झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती !!

Submitted by मिलिंद जाधव on 1 July, 2017 - 04:30

शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!

अक्षरशः झीरो बजेट मध्ये किफायतदार शेती करता येते हे श्री सुभाष पा़ळेकर यांनी दाखवुन दिले ,
एका देशी गाई च्या सहाय्याने ३० एकर शेती करता येते, ह्या शेतीला कोणत्याही रासायनीक खताची गरज पडत नाही, ना कोणत्याही किटक नाशकाची !!

शेतकर्यांना कर्जमाफी करुन पुर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने चुक केलेली आहे अस परखड मत सुभाष पाळेकरांनी माडलेले आहे.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती बद्दल अधिक माहीती असलेल्यांनी ती ईथे द्यावी म्हणजे ईच्छुक लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
त्या शिवाय झीरो बजेट नॅचरल शेती पद्दतीने निर्माण झालेल्या शेत मालाचा चांगल मार्केटींग करण्यासाठी सुद्धा उपाय सुचवावेत. काही शेतकर्यांनी आपापले व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवुन आपल्या शेत मालाच मार्केटींग सुरु केलेल आहे. झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती चे फेस बुक पेजेस सुद्धा आहेत.

त्यांनी केलेल्या कामाचा आढावा येथे बघायला मिळेल ,

https://youtu.be/cBLWpSEJW9g
शेतीवर कीटक रोग का येतो त्याच वैज्ञानीक विश्लेषण. पाळेकर गुरुनीं किती खोलवर विचार संशोधन केलेल आहे त्याच ऊदाहरण आहे हे !!

GreatBhet Subhash Palekar (Part 1)
https://www.youtube.com/watch?v=68CkDaJjtYE

GreatBhet Subhash Palekar (Part २)
https://www.youtube.com/watch?v=dt2h7a7s9CQ

मधुकर पिसाळ, उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=GokLCkZYISQ&t=368s

एम आर चौगुले , उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=1KzyTmINriQ

डाळींब शेती
https://www.youtube.com/watch?v=a03P-8qOuSo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच्या शेतकर्या समोर दोन आव्हाने आहेत.

एक : स्वतःला बदलणे , रासायनीक खते बंद करुन ZBNF पद्धतीने शेती करणे.

दुसरे:ZBNF पद्धतीने आलेले उत्पादन केमिकल फ्री, ऑरगॅनीक प्रोडक्ट कॅटेगॅरी खाली विकणे.

ZBNF पद्धतीने आलेले उत्पादन फायद्यात विकणे हे सर्वात मोठे आव्हान शेतकर्यांसमोर आहे. ZBNF पद्धतीने आलेले उत्पादन हे ऑरगॅनीक प्रोडक्ट कॅटेगॅरी खाली येत असेल तर ते प्रयोगशाळेत तपासुन घेणे गरजेच आहे. तसेच अश्या प्रोडक्टना सर्टॉफाईंग बॉडीकडुन मान्यता मिळवावी लागते. हे सर्व खर्चीक आहे. निर्यातीसाठी हे सर्व करणे क्रमप्राप्त आहे पण लोकल मार्केट मध्ये विकायला मात्र सर्टॉफाईंग बॉडीकडुन मान्यता याची गरज नाही, पण विकणार्याचा लौकीक, नाव , मालाचा दर्जा ह्या गोष्टी लागतात.

ZBNF पद्धतीने शेती करणार्या शेतकर्यांचे फेसबुक वर पेजेस आहेत. अश्या शेतकर्यांनी आपापले ग्रूप बनवुन
ते आपले प्रॉब्लेम सॉल्व करत आहेत. मालाची विक्री सुद्धा करत आहेत.

मालाच्या विक्री करता काही करता येण्यासारख असेल तर जरुर ईथे लिहा.

मिलिंद जाधव, उत्तराबद्दल धन्यवाद. मला शेतीचा अनुभव नाही. पण अजूनही कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशातील सुपीक जमीन वाचावी, शेतकरी वाचावा, त्याला decent आयुष्य जगायला मिळावं ह्याची मनापासून कळकळ आहे. ते आपलेच कुणीतरी वाटतात मला. त्यांच्यासाठी जिथून कुठून hopes असतील ते जाणून घ्यायला आवडेल मला. कधीकधी आपल्या आप्तांसाठी आपण direct काही करणं आपल्या हातातच नसतं पण त्याचं सुखात असणं मात्र आपल्यासाठी महत्वाचं असतं... तसंच काहिसं.

साधना, छान posts. तू आंबोलीला हीच पद्धत वापरणार आहेस का?

आबासाहेब, पुढे काय झालं? काही शेतकरी सेंद्रीय व झीरो बजेट अश्या दोन्ही प्रकारांचा एकत्र अवलंब करत असतील का?

अश्विनी ,

तुमच्या लिहीण्यातुनच कळकळ पोहोचली !

तुमच्या प्रश्नांना साधनाने अतिशय उत्तमरीत्या उत्तर दिलेली आहेत, त्यांचे विषेश आभार !!

भारतातील शेतकर्याची परिस्थीती हालाखीची झालेली आहे आणी शेतकर्यांना ह्यातुन बाहेर काढायच काम हे सर्वांच आहे. श्री पाळेकरांसारख्यांच काम हे प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचल पाहीजे. वेगवेगळे मॉडेल्स बघुन शेतकर्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा आहे. शिवाय झालेल उत्पादन हे स्वतः विकल पाहीजे.

.

सुजा, स्वाती2 धन्यवाद. मलाही ह्या पद्धतीची माहिती हल्लीच मिळाली.

हो अश्विनी. मी zbnf शेती करणार आहे. शेती माझे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे मी त्यात प्रयोग करू शकते पण ज्यांचे असे नाहीय ते असले प्रयोग करू धजावत नाहीत. हल्ली शेतकी विद्यापीठे, तज्ञ मिश्र शेती करायचा सल्ला देतात. म्हणजे जीवामृत वापरायचे, जमीन आच्छादन करायचे, मिश्र पिके घ्यायची पण गरजेपुरती रासायनिक खतेही वापरायची. याला zbnf म्हणता येणार नाही. वर आबासाहेब यांच्या भावाने कदाचित या प्रकाराची शेती केली असावी.

शेणखत, मिश्र पिके यात म्हटले तर नवे काही नाहीय, पारंपरिक शेती अशीच होती. पण उत्पादन खर्च, येणारे उत्पादन व ते विकून मिळणारे पैसे यांचा मेळ बसेनासा झाला त्यामुळे शेतकरी भरपूर उत्पादनाच्या मागे लागला.

शेती मध्ये मूलभूत बदल होणे गरजेचे आहे. शेतकी माल जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असल्याने त्याची किंमत जास्त असूनही चालत नाही, अशावेळी कोणीतरी अशी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे ज्यायोगे पुरवठा वर्षभर नीट विभागला जाईल, किमती स्थिर राहतील.

Zbnf पिकवणारे सध्या व्हाट्सअप ग्रुप्स वगैरे सोशल मीडिया मार्फत स्वतःची उत्पादने विकताहेत. त्यांना स्वतःची बाजारपेठ अशी नाहीय. ज्यांनी zbnf चा भाजीपाला खाल्लाय, धान्य वापरलेय त्यांना फरक लक्षात येतो. खपली गहू मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला तो zbnf चा. अन्यथा ह्या गव्हाचे उत्पादन आता फारसे होत नाही. तुमच्या आजूबाजूला कोणी zbnf विकत असेल तर अवश्य घ्या आणि फरक पहा. किमतीत फारसा फरक नाहीये, नसावा.

कोकणात पाळेकर गुरुजींनी या आधी 2 शिबिरे घेतलीत, नोव्हेंबरात महाशिबिर आहे. त्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे सुरू आहे. त्यांना यश मिळाले तर zbnf ची स्वतंत्र बाजारपेठ उभी राहिल.

रासायनिक खते,संकरित बियाणे यातून उत्पादन वाढले आणि शेतकरी तिकडे वळले हे मुलाखतीत पाळेकर मान्य करतात. या सर्वांतून शहरातल्या एजंटाकडेच पैसा जातो.
सततच्या या पद्धतीने नंतर उत्पादन रोडावले,जमीन निकस झाली आता जुन्या पद्धतीकडे वळायचं याचा प्रचार करत आहेत याबद्दल तो पुरस्कार असावा. परंतू धोरण सरकारनेच अगोदर ठरवून प्रचार करायला नको होता. हरितक्रांतीचा उदोउदो करून झाल्यावर परत फिरायचं आहे.
बाकी त्या मुलाखत व्हिडिओत कामाचं काही नाही.

साधना, खूप उत्तम आणि सविस्तर माहिती.झेड बी एन एफ म्हणजे फक्त जीवामृत वापरणं असा काहीसा समज झाला होता.सध्या मला जीवामृत ब्रँड अंबासेडर म्हणतात.जीवामृत 2 किंवा 3 वेळा बागेत 1: 20 ने व वापरल्यावर सुमारे 8 वर्षं काहीही न देणारं लिंबाचं झाड लिंबू द्यायला लागलं.कढीपत्ता झाड फोफावलं.पपई खूप चांगली आली.(आंब्याला मात्र फळ आलं नाही.का ते माहीत नाही).

शेणखत, मिश्र पिके यात म्हटले तर नवे काही नाहीय, पारंपरिक शेती अशीच होती. पण उत्पादन खर्च, येणारे उत्पादन व ते विकून मिळणारे पैसे यांचा मेळ बसेनासा झाला त्यामुळे शेतकरी भरपूर उत्पादनाच्या मागे लागला.

>> हे खरे नाही.

Srd, भारतच काय जगभर लोक रासायनिक खतांकडे व संकरित बियाणाकडे वळले याचे कारणच वाढती लोकसंख्या हे आहे. पारंपरिक बियाणे व शेती एवढे उत्पादन देत नाही ज्याने जगात सगळ्यांचे पोट भरेल. जास्त धान्य देणाऱ्या जाती वाढत्या गरजेला तोंड देण्यासाठी संकरित केल्या गेल्या. हे सगळे करताना रसायने जरुरी पुरतीच वापरली गेली असती तर आजची परिस्थिती ओढवली नसती. आज जमिनीवर, तिथून वाहून जाऊन पाण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रसायने मिसळली गेलीत की आपले सगळे अन्न विषमय झालेय. मातेच्या दुधातही रसायनांचे ट्रेसेस सापडले आहेत. हरितक्रांती करताना योग्य शिक्षण दिले असते तर कदाचित चित्र वेगळे असते, पण कदाचीतच. रसायनांचा गरजेपेक्षा जास्त मारा जगभर झालाय, प्रशिक्षण असो वा नसो.

ज्यांना हा मारा आता नकोसा झालाय ते पर्याय शोधताहेत.

प्रश्न हा आहे की हे पर्याय तेवढेच उत्पादन देऊ शकतील का? संकरित बियाणे रोगांना लवकर बळी पडतात, त्यांना वाढीसाठी विशिष्ट पद्धतीची रसायने लागतात. रसायने वापरूनच यांचे उत्पादन होणार हे गृहीत धरून जी बियाणे विकसित झालीत ती पर्यायी पद्धतीत कितपत टिकतील हे येणारा काळ सांगेल. ह्या पर्यायी पद्धती वापरणाऱ्यांची संख्या वाढली तर या पद्धतीसाठीही नवीन बियाणे संकरित केली जातील. शेवटी पद्धत काय आहे, कोणी शोधलीय याच्यापेकशा जास्त महत्व ती पद्धत अपेक्षित परिणाम देतेय का याला आहे. कारण हा शेवटी आपल्या पोटाचा प्रश्न आहे.

बरोबर. एखादं तंत्रज्ञान आल्यावर त्याचा धुमधडाक्याने प्रचार नको. त्याचे दुष्परिणाम अजून माहीत नाही हे तरी वारंवार सांगावं.
उदा० कापुस. संकरित बियाणं लावून आलेल्या बिया रुजत नाहीत. परत महागडे बियाणे आणावं लागतं. गुरं पुर्वी सरकी ( कापसाचं बी)ची पेंड खायचे,आता अशा बियांची पेंड खाल्ली तर काय होईल? माहीत नाही. लांब दांड्याचे गुलाब करताना त्याचा सुगंध गेलाच, फळ धरत नाही.
ठीक आहे भरपूर उत्पादन देतात पण किती वर्षं?

कुणा एकाच्या सल्ल्यावर एकशेवीसकोटी जनता अवलंबून राहाण्याची वेळ का येते याचे दु:ख

http://aisiakshare.com/node/4973
http://www.aisiakshare.com/node/5056

प्रियदर्शिनी कर्वे यांची 'ऐसी अक्षरे ' वरील 'नैसर्गिक शेती' विषयावरील लेखमाला जिज्ञासूंनी जरूर वाचावी.
यामधे इथे विचरल्या गेलेल्या बहुतेक प्रश्नांचे शास्त्रीय उत्तर दीले आहे. त्यांचे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी केलेल्या प्रयोगातून Zbnf चे गूढ उलगडले आहे.
अर्थात फक्त 'देशी' गायीचेच शेण पाहिजे ई. चुकीच्या समजुती असल्याचे यावरून लक्षात येईल . म्हशीचे किन्वा विदेशी गायीचे शेण सुद्धा चालेल.
हे लेख जरूर वाचा म्हण्जे 'नैसर्गिक शेती' बाबत पसरवण्या येणार्‍या समजांचे अंधानुकरण न करता त्यामागचे शास्त्र जाणून घेऊन योग्य मार्ग निवडता येईल.

रच्याकने, मिलिन्द जाधव,
तुम्हाला जर वरील लिन्क मधली माहीती पटली , तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की या लिन्क तुम्ही लेखाच्या हेडर मधे अ‍ॅड कराव्यात. जेणेकरून गरजूंना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. व गैरसमज , अंधश्रद्धा दूर होतील.
धन्यवाद.

मला थोडासा वेगळा मुद्दा मांडायचा आहे. देशकालानुरूप व्यवहाराची पद्धत बदलते. रूढ पद्धत आता सोयीस्कर किंवा फायदेशीर राहिली नाही असे लक्ष्यात येताच नवे मार्ग धुंडाळले जातात. ते काही काळ यशस्वी ठरतात. पण कालांतराने त्यांतही बद्ल करावे लागतात. तंत्रज्ञान, शिक्षण शेती कुठलेच क्षेत्र असे नाही की ज्यात बदल झाले नाहीत, करावे लागले नाहीत. रासायनिक शेतीने एका कालखंडाची भुकेची गरज भागवली. गरज तातडीची असते तेव्हा अंमलबजावणीतले तपशील बाजूला राहातात. कालांतराने त्यातल्या त्रुटी दिसू लागतात पण तोपर्यंत त्या पॅटर्नकडून अपेक्षित काम पार पडलेले असते. आणि तो बदलायची वेळ आलेली असते. शेततळ्यांचे (जलयुक्त शिवार) काम असेच घिसाडघाईने पार पाडले गेले आहे. भ्रष्टाचाराचीही कुजबूज आहे. यातले दोष आणि तोटे आणखी दहा वर्षांनी कदाचित उघडकीला येतील. सध्याचे गोदूध आणि गो उत्पादनांचे अर्थशास्त्र काळाच्या कसोटीवर कदाचित टिकेल, कदाचित नाही. तेव्हा जशी टोकाची टीका नको तसेच टोकाचे गुणगानही नको.

येस, डेलिया, हेच इथे लिहायचे किती तरी वेळा मनात आले. पण अन्य संस्थळावरची लिंक द्यावी की न द्यावी असा संभ्रम पडला. डॉक्टर आनन्द कर्वे हे आन्तरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर प्रियदर्शिनी यांचे कर्तृत्वही तितकेच तोलामोलाचे आहे.

डेलिया धन्यवाद! मीही अशाच काही लिंक्स शोधत होतो. कर्वे सरांनी काटेकोर संशोधन केलेले आहे. फापटपसारा नव्हे! सोलापूर जवळ अरुण देशपंडेंनीही असेच काम केलेले आहे.

मुळात "देशी" गाय म्हणजे आपल्या शेकर्‍यांनी पिढ्यानपिढ्या जेनेटिक इंजिनीयरिंग करून विकसीत केलेले वाण आहे.
शेण देशी गायीचेच हवे हे विधान अनाकलनीय (Preaching to the Choir ? ) आहे.
पाळेकरांच्या लेखनात इतरही अनेक अंतर्विरोध आहेत. एका (देशी !) गायीच्या भरवशावर तीस एकर शेती ?

अशाप्रकारच्या ( आयुर्वेदाच्या सहाय्याने कँसरवर मात छाप ) लेखनाचे मूल्यमापन करताना
१ If something is too good to be true, then it probably is.
2 Extraordinary claims require extraordinary proofs.
हे ध्यानत ठेवावे.

ते कर्वेंचे लेख मी ऐसीवर त्यावेळी वाचले आहेत॥

मीसुद्धा उद्या एखादी पद्धत विकसित केली, त्याला दोनचार मोठ्या व्यक्ती धर्मग्रंथाची जोड दिली,थोडे कंपू जमवले तर काही काळ बेंडबाजा वाजेल. पण विज्ञान आणि निसर्गक्रमास कुठेतरी फसवतोय हे मला समजत असते.
शेतीमध्ये संतुलन आणि अर्थकारण संभाळायचे अ ते.

<<<<मीसुद्धा उद्या एखादी पद्धत विकसित केली, त्याला दोनचार मोठ्या व्यक्ती धर्मग्रंथाची जोड दिली,थोडे कंपू जमवले तर काही काळ बेंडबाजा वाजेल. पण विज्ञान आणि निसर्गक्रमास कुठेतरी फसवतोय हे मला समजत असते.>>>>
विज्ञान आणि निसर्गक्रमास कुठेतरी फसवुन जास्त उत्पादन घेता येईल का ?
उगाच चिखलफेक का करताय ?
आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक , तामिळनाडुचे शेतकरी का पाळेकरांच्या ह्या पद्भतीचा अवलंब करताहेत त्याचा विचार करा !!

>>आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक , तामिळनाडुचे शेतकरी का पाळेकरांच्या ह्या पद्भतीचा अवलंब करताहेत त्याचा विचार करा !!

याच्या समर्थनार्थ काही विदा आहे की निव्वळ तोंडी दावे केले जाताहेत?

डेलिया,
लिंक बद्दल धन्यवाद,
डॉ कर्वेंना मी बरीच फॉलो करत आहे. त्यांच्या "आरती" ह्या संस्थेच्या निमित्याने मी त्यांच्या संपर्कात होतो.
डॉ कर्वेंनी बरच मोलाच संशोधन शेती क्षेत्रात केलेल आहे, त्यातल महत्वाच आणि वेगळ संशोधन हे कार्बनडाय अॉक्साईड वायुचे शेतीवरचे उपयोग व परीणाम.

त्याच बरोबर पाळेकर गुरुजींच संशोधन चुकीच, टाकावु आहे अस म्हणता येत नाही. त्यांनी सांगीतलेली पद्धती आता बरेच शेतकरी यशस्वीरीत्या वापरत आहेत.

<<<<<याच्या समर्थनार्थ काही विदा आहे की निव्वळ तोंडी दावे केले जाताहेत? >>>>>>

बरेच व्हिडीयो युट्युब वर आहेत, शोधा म्हणजे सापडतील,
दावे ते स्वतःपण करत नाहीत. कोणताही मानधन पैसा ते घेत नाहीत.

आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक , तामिळनाडुचे शेतकरी का पाळेकरांच्या ह्या पद्भतीचा अवलंब करताहेत >> दक्षिणेकडिल शेतकरी या पद्धतीचा अवलंब का करत असावेत? महाराष्ट्रात हि पद्धत का अगिकारली जात नसावी? यावरील आपले विवेचन वाचायला आवडेल मिलिंद जाधवजी.

चिखलफेक नव्हे. मत मांडलं आहे.
जे कोणी देशी गायीच्या शेणामुताचा प्रचार करत आहेत त्यांनी स्वत:ला प्रश्न करावा किती गोठ्यांत चार लिटरस दुध देणाय्रा देशी गायी आहेत,पंधरा लिटरपेक्षा अधिक दुध देणाय्रा न्युजर्सी आहेत.

म्हणजे शेणासाठी देशी गायी कोण पाळणार?
कोणतेही शेणखत घाला म्हटलं तर ठीकच आहे. त्यात क्रांतीकारक नवीन काही नाही.
बाकी ते पाळेकर उगाचच पाठ थोपटून घेत आहेत.

Srd,. सद्या गाय देशी असो वा विदेशी, ती भाकड झाल्यावर तिची रवानगी कत्तल खान्यात होते. जर ह्या भाकड गायीच्या शेणामुताने शेती चालत असेल तर त्यात काय वाईट आहे? कोणाचाही कुठलाही दावा कसोटीवर घासून घेणे केव्हाही योग्यच. पण दावा खोटाच असणार याची परीक्षा तुम्ही स्वतः केलीयेत का?

वर कोणीतरी लिहिलेय की इथे समर्थन करणार्यांनी डालडाच्या डब्यात तरी तुळस लावून पाहिलिय का? तेच टीका करणाऱ्यांनाही लागू होते ना? कर्व्यांचे संशोधन असो, पाळेकरांचे असो वा दाभोलकरांचे असो. ही माणसे स्वतः मातीत उतरून धडपड करताहेत. प्रयोगानंतर आलेले निष्कर्ष मांडताहेत. काही लोक ते वाचून स्वतः प्रयोग करताहेत, त्यांनाही बरेवाईट अनुभव मिळताहेत.

तुम्ही इतक्या ठामपणे बोलताय याचा अर्थच तुम्हीही प्रयोग केलेले आहेत, त्याशिवाय बोलणार नाही. तुमच्या प्रयोगाची माहिती व अनुमान देणार का इथे? म्हणजे आमच्या सारख्याना मदत होईल.

माझ्याबाबत बोलायचे झाले तर मी माझ्या घरात आधी गांडूळखत व नंतर दाभोलकर प्रणित शहरी शेतीचे प्रयोग केलेले आहेत. चिकाटीने न कंटाळता काम केले तर खूप चांगले रिझल्ट्स येतात हे स्वतः अनुभवलेले आहे. पाळेकरांचे जीवामृतही आता वापरलेले आहे, माझ्या घरच्या झाडांवर त्याचे परिणाम पाहिलेले आहेत. देवदयेने सगळे नीट झाले तर येत्या ऑक्टोबरात माझया शेतात गहू लावणार आहे. मला सगळ्या नव्या शोधांबद्दल कुतूहल आहे, निसर्गाबद्दल प्रेम आहे. त्यामुळे कमीत कमी निसर्गहानीत माझे शेतीचे उद्दिष्ट्य कसे पूर्ण होईल हे मला बघायचंय. कोणाचेही प्रयोग थोतांड म्हणून फेकून देण्याऐवजी ते स्वतः करून स्वतःचे निष्कर्ष स्वतःच काढणे मी जास्त योग्य समजते.

कर्णाटक आंध्र तमीळनाडु मधले शेतकरी पाळेकरांच्या पद्धतीचे अनुकरण करीत आहेत. त्यांना चांगले उत्पन्न नक्कीच मिळत आहे. पण आपण जे मिश्रण वापरत आहोत त्यातल्या नक्की कोणत्या घटकामुळे आणि कशी सुपीकता वाढते हे त्यांना कदाचित माहीत नसेल. कर्बोदक हे सेन्द्रीय रसायन यामागे आहे हे त्यांना कळले तर ते कर्बोदकांचे अन्य सोपे, सोयीस्कर, स्वस्त पर्याय वापरून बघतील आणि ते वापरूनसुद्धा तितकेच भरघोस पीक येते हे त्यांना कळेल. अन्य तितक्याच एफिशिअन्ट आणि अधिक स्वस्त पर्यायांची उपलब्धता असताना बळेच एक (महाग) पर्यायच वापरायचा असे ठरवून ही शेती केली जात असल्याचा फील नेहमीच येतो. अर्थात कोणी कोणते स्वस्त अथवा महाग पर्याय वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. आमची सध्या शेती नाही. पण इमारतीत अथवा बाल्कन्यांत शक्य असेल तेथे झाडे लावतो. डॉ. कर्वे यांच्या तत्त्वानुसार अधून मधून साखरयुक्त चहाचा चोथा अगदी थोडा थोडा घालतो. रिझल्ट उत्तम आहे. एव्हढ्याश्या जागेत केवळ दोन झाडांवर चाळीस पन्नास मिरच्या मिळतात. पावसातसुद्धा झाडावर मिरची असते. चाफे फुलतात. सायली बहरते. अळू पसरते. सुरणाचा कंद मिळतो. कोनफळ धरते. वरती वेलीवर बेबडे येतात. कढीलिंब, पुदिना, गवती चहा तर असतोच. या वर्षी हळद नाही. पण काही वर्षे सातत्याने थोडी थोडी हळकुंडे मिळाली. अलीकडे पपया लावला आहे. पाहू काय होते. असो.

हिरा, योग्य विवेचन. नेमके कशामुळे काय मिळते ते समजणे कठीण असले तरी अशक्य नाही. वेगवेगळे प्रयोग आणि त्यांचे निष्कर्ष ताडून पाहिले तर आपल्यालाही काही अंदाज बांधता येतात. कर्व्यांचा प्रयोग मी सुद्धा नक्की करून पाहीन.

असे प्रयोग करणे सर्वांनाच जमते असे नाही, त्याहुन कर्जात पिचलेल्या शेतकर्यालातर काडीचा ही आधार आहे.
एका व्हिडीयोत कोल्हापुरच्या उस घेणारा शेतकरी रडला. अश्या शेतकर्यांना कोणीतरी पाठीशी उभा असणारा पाहीजे.
अस करुन बघ. हे अस करता येईल !! वैगेरे वर शेतकर्याचा विश्वास बसणार नाही.
पाळेकर गुरुजी स्वतः उ भ राहुन प्रत्येक पद्धती स्वतः समजावुन सांगतात !!

मोठ्या प्रमाणावर शेती यावर अवलंबून राहाणे कठीण आहे. तुमच्या माझ्या एकाच्या प्रायोगिक पद्धतीवर परिणाम येऊन काही उपयोग नाही. एकमेकास पूरक चक्र प्राणी माणूस पीक हे एका बाजूस तोडून झालेलं आहे. आता पुन्हा जोडाजोड.

Pages