झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती !!

Submitted by मिलिंद जाधव on 1 July, 2017 - 04:30

शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!

अक्षरशः झीरो बजेट मध्ये किफायतदार शेती करता येते हे श्री सुभाष पा़ळेकर यांनी दाखवुन दिले ,
एका देशी गाई च्या सहाय्याने ३० एकर शेती करता येते, ह्या शेतीला कोणत्याही रासायनीक खताची गरज पडत नाही, ना कोणत्याही किटक नाशकाची !!

शेतकर्यांना कर्जमाफी करुन पुर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने चुक केलेली आहे अस परखड मत सुभाष पाळेकरांनी माडलेले आहे.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती बद्दल अधिक माहीती असलेल्यांनी ती ईथे द्यावी म्हणजे ईच्छुक लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
त्या शिवाय झीरो बजेट नॅचरल शेती पद्दतीने निर्माण झालेल्या शेत मालाचा चांगल मार्केटींग करण्यासाठी सुद्धा उपाय सुचवावेत. काही शेतकर्यांनी आपापले व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवुन आपल्या शेत मालाच मार्केटींग सुरु केलेल आहे. झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती चे फेस बुक पेजेस सुद्धा आहेत.

त्यांनी केलेल्या कामाचा आढावा येथे बघायला मिळेल ,

https://youtu.be/cBLWpSEJW9g
शेतीवर कीटक रोग का येतो त्याच वैज्ञानीक विश्लेषण. पाळेकर गुरुनीं किती खोलवर विचार संशोधन केलेल आहे त्याच ऊदाहरण आहे हे !!

GreatBhet Subhash Palekar (Part 1)
https://www.youtube.com/watch?v=68CkDaJjtYE

GreatBhet Subhash Palekar (Part २)
https://www.youtube.com/watch?v=dt2h7a7s9CQ

मधुकर पिसाळ, उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=GokLCkZYISQ&t=368s

एम आर चौगुले , उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=1KzyTmINriQ

डाळींब शेती
https://www.youtube.com/watch?v=a03P-8qOuSo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा,

<<<<<तितक्याच एफिशिअन्ट आणि अधिक स्वस्त पर्यायांची उपलब्धता असताना बळेच एक (महाग) पर्यायच वापरायचा असे ठरवून ही शेती केली जात असल्याचा फील नेहमीच येतो. >>>>>>
हे समजले नाही....... कोणत्या महाग पर्याया बद्दल बोलत आहात तुम्ही ?

या धाग्यापाठोपाठ आलेले गडकरी आख्यान वाचल्यावर ही बातमी आठवली.

I started storing my urine in a plastic can. After collecting it in a 50-litre can ..So one day, I called the gardener and instructed him to water some plants with this. And I'm telling you, there was so much difference, the trees grew one-and-a-half feet more than other plants,

अवांतरः
घराच्या किंवा अंगणाच्या अंधा-या कोप-यात दिवे लावुस रोप घेण्याचा प्रयोग इथे कुणी स्वतः केलेला आहे का?
असल्याल कोणते दिवे चांगले ई. माहिती द्यावी.

https://youtu.be/cBLWpSEJW9g
शेतीवर कीटक रोग का येतो त्याच वैज्ञानीक विश्लेषण. पाळेकर गुरुनीं किती खोलवर विचार संशोधन केलेल आहे त्याच ऊदाहरण आहे हे !!

बरोबर. एखादं तंत्रज्ञान आल्यावर त्याचा धुमधडाक्याने प्रचार नको. त्याचे दुष्परिणाम अजून माहीत नाही हे तरी वारंवार सांगावं.>>>>>

हे कुठल्या तंत्राबद्दल आहे? Zbnf बद्दल असेल तर त्यात नवीन काही नाही किंवा त्यात तंत्रज्ञानही काही नाही.

निसर्गतः जंगलात, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर झाडे कशी वाढतात, कोण त्यांना एन पी के देतो, कोण त्यांचे किड निवारण करतो याचे निरीक्षण करून त्या प्रकारचे वातावरण शेतातही उभे करून करायची शेती zbnf आहे.

यामधे इथे विचरल्या गेलेल्या बहुतेक प्रश्नांचे शास्त्रीय उत्तर दीले आहे. त्यांचे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी केलेल्या प्रयोगातून Zbnf चे गूढ उलगडले आहे.
अर्थात फक्त 'देशी' गायीचेच शेण पाहिजे ई. चुकीच्या समजुती असल्याचे यावरून लक्षात येईल . म्हशीचे किन्वा विदेशी गायीचे शेण सुद्धा चालेल.
हे लेख जरूर वाचा म्हण्जे 'नैसर्गिक शेती' बाबत पसरवण्या येणार्‍या समजांचे अंधानुकरण न करता त्यामागचे शास्त्र जाणून घेऊन योग्य मार्ग निवडता येईल.>>>>>

मी आधी लिहिल्या प्रमाणे मला जे काही नवीन प्रयोग या क्षेत्रात होताहेत त्यात रस आहे. कर्व्यांनी जे निष्कर्ष काढले ते मी माझ्या घरच्या कुंड्यांवर वापरून पाहिले. जमीनीत बारीक गांडूळे असतील तर चांगला प्रतिसाद मिळतो. माझ्या कुंड्यांमध्ये बारीक गांडूळे आहेत, बाकी सूक्ष्म जीवजंतूही असावेत असे मी गृहीत धरते करण मला ते तपासता येणार नाही. मी गेली 15 वर्षे घरच्या घरी भाजीपाला लावत असले तरी मी युरिया वगैरे कधीच वापरले नाही. घरचा हिरवा कचरा बारीक करून घालत राहते. त्यामुळे नैसर्गिकरित्या जमिनीत जे असणे अपेक्षित आहे ते कुंडीतल्या मातीत असावे. या मातीला साखरेचे पाणी पाजले तर आवश्यक कर्बोदके आपोआप मिळतील व झाडे वाढतील.

फक्त हा प्रयोग मोठ्या प्रमाणात करायचा झाला तर कित्येक एकर जमिनीवर साखरेचे पाणी पसरवणे किती खर्चिक होईल? साखरेची किंमत द्यावी लागेल जशी आज रसायनांची देतोय तशीच. साखरेला कितीही नावे ठेवली तरी आज भारतात साखरेचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, करोडो लोक ती रोजच्या आहारात वापरतात. मग असा महाग व आवश्यक पदार्थ मातीत मिसळायचा?

रासायने टाकून जमिनीतील उपयोगी जीव जंतू जर आधीच मारले गेले असतील तर साखरेचा उपयोग शून्य आहे. साखर जीवजंतूचे खाद्य म्हणून काम करते, जीवजंतू निर्माण करायचे काम साखरेमुळे होणार नाही.

इथे जीवामृत उपयोगी येते. जीवामृत हे दह्याच्या विरजणासारखे जमिनीत काम करते. जीवामृत घालून जमीन आच्छादित ठेवली की त्याखाली हळूहळू सगळे तयार होते जे जमिनीला सशक्त बनवते.

साखर नैसर्गिक नाही. असे असताना साखरेचे पाणी झाडांसाठी ...

मागच्या वर्षी एक पुस्तक लेक घेउन आली होती. The Case of the Vanishing Honeybees: A Scientific Mystery त्यात मधमाशा खुप संख्येने का कमी झाल्या यावर शास्त्रज्ञ संशोधन करत होते की नक्की काय कारण असावे. रसायनांचा वाढलेला वापर कारणीभुत असावा वगैरे असे वाटले पण नक्की कारण कळले नाही.
नंतर कमी झालेली संख्या वाढण्यासाठी प्रयत्न चालु झाले. त्यामध्ये एक प्रयोग केला ज्यामध्ये साखर दिली गेली. साखरेने सुरवातीला मधमाशांची संख्या खुप वाढली पण पुढच्याच वर्षी पुन्हा दुपटीने कमी झाली. कारण शोधले असता लक्शात आले की साखरेवर वाढलेल्या मधमाशा जगल्या नाही. कारण त्या मधमाशा फुलांच्या रसावर वाढलेल्या मधमाश्यांच्या तुलनेत खुपच दुर्बळ होत्या. निसर्गामधल्या छोट्या मोठ्या गोष्टींनी त्या तग धरु शकल्या नाही. त्यामुळे त्यांची पिढी जगली नाही.

रासायनीक कीटकनाशकांच्या बेसुमार वापारामुळे मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे हे खरे आहे.
मधुमक्षिका पालन करताना आजूबाजूला पुरेशी फुलं नसतील किंवा त्या भागात मक्षिका भक्षक पक्षी असल्यास बंदिस्त जागेत साखरेचे पाणी ठेवले जाते. त्यामुळे मध माशांना मध गोळा करायला बाहेर पडावे लागत नाही व पक्षांपासून रक्षणही होते. परंतू साखरेवर पोसलेल्या मधमाशा दुर्बल होतात हे माझ्याकरता तरी नवीन आहे. खात्री करून घेईन.

या धाग्याशी रिलेटेड नाही पण तरी प्रश्नः
होम कंपोस्टला सोपेपणी मुबलक मिळणारा कार्बन म्हणून काय वापरता येईल?

घरी कुंडीत घरगुती किचन कंपोस्टिंग. पण स्पीड प्रचंड कमी आहे.
कार्बन चं प्रमाण वाढवायला वर्तमानपत्र तुकडे टाकले. वाळकी पानं मिळत नाहीत.परवा एका सॉमिल वाल्या कडून सॉडस्ट घेऊन टाकली.मग दमट पणा वाढून प्रोसेस फास्ट व्हायला पाणी शिंपडून नीट ढवळून ठेवले.
कार्बन पेक्षा नायट्रोजन म्हणजे डिसकार्डेड भाज्या आणि सालं जास्त असल्याने कंपोस्ट तयार व्हायला खूप वेळ लागतो.
कचरा निर्माण होण्याचे प्रमाण खूप आणि कंपोस्ट तयार व्हायला लागणारा वेळ भरपूर असे होते.त्यामुळे कुंडी पटापट भरते.
आधी एक शाफ्ट फिरवता येईल असा कंपोस्टर होता. भरपूर कपॅसिटी चा. पण मध्ये बरेच दिवस मिक्स करायला न झाल्याने कचरा जमून बसून शाफ्ट अडकला.कचर्‍याची केमिकल रिअ‍ॅक्शन होऊन खालचं प्लॅस्टिक थोडं उचकून शाफ्ट जाम होऊन बसला. यातून कसाबसा एक लॉट काढून वापरुन झाल्यावर हा बिन भंगारात विकला.
भारतात चांगले कंपोस्टर या क्षेत्रात खूप मागे आहे.प्रोफेशनल आडवे टंबलर चांगले पडतात पण किंमती ९००० वगैरे काहीही आहेत. बाकी लहान उद्योजक मेटल लेयर आतून दिलेल्या प्लास्टिक बास्केट कंपोस्टर म्हणून विकतात. यात वेस्ट एका काठीने हलवावे लागते. बास्केट पटकन फुल होते.(थोडे श्रमाचे.आम्ही तीन दाते असलेल्या गार्डन खुरप्याने (बहुतेक खुरपं म्हणतात त्याला) हलवतो.)
अमझॉन वर कंपोस्टर म्हणून प्लॅस्टिक चे डस्टबिन आणि पाणी साठवायची पिंप महागात विकतात.
डेली डंप सारखी सोल्युशन प्रचंड महाग आहेत.

माझा आयडीयल कंपोस्ट बिनः
पाणी साठवायचे मोठे पिंप असते तसे मातीचे भांडे विथ दर ३ इंचावर छिद्रे, वर माठासारखे झाकण असे कुंभाराकडून बनवून घायचे.पण आम्ही कुंभारापासून खूप लांब राहतो, आमच्या एरियात कुंड्या विकणारे हे फक्त डिलर असतात. कुंड्या आउटसोर्सड असतात.

अनु,
कुंडीवाल्यांकडून मोठी कुंडी घेऊन त्याला गरजे प्रमाणे ड्रील करून तुम्ही हवी तशी बिन बनवू शकता.

जर ते design खरेच वर्क करते असे दिसले तर बनवून घेण्याचा विचार करू शकता

आता घेतलेली मोठी कुंडीच आहे.बघू. त्यापेक्षा मोठी घेईन.
आपले ड्रिल मशिन न तुटता कुंडी वर चालेल ना (त्यात कधीकधी माती बरोबर अस्बेस्टॉस वगैरे मिक्स असते ना)?

कॉंक्रीट भिंतीवर ड्रिल करण्यासाठी जे ड्रिल मशीन वापरतो ते वापरा.

छोट्या ड्रिल बीटने (बीट पण भिंती साठी जे असते तेच वापरा) सुरवात करा, पूर्ण आरपार भोक पडले कि थोडे मोठे घ्या, मग अजून मोठे.

सुरवातीला ड्रीलस्पीड कमी ठेवा, खड्डा झालेला दिसला कि वाढवा.

मधुमक्षिका पालन करताना आजूबाजूला पुरेशी फुलं नसतील किंवा त्या भागात मक्षिका भक्षक पक्षी असल्यास बंदिस्त जागेत साखरेचे पाणी ठेवले जाते. त्यामुळे मध माशांना मध गोळा करायला बाहेर पडावे लागत नाही व पक्षांपासून रक्षणही होते...>>>>

मुळात मधूमक्षिका पालन करून मध मिळवणे हा धंदाच चुकीचा आहे, हा धंदा करून आपण मधमाशांना मारतोय. मधमाशा मध मानवासाठी गोळा करत नाहीत तर त्यांचे जीवन चक्र मधावर अवलंबून आहे. त्या इतक्या लांबवर फिरून मध गोळा करतात ते त्यांच्या जगण्याच्या व प्रजननाच्या कामासाठी. त्या हे करत असताना फुलांचे आपसूक परागीभवन होते व फळ धरते. त्यांनी कष्टाने गोळा केलेले मध आपण खातो तेव्हा आपण मधमाशांना उपाशी मारतो. त्यांना साखरेचे पाणी पाजणे म्हणजे आपल्या मुलांना ताजे अन्न न देता जेवणाची गोळी देणे होय. असो.

माणसाने निदान या बाबतीत तरी आजवर करत आलेल्या चुका ओळखून त्या टाळायला हव्यात. नाहीतर येणारा काळ कठीण आहे.

>>>>ळात मधूमक्षिका पालन करून मध मिळवणे हा धंदाच चुकीचा आहे, हा धंदा करून आपण मधमाशांना मारतोय. मधमाशा मध मानवासाठी गोळा करत नाहीत तर त्यांचे जीवन चक्र मधावर अवलंबून आहे. त्या इतक्या लांबवर फिरून मध गोळा करतात ते त्यांच्या जगण्याच्या व प्रजननाच्या कामासाठी. त्या हे करत असताना फुलांचे आपसूक परागीभवन होते व फळ धरते. त्यांनी कष्टाने गोळा केलेले मध आपण खातो तेव्हा आपण मधमाशांना उपाशी मारतो. त्यांना साखरेचे पाणी पाजणे म्हणजे आपल्या मुलांना ताजे अन्न न देता जेवणाची गोळी देणे होय. असो.>>>>

साधना, आता या पॅरेग्राफ मध्ये मधमाशी आणि मधाच्या ऐवजी गाय/म्हैस आणि दूध घालून पहा बरं?

असो....

माणसाने निदान या बाबतीत तरी आजवर करत आलेल्या चुका ओळखून त्या टाळायला हव्यात. नाहीतर येणारा काळ कठीण आहे.

तसं म्हटलं तर शेतीसुध्दा अनैसर्गिकच म्हणायला हवी. तिनेही निसर्गाचे नुकसान केले आहे.

साधना, आता या पॅरेग्राफ मध्ये मधमाशी आणि मधाच्या ऐवजी गाय/म्हैस आणि दूध घालून पहा बरं?>>>>

तिथेही तेच गणित आहे. गाय/म्हैस माणसांसाठी दूध देत नाही.

फक्त फरक एवढाच आहे की गाय/म्हैस/बैल/रेडे हे प्राणी शेतीत जरी महत्वाचे असले तरीही ते मधमाशीइतके महत्वाचे नाहीत. आजची शेती गाय बैलापासून दूर गेलेली आहे, त्याची जागा ट्रॅक्टरने घेतलीय. पण मधमाशीची जागा घ्यायला आर्टिफिशियल पोलीनेशनची व्यवस्था आपल्याला करावी लागेल व ती मधमाशीइतक्या अचूकपणे न थकता, न कंटाळता, फुलाला अजिबात धक्का न लागता करण्याइतपत सफाई त्यात आणावी लागेल. हे जर खरेच करावे लागले तर असे करून मिळालेले अन्न प्रचंड महाग होणार.

हे सगळे टाळायचे असेल तर मधमाशीला पर्याय नाही.

तसं म्हटलं तर शेतीसुध्दा अनैसर्गिकच म्हणायला हवी. तिनेही निसर्गाचे नुकसान केले आहे.>>>>>

गेल्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात एक कार्टून पाहिलेले. आगीचा शोध लावणाऱ्या आद्य मानवाची नोंद एक आद्य वंशावळकार करतोय. तो विचारतो, तुझी नोंद काय म्हणून करू? आगीचा शोध लावणारा मानव की प्रदूषणाची सुरवात करणारा पहिला मानव?

http://www.bbc.com/news/science-environment-11418033

However, many vegetables - such as pumpkin, squash, cucumber and gherkin - were reliant on insects, such as bees.

He added that the fall in yield per hectare was against the backdrop of a greater area being turned over to crop production each year.

In an attempt to identify an underlying cause for the pollinator decline, the team is carrying out a series of field experiments, comparing conventional agriculture with "ecological farming".

Defined as "a farming system that aims to develop an integrated, humane, environmentally and economically sustainable agricultural production system", ecological farming is almost a hybrid of conventional and organic farming, looking to capitalise on returns from modern farming methods as well as drawing on natural ecological services, such as pollination.

Dr Basu said: "There is an obvious indication that within the ecological farming setting, there is pollinator abundance. This method typically provides the habitats for natural pollinators - this is the way forward."

He added that if the team's findings were extrapolated, this would offer a "clear indication" that India was facing a decline in natural pollinators, as ecological farming was only practiced on about 10-20% of the country's arable land.

-----------

Dr Basu said food security was unlikely to be the main consequence facing India.

"There has been a debate within India about this, but most of the cereal crops are not pollinator dependent, so if there is a pollination crisis it is not going to affect food security as such.

"What is going to be affected is nutritional security."

The concept of food security was first established by a FAO committee in 1983. Nutritional security was soon added as a key pillar to ensure "access by all people at all times to enough food for an active and healthy life".

Dr Basu said that vegetables such as pumpkins, squash, cucumber, and gherkins were "quite substantial" in terms of delivering necessary nutrients to the population.

"But there are many other vegetable crops that are eaten by people who are around the poverty level, so-called minor vegetable crops like eggplant, for which is there is no or very little data," he explained.

मधुमक्षिका पालन करुन , माश्यांनी साठवलेला मध आपण घेऊन आपण त्यांना उपाशी मारतोय हे विधान पूर्णपणे मानभावी आणि उगाचच हाय मोरल ग्राउंड घेणारे आहे,

नॅचरल वातावरणात मधुमक्षिका पालन होत असेल तर माश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनाला काहीच फरक पडत नाही,
कंट्रोलल्ड वातावरण असल्याने, आणि त्यांच्या योगक्षेमाची काळजी वाहायला त्यांचा मालक असल्याने, त्यांना आपण उपाशी मारतोय वगैरे दावा चूक आहे.

जिथे आजूबाजूस पुरेशी फुले नाहीत, तिकडे साखरपाणी वगैरे पर्याय वापरले जातात, त्याचा माश्यांच्या जीवनक्षमतेवर परिणाम होतही असेल, पण म्हणून 100%वरील मधूपालन चूक आहे असे म्हणणे बरोबर नाही

मधुमक्षिका पालन करुन , माश्यांनी साठवलेला मध आपण घेऊन आपण त्यांना उपाशी मारतोय हे विधान पूर्णपणे मानभावी आणि उगाचच हाय मोरल ग्राउंड घेणारे आहे,>>>>>>

बरं.

Arc, घाटकोपरला एक आहेत माहितीतले. ठाण्यात ठाणे नॅचरल्स आहे, पत्ता माहीत नाही.

गोरेगावला जे ग्लोबल कोकण संमेलन 3 जानेवारीपासून भरलेय तिथे सिंधुदुर्ग फार्मर्सचा स्टॉल आहे. तिथेही माहिती मिळेल.

online आहे का?
पुण्यात आधी एक दोन watsapp group war try केले.co-ordination मधे खुप कटकट होती.
शेवती merafarmer सापडले ..reasonable rates ,good quality,good service,once a week home delivery. very easy to place order.

मला माहित असलेले ऑनलाइन नाहीत. पण घाटकोपरला घरी डिलिव्हरी देतात. आठवड्यात एकदा. व्हाट्सअप्पवरून कळवतात उपलब्धी

माहीतेसाठे ध्नयवाद. संबंधितांना कळविण्यात येइल.
आम्ही गेले १ वर्ष zbnf फले ,भाज्या खातोय. चवीत आणि दर्ज्यात खुप फरक जानवतो. आता non-zbnf खायला नको वाटते.

Pages