झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती !!

Submitted by मिलिंद जाधव on 1 July, 2017 - 04:30

शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!

अक्षरशः झीरो बजेट मध्ये किफायतदार शेती करता येते हे श्री सुभाष पा़ळेकर यांनी दाखवुन दिले ,
एका देशी गाई च्या सहाय्याने ३० एकर शेती करता येते, ह्या शेतीला कोणत्याही रासायनीक खताची गरज पडत नाही, ना कोणत्याही किटक नाशकाची !!

शेतकर्यांना कर्जमाफी करुन पुर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने चुक केलेली आहे अस परखड मत सुभाष पाळेकरांनी माडलेले आहे.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती बद्दल अधिक माहीती असलेल्यांनी ती ईथे द्यावी म्हणजे ईच्छुक लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
त्या शिवाय झीरो बजेट नॅचरल शेती पद्दतीने निर्माण झालेल्या शेत मालाचा चांगल मार्केटींग करण्यासाठी सुद्धा उपाय सुचवावेत. काही शेतकर्यांनी आपापले व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवुन आपल्या शेत मालाच मार्केटींग सुरु केलेल आहे. झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती चे फेस बुक पेजेस सुद्धा आहेत.

त्यांनी केलेल्या कामाचा आढावा येथे बघायला मिळेल ,

https://youtu.be/cBLWpSEJW9g
शेतीवर कीटक रोग का येतो त्याच वैज्ञानीक विश्लेषण. पाळेकर गुरुनीं किती खोलवर विचार संशोधन केलेल आहे त्याच ऊदाहरण आहे हे !!

GreatBhet Subhash Palekar (Part 1)
https://www.youtube.com/watch?v=68CkDaJjtYE

GreatBhet Subhash Palekar (Part २)
https://www.youtube.com/watch?v=dt2h7a7s9CQ

मधुकर पिसाळ, उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=GokLCkZYISQ&t=368s

एम आर चौगुले , उस शेतकरी,
https://www.youtube.com/watch?v=1KzyTmINriQ

डाळींब शेती
https://www.youtube.com/watch?v=a03P-8qOuSo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहो? आज कुठून अचानक? त्यांना पद्मपुरस्कार देऊन तर वर्ष झालंय... हे विडियोही जुनेच आहेत. तुम्हाला आज कळलं काय पाळेकरांबद्दल? काय विशेष?

पाळेकरांच नाव भाजपा सरकारविरोधातील कर्जमाफी आंदोलनात शेतकर्‍यांच्या बाजूने लढणारे कृषीतज्ञ म्हणुन ऐकले होते.

काँग्रेस सरकार च्या काळात देशात ७लाख शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत असा दावा पालेकरांनी केलेला आहे !!

https://www.youtube.com/watch?v=xRXd5Yb__6c

देशातील डायनॅमीक मुख्यमंत्री चंद्रा बाबु नायडुयांनी सुभाष पाळेकरांना अ‍ॅडव्हायझर म्हणुन नेमलेल आहे.
संपुर्ण आंध्र प्रदेश राज्य झिरो बजेट नॅचरल शेती खाली आणायचा निर्धार श्री चंद्रा बाबु नायडुयांनी केलेला आहे.

काहो? आज कुठून अचानक? त्यांना पद्मपुरस्कार देऊन तर वर्ष झालंय... हे विडियोही जुनेच आहेत. तुम्हाला आज कळलं काय पाळेकरांबद्दल? काय विशेष?>>>>> त्यांना आज कळलं म्हणून लिहिलं त्यांनी. मला सुध्दा माहित नव्हत.

तुम्हाला जर या कार्याची आधीच माहिती होती तर तुम्ही सुध्दा लिहू शकत होता की?

तुम्हाला जर या कार्याची आधीच माहिती होती तर तुम्ही सुध्दा लिहू शकत होता की?

>> हा काय प्रश्न आहे का? कुच्छभी?

कळा लागल्या जिवा. तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारला आहे. त्याच हक्कानी मी प्रश्न विचारला. का वाईट वाटले का.

आरशातील भेसुर चेहरा ऊघडा पडला का?

महोदय, जास्त आगावू बोलायची गरज नाही.

पाळेकरांवर 'जुन्या बातम्या' घेऊन धागा टाकायला 'आज काय निमित्त आहे' एवढे विचारले, त्यांना पद्म मिळाले तेव्हाच त्यांच्याबद्दल मी लिहिले होते. पाळेकरांबद्दल तर त्यांना पद्म मिळण्याच्या आधीपासून लिहित आहे., त्यांचा प्रचारही करत आहे.

तुम्हाला पाळेकरांबद्दल माहित नाही, आणि पाळेकरांबद्दल मला तुमच्याआधीपासून माहिती आहे. आता ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही ह्याचा दोष माझा नाही.

महोदय, एव्हढं विपुल लेखन आपण केले होते तर तुम्ही माझ्या त्या पोस्टवर हे सांगु शकत होतात. त्यासाठीच तुम्हाला नेहमी आरसा दाखवावा लागतो. कळल असेलच......

मी ते मान्य केलं आहे, कि मला ही माहिती नव्हती. पण त्यांनी धागा काढला तर काय बिघडलं हा साधासोपा प्रश्न होता.

शेतीतंत्र हे अचानक भरतवर्षात एकालाच का सापडावं?देशभरातल्या शेतकी विद्यालयांत अशा प्रकारचे प्रयोग झाले होते का? असा प्रश्न लगेच पडतो/विचार येतो. अर्थात हे तुम्हाला उद्देशून नाही फक्त एक शंका.
( व्हिडिओ पाहायचे बाकी आहेत.)

<<<<शेतीतंत्र हे अचानक भरतवर्षात एकालाच का सापडावं?देशभरातल्या शेतकी विद्यालयांत अशा प्रकारचे प्रयोग झाले होते का? >>>>
Srd : ऊत्तर पाहीजे असतील तर ,
Video जरुर बघा !!

शेतकी विद्यालये गेली ६० वर्षे चुकीची माहीती देत होते अस पाळेकर साहेबांनी सिद्ध केलेल आहे.

पण व्हिडिओशिवाय थोडी माहितीही लिहा की झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय? कसं? वगैरे. >>>
हो खरंच लिहा.. नविन विषय वाचायला आवडतील.

झीरो बजेट नॅचरल शेती पद्दती बद्दल अधिक माहीती असलेल्यांनी ती ईथे द्यावी म्हणजे ईच्छुक लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. >>> एवढं स्पष्टं लिहिलेलं असताना त्याला फाटे फोडायची काही गरज आहे का ?
एका देशी गाई च्या सहाय्याने ३० एकर शेती करता येते, ह्या शेतीला कोणत्याही रासायनीक खताची गरज पडत नाही, ना कोणत्याही किटक नाशकाची !! >>> एका देशी गाईने ????

श्री,

श्री सुभाष पाळेकर सराच्या मते फक्त एका देशी गाईच्या भरोश्यावर ३० एकर जमिनी वर शेती घेता येते. ह्या शेतीला कोणतेही रासायनीक किंवा सेंद्रीय खत ( कांपोस्ट ) लागत नाही.

देशी गाईच्या गोमुत्रावर, शेणावर विशीष्ठ प्रकारे प्रक्रीया करुन सुभाष पाळेकर जीवामृत व अमृत पाणी नावाची दोन रसायने बनवतात. जीवामृत हे ठिबक सिंचना प्रमाणे वनस्पतीच्या मु़ळाशी दिल जात.

अश्विनी के , राहुल

ZERO BUDGET NATURAL FARMING ही पद्धती श्री सुभाष पाळेकर यांनी निर्माण केलेली आहे.
ह्या पद्धतीत, शेती करताना कोणत्या ही प्रकारचे खर्च अपेक्षीत नाहीत. कोणत्याही प्रकारचे खत, किटनाशक वापरायची नाहीत. स्वतःच्या शेती साठी एक देशी गाईची गरज आहे. त्या गाई पासुन मिळालेल्या गोमुत्र व शेणापासुन जिवामृत नावाच रसायन घरच्या घरी बनवुन शेतात वापरायच आहे. एका गाई पासुन ३० एकर जमिनीत शेती करता येते अस श्री पाळेकरांच म्हणण आहे.

श्री पाळेकर ही पद्धती पुर्ण पणे फुकट शिकवतात, कोणतेही मान धन ते घेत नाहीत. देशभरात ह्या पद्धतीच्या प्रसारासाठी ते आपल्या स्वतःच्या खीशातुन खर्च करुन प्रवास करतात.

अमरावतीचे श्री पाळेकर स्वतः सधन शेतकरी कुटुंबातुन आहेत. शेतकी विद्यालयात काही वर्ष घालवल्यावर तिथे
मिळालेल्या ज्ञानावर पाळेकरांना काही भरोसा राहीला नाही. १९८८ पर्यत ईतरां सारखी शेती करताना पाळेकरांना काही गोष्टी जाणवल्या. उत्पादन ईतक घटल की शेतीत राम राहीला नाही म्हणुन त्यानी पर्यायी व्यवस्था निर्माण
करण्याचा ध्यास घेतला.

शेती करण्यायोग्य कोणतीही मुलद्रव्य जमिनीत असत नाहीत, म्हणुन रासायनीक खताच्या रुपाने जमिनीत करण्यात येणार्या शेतीनुरुप लागणारी मुलद्रव्य शेत जमिनीत टाकावीच लागतात , हे ज्ञान शेतकी विद्यालयात शिकवल जाते.

पण श्री पा़ळेकरांनी जंगलातील झाडांचा, वनस्पतीचा सखोल अभ्यास केला व त्यांना अस आढळुन आल की जंगलातल्या वनस्पती, झाडे फळांनी लगडलेली असतात, त्या झाडाच्यां पानांचा अभ्यास केला असता, त्यात पानात लागणारी सर्व मुलद्रव्य मिळाली.

सुधारीत बियाणे व भारताची पारंपारीक वाण ह्यांच्यात संशोधन केल्याने त्यांना खुप वेगवेगळे रिझल्टस मिळाले.
एकाच वेळेला साध्या जमिनीत सुधारीत बियाणे व भारताची पारंपारीक वाण लावली, रासायनीक खते न घालता
भारताची पारंपारीक वाणेचे उत्पादन हे सुधारीत बियाण्यापेक्षा जास्त निघाले. पण जेंव्हा रासायनीक खते घातली त्यावेळेला सुधारीत बियाण्याचे उत्पादन, भारताची पारंपारीक वाणेच्या उत्पादना पेक्षा बरच जास्त निघाले .

याचा अर्थ असा निघत होता की सुधारीत बियाणे मुद्दामहुन अशी बनवलेली असतात की त्यांच्या उपयोग रासायनी खता बरोबरच करता येईल. अशी सुधारीत बियाणे ही रोग निरोधक नसतात त्यासाठी रासायनीक किटनाशक सुद्धा लागतातच.

रासायनीक खते व किटनाशके घातल्याने जमिनी सिमेंट सारख्या कडक व्हायला लागल्या, त्या मध्ये नांगर चालेनासा होतो म्हणजे, ट्रॅक्टरनेच नांगरणी करायला लागते.

जीवामृत व अमृत पाणी बनवण्यासाठी देशी गायच का ?

श्री पाळेकरांच्या संशोधनात हे पुढे आले आहे की, देशी गाय, म्हैस, जर्सी फ्रेसर होल्स्टेन गाय ह्या सर्व प्राण्यांच शेण तपासल्यावर फक्त देशी गाईच्या शेणात सर्वात जास्त बेनेफिशीयल माक्रोबस त्यांना सापडले (३ कोटीच्या आसपास ) त्या विरुद्ध जर्सी गाईच्या शेणात काही बेनेफिशीयल तर काही घातक बॅक्टेरीया सापडले.

त्या मुळे देशी गायीच शेण व गोमुत्र त्याम्नी वापरण्यास सुरुवात केली. १० दिवसा पर्यंतच गाईच शेण हे ताज समजल जात तर गोमुत्र जितक जुन तितक चांगल. जीवामृत बनवण्यासाठी ताज गाईच शेण व जुन गोमुत्र
लागते. त्या दोना व्यतिरिक्त काळा गुळ , बेसन, बैलाच शेण, मुठभर शेतातली माती, पाणी ईतक्याच गोष्टींची गरज असते. बनवलेल जीवामृत १० -१२ दिवस झाडाच्या सावलीत ठेवल मग ते वापरण्यास योग्य होत. फिल्टर करुन ठिबक सिंचनाने पाण्यात डायल्युट करुन जीवामृत वापरल जात.

दशपर्णी काढा

दशपर्णी काढा नावाचा किट नाशक ही श्री पाळेकर साहेबांनी बनवलेला आहे. कडुनीब , धोत्रा , एरंड, करंज सारखी १० वनस्पतीची प्रत्येकी २ कीलो पाने गोमुत्रात व २०० लि पाण्यात आंबवुन दशपर्णी काढा बनवला जातो.
ह्यावर व्हीडीयो उपलब्ध आहे.

श्री पाळेकरांच्या शिष्य शेतकर्यांनी कापसा पासुन ते उसापर्यंत द्राक्षापासुन ते संत्रे मोसंब्या पर्यंत सर्व प्रकारचे उत्पादन कोणत्याही किडी, रोगाशिवाय यशस्वी रित्या घेऊन दाखवलेले आहे. त्या शेतक र्यांची मुलाखत व्हीडियो उपलब्ध आहेत.

DISCLAIMER :

मी वर लिहीलेले सर्व आपल्या परीने आपल्या आकलनाच्या कुवती प्रमाणे लिहीलेले आहे. मी लिहीलेल्या माहीतीत चुक असण्याची शक्यता आहे. हे लिहीलेल सर्व बरोबरच आहे अस माझ म्हणण नाही. मी कोणी तरी तज्ञ आहे असा ही माझा दावा नाही .
श्री पाळेकरांनी केलेल्या कामाचा आदर वाटला व ईथल्या लोकांना त्याचा फायदा हो ऊ शकेल अस वाटल्याने सर्व ईथे मांडु शकलो.

देशी गाय ह्या एका शब्दामुळे ईथे हाणामारी होण्याची शक्यता आहे. मला त्यात काहीही स्वारस्य नाही.

इथे लिंका डकवणार्‍यांपकी कुणी किमाण डालडाच्या डब्यात तुळस जगवून पाहिली आहे का?, असा सहज प्रश्न पडला.

हे जे काय चाल्लंय ते अभद्र व भेसूर आहे हे नक्की.

Pages