झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती !!

Submitted by मिलिंद जाधव on 1 July, 2017 - 04:30

शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!

अक्षरशः झीरो बजेट मध्ये किफायतदार शेती करता येते हे श्री सुभाष पा़ळेकर यांनी दाखवुन दिले ,
एका देशी गाई च्या सहाय्याने ३० एकर शेती करता येते, ह्या शेतीला कोणत्याही रासायनीक खताची गरज पडत नाही, ना कोणत्याही किटक नाशकाची !!

शेतकर्यांना कर्जमाफी करुन पुर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने चुक केलेली आहे अस परखड मत सुभाष पाळेकरांनी माडलेले आहे.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती बद्दल अधिक माहीती असलेल्यांनी ती ईथे द्यावी म्हणजे ईच्छुक लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
त्या शिवाय झीरो बजेट नॅचरल शेती पद्दतीने निर्माण झालेल्या शेत मालाचा चांगल मार्केटींग करण्यासाठी सुद्धा उपाय सुचवावेत. काही शेतकर्यांनी आपापले व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवुन आपल्या शेत मालाच मार्केटींग सुरु केलेल आहे. झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती चे फेस बुक पेजेस सुद्धा आहेत.

त्यांनी केलेल्या कामाचा आढावा येथे बघायला मिळेल ,

https://youtu.be/cBLWpSEJW9g
शेतीवर कीटक रोग का येतो त्याच वैज्ञानीक विश्लेषण. पाळेकर गुरुनीं किती खोलवर विचार संशोधन केलेल आहे त्याच ऊदाहरण आहे हे !!

GreatBhet Subhash Palekar (Part 1)
https://www.youtube.com/watch?v=68CkDaJjtYE

GreatBhet Subhash Palekar (Part २)
https://www.youtube.com/watch?v=dt2h7a7s9CQ

मधुकर पिसाळ, उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=GokLCkZYISQ&t=368s

एम आर चौगुले , उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=1KzyTmINriQ

डाळींब शेती
https://www.youtube.com/watch?v=a03P-8qOuSo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री सुभाष पाळेकर सराच्या मते फक्त एका देशी गाईच्या भरोश्यावर ३० एकर जमिनी वर शेती घेता येते. ह्या शेतीला कोणतेही रासायनीक किंवा सेंद्रीय खत ( कांपोस्ट ) लागत नाही. >>> मिलिंद हे कसं शक्य आहे ?

कुतूहल म्हणून काही प्रश्न -

1) इतर राज्यातील ४० लाख शेतकरी झीरो बजेट शेती करतात - ह्यांना ही शेती कुणी शिकवली? ह्यांना ह्या पद्धतीबद्दल आधीपासूनच माहित होते का? त्यांना माहित असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का माहित नाही?

२) आपल्या देशात दुष्काळ अन्य राज्यातही पडत असेल. तिथे ह्या शेतीनेच त्या संकटावर मात केली जातेय का? जसे की जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व्हर्मीकंपोस्टमध्ये जास्त असते त्यामुळे पाणी कमी लागते. की फक्त रासायनिक खतांचा शून्य वापर हेच एकमेव (पण अर्थात खूप महत्वाचे) धोरण ह्या शेतीत आहे?

३) सर्व प्रकारच्या जमिनीला ही पद्धत उपयोगी आहे का?

४) सर्व प्रकारच्या पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे का?

५) महाराष्ट्रात ही पद्धत किती शेतकऱ्यांनी किती काळापासून अवलंबिली आहे व त्यांना किती फरक पडला? रासायनिक खतांचा वापर टाळला जावू लागल्यानंतर ह्या पद्धतीने शेती सुरू केल्यावर जमिनीचा कस सुधारायला किती काळ जावा लागतो?

६) व्हर्मीवॉश (ह्या पद्धतीत त्याला काय म्हणतात ते माहित नाही) अतिशय उत्तम किटकनाशक म्हणून काम करते. एका गायीचे शेण व इतर सामान वापरून ३० एकरांना पुरेसे खत,नैसर्गिक किटकनाशक कश्याप्रकारे तयार होते? की ते इतके strong असते की फार कमी घालावे लागते?

७) इतर झाडांच्या पानांमधून आवश्यक मूलद्रव्ये मिळतात. ती सर्व झाडे लावावी लागतात की कुठूनतरी पानेच आणून कंपोस्टमध्ये वापरतात? इथे त्यांनी कंपोस्ट शब्द वापरला नाहिये पण ती आंबवण्याची पर्यायाने decompose करण्याची प्रक्रिया आहेच. जमिनीला नत्र पुरेसं मिळण्यासाठी लेग्युम्स लावतात हे माहित आहे. पण लेग्युम्स हे एक स्वतंत्र पीक म्हणून काढले जाऊ शकते. तशी ही झाडे आहेत का? वर त्यांनी वापरलेली झाडे सहज लावली जाऊ शकतील परंतु जमिनीला, शेतीला आवश्यक सर्वच मूलद्रव्ये त्यातून मिळतात का? माझ्या माहितीप्रमाणे गांडूळखतातच सर्वात जास्त आवश्यक मूलद्रव्ये एकाच वेळी व तीही प्रचंड प्रमाणात मिळू शकतात.

वरीलपैकी काही प्रश्न अडाणीपणाचे वाटू शकतात. पण तरिही विचारतेय Happy जो जो कुणी जगातली कुठल्याही प्रकारची वाईट परिस्थिती शांतपणे फोकस्ड राहून प्रयास करून सुधारू बघतोय त्याबद्दल आदर आहेच.

http://palekarzerobudgetspiritualfarming.org/organic.aspx

Organic farming has launched the surface feeder worm orm Eisenia Foetida of the class oligochata and family Cumbricidae, imported from Europe and Canada in India. Purpose? To destroy the all dried biomass on the soil, to destroy the animal casting and to add Cadmium, Arsenic and Mercury like poisonous heavy metals in the soil to destroy the soil health and human health. Because, the Eisenia Foetida does not eat soil, eats only casting and biomass, which are the main part of the humans creation.

Destructor beast: EISENIA FOETIDA

अश्विनी ताई,

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची सखोल उत्तर माझ्या कडे नाहीत. ज्या प्रश्नाची उत्तर देउ शकलो ती दिली आहेत. तुम्ही विचारलेल्या प्रश्ना वरुन तुम्हाला ह्या विषयात विषेश रस आहे हे कळत .

1) इतर राज्यातील ४० लाख शेतकरी झीरो बजेट शेती करतात - ह्यांना ही शेती कुणी शिकवली? ह्यांना ह्या पद्धतीबद्दल आधीपासूनच माहित होते का? त्यांना माहित असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का माहित नाही?
झीरो बजेट नॅचरल शेतीचे प्रणेते श्री पाळेकर आहेत. त्यांच्या पुर्वी ह्या प्रकारची शेती केली जात नव्हती. गेली १७ वर्ष अथक प्रयत्न करुन ते ह्या पद्धतीचा प्रसार करत आहेत. ४० लाख शेतकरी हे त्यांच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. ही संख्या वाढत आहे. त्या व्यतीरीक्त आणखी शेतकरी सुद्धा असतील जे ह्या पद्धतीने शेती करतात
पण मोजले गेलेले नाहीत.

२) आपल्या देशात दुष्काळ अन्य राज्यातही पडत असेल. तिथे ह्या शेतीनेच त्या संकटावर मात केली जातेय का? जसे की जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व्हर्मीकंपोस्टमध्ये जास्त असते त्यामुळे पाणी कमी लागते. की फक्त रासायनिक खतांचा शून्य वापर हेच एकमेव (पण अर्थात खूप महत्वाचे) धोरण ह्या शेतीत आहे?
दुष्काळ पडलेल्या प्रदेशातही झीरो बजेट शेती प्रभावी ठरलेली आहे. ह्या पद्धतीत जमिनीत निर्माण होणार्या ह्युमसमुळे हवेतील आर्द्रता शोषुन जमिनीत टिकवुन ठेवली जाते. त्यामुळे शेतीला अतिरिक्त पाण्याची गरज नसते. दुष्काळ काळात ह्याचा फायदा होतो.

३) सर्व प्रकारच्या जमिनीला ही पद्धत उपयोगी आहे का? ही पद्धती देशातील बर्याच राज्यात यशस्वी झालेली आहे. ह्याचा अर्थ वेगवेगळ्या जमिनीत व पिकावर ह्या पद्धतीचा वापर केला गेलाय !

४) सर्व प्रकारच्या पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे का? ही पद्धती देशातील बर्याच राज्यात यशस्वी झालेली आहे. ह्याचा अर्थ वेगवेगळ्या जमिनीत व पिकावर ह्या पद्धतीचा वापर केला गेलाय !

५) महाराष्ट्रात ही पद्धत किती शेतकऱ्यांनी किती काळापासून अवलंबिली आहे व त्यांना किती फरक पडला? रासायनिक खतांचा वापर टाळला जावू लागल्यानंतर ह्या पद्धतीने शेती सुरू केल्यावर जमिनीचा कस सुधारायला किती काळ जावा लागतो? महाराष्ट्रात ही बरेच यशस्वी शेतकरी आहेत ज्यांनी ही पद्धती अवलंबलेली आहे. त्यांचे बरेच व्हीडीयो उपलब्ध आहेत. जमिनीचा कस गेलेला असेल व त्याचा सुधारण्याचा काळ, त्यावरची माहीती श्री पाळेकरच देउ शकतील.

६) व्हर्मीवॉश (ह्या पद्धतीत त्याला काय म्हणतात ते माहित नाही) अतिशय उत्तम किटकनाशक म्हणून काम करते. एका गायीचे शेण व इतर सामान वापरून ३० एकरांना पुरेसे खत,नैसर्गिक किटकनाशक कश्याप्रकारे तयार होते? की ते इतके strong असते की फार कमी घालावे लागते? त्यावरची माहीती श्री पाळेकरच देउ शकतील.

७) इतर झाडांच्या पानांमधून आवश्यक मूलद्रव्ये मिळतात. ती सर्व झाडे लावावी लागतात की कुठूनतरी पानेच आणून कंपोस्टमध्ये वापरतात? इथे त्यांनी कंपोस्ट शब्द वापरला नाहिये पण ती आंबवण्याची पर्यायाने decompose करण्याची प्रक्रिया आहेच. जमिनीला नत्र पुरेसं मिळण्यासाठी लेग्युम्स लावतात हे माहित आहे. पण लेग्युम्स हे एक स्वतंत्र पीक म्हणून काढले जाऊ शकते. तशी ही झाडे आहेत का? वर त्यांनी वापरलेली झाडे सहज लावली जाऊ शकतील परंतु जमिनीला, शेतीला आवश्यक सर्वच मूलद्रव्ये त्यातून मिळतात का? माझ्या माहितीप्रमाणे गांडूळखतातच सर्वात जास्त आवश्यक मूलद्रव्ये एकाच वेळी व तीही प्रचंड प्रमाणात मिळू शकतात. पाने कोठुनही आणली तरी चालतात, जंगलातुन आणलेली बरी

वरीलपैकी काही प्रश्न अडाणीपणाचे वाटू शकतात. पण तरिही विचारतेय Happy जो जो कुणी जगातली कुठल्याही प्रकारची वाईट परिस्थिती शांतपणे फोकस्ड राहून प्रयास करून सुधारू बघतोय त्याबद्दल आदर आहेच.

रासायनिक शेतीचा इतिहास फक्त शंभर वर्षे जुना आहे. खरंतर भारतात त्याची सुरुवात हरित क्रांतीपासून झाली, म्हणजे उणीपुरी पन्नास वर्षेही झालेली नाही. भारतात रासायनिक शेती चा हरितक्रांती प्रकल्प करण्याची गरज का पडली असावी याबद्दल इथल्या वाचकांनी विचार करावा.

हरितक्रांती आणि रासायनिक शेतीच्या आधी भारतात कशी शेती केली जात होती याबद्दल धागाकर्ते मार्गदर्शन करतील काय?

बाकी, मागच्या वर्षी पाळेकरांची शेती करणारे २० लाख शेतकरी सांगितले जात होते, यावर्षी ४० लाख म्हणजे प्रगती अफाटच म्हणायला हवी.

पाळेकर स्वतः शेती करतात का हा प्रश्न बरेच जण विचारतात, त्याचे उत्तर धागाकर्त्यांकडे असेलच.

हे सगळं करायला देशी गाईचंच मूत्र आणि शेण का लागतं, त्यावरची माहिती श्री पाळेकर तरी सांगू शकतील का याबद्दल शंकाच आहे.
कीटकनाशकं, खतं न वापरल्याने आणि बाजारचे बियाणे न वापरल्याने खर्च चांगलाच कमी होईल. त्यामुळे जे काही उत्पादन होईल, तो सगळाच नफा. हा फंडा कळला.
पण याप्रकारे निघणार्‍या उत्पादनाचे प्रमाण रासायनिक खते-कीटके-नवे बियाणे वापरून केलेल्या शेतीच्या तुलनेत कुठे बसेल, याची आकडेवारी कुठे दिसली नाही.

<<<<<< हे सगळं करायला देशी गाईचंच मूत्र आणि शेण का लागतं, त्यावरची माहिती श्री पाळेकर तरी सांगू शकतील का याबद्दल शंकाच आहे. >>>>>>
शंका दुर करण्यासाठी श्री पाळेकर उपलब्ध असतात ( संपर्क माहिती माझ्याकडे नाहीय, नेटवर सहज मिळेल ),
त्यांची शेतीची मॉडेल्स ही ईंन्स्पेकशन साठी उपलब्ध आहेत. झीरो बजेट बद्द्ल माहीती त्यांच्या कडुन कोणत्याही आर्थिक फायद्याशिवाय दिली जाते.
श्री पाळेकर यांनी, गाईच्या शेणाच, गो मुत्राच रासायनीक विश्लेषण प्रयोग शाळेतुन केलेल आहे . त्याच बरोबर भारतात सहज उपलब्ध असलेल्या ईतर गुरां चा ही ह्या रासायनीक विश्लेषणात सहभाग होता. ( ही माहीती त्यांच्या ग्रेट भेट ह्या व्हीडीयोत आलेली आहे )

संकरीत बियाणे दर वर्षी नविन घ्यावे लागतात , रासायनीक खतांचा , किटनाशकां चा खर्च दर वर्षी वाढता असतो.
संकरीत बियाणे पेरुन आलेल्या पिकातील धान्यांचा बियाणे म्हणुन वापर करता येत नाही. जर पाऊस पडला नाही तर जमिनीत पेरलेले बाजारातुन घेतलेले महाग संकरीत बियाणे वाया जाते. नविन पेरणी साठी नविन बियाणे घ्यावे लागते.

देहरादुन नावाच्या बासमती तांदुळाची देशी जात आहे. त्याच पिक हे दर प्रती एकर १२ ते १६ क्विंटल रासायनीक खते वापरुन येत असे. पण ZBNF पद्धतीने ह्या तांदळाचे उत्पादन १८ ते २४ क्विंटल पर्यंत आलेल आहे.
बन्सी गहु च प्रती एकर उत्पादन हे ६ क्विंटल येत असे ते आता ZBNF पद्धतीने १८ क्विंटल पर्यंत वाढलेल आहे.
https://youtu.be/ZihEgF-sBvI

भरत, इकडे आकडेवारी, शंका काहीही विचारण्यात पॉईंट नाही आहे,
इतर प्रसिद्दी माध्यमात प्रसिद्ध झालेले व्हिडीओ, बातम्या इकडे शोधून शोधून टाकायच्या, शंका विचारल्यावर मला माहित नाही, पाळेकरा ना विचारा सांगा , असा प्रकार आहे,

इतर प्रसिद्दी माध्यमात प्रसिद्ध झालेले व्हिडीओ, बातम्या इकडे शोधून शोधून टाकायच्या हे भरत साहेबांना नविन नाही,

आता पर्यंत ते हेच करत आ लेले आहेत.

सिंबा तुमच्या कडे काही माहीती असेल तर सांगा, जिथे तिथे पिंक टाकण्याच काम करु नका !!

भारतीय सैन्याने सर्जीकल स्ट्राईक केला तर पुरावा मागणारे तुम्हीच होतात , हे विसरु नका !!

भारतात ज्याच नाण वाजत तेच खपत !!
लोक नक्कीच ईतकी हुशार आहेत की प्रत्येक वेळेला नाण वाजवुन घेतात !!

मिलिंद जाधव तुम्ही श्री. पाळेकर यांना व्यक्तीशः ओळखता का? ओळखत असाल तर त्यांच्या बरोबर एक दिवस मायबोलीवर AMA (ask me anything) करता येईल का?

">>>>>सिंबा तुमच्या कडे काही माहीती असेल तर सांगा, जिथे तिथे पिंक टाकण्याच काम करु नका !!>>>>>
मी काय करावे आणि काय करू नये हे सांगायचा तुम्हाला काडीमात्र अधिकार नाही हे खूब समजून असा,

वर विचारलेल्या एकही प्रश्नाला तुम्ही सरळ उत्तर दिले नाही आहे, असे असावे, तसे असेल नाहीतर पाळेकरांना विचारा (विचारून सांगतो असे पण नाही) अशी उत्तरे तुम्ही दिली आहेत,
त्यामुळे या धाग्यावरून जास्त माहिती पदरात पडणार नाही,
ही वस्तुस्थिती मी लिहिली तर इतके चिडण्यासारखे काय आहे?

नुसत्या माइक्रोबने काही होत नाही.
नाइट्रोजन खतातून पुरवावा लागतो वांगी,टमाटे वगैरेंना. तबेला म्हणजे ज्याठिकाणी म्हशी,गाईंना आंबोण - कडधान्याची फोलपटे,तेलबियांचा पिळून उरलेला लगदा -पेंड देतात त्या गोठ्यांतले शेण कुजवून बनलेले शेणखत फार उपयोगी असते याचा शोध काही आताच लागलेला नाही.

७० सालापासून ट्रॅक्टर वाढत चालले बैल नकोसे झाले हा मुद्दा विचारात घेतला तर शेती आणि जनावरे यांचे संतूलन बिघडले गेले आहे. पुर्वी गाईला गाय अथवा बैल होणारे वासरू चालत होते पण आता फक्त गायी म्हशी हव्यात मग अर्ध्या संततिचे काय करायचे? बैल गाडीला जुंपल्याने डिझल लागत नव्हते व शेतातलाच कडबा खायचे.
हे सर्व चक्र कोणी एक माणूस उलटा फिरवू शकणार नाही. प्राणी कमी झाले तर शेण/गोमुत्र काय ट्रॅक्टरमधून पडणार का?

>>>>>

भारतीय सैन्याने सर्जीकल स्ट्राईक केला तर पुरावा मागणारे तुम्हीच होतात , हे विसरु नका !!>>>>>
हो होतो, पण त्याचा इकडे के संबंध?

And since you have started...
विविध शेंडे बुडखे नसलेले धागे काढून, लोकांच्या प्रश्नाला उत्तर न देता आल्याने तोंडावर पडणारे तुम्हीच होतात , हे विसरू नका Lol

सिंबा, भरत .

जर धाग्यावर विषयाला धरुन लिहीता येत नसेल तर ईथे न आलेल चालेल !

Srd :

गेल्या दहा वर्षांत ७ लाख शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
चक्र उलट फिरवण्याच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणी ही करु दे !!

जिज्ञासा

आयडीया छान आहे, पण श्री पाळेकरांना एका दिवस बांधुन ठेवणे कितपत योग्य असेल ?
त्या पेक्षा जर ईथेच प्रश्न विचारले तर ते सर्व प्रश्न एकाच वेळेला पाळेकरांना विचारता येई त व त्यांचे उत्तर घेऊन
ईथेच देता येईल.

इथे उलट सुलट प्रश्न विचारण्याऐवजी जे लोक स्वतःच्या शेतात ही पद्धती वापरताहेत त्यांचे ढिगानी विडिओ यू ट्यूबवर आहेत ते बघा की. इथे लिहिणारे आणि विचारणारे दोघेही स्वतः शेतकरी असण्याची शक्यता आहे, पण ती संख्या खूप कमी असू शकते, बहुतेक लोक केवळ आपल्या तर्काने लिहितात.

मी झिरो बजेट बद्दल वाचून व विडिओ पाहून मला जे समजलंय ते असे -

1. भारतातील शेतकरी प्रशिक्षित नाहीये. शेतात खताची कमाल व किमान मात्रा किती असावी याचे ज्ञान नाहीये. आशा वेळी तो खते विकणाऱ्या तज्ञावर अवलंबून राहतो, कित्येक वेळा जास्त खत म्हणजे जास्त पिक हेच धरून चालतो.

आबाश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमीन निकृष्ट होत गेली. आणि आता अशी परिस्थिती आहे की खते दिल्याशिवाय पीक येणे अशक्य.

झिरो बजेट मध्ये जमिनीवर जीवामृत टाकून व ती सतत आचछादीत ठेऊन जमिनीत खूप खोलवर गेलेली गांडूळे व इतर माईकरोबस परत आणले जातात. हे सतत करून जमिनीचा कस सुधारला जातो. निरोगी जमिनीत येणारी पिके निरोगी येतात. त्यांच्यावर पडणारे रोग व किटकांचे निराकरण कडुनिंब व इतर काही वनस्पतींचा पाला वापरून केले जाते. रसायने वापरली तर गांडूळे व इतर उपकारक कीटक व जीव यांचा नाश होतो, म्हणून रसायने टाळली जातात.

2. झिरो बजेट म्हणजे काय? शेती करायला खर्च आहेच मग झिरो बजेट कसे? तर गुरुजींनी वेगवेगळी मॉडेलस बनवलीत. कुठल्या पिकाबरोबर कोणकोणती आंतरपिके आणि सहपिके घ्यावीत याची. शेतीचे नियोजन करतानाच विचारपूर्वक देणारी व घेणारी पिके एकत्र लावली तर शेतीचा कस सांभाळून शेती होते, रोगांचे व कीटकांचे हल्ले कमी होतात, परिणामी खर्च कमी होतो.

जर तुमचे मुख्य पीक ऊस असेल तर ऊस रुजवला की लगेच त्याच्या बरोबरीने शेतात अजून काही पिके पेरायची. हरभरा, मूग वगैरे. ह्या पिकांमुळे नायट्रोजन फिक्सिङ् होतेच शिवाय उसाचे पीक हाती येईपर्यंत तुमची ही पिके विकून होतात व या पिकांच्या कमाईतून उसाचा खर्च निघतो. रासायनिक खते अजिबात न वापरल्याने तो खर्च वाचतो. शेती करत असताना आजूबाजूला बांधावर कडुनिंब, करंज, निर्गुंडी, गुळवेल, पपई वगैरे लावणे अपेक्षित आहे, या झाडांची पाने वापरून वेगवेगळी अस्त्रे तयार केली जातात जी कीटकनाशक म्हणून काम करतात. एकूण एकदा ह्या मॉडेल वर काम सुरू केले की काही वर्षात शेतीची सगळी गरज शेतातूनच पुरवली जाते व वरखर्च कमी कमी होत जातो. शेतबियाने, मजूर वगैरे खर्च तर होणारच. पण अतिरिक्त खर्च कमी होतो, मुख्य पिकावरील जो खर्च आहे तो अंतर पिकांमुळे भरून निघतो व मूख्य पिकाचा सगळं नफा बोनस ठरतो. आशा प्रकारे मुख्य पीक झिरो बजेटात होते. म्हणून ही झिरो बजेट शेती.

3. इतके सोपे सरळ असताना ही शेती लोक का करत नाहीत?

शेतकरी प्रशिक्षित नाहीत हे प्रमुख कारण आहे. पारंपरिक शेत करत राहायचे, शेतीखात्यातून जो सल्ला मिळतो तो ऐकून शेत करतात. मोठ्या खत कंपन्या निरनिराळी प्रलोभने दाखवून स्वतःचा माल व बियाणे विकतात. यातून बाहेर पडायची हिम्मत लहान शेतकरी दाखवत नाही करण याच्या बाहेरही जग आहे हेच मुळी माहीत नाही.

4. महाराष्ट्र सरकारने झिरो बजेट शेतीबाबतीत पूर्ण अनास्था दाखवलीय. आजूबाजूचे मळे दुष्काळाने सुकले असताना झिरो बजेट मळे टिकल्याचे कित्येक व्हिडीओ आहेत. ते जादूने टिकलेले नाहियेत तर पूर्ण शेत ही एक इकोसिस्टिम झाल्यामुळे थोड्या पाण्यातही जमिनीची आर्द्रता टिकली व दुष्काळात शेते टिकली. पण सरकार अजून जागे झाले नाही, विद्यापीठे अजून जागी झाली नाहियेत. आंध्र सरकारने हा प्रयोग स्वीकारलाय, तिथल्या शेतकऱ्यांना फळे मिळताहेय, मिळतील.

5. यातून किती लोकांची सोय होईल? भारत रासायनिक शेतीकडे वळला करण पारंपरिक शेतीमधून वाढत्या लोकसंख्येचे पोट भरणे कठीण होऊ लागले. रासायनिक शेती नियंत्रित पद्धतीने केली असती तर आज तिचा असा भस्मासुर झाला नसता. या शेतीचे तोटे दिसायला लागल्यावर काही लोकांनी पर्याय शोधायला सुरवात केली. ऑरगॅनिक, नॅचरल वगैरे विविध पर्याय शोधले त्यापैकी हा एक पर्याय. पाळेकर गुरुजी याला झिरो बजेट आध्यात्मिक शेती म्हणतात, ही शेती करताना शेतकरी निसर्गाच्या जवळ जातो, त्याच्याशी एकरूप होतो, अंतर्बाह्य बदलतो.

ह्या प्रकारच्या पर्यायी शेतीमुळे वाढत्या लोकसंख्येची अमर्याद मागणी किती पुरी होणार याचे उत्तर मलाही हवंय, उत्तर सापडेल हे नक्की. कदाचित मी शेती सुरू केल्यावर मला अंशतः कळेलही.

महाराष्ट्रात या शेतीचा प्रसार व्हावा या उद्देशाने गुरुजींनी एक महाशिबिर ठरवलंय आणि जागा ठरवली दापोली. दापोली कृषी विद्यापीठाच्या माहेरात. नोव्हेंबर 11 ते 18 हे शिबीर चालेल. ज्या कोणाला या शेतीची माहिती हवीय, या प्रकारची शेती करण्यात रस आहे, त्यांनी शिबीराला जावे.

साधना ,

प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद !

आयडीया छान आहे, पण श्री पाळेकरांना एका दिवस बांधुन ठेवणे कितपत योग्य असेल ? >>AMA is not for the whole day. It's usually only 2-3 hours on a day that suits him (Mr. Palekar)
त्या पेक्षा जर ईथेच प्रश्न विचारले तर ते सर्व प्रश्न एकाच वेळेला पाळेकरांना विचारता येई त व त्यांचे उत्तर घेऊन
ईथेच देता येईल. >> that can be done too. If you are ready to be the bridge. You can read out all the questions raised by the Maayboli members to Mr. Palekar and write his answers on Maayboli. It'll be a great resource for everyone.

अश्विनी, शेतात आताही गांडूळे आहेत पण ती रसायनांच्या मारामुळे व त्यातल्या उष्णतेमुळे ती खोलवर गेलीत. देशी गाईच्या शेणामुतापासून तयार केलेले जीवामृत वापरून ही गांडूळे परत वर आणली जातात. जमीन तयार करायला वेळ लागतो. दर 15 दिवसांनी जीवामृत टाकले आणि पालापाचोळा पसरून जमीन झाकून ठेवली की हळूहळू गांडूळे परततात.

तू झिरो बजेट शेती पाहिलिस तर तुला चटकन कुठली शेती आहे हे ओळखता येणार नाही कारण एकतर जमीन अजिबात उघडी ठेवली जात नाही, तण देखील ठराविक उंचिनंतर कापून परत तिथेच पसरले जाते. शिवाय वेगवेगळी पिके एकत्र घेतली जातात. जमिनीवरचे आच्छादन बाजूला करून बघितलेस तर तिथे गांडूळखत दिसेल.

झीरो बजेट अन सेंद्रीय शेती यात काय फरक आहे. साधारण तीनेक महिन्यांपूर्वी भावाची चिकूची बाग फळतोडणीला आलेली जी त्याने अगदी सुरुवातीपासून जीवाम्रूत वापरून वाढवलेली. आमच्या कारखान्यावर पाळेकर सरांच लेक्चर झाले होते तेव्हा पासून भावाने रासायनिक खते वापरणे बंद केले. त्याने झीरो बजेट शेती मधील उत्पादन घेणाऱ्या ला फोन करून चिकू घेता का अशी चौकशी केली तर तिकडून हि सेंद्रिय शेती आहे झीरो बजेट नाही अस सुनावल. भावाला फोन करून विचारायला हवं नक्की काय ते

Pages