नुकसानच झाले आहे. पण गमतीचा भाग असा कि मला त्याची फारशी चिंता वाटत नाही. आज ना उद्या नवीन भाडेकरू येईल त्यात काय एवढे असा विचार मी करतो. पण चुकून हातचे गेलेले सातशे रुपये मात्र खूप बोचत आहेत. मी अजूनही तिरमिरीत त्याला फोन करतो. देत कसा नाही बघू असे विचार माझ्या मनात येतात. पण तो आता माझे फोन घेत नाही. आणि मग फक्त मनाची चरफड होऊन मी पुन्हा काही काळापुरता शांत बसतो.

हजारो रुपयाच्या नुकसानीचे काही वाटत नाही पण सातशे रुपये हातून गेल्याची रुखरुख असे तुमच्यापैकी कुणाला अनुभवास आलेय का? काय करावे यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय एक मित्र तुम्हाला सगळे निगेटीव अनुभवच येतात का हो नेहमी???
होत असं बर्याचदा,पैशाच्या बाबतीच होईल अस काही नाही...आपण एरवी पैसे खर्च करतो...गरजेपक्षा जास्त्,पण कोणाकडे असे १० रुपये जरी कारण नसताना जास्ती गेले तरी मनाला लागतं.. Sad

या केस मधे विसरुन जाणे हा पर्याय बेस्ट आहे,पण तरईही विसरता येत नसेल..हुरहुर लागून राहिली असेल...तर तुमच्याकडे त्या भाडेकरूचा अ‍ॅड्रेस असेल ना..मग जावा त्याच्या घरी आणी घ्या तुमचे पैसे...

दुसरे आहे ते अप्रत्यक्ष नुकसान आहे ते अस्तित्वात न आलेल्या तुमच्या पैश्यांचे कारण रिकामे घर अजून महिनाभर पडले तरी नुकसानीची जाणीव होणार नाही. परंतु हे गेलेले सातशे साडेसातशे रुपये मुर्तस्वरुपात होते जे त्याने तुमचे देणे लागते आणि ते तुम्हा ज्ञात आहे कुणाकडून येणे त्यामुळे जास्त जाणवत राहते!

त्याला निरोपसमारंभाची भेट दिली असे समजा! किंवा खिश्यातून पडले ते असे समजा! म्हणजे वेदना होणार नाही!

नाहीतर इथे त्याचं नाव आणि पत्ता टाका. उद्याच देईल......
बाकी ज्याला तुम्ही हजारो रुपयाचं नुकसान म्हणताय, मुळात त्याला थांबलेली आवक म्हणता येईल, नुकसान नाही.....

त्रास सातशे रुपयाच्या नुकसानीचा कमी आणि तो तुम्हाला योग्य प्रतिसात देत नाही / इग्नोर करतोय, याचा जास्त आहे.
तुम्ही ही गोष्ट इथेच सोडून द्या.

ते सहज जमत नसेल तर असा विचार करा की पृथ्वी गोल आहे आणि आज ना उद्या तो तुमच्या समोर येईलच. Happy

अवांतर: काही भाडेकरू असे मनस्ताप देणारे नमुने असतात की गेल्या जन्माचे शत्रूच आहेत, असे वाटावे. आमच्या शेजांर्‍यांचा एक भाडेकरू जाताना चक्क दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या कड्या उखडून घरात टाकून गेला होता. एसी, शॉवर वगैरे साठी भिंतींचे वाईट नुकसान करून गेला. या सगळ्याचा शेजार्‍यांना भयंकर त्रास झाला होता, ते आठवले.

याला म्हणतात अक्कलखाती.
म्हणजे त्या गेलेल्या ७०० रुपयांमुळे तुम्हाला अक्कल आली ना? आता पुनः चूक होणे नाही हे ठरवा, की झाले तुमचे ७०० रुपये वसूल. Happy

त्रास सातशे रुपयाच्या नुकसानीचा कमी आणि तो तुम्हाला योग्य प्रतिसात देत नाही / इग्नोर करतोय, याचा जास्त आहे. >>> +१
तो जर तुमच्याशी व्यवस्थीत बोलला असता, आणि विनंती केली असती की ठीक आहे, मी इतके दिवस राहिलो तुमचा भाडेकरु म्हणुन, आता ती सातशे रुपयांची मला सूट देउन टाका ना! तर तुम्ही कदाचीत ठीक आके म्हणुन विसरुनही गेला असता. इथे त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास वाटतोय, भेटतात असे लोक म्हणा आणि विसरुन जा.

काहि शेअर्स विकत घ्या अन त्यात ७०० रुपये वर मिळाले कि विकुन टाका तुमचे पैसे तुंम्हाला परत मिळाले असे वाटेल Happy

असं करता येऊ शकेल का?
त्या भाडेकरूला सांगायचं तुमचं काहीतरी महत्वाचं डॉक्युमेंट्स वैगरे कुरीअर ने आमच्या कडे आलं आहे..म्हणजे त्याच्या जुन्या पत्त्यावर (तो कुठल्या क्षेत्राशी संबंधित काम वैगरे करतोय ते माहीत असेलच की).. येऊन घेऊन जा सांगायचं...तो आलाच पाहिजे असं वाटतं..

प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचे मनापासून धन्यवाद.

@अग्निपंख: हो सध्या तोच एक उपाय

@मेघा.: हो काही अंशी खरे आहे तुमचे. खूप आनंद होऊन इथे शेअर करावे असे अनुभव फार येत नाहीत मला. तो भाडेकरू खूप लांबच्या गावचा आहे. आता त्याने नवीन कुठे भाड्याने घेतलेय माहिती नाही.

@कृष्णा: हो पैसे हरवले असेच समजून विसरायचा प्रयत्न करतोय. पण पैसे हा मुख्य मुद्दा नाही. गजानन यांनी लिहिल्याप्रमाणे सल वेगळीच आहे.

@पद्म: त्याचा नाव पत्ता इथे देणे योग्य वाटत नाही. आणि तसेही तो मायबोलीवर असेल असे वाटत नाही. पण "थांबलेली आवक" मुद्दा पटला.

@गजानन: तो इग्नोर करतोय याचा त्रास जास्त होतोय. अगदी परफेक्ट बोललात. यू हिट द नेल.

@अंबज्ञ: Lol

@मानव पृथ्वीकर: मला स्वत:चा पण राग आलाय कि इतका भोंगळपणा माझ्याकडून झालाच कसा

@भावना गोवेकर: ज्यादाचे पैसे शेअर वगैरेतून मिळतीलही पण त्यामुळे हातून चुक झाल्याची बोच मनातून जाईल असे वाटत नाही

@र।हुल: आता तो माझे फोन घेत नाही. पण जरी दुसऱ्या नंबर वरून फोन करून असे काही सांगितले तर त्याला त्यामागचा हेतू लगेच लक्षात येईल. तितका हुशार तो आहे.

आणि मेसेज करायच्या आधी चाराठ दिवस त्याला फोन लावायचा नाही म्हणजे त्याला संशय वा शंका येणार नाही..अचानक मेसेज करा आणि काहीतरी कुरीअर सारखं पाकिटात pack करून त्यावर नावगाव पत्ता टाकून त्याचा फोटो पाठवू शकता. मग खात्री पटेल.काहीतरी खूप महत्वाचं (बैंक, इंश्योरेंस किंवा तत्सम) असेल असं वाटलं पाहीजे.

@सचिनजी Happy

मला स्वत:चा पण राग आलाय कि इतका भोंगळपणा माझ्याकडून झालाच कसा >>>>>> नोबडी ईज पर्फेक्ट लक्षात ठेवा.नुकसानीपेक्षाही आपला मामा झाला की वाईट वाटते.
१).७००/-चा धडा शिकलात.
२) तुमचा लाखांचा फ्लॅट चांगला वापरला असावा,तेव्हा जाऊ दे म्हणून सोडून द्या.
३)आयुष्य खूप मोठे आहे.त्या ७००/- साठी स्वःतला किंवा त्यालाही दोष देत बसू नका.

वरची महत्वाचे डॉक्युमेंट आलेय सांगायची आयड्या मस्त आहे.

शांतपणे समस्या सोडवायचे दोन सुप्रसिद्ध मार्ग आहेत. एक गांधीगिरी आणि एक ऋन्मेष स्ट्रॅटेजी .. (नवीनच शब्द आलाय बाई हा मार्केटमध्ये)

तर समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. त्यात तुम्हाला ओपोर्च्युनिटी दिसेल. सातशे रुपयात कोणालातरी पिडायची संधी मिळाली आहे ती सोडू नका. एकवेळ जरा स्वत:ला त्याच्या जागी ठेवून विचार करा. तुमचा फोन आलेला बघून त्याला काय वाटत असेल. कधीतरीच चार दिवसाने करता ते रोज दिवसातून चार आठ वेळा करा. आठवले की लावायचा फोन.. मूड झाला की लावायचा फोन.. मेसेज फ्री असतील तर ते ही टाकत राहा. व्हॉटसप करा. फेसबूकवर उगाच हाय करा. तुमच्याकडे त्याचा लॅन्डलाईन नंबर असेल त्याचा तर मज्जाच. एकूणच छळा त्याला.. आणि ते एंजॉय करा. कधी उचललाच फोन तर छान मित्राशी गप्पा मारता त्या टोनमध्ये बोलत पैसे मागा. किंवा मागू नका तर सावकाश दिलेत तरी चालेन असे बोला. तुमचे त्याच्या आयुष्यातील अस्तित्व त्याला आपण एखाद्याचे पैसे हडपलेत याची जाणीव करून देत राहील. अगदी निर्लज्ज असला तरी कुठे ही ब्याद मागे लागली म्हणून तो ईरीटेट होऊ शकतो. सातशे रुपये खर्च होत असे गिर्हाईक मिळालेय तर मज्जा घ्या. फक्त एक लक्षात ठेवा, त्याला असे फोन करून पिडल्यावर तुम्हाला खरेच मजा आली पाहिजे. आणि विचारांचा कोन बदलला की हे जमते. प्रॉब्लेम तर तेव्हा होतो जेव्हा ओळखीचा वा मित्रपरीवारातला पैसे दडवून बसतो आणि आपल्याला विचारायलाही संकोच वाटतो..

हे पिडायचं तत्वज्ञान आजिबात पटलं नाही..
त्यानं आपल्याला त्रास दिला तर आपण त्याला द्यायचा येथवर ठिकेय पण त्याला त्रास देताना तुम्हाला 'मजा' आली पाहीजे हा विकृत विचार वाटतो.

त्यानं आपल्याला त्रास दिला तर आपण त्याला द्यायचा येथवर ठिकेय पण त्याला त्रास देताना तुम्हाला 'मजा' आली पाहीजे हा विकृत विचार वाटतो.
>>>>>>

येथवर ठिकाय बोलता, मग एखाद्याला त्रास देताना तुम्हालाही मनस्ताप झाला पाहिजे का?

मनस्ताप ही नको अन् मजाही नको शांत डोकं ठेऊन समोरच्याला सरळ करता येऊ शकतं.. नाहीतर मग एक घाव दोन तुकडे..विषय संपला.

मनस्ताप ही नको अन् मजाही नको
>>>>
जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रत्युत्तर देतात, धडा शिकवतात, तेव्हा हे प्रॅक्टीकली अशक्य आहे.
मजा किंवा मनस्ताप यापैकी एकाला स्विकारावेच लागते.

७०० चा एक पेग पाजला समजा
>>>>
त्यापेक्षा स्वत:चे एखादे व्यसन (असल्यास) त्यावर 700 रुपये खर्च होतात ईतक्या काळापर्यंत सोडा.

LIFE IS 20% WHAT HAPPENS TO US AND 80% HOW WE REACT TO IT

डोक्यात येणारे विचार हे एकेरी मार्गाप्रमाणे असतात. एकदा एक मार्ग घेतला कि परत फिरणे मुश्कील असते. तो जिकडे नेईल तिकडे जाणे क्रमप्राप्त. नुकसान अपमान फसवणूक इत्यादी गोष्टी आयुष्यात घडतच असतात. पण त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपण कोणता मार्ग (विचार) निवडतो हे महत्वाचे आहे. चुकीचा मार्ग निवडला तर मानसिक फरफट होते.

पाच सातशे रुपयाचा प्रश्न होता. तो लक्षात आल्यांनतर "दुर्लक्ष करून सोडून देणे" आणि "पाठलाग करून इरेला पडून ते मिळवणे" असे दोन मार्ग होते. त्यातला तुम्ही दुसरा निवडलात. आणि आता तुमची फरफट सुरु झाली आहे. लाख किंवा कोटीभर रुपये असते तर पोलीस वगैरे कायद्याचे मार्ग होते. फरफट झाली असतीच. पण तशी फरफट होणे कोटीभर रुपयांसाठी परवडले असते. पण इथे काय? परवडणार आहे का तुम्हाला हा मार्ग? मग कशाला पुढे जात आहात? एके ठिकाणी बसा. ध्यान करा. एखाद्या थोर व्यक्तीचे चरित्र वाचा. मन शांत करा. आणि मार्गावरून परत फिरा. अत्यंत किरकोळ बाबीसाठी अमूल्य असे मन:स्वस्थ्य घालवू नका.

LIFE IS 20% WHAT HAPPENS TO US AND 80% HOW WE REACT TO IT >>>> अगदी बरोबर

माझेही बरेच वाईट अनुभव आहेत, पण मी नको असणार्या ( मनाला दु:खी करणार्या ) गोष्टींकडे दुर्लक्ष करयला शिकलेय.

अहो माझे तर टायटन चे नविन घड्याळ जे मी एकदाच वापरले होते ते अन २५०० रुपये एका पुजार्याने चोरले पण शेवटी चुकी माझीच होती कारण मीच त्याच्या घरी माझी पर्स ठेवुन देवदर्शनाला गेली होते. बस्स तेव्हापासुन ठरविले कोणावरही विश्वास ठेवायचा नाही.

Pages