'मॅग्नोलिया हेरिटेज' केस

Submitted by हायझेनबर्ग on 12 June, 2017 - 23:05

तीन वर्षांपूर्वी ऊटी जवळच्या नयनरम्य टेकड्यांवर 'प्रोटीआ' ग्रूपने वीकेंड होम धर्तीवर 'कॉटेजेस आणि चॅले' स्टाईलघरांचा 'डॅफोडिल वॅली सिटी' हा ६५०० घरांचा प्लान जसजसा प्रत्यक्षात ऊतरावयाला सुरूवात केली तशी वॅलीतली एकंदर वर्दळ आणि डॅफोडिल सिटीला भेट देणार्‍या कुटंबांमध्ये पर्यटनाबरोबरच घरखरेदी अशी टूम निघू लागली. प्रोटीआ ग्रूपची शहरातली ऑफिसेस बंगळूर, मैसूर, कोची मधल्या नवश्रीमंत ग्राहकांना हेरून शहरातूनच लक्झ्युरी बसेसमधून अश्या ग्राहकांची पाठवणी डेफोडिल वॅली सिटीला करू लागली. सिटीला भेट देणार्‍या ग्राहकांची वाढती संख्या बघून बिझनेस मिळवण्यासाठी देशातली आघाडीची 'टेनिसन' बँकही कशी मागे राहिल? बँकेनेही वॅली मध्ये आपले ऑफिस ऊघडले आणि पाच होम लोन ऑफिसर्स कम सेल्स एजंट्स ची तिथे नेमणूक केली. पराग कामत, दिनेश शर्मा, केविन परेरा, सिराज कांचवाला आणि राहूल त्रिपाठी. कामाचा वाढता लोड पाहून सगळ्यांच्या मदतीसाठी वर्षापूर्वी अरूण राव ह्या ज्युनिअरलाही ट्रेनिंग साठी पाठवले होते. बँकेने ह्या सहा जणांच्या राहण्यासाठी स्टाफ क्वार्टर्स म्हणून डॅफोडिल सिटीतच वर्षभरापूर्वीच तयार झालेली तीन मजली 'मॅग्नोलिया हेरिटेज' सध्यापुरती पाच वर्षांच्या भाडे करारावर प्रोटीआ ग्रूपकडून बांधून घेतली होती. पाच वर्षानंतर हा करार वाढवता येणार होता किंवा बिल्डिंग पुन्हा प्रोटीआ ग्रूपकडे ह्स्तांतरित करता येणार होती.

डॅफोडिल्स वॅली मध्ये शाळा,मॉल्स वगैरेंची गरज नसल्याने वीकेंडला येणार्‍या ग्राहकांना राहण्यासाठी 'ग्रीनलॅंड ईन' हे थ्री स्टार हॉटेल, काही रेस्टॉरंट्स, एक छोटेसे क्लिनिक व एका डिपार्टमेंटल कम मेडिकल स्टोर शिवाय फार काही नव्हते. या पूर्ण एरियाला वॅली सिटीच्या प्लान मध्ये 'बिझनेस सेंटर' नाव होते. प्रत्येकी दोन बेडरूम्सच्या सहा फ्लॅट्सची 'मॅग्नोलिया हेरिटेज', बिझनेस सेंटरमध्येच असलेल्या प्रोटीआ ग्रूपच्या मॉडेल हाऊसेस, ऑफिसेस आणि त्याला लागूनच असलेल्या टेनिसनच्या ऑफिसपासून साधारणतः चार किलोमीटर अंतरावर असावी. चोहो बाजूंनी दाट झाडींनी वेढलेली मॅग्नोलिया हेरिटेज, बिझनेस सेंटरपासून वॅली सिटीचे प्रमुख आकर्षण असलेल्या 'मिल्किवे फॉल्स आणि 'बोटॅनिकल गार्डन' कडे जाणार्‍या एकमेव रस्त्यावर होती. ह्या निसर्गरम्य परिसरात येणार्‍या पर्यटकांछ्या डोळ्यात खुपू नये म्हणून मोठ्या शिताफिने मॅग्नोलिया हेरिटेज दाट झाडींमध्ये लपवण्यात आली होती. ट्रेकिंग, हायकिंग ची ईच्छा असणारे बरेच ग्राहक बिझनेस सेंटर वरून डॅफोडिल सिटीची 'वॅली टूर' बस न घेता ह्याच रस्त्याने चालत फॉल आणि गार्डनकडे जाणे पसंत करत. अश्या ग्राहकांची संख्या वाढू लागली तसे प्रोटीआ ग्रूपने त्यांच्या सोयीसाठी ज्यूस, पाणी, फळे, कोल्ड्रिंक, स्नॅक्स विकणारे 'लिली'ज स्नॅक्स सेंटर' ह्या रस्त्यावर ऊभारले. स्नॅक्स सेंटर मध्ये थांबणार्‍याला मागच्या झाडींमध्ये केवळ फर्लांगभर अंतरावर तीन मजली मॅग्नोलिया हेरिटेज ऊभी आहे हे सांगूनही खरे वाटले नसते.

टेनिसनच्या सगळ्याच ऑफिसर्सकडे आपापल्या कार्स असल्याने जाण्यायेण्याच्या बाबतीत कोणी असे खास एकमेकांवर अवलंबून नव्हते. ऊटी शहर ही दोन तासांवरच असल्याने गरज पडल्यास जाऊन येणेही अगदीच सोपे होते. पाचही ऑफिसर्स तसे तिशी पस्तीशीचेच असावेत आणि सहा महिन्यांपूर्वीच रुजू झालेला अरूण साधारणतः पंचवीशीचा. पण ऑफिस टायमिंगनंतर वेळ घालवण्यासाठी मात्रं त्यांना एकमेकांच्या सोबतीशिवाय पर्यायच नव्हता. करमणूकीची साधने वॅली सिटी मध्ये फारशी नव्हतीच, शाळा/कॉलेजही नसल्याने कुणाला कुटुंब-कबिल्यासहित वॅली सिटीमध्ये राहणे जमण्यासारखे नव्हते. टेनिसनचे सगळेच ऑफिसर्स बॅचलर असण्यामागे कदाचित तेही एक कारण होतेच. वॅली सिटीमधल्या एका रेस्टॉरंटने सहाही जणांची तीनवेळा खाण्यापिण्याची सोय केली होती पण महिन्यागणिक खाण्याच्या बिलापेक्षा जोमाने वाढणारे 'पिण्याचे' बिल टेनिसनच्या ऑफिसर्सचे एकमेकांच्या सोबतीने वेळ घालवण्यासाठीचे दररोजच्या करमणूकीचे एकमेव साधन होते. सहा पैकी कुठल्याही एका फ्लॅटमध्ये आठाच्या ठोक्याला एकत्रं जेवायला बसलेली टेनिसनची ही मंडळी एकेक घोट रिचवत एकेमेकांचा निरोप घेवून आपापल्या फ्लॅटमध्ये बेडवर जाऊन पडेपर्यंत रात्रीचे किमान ११:३०-१२ तरी होत. स्नॅक सेंटर झाल्यापासून मॅग्नोलिया वासियांच्या खासकरून केविनच्या आधीच वाढत्या 'पिण्याच्या' ब्रँड्समध्ये अजून काही 'ब्रँडसची' भर पडली... फोर-स्क्वेअर, मार्लबोरो, विल्स, गोल्ड फ्लेक.

मॅग्नोलिया वासियांचे हे असेच रुटीन मागच्या तीन वर्षांपासून चालू होते. 'डॅफोडिल वॅली सिटीची' वाढती लोकप्रियता आणि भेट देण्यास येणार्‍या ग्राहकांचा वाढता ओघ वाढत राहिला तसे टेनिसनच्या ऑफिसर्सना प्रत्येक लोन केसमागे मिळणारे कमिशनही महिन्याकाठी वाढतंच होते. वॅली सिटीमध्ये राहणे अतिशय बोरिंग असूनही वाढत्या सॅलरी/कमिशनने सगळ्यांच्या पायात जणू बेडीच घातली होती. नेमके वीकेंड आणि सुट्यांचा मोसम हेच बिझनेसच्या दृष्टीने महत्वाचे दिवस असल्या कारणाने टेनिसन ऑफिसर्सना गरज पडल्यास आठवड्याच्या ईतर दिवसातंच सुट्या घ्याव्या लागत. तसेही सगळे ऑफिसर्स मूळ पुण्या मुंबईचेच असल्या कारणाने एक-दोन दिवसांची सुटी न घेता वर्षातून दोन-तीन वेळा दोन आठवड्यांची सुटी घेवून जाणेच सगळ्यांना पसंत होते. थोडक्यात मागच्या तीन वर्षांपासून टेनिसनच्या ऑफिसर्सचे आजिबात रंग नसलेले, कंटाळवाणे आयुष्य नयनरम्य, रंगीबेरेंगी डॅफोडिल वॅली मध्ये अव्याहतपणे चालू होते.

सहा महिन्यांपूर्वी आलेल्या वसंत ऋतूमध्ये डॅफोडिल वॅलीने डेफोडिल्स, मॅग्नोलिया, डेलिया आणि पिट्युनिया चा नवा रंगीबेरंगी चेहरा ओढला आणि मॅग्नोलियावासियांच्या कंटाळवाण्या आयुष्यात थोडा बदल घडून आला. पराग त्याची बर्‍याच काळापासूनची गर्लफ्रेंड जेनेलियाशी डिंसेबर मध्ये एंगेज होणार होता. डॅफोडिल वॅली सिटीमध्ये येण्यापूर्वी तो सिनेसॄष्टीत रिपोर्टर असलेल्या जेनेलियाबरोबर मुंबईमध्ये काही काळ लिव-ईन रिलेशनशिपमध्येही रहात होता. मार्च दरम्यान वसंतात फुलणार्‍या फुलांचा पीक मोसम असतांना जेनिलिया महिनाभर मॅग्नोलियामध्ये राहून गेली आणि त्यादरम्यान ती सगळ्या ग्रूपमध्ये चटकन मिसळून गेलीसुद्धा. त्यांच्या लेट नाईट पर्यंत चालणार्‍या सिटिंग्स मध्येही तिच्या सिनेजगतांच्या गप्पांनी सॉलिड रंगत येत असे. सहा पुरुषांच्या कंपनीत बरळणं चालू होऊन आधाराशिवाय चालता न येण्याईतपत ड्रिंक्स करतांनाही ती अजिबात लाजत वा बुजत नसे. बाकीचेही तिची 'मित्राची होणारी बायको' अशी भीड न ठेवता तिला 'सेवंथ मॅन ईन द रूम' असे मित्रासारखेच समजत. त्यांच्या 'फॉर मेन ओन्ली' टाईपच्या विनोदांची लेवलही ती होती म्हणून कधी चेंज झाली नाही, तिलाही कधी ह्या विनोदांमध्ये वावगे वाटले नाही. तिच्या संसर्गजन्य हसण्यातून ती ही ह्या विनोदांना हातभारंच लावत असे.
पण जेनेलिया आल्या पासून अरूणची चांगलीच पंचाईत होऊन बसली होती. ईथे येण्याआधी अगदी साधे सरळ आयुष्य जगलेल्या अरूणने नुकताच कुठे 'पहिला पेला' हातात घेतला होता. कॉलेजात गर्लफ्रेंड वा ऑफिसमध्ये स्त्री सहकार्‍यांशी संवादाचा आजिबातंच अनुभव नसल्याने तो जेनेलिया असतांना बुजूनच जाई. तिच्याशी नजर देवून दोन शब्दं बोलणेही त्याला शक्य होत नसे. मुलींच्या बाबतीत त्याचा हा लो-कॉन्फिडन्स ईतर मॅग्नोलिया वासियांच्या विनोदाचा विषय झाला नसता तर नवलंच. दोन पेग पोटात जातांच त्याची फिरकी घेण्याचा सगळ्यांचाच ऊत्साह १० पट वाढत असे आणि जेनेलियाही ह्यात मागे नसे. जेनेलियाला प्रपोज करण्याचे नाटक करण्यापासून, स्त्री-पुरूष संबंधांबद्दल त्याला नको-नको ते प्रश्न विचारून त्याची खिल्ली ऊडवण्यात त्यांना कोण मजा वाटत असे. त्याला त्रास देण्यात सगळ्यात आघाडीवर कोण असेल तर केविन, बाकींच्यांनी त्याला दोन तीन वेळा अजून जोक्स करण्यास आडकाठी करेपर्यंत त्याचे अरूणची खिल्ली ऊडवणे थांबत नसे. पण अरूणने केविनचे किंवा ईतर कुणाचे बोलणे कधी मनावर घेतल्यासारखे वाटले नाही, तो नेहमी हसत लाजतच राही. दिवसेंदिवस ग्रूपमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढत होता, जेनेलियानेही त्याच्याशी गप्पा वाढवत त्याला मुलींशी संवाद साधण्याच्या कलेचे मंत्र शिकवत त्याच्या वाढत्या आत्मविश्वासाला हातभार लावला होता. ती परत जातांना अरूणने तिला मनापासून दिलेले गिफ्ट त्याला तिच्याबद्दल वाटत असलेली कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतिकंच होते जणू. जेनेलियाला असेपर्यंत जमेल तेव्हा परागचे काम आपल्या अंगावर घेत बाकीच्यांनी त्याला तिच्याबरोबर वेळ घालवण्याची सोय करून दिली. कायम मुंबईतल्या गर्दीची आणि माणसांच्या संपर्काची सवय असलेली जेनेलियाला जेव्हा पहिल्या आठवड्यातच बोअरडमने वैतागून परत जाण्याबद्दल बोलू लागली तेव्हा मग सगळ्यांनी आपल्या आठवड्यातल्या सुट्या अ‍ॅडजस्ट करत दररोज कोणीना कोणी तिला कंपनी द्यायची असे ठरवले.

जेनेलिया गेल्यावर दिनेशही दोन आठवड्यांच्या सुटीत पुण्याला जावून आला होता. त्याचे खूप वर्षांपासूनचे प्रेम असणार्‍या बंगाली मुलीशी 'देबोलिनाशी' लग्नं करण्यासाठी बरेच दिवसांपासून तो त्याच्या कर्मठ आईबाबांची मनधरणी करीत होता. ह्या खेपेला मात्रं त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नाला मान्यता मिळाली. अर्थात दिनेशच्या आयुष्यात असे काही चालू आहे ह्याची ईतर मॅग्नोलिया वासियांना आजिबात कल्पना नव्हती. त्याने जेव्हा लग्नं करत असल्याचा गौप्यस्फोट सुटीवरून आल्यावर पहिल्याच रात्रीच्या जेवणादरम्यान केला तेव्हा सगळ्यांनी पहिल्याने तर त्याला हे लपवून ठेवल्याबद्दल खूप बोलून घेतले आणि नंतर मिठी मारत त्याचे अभिनंदन केले. केविन तर देबोलिनाचा फोटो दाखवच म्हणत दिनेशच्या मागेच पडला. एक दोघे जण म्हणालेही 'अरे जाऊदे त्याला वाटेल तेव्हा दाखवेल' पण केविनने जेनेलियाचा दाखला देत त्यात काय एवढे लपवायचे म्हणत पिच्छाच पुरवल्यावर शेवटी नाईलाज होवून दिनेशने फोनवरचा फोटो दाखवला. फोटो बघून केविन म्हणाला 'अहाहा! बॉस एवढी मालदार पार्टी असेल तर मी कोणी कितीही आग्रह केला असता तरी फोटो दाखवला नसता'. केविनच्या जोकवर सगळ्यांनी अवघडून हसल्यासारखे केले आणि दिनेश तडकाफडकी जेवण सोडून निघून गेला. दुसर्‍या दिवशी दिनेश ऑफिसमध्येही कुणाशी फार काही बोलला नाही. तो रात्री सिराजच्या रूमवरही जेवण्यासाठी आला नाही तेव्हा पराग स्वतः दिनेशकडे गेला आणि त्याला घेवून जेवायला आला. त्यांचे नेमके काय बोलणे झाले कळाले नाही पण आला तेव्हा दिनेशचा मूड बरा दिसत होता. केविन आणि दिनेशमध्ये आलेल्या तणावाची परिणिती जेवणानंतर त्याने पिण्याला न थांबता काढता पाय घेण्याने होऊ लागली. बाकीच्यांचाही मूड कमी होऊ लागला आणि त्याबरोबरीने ग्रूपमध्ये पिणे कमी होत गेले ते गेलेच, पण सगळ्यांचे आपापल्या रूममध्येच बसून पिणे मात्रं चालूच राहिले.

सर्वात जास्तं लोन केसेस क्लोज करणार्‍या आणि ग्राहकांकडून हाय सॅटिस्फॅक्शन रेटिंग्ज मिळवणार्‍या ऑफिसरला टेनिसन मॅनेजमेंटचा पगाराच्या १०% एक्स्ट्रा ईन्सेंटिव पगार / बोनस देण्याचा नियम होता. ऑफिसर्स मध्ये हेल्दी काँपिटिशन वाढीस लागावी असा मॅनेजमेंट चा सरळ सरळ हेतू असावा. केस बेसिस वर फिक्स्ड कमिशन तर होतेच आणि १०% ईन्सेंटिव थोडक्यात पर्फॉर्मन्स बोनस, मॅनेजमेंटचा होरा बरोबर निघाला. नियम अंमलात आणल्या पासून सगळेच ऑफिसर्स प्रत्येक केस वर जास्तं मेहनत घेवू लागले. १०६ केसेस क्लोज करत पहिल्या वर्षी केविननेच हा बोनस पट्कावला आणि त्यापाठोपाठ राहूलने ९४ केसेस क्लोज केल्या होत्या. केविनची ईंप्रेसिव पर्सनॅलिटी, त्याचे पॉलिश्ड बोलणे, समोरच्याचा ईंट्रेस्ट लक्षात घेवून त्यावर गप्पा मारत आपली छाप पाडणे, लोनची किचकट प्रकिया सोप्या पद्धतीने सांगणे, घराच्या पसंतीनंतर शक्यतो लोन प्रोसेस पासून लांब राहणार्‍या ग्राहकांच्या 'पत्नी' वर्गालाही महत्व देत त्यांना प्रोसेस समजावून सांगणे अश्या सगळ्या सॉफ्ट स्कील्स आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्याच्या कौशल्यामुळे राहूलसहित सर्वांनाच केविनशी स्पर्धा करणे पहिल्या वर्षी जड गेले. पण दुसर्‍यावर्षी मात्रं आशर्यकारक रित्या राहूलने केविनच्या ११४ केसेसच्या तुलनेत ११६ केसस क्लोज करत 'बेस्ट परफॉर्मर' चा बोनस पटकावला. त्या पूर्ण वर्षात राहूलने स्वतःवर खूपच मेहनत घेतली होती. रात्रं रात्रं जागून ऑनलाईन कोर्सच्या असाईनमेंटसचे कंप्लिशन, ग्राहकांची मानसिकता समजण्यासाठी तज्ञ लोकांशी पत्रव्यवहार, दोन आठवड्यांच्या सुटीमध्ये घरी न जाता तज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे, सेमिनार, कार्यशाळा अटेंड करणे असे आणि बरेच काही.
मात्रं चालू असलेल्या पूर्ण वर्षभर केविनने राहूलच्या कामावर त्याच्या क्लायंटस समोरच काहीतरी खुस्पटं काढून अपूर्ण पेपरवर्क, चुकलेले नंबर्स आणि डेड्लाईन्स, मॅनेजमेंटकडे वजन नाही ह्या आणि अश्या अनेक कारणांनी ताशेरे ओढले होते. एक दोन क्लायंट्सना परस्पर फोन करून लोन ऑफिसर चेंज करून घ्या असेही सुचवले होते. हे कमी की काय म्हणून त्याने अजून ऑफिसर नसलेल्या अरूणच्या सगळ्या केसेसवर ऑफिसर म्हणून आपलेच नाव घालत त्या केसेस वरती रिपोर्ट केल्या होत्या. क्लोज झालेल्या केसेस ची संख्या बघता, अगदी थोड्या फरकाने 'बेस्ट पर्फॉर्मर' केविनच असणार ह्यावर आता जवळ जवळ शिक्का मोर्तब झाले होते. राहूलने ह्यावर फार काही रिअ‍ॅक्ट न होण्याचेच धोरण स्वीकारले. केविनच्या ह्या अनप्रोफेशनल आणि चीड आणाणर्‍या कृती नंतरही कमालीच्या शांत असलेल्या राहूलला पाहून बाकी सगळेच अचंबित झाले होते.

एक लग्नं झालेला भाऊ सोडला तर केविनला कोणी नातेवाईक नव्हते त्यामुळे देश विदेशातली पर्यटन स्थळे भटकणे हाच केविनचा प्रत्येक सुटीचा प्लॅन. ग्रूपमध्ये आपल्यामुळे वाढलेला तणाव पाहून त्याने तडकाफडकी दोन आठवड्यांची सुटी टाकली आणि तो हवाई बेटांची सफर करून आला. त्याचे असे जाणे बहुधा चांगल्यासाठीच झाले असावे कारण तो आला तेव्हा मॅग्नोलिया वासियांचे खाणेपिणे पुन्हा सुरळीत सुरू झाले होते. त्यालाही चांगले वाटले. तो येताच दिनेशसहित सगळ्यांनी त्याच्या ट्रीपबद्दल भरपूर गप्पा मारल्या. केविनही आपल्या ट्रीपबद्दल भरभरून सांगत राहिला, फोटो, विडिओ दाखवत राहिला. त्याला भेटलेल्या एका ऑस्ट्रेलियन मुलीबद्दल, तिच्याबरोबर केलेल्या मजेबद्दल रंगवून काहीबाही सांगत राहिला. पण हे केविनचे नेहमीचेच म्हणत सगळ्यांनी त्याचे बोलणे हसण्यावारी नेले. केविनने सगळ्यांसाठी आणलेले एकाच साईझचे हवाईयन शर्ट्स सगळ्यांनी घालून पाहिले तेव्हा ती एकंच साईझ सगळ्यांना व्यवस्थित फिट बसली. पुढचा अर्धा तास सगळ्यांनी आपल्याला हवी असलेली डिझाईन दुसर्‍याच्या हातात असल्यास ती त्याच्याकडून मिळवण्यात एकमेकांची मनधरणी चालू केली. सिराज आणि राहूल दोघांचे शर्ट अदलाबदली करण्याचे डील तडीस गेले. अरूण आणि परागला, परागच्या हाताला लागलेली एकंच डिझाईन आवड्ल्याने आणि पराग हटून बसल्याने अरूणला हातात आलेल्या डिझाईनवरच समाधान मानावे लागले. शेवटी ऊरलेल्या दोन सारख्याच डिझाईनच्या शर्टपैकी एकावर दिनेशने समाधान मानले आणि ऊरलेला दुसरा केविनने ठेऊन घेतला.
प्रेमाचाच व्यवहार होता सगळा, टेनिसनच्या मॅग्नोलियावासियांमध्ये सगळे आलबेल असल्याची नांदी होती जणू.

पण मॅग्नोलियाच्या नशिबात कदाचित ऑगस्टची ती सकाळ 'ऑल ईज नॉट वेल' चा पुकारा करतंच ऊगवली. मॅग्नोलियाच्या मागच्या बाजूच्या फरशीवर पाण्याची मोटार चालू करायला गेलेल्या मॅग्नोलियाच्या सिक्युरिटी गार्ड सुरेशला हवाईयन शर्ट घातलेल्या केविनचे डोके फुटलेले निष्प्राण शरीर सापडले.

पोलिस डायरीतल्या नोंदी

मेडिकल रिपोर्ट
केविन
- ऊंचावरून पडल्याने डोके फुटून मृत्यू
- रक्तामध्ये प्रचंड प्रमाणात अल्कोहोल सापडले
-एवढे अल्कोहोल प्राशन केलेल्या अ‍ॅवरेज मनुष्याला स्वतःचा तोल सावरत ऊभे राहणे अशक्य. पण अट्टल दारूबाज असल्यास असा मनुष्य जवळचे अंतर व्यवस्थित चालून जाऊ-येवू शकतो
-विक्टिम काही वर्षांपासून चेन स्मोकर असावा
-बाल्कनी आणि खाली फरशीवर सापडलेल्या सिगरेट बट्सवर केवळ विक्टिमचेच डीएनए मिळाले आहेत
-स्ट्र्गल झाल्याचे शरीरावर कुठलेही पुरावे नाहीत
-अ‍ॅक्सिडेंट की आत्महत्या किंवा खून स्पष्टं अनुमान सांगता येत नाही
-मृत्यू सकाळी ७:३० ते ८:३० दरम्यान झाला असावा

अरूण
- शरीरात अल्कोहोल आणि झोपेच्या गोळ्यांच्या अतिशय स्ट्राँग डोसेसचे ट्रेसेस
- शरीरावर ईतर जखमा वा स्ट्रगलचे पुरावे नाहीत

टाईमलाईन
-सकाळी ७:०४ सिक्युरिटी गार्ड सुरेश ड्युटीवर हजर
-सकाळी ७:५० 'नेविल परेरा' ची 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये एंट्री
-सकाळी ८:०१ 'नेविल परेरा' चा कॅथी डिसुझाला १ मिनिट ३ सेकंदांचा फोन
-सकाळी ८:०९ 'नेविल परेरा' ची 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये एक्झिट
-सकाळी ९:५५ सिराज कांचवालाचा पोलिसांना फोन
-सकाळी १०:२२ पोलिस 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये दाखल.

क्राईम सीन (केविनचे अपार्टमेंट)
-केविनच्या अपार्टमेंटचे दार ओढलेले आणि लॅच्ड होते पण आतून लॉक नव्हते.
-सोफ्यावर अरूण गाढ झोपलेला होता, क्राईमसीन वर सापडल्याने त्याचेही मेडिकल चेक-अप करवले.
-बेडरूममध्ये वा बाल्कनीत स्ट्र्गलचे पुरावे मिळाले नाहीत.
-घरात केविनची त्याच्या अपार्टॅमेंटची चावी मिळाली नाही.
-रूममध्ये झोपेच्या गोळ्यांचे ट्रेसेस असलेला एक दारूचा ग्लास मिळाला ज्यावर सिराज सोडून सगळ्यांच्या बोटांचे ठसे आहेत.

प्रासंगिक माहिती
- नेविलच्या अकाऊंटमध्ये जेमतेम अडीच लाख रुपये आहेत.
- केविन दर महिन्याला कॅथी डिसुझाला पैसे पाठवतो.
-बॉडी सापड्ल्यावर सुरेशने सगळ्यांना बोलावून आणले. अरूणने त्याच्या अपार्टमेंटचा दरवाजा ऊघडला नाही.

मॅग्नोलियाचा सिक्युरिटी गार्ड सुरेश
-मी रोज सकाळी सातच्या आसपास येतो आणि संध्याकाळी साहेब लोक आले की सातच्या आसपास निघून जातो.
-स्नॅक्स सेंटरचं बांधकाम चालू होतो तेव्हा बिल्डिंगमध्ये दोन-तीन साहेबांच्या घरात चोरी झाली म्हणून माझी ड्युटी ईथे लागली.
-मी दहाच्या आसपास बिल्डिंगच्या मागच्या बाजूला पाण्याची मोटर चालू करायला गेलो तेव्हा केविन साहेब पडलेले दिसले. मला वाटलं ते सकाळी कधी तरी सिगरेट पितांना बाल्कनीतून पडले असतील.
-बाजूच्या टेकडीवर सपाटीकरणासाठी ड्रिलिंगचे काम चालू आहे. त्या ड्रिलचा आवाज खूप मोठा असतो म्हणून केविन साहेब पडल्याचा आवाज मला आलाच नाही. साहेब लोकांनीही तिथल्या कन्स्ट्रक्शन मॅनेजरला ड्रिलच्या आवाजामुळे झोपमोड होते म्हणून दोन-तीन वेळा कंप्लेंट केली आहे.
-पण मी सकाळी केविन साहेबांना स्नॅक्स सेंटरला सिगरेट आणायला जातांना पाहिले होते. म्हणजे मी पेपर वाचत होतो म्हणून चेहरा दिसला नाही पण रंगीबेरंगी शर्ट दिसला म्हणजे ते केविन साहेबंच असले पाहिजे. ते जवळजवळ रोजच सकाळीच स्नॅक सेंटरमध्ये सिगरेट आणायला जातात.
-हवाहवाईका कुठे फिरून आलापासून ते नेहमीच त्यांचा रंगीबेरंगी शर्ट घालून सकाळी सिगरेट आणायला जातात. सवयच आहे त्यांची ती, मी ओळखतो ना त्यांचा तो नारळांच्या झाडावाला लाल-निळा शर्ट.
-केविन साहेबांना सकाळी ऊठल्या ऊठल्या सिगरेट ओठांत पाहिजे म्हणजे पाहिजेच असते. त्याशिवाय त्यांचे हात पाय थरथर कापतात त्यांना एक वाक्य ही नीट बोलता येत नाही. ते सकाळीच सात-आठ ला ऊठून सिगरेट घेऊन येतात आणि मग बाल्कनीत ऊभे राहून भकाभका चारपाच सिगरेट ओढतात. बर्‍याचवेळा पुन्हा झोपूनही जातात.
-सुरूवातीला मीच त्यांना रोज एक पाकीट आणून द्यायचो पण आता तेच जातात.
-केविन साहेब त्यांचे भाऊ येण्याआधी, ते असतांना की ते निघून गेल्यावर सिगरेट आणायला गेले होते ते नक्की आठवत नाही.
-केविन साहेबांचे भाऊ निघतांना फार घाईत होते. मी त्यांना एक्झिटची एंट्री करायला सांगितली तर ते म्हणाले तूच करून घे.
-पराग साहेबांच्या त्या जेनेलिया मॅडम आल्या होत्या तेव्हा सगळे साहेब लोक रोज बारी लावून मॅडमला फिरायला घेवून जात पण केविन साहेबांची बारी असली की ते दोघं कधी बिल्डिंगमधून बाहेर पडलेच नाही.
-सगळे साहेब लोक दहाच्या आसपास ऊठतात आणि अकरा वाजता बँकेत जातात.
-बिल्डिंगमधल्या साहेब लोकांची विजिटर लॉग मध्ये एंट्री करत नाही.

सिराज कांचवाला
-सुरेश धावतपळत केविन पडल्याचे सांगायला आला तेव्हा अरूण सोडून आम्ही सगळे खाली जमलो आणि तुम्हाला फोन केला. तुम्ही येईपर्यंत केविनच्या फ्लॅटमध्ये जायचे नाही असे आम्ही ठरवले.
-आम्ही रात्री केविनच्या रूममध्येच आठ वाजता जेवायला जमलो आणि नंतर सगळे दारू पित बसले.
-रात्री दोनच्या आसपास मीच सर्वात शेवटी गेलो. दिनेश, पराग आणि राहूल माझ्या आधी निघून गेले होते. दिनेश आणि राहूलला तर मी जातांना पाहिले पण पराग कधी निघून गेला मला कळालेच नाही. सगळे नेहमी निरोप घेवूनच जातात पण पराग बहूतेक तसाच निघून गेला असावा.
-अरूणला काल बहूतेक खूप जास्तं झाली असावी. तो जेवण झाल्यानंतर तासाभरातंच केविनच्या फ्लॅटमध्येच सोफ्यावर झोपून गेला. तसेही त्याने हल्लीच पिणे चालू केल्याने त्याचा स्टॅमिना फारंच कमी आहे. तो ज्युनिअर असल्याने दिवसभर त्याला बरीच धावपळ करावी लागते. संध्याकाळी जेवणानंतर एक पेग संपायच्या आधीच तो पेंगायला लागतो. काल केविनने 'आता तुझा स्टॅमिना वाढवायला हवा' म्हणत अरूणला स्वतःचा ग्लास देत दुसरा पेगही जबरदस्तीनेच संपवायला लावला आणि बाकी सगळ्यांपेक्षा केविनचे पेग खूप स्ट्राँग असतात असं ऐकून आहे.
- धार्मिक कारणामुळे मी तर कधीच दारू पीत नाही पण बाकीचे पीत असतांना मला गप्पा मारत बसायला आवडते. नाही तरी थ्रिलिंग वाटावे असे दुसरे काही करण्यासारखे ईथे नाही. प्रचंड बोरिंग आयुष्य आहे ईथले.
-केविनने अरूणला दिला तो ग्लास त्याला दिनेशने भरून दिला होता हे मी पाहिले होते. माझ्यामते बाकी कोणी पाहिले नसावे. दिनेश आणि केविन मधले ताणलेले संबंध बघता दिनेशने असे करणे मला चांगलेच वाटले पण त्याच्या कृतीचे खूप आश्चर्यही वाटले.
-दिनेश बाराच्या आसपास गेला असावा आणि पराग त्यानंतर कधी तरी पण मी त्याला जातांना बघितले नाही. पण तो कदाचित दिनेशबरोबच गेला असावा असे मला वाटते. महिन्यापासून ते दोघे एकमेकांबरोबर खूपच वेळ घालवत आहेत, सारखे काहीतरी सिरियस बोलणे चालू असते.
-मध्येच दारू संपल्याने राहूल त्याच्या रूममधून विस्की, वोडका, रम आणि टकिला शॉट्स घेवून आला. केविन विस्की शिवाय बाकी काही पीत नाही आणि राहूलही काल नेहमी पेक्षा कमी पीत होता त्यामुळे तो केविनसाठी एवढ्या सगळ्या बाटल्या घेवून आल्याचे मला आश्चर्य वाटले.
त्याने एक दोन वेळा केविनला 'टकिला शॉट्स' ट्राय करण्यासाठी आग्रहसुद्धा केला पण केविन विस्कीच पीत बसला.
-एक वाजला तेव्हा केविनने पुन्हा त्याचा हवाईमधला ऑस्ट्रेलियन मुलीचा किस्सा सांगायला घेतला तेव्हा राहूल कंटाळून निघून गेला.
-राहूल गेल्यावर केविनने मला त्याने त्याच्या वहिनीबरोबर झालेल्या चुकीबद्दल, त्याच्या लग्नाबद्दल, मुलाबद्दल आणि जेनेलियाशी त्याच्या संबंधाबद्दल सांगितले. पण केविनचे हे नेहमीचेच असते त्याला खूप चढली की तो असे काहीतरी बरळत राहतो. दुसर्‍यादिवशी त्याला त्यातले काहीही आठवत नाही. मी त्याच्या बरळण्याला त्याच्या डोक्यातले हवामहल समजून एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडून देतो.
-राहूलने एकदा माझ्याकडे केविन ऑफिसमध्ये करीत असलेल्या चिटिंगबदाल मन मोकळे केले होते. त्याच्या मनात केविनबद्दल प्रचंड राग धुमसत होता आणि केविनला आयुष्यभराचा धडा शिकवण्याचे त्याने ठाम ठरवले होते.
-सुरेशने केविनच्या चेन स्मोकिंग बद्दल संगितलेले सगळे खरे आहे.
-एकदा केविनच्या घरात चोरी झाली तेव्हा त्याने सुरेशवर आळ घेतला होता. सिगरेट द्यायला आला तेव्हा सुरेशने त्याची नाईट स्टँडच्या ड्रॉवर मधली सोन्याची वेडिंग रिंग चोरली असे केविनचे म्हणणे होते. त्याने सुरेशला पोलिसांत द्यायची धमकी दिली होती पण परागने मध्ये पडून सुरेशची नोकरी वाचवली. तेव्हापासून केविनने सुरेश कडून सिगरेट मागवणे बंद केले.
-केविनचे कधी लग्न झालेले असल्याचेच आम्हाला माहित नव्हते त्यामुळे आम्ही तो केवळ केविनचा त्रागा असावा म्हणत सोडून दिले.

नेविल परेरा(केविनचा भाऊ)
-आमच्या वडिलोपार्जित घरावरचा हक्कं सोडण्यासाठी केविनने २५ लाख रुपये मागितले होते. त्याचा चेक देण्यासाठी आणि पेपर्सवर त्याची सही घेण्यासाठीच मी आलो होतो.
-मी दारावर क्नॉक केले तेव्हा कोणी दार ऊघडले नाही म्हणून मी हँडल फिरवले तर ते ऊघडले. मी आत गेलो तेव्हा सोफ्यावर एक जण झोपला होता. मी आत बेडरूममध्ये जाऊन केविनला ऊठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऊठलाच नाही.
-तेव्हा मला कळले की त्याची सही घेण्यासाठी मला आता थांबावे लागणार आणि माझी कोईंबतूर वरून रिटर्न फ्लाईट चुकणार म्हणून मी फॅनीला- माझ्या बायकोला लागलीच फोन करून सांगितले. मग मी ग्रीनलँड ईन मध्ये आलो आणि ईथे रूम बूक केली.
-केविनच्या अंगावर पांघरून होते म्हणून त्याने कोणता शर्ट घातला होता ते मला दिसले नाही.
-मी काल रात्री मुंबईवरून कोईंबतूरला आलो आणि रेंटल कार घेवून पहाटेच ईथे येण्यासाठी निघालो.

खबरींकडून मिळालेली माहिती
-मुंबईमधले सध्या केविनचा लहान भाऊ 'नेविल' रहात असलेले वडिलोपार्जित घर सोडले तर केविनला तसे कोणी नातेवाईक नव्हते. नेविलच्या लग्नानंतर, फॅनी घरात आली आणि काही तरी 'कारण' होवून भावाभावात वितुष्टं आले. नेविल ने केविनला दुसरीकडे रहायला जायला सांगितले. फॅनीने -केविनच्या कॅरॅक्टर वरून त्याच्यावर आरोप केले होते. पण पोलिस केस झाली नाही.
-नेविल खूप कर्जात आहे आणि ते भागवण्यासाठी त्याला त्याचे वडिलोपार्जित घर विकायचे आहे.
-नेविलच्या लग्नाआधी केविनचे 'कॅथी डिसुझा'शी लग्न झाले होते आणि त्यांना साडेचार वर्षांचा मुलगा 'रॉनी' आहे. ते वेगळे राहतात पण अजून डिवोर्स झालेला नाही

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
काय कारण असेल केविनच्या मृत्यूमागे - अ‍ॅक्सिडेंट, आत्महत्या की खून? खून झाला असल्यास कोणी व कसा केला असेल?

तुमच्या एकापेक्षा अनेक थिअरीज असतील तरी हरकत नाही पण घटनाक्रम आणि थोडी कारणीमीमांसा द्यावी अशी अपेक्षा. यावेळी क्लू देता येणार नाहीत किंवा देण्याची गरज पडणार नाही. पण काही कन्फ्युझिंग वाटत असल्यास आणि फॅक्ट्सचे क्लॅरिफिकेशन हवे असल्यास बोल्ड ईटालिक फाँट मध्ये लिहिले तर मला त्या पोस्ट्स ना ऊत्तर देणं सोपं जाईल. बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे रेग्यूलर फाँटमध्ये चालूदेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद राजसी.
साईट मेंटेनन्समुळे एकदा टाईप केलेले सगळे गायब झाले म्हणून पूर्ण केस दुसर्‍यांदा लिहितांना नजरचुकीने राहून गेले होते.
दुरूस्ती केली आहे. अजून चुका सापडल्यास नक्की कळवा.

  • दिनेशने केविनला पेग बनवुन दिला, त्यामधे झोपेचे औषध असणार कारण तो पेग नंतर अरुण प्यायला आणि त्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांच्या अतिशय स्ट्राँग डोसेसचे ट्रेसेस सापडले.
  • दिनेश आणि केविनच्या शर्टचे डीझाईन सारखेच होते. सकाळी सिगरेट घ्यायला दिनेश गेलेला असु शकतो
  • परागने सुरेशची मदत केलेली म्हणुन सुरेशने त्याला जेनेलियाच्या केविनच्या वेळी बिल्डींगमधुन बाहेर न जाण्याबद्द्ल सांगितले असावे
  • दिनेश आणि पराग दोघांचाही केविनवर राग होता. ते दोघं आपापसात बदला घेण्याचं प्लानिंग करत असु शकतात
  • पराग बाहेर न जाता तिथेच कुठेतरी लपुन रहिला असण्याची शक्यता आहे

कोड्यामधे नक्कीच काहीतरी ट्विस्ट असणार, म्हणुन दिनेश, पराग हे खुनी नसणार :p

इंटरेस्टिंग... प्रिट्टी इंटरेस्टिंग...

दिनेश / पराग / राहुल / नेव्हिल / अरूण... सगळ्यांकडे मोटिव्ह आहे...
- फिआन्सीबद्दलची कॉमेंट सहन न झाल्यानी दिनेश (हा मुद्दा तसा सौम्य आहे).
- जेनेलिआसोबतचे संबंध असल्यानी पराग
- ऑफिसमधल्या अ‍ॅवॉर्डच्या बदमाशीमुळे राहुल
- प्रॉपर्टीच्या पैशाच्या वाट्यामुळे नेव्हिल
- सतत केलेली चिडवाचिडवी अन ऑफिसच्या क्लायंट्सवर परस्पर लावलेलं स्वतःच नाव यामुळे अरूण (जेनेलिआ सोबत तयार झालेला सॉफ्ट कॉर्नर अन त्यामुळे वाटणारी आसूया / राग हे ही कारण असू शकतं

माझ्या दॄष्टीनी प्राईम सस्पेक्ट अरूण
पण अ‍ॅनालिसिस तो अभी बाकी है...!!!

सकाळी ८:०१ 'नेविल परेरा' चा कॅथी परेराला १ मिनिट ३ सेकंदांचा फोन<<<<<
आणि तो म्हणतो त्याने बायको 'फॅनी परेरा'ला फोन केला. ही टायपो आहे की नेव्हिल खोटे बोलतोय?

माझा प्राथमिक अंदाज हा की केविन हा चांगला माणूस आहे फक्त ते बायकांबाबतचे बढाया मारणे सोडले तर! He is really good at work. राहुलने इर्षेने त्याच्यापुढे जायला योग्य ती प्रोसिजर फॉलो न करता भरपूर केस क्लोज करू पाहिल्या, पण केविनने ते ओळखून त्याला समज दिली. अरुणच्या केसेसवर स्वतःचे नाव घालायचे कारण म्हणजे अरुण अननुभवी आहे व काही चुका त्याच्याकडून झाल्यास सगळी जबाबदारी केविन स्वतःवर घेईल.

देबोलीनाच्या फोटोवरची 'मालदार पार्टी' ही कमेंट. देबोलीना हीच केविनची दुरावलेली बायको आहे का? कारण दिनेशच्या 'कर्मठ' आईवडिलांना तिच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. देबोलीना हीच त्याची दुरावलेली बायको असेल तर तिला केविनकडून नियमित मिळणारी रक्कम एक्स्प्लेनस 'मालदार पार्टी' कमेंट.

देबोलीनाच्या फोटोवरची 'मालदार पार्टी' ही कमेंट. देबोलीना हीच केविनची दुरावलेली बायको आहे का? कारण दिनेशच्या 'कर्मठ' आईवडिलांना तिच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. देबोलीना हीच त्याची दुरावलेली बायको असेल तर तिला केविनकडून नियमित मिळणारी रक्कम एक्स्प्लेनस 'मालदार पार्टी' कमेंट.
>> वाटत नाही.
नेविल नी कॅथी ला फोन करणं ही संशयास्पद आहे.
सकाळी सिगरेट्स न मिळाल्यामुळे थरथरणं, बॅलन्स जाणं इत्यादी जर खुन्याला माहित असेल तर तो तशी तजवीज करून केविनला बाल्कनीत आणू शकतो अन या कारणानी केविन स्वतःच खाली पडू शकतो. (आत्महत्या नाही, पण घडवला गेलेला अ‍ॅक्सिडेंट)

खून केला आहे नेव्हिल आणि दिनेश या दोघांनी मिळून. ते 'देबोलीना' उर्फ कॅथी हिच्यामुळे एकमेकांना ओळखत असावेत.
नेव्हिल सुरुवातीपासूनच 'गुड फॉर नथिंग' असावा. केविनचे लग्न झाल्यावर त्याने मुद्दाम केविन आणि त्याच्या बायकोत गैरसमज निर्माण केले असावेत. म्हणून ते वेगळे राहत असावेत. पण केविनचे अजूनही तिच्यावर प्रेम असावे, त्यामुळे वेडिंग रिंग चोरीला गेल्यावर तो भडकला. तो घटस्फोट द्यायला तयार नसल्याने दिनेशचे आईवडील तयार होऊनही देबोलीनाचा नाईलाज झाला असावा. म्हणून दिनेश व नेव्हीलने दोघांचा फायदा व्हावा म्हणून केविनला संपवायचा प्लॅन केला.

तो तर गाढ झोपलेला आहे.. खून कसा करेल
>>> खून करून टॅब्लेट घेऊन झोपू शकेल ना...
अरुण लवकर झोपला, एकूणात कमी प्यायला, सवय नव्हती, झोप यायची टेंडन्सी होती, सकाळी सर्वात उशिरापर्यंत डीप स्लीप मधे होता.

रात्री कंझ्यूम केलेल्या टॅब्लेट्सचा इफेक्ट सकाळी साडेदहा पर्यंत कमी व्हायला हवा. दारूसोबत हेवी डोस घेतला गेला असेल तर त्याचा इफेक्ट तर अजून डेंजरस होऊ शकतो. नुसती गाढ झोप लागणं हे सकाळी आठ साडेआठला खून करून मग गोळ्या घेऊन झोपण्यानी शक्य आहे.
खून झाल्यानंतर अरूण उठेपर्यंत २-३ तासाचा अवघी झालेला आहे.

म्हणून अरूणवर संशय

देबोलीनाच्या फोटोवरची 'मालदार पार्टी' ही कमेंट >> नाही.. हे केविन ने पैश्यान्च्या बाबतीत बोललेले नसून.. ती दिसायला खूप attractive आहे..अशी comment आहे ती..

खून करून टॅब्लेट घेऊन झोपू शकेल ना...
अरुण लवकर झोपला, एकूणात कमी प्यायला, सवय नव्हती, झोप यायची टेंडन्सी होती, सकाळी सर्वात उशिरापर्यंत डीप स्लीप मधे होता.

रात्री कंझ्यूम केलेल्या टॅब्लेट्सचा इफेक्ट सकाळी साडेदहा पर्यंत कमी व्हायला हवा. दारूसोबत हेवी डोस घेतला गेला असेल तर त्याचा इफेक्ट तर अजून डेंजरस होऊ शकतो. नुसती गाढ झोप लागणं हे सकाळी आठ साडेआठला खून करून मग गोळ्या घेऊन झोपण्यानी शक्य आहे.
खून झाल्यानंतर अरूण उठेपर्यंत २-३ तासाचा अवघी झालेला आहे.

म्हणून अरूणवर संशय

>> हे सगळं अरूण plan करू शकणार नाही.. plan फसायचा chance जास्तं आहे....

दिनेश व नेव्हीलने दोघांचा फायदा व्हावा म्हणून केविनला संपवायचा प्लॅन केला. >> नेव्हील murder च्या दिवशी का आला? prime suspect होईल की तोच्..

नेविलच्या खात्यात फक्त २.५ लाख आहेत. आणि तो २५ लाखाचा चेक (चेक, ड्राफ्ट नाही) घेऊन आलाय. केविन सही करणार आहे, सो पूर्ण रक्कम आल्याखेरीज सही करणार नाही (टर्मस प्रमाणे करेलही) पण नेविल खोटं बोलतोय असं मानायला जागा आहे.
नेविल ने कॅथीला (जी केविनची बायको होती/ आहे) ज्यांचा डिवोर्स पेंडिंग आहे तिला मिनिट भरापेक्षा जास्त फोन केलाय. कशासाठी?

केविनचं कॅरेक्टर चांगलं नसावं. फॅनी बरोबर पोलीस केस होता होता राहिली, जो माणूस दारू पिऊन इतकं काय काय बरळतो, त्याने ३ वर्षांत बायको विषयी चकार शब्द कधी काढला नाही आणि त्याच रात्री सिराजला वाहिनी, जेनेलिआ आणि बायको असं सगळं सांगितलं. का?? तो काही हालचाल बायको कडून एक्स्पेक्ट करत होता का?

सकाळी ८:०१ 'नेविल परेरा' चा कॅथी परेराला १ मिनिट ३ सेकंदांचा फोन<<<<<
आणि तो म्हणतो त्याने बायको 'फॅनी परेरा'ला फोन केला. ही टायपो आहे की नेव्हिल खोटे बोलतोय? >> हा प्रश्न genuine आहे.. आणी जर नेव्हिल खोटे बोलतोय तर का?

नाही.. हे केविन ने पैश्यान्च्या बाबतीत बोललेले नसून.. ती दिसायला खूप attractive आहे..अशी comment आहे ती..<<<<
Exactly! प्रथमदर्शनी ती तिच्या दिसण्यावर केलेली कमेंट आहे, असेच वाटते. पण तीन वर्षांपासून हे लोक एकत्र राहतात, त्यामुळे दिनेशला सुरुवातीला चीड आली केविनच्या विधानाची तरी ते एवढा प्रदीर्घ काळ टिकणार नाही करण त्याचा स्वभाव, बोलण्याची पद्धत त्याला परिचयाची असणार. आणि तीन वर्षांत दिनेशचं काही प्रेमप्रकरण वगैरे असेल हे कुणालाच माहीत नसणं, एकदम पक्कं सिक्रेट ठेवणं यामुळेही मला देबोलीना = कॅथी हा तर्क बरोबर वाटतो.

बायको विषयी आदर आहे म्हणून काही बाही बोलला नाही, वेडिंग रिंग हरवली म्हणून चिडला इत्यादी मुळे तो स्वतःहून बायको पासून दूर रहात नसावा , बायको आणि नेविलच्यात काही असेल का?
देबोलिना == कॅथी ->मालदार पार्टी.--->> पण केविन कॅथीला रक्कम कशाला देईल? अजून डिवोर्स व्हायचाय. अ‍ॅलिमनीला वेळ असावा.

मला देबोलीना = कॅथी हा तर्क बरोबर वाटतो >> त्याचे खूप वर्षांपासूनचे प्रेम असणार्‍या बंगाली मुलीशी 'देबोलिनाशी' लग्नं करण्यासाठी बरेच दिवसांपासून तो त्याच्या कर्मठ आईबाबांची मनधरणी करीत होता. ह्या खेपेला मात्रं त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नाला मान्यता मिळाली.. --> कॅथी बंगाली वाट्त नाही.. शिवाय.. त्याने स्वताहून ही news सगळ्यान्ना सांगितली आहे..

सिराज अकौंट वरून, राहुल केविनच्या घरात असू शकतो.
दिनेश सिगारेट ओढत नसावा, तरीही तो सिगारेट आणायला का गेला असेल. कदाचित तो सिगारेट आणायला गेलाच नसेल, त्याचं काही पर्सनल आणायला गेला असेल, टीशर्ट वरून watchmanला तो केविन वाटला आणि तो सिगारेट आणायला गेला असा समज त्याने करून घेतला असेल.

केविनने पैसे मागितले म्हणून चेक घेऊन आलो हे नेव्हीलचे विधान फक्त स्वतःच्या बाजूने पुरावा निर्माण करण्यापूरते आहे. माझ्या मते केविनने सहीसाठी पैसे मागितलेच नाहीत. त्याने फक्त नेव्हीलला सही घ्यायला बोलावले असेल.

फॅनीबरोबर झालेले प्रकरण हाही नेव्हिल फॅनीचा या दोघांचा डाव असावा. कॅथी सोडून गेल्यावर केविन दारूच्या आहारी गेला असणार आणि त्याने नशेत नेव्हीलच्या बायकोशी गैरवर्तन केले असा देखावा त्या दोघांनी तयार केला असणार. हे मुळातच खोटे होते आणि त्याचा वापर फक्त केव्हीन घरातून जाण्यासाठी करायचा होता म्हणून त्या दोघांनी पोलीस केस केली नाही. एरवी केस न करण्याचे काय सबळ कारण असू शकेल?

केविनबद्दल इतक्या काळ्या गोष्टी आहेत की तो चांगलाच असावा, असा अनेक रहस्यकथा वाचून काढलेला निष्कर्ष सांगतो. किंवा 'उसके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा...' Proud

देबोलीना आणि बंगाली ह्या दोन्ही गोष्टी फक्त दिनेशने सांगितलेल्या आहेत. त्या बनावट नसतील कशावरून?

दुसरं म्हणजे 'what forced dinesh to kill kevin?' मला तरी असं वाटतं की जेनेलियाच्या मदतीने केविन कॅथीचा गैरसमज दूर करून तिला परत आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ते दोघेच फ्लॅटवर असताना कुठेही फिरायला जात नसत.

जर कॅथीच्या मनातले सगळे गैरसमज मिटले असते तर दिनेश ला प्रॉब्लेम होणार. शिवाय नेव्हीललाही कारण मग केव्हीनची बायको आणि मुलगा सुद्धा त्या घरात वाटा घेणार.

कॅथी 'डिसुझा' लाच फोन केला होता पण पोलिसांना सांगतांना मी फॅनीला केला असे तो म्हणाला. त्याच्या जबाबातली विसंगती होती ती जी पोलिसांनी पकडली.

फोटो बघून 'मालदार पार्टी' म्हणण्याचा एकंच अर्थ निघू शकतो असे मला वाटते आणि तो नक्कीच फायनॅनशिअल स्टेट्सशी संबंधित नसावा Happy

अर्रर्र, केविन लिहिल्याप्रमाणे काळाच माणूस निघाला तर वाईट वाटेल मला. Proud

hawaiian-sunset-navy-big-500x500.jpgWHOLESALE ALOHA HAWAIIAN SHIRT.jpghawaiian-aloha-shirt-beach-01.jpgmh0P_45kJV2KJdP5iyr-UBg.jpgmh0P_45kJV2KJdP5iyr-UBg_0.jpg

हवाई शर्टबद्दलचा महत्वाचा मुद्दा चटकन लक्षात येणे अवघड आहे म्हणून सगळ्यांच्या हवाई शर्टचे डिझाईन टाकले. ह्यातली एक डिझाईन केविन आणि दिनेश दोघांकडे होती. सुरेशला जर ह्यातला निळा शेड आणि नारळाची झाडं असलेला केविनचा शर्ट ओळख म्हंटल्यावर तो काय ओळखणार ... कप्पाळ
थोडक्यात हवाई शर्ट असतात वेगळे पण लांबून एका पासून दुसरा वेगळा ओळखणे कठीण

-आम्ही रात्री केविनच्या रूममध्येच आठ वाजता जेवायला जमलो आणि नंतर सगळे दारू पित बसले.
-अरूणला काल बहूतेक खूप जास्तं झाली असावी. तो जेवण झाल्यानंतर तासाभरातंच (९ वाजता) केविनच्या फ्लॅटमध्येच सोफ्यावर झोपून गेला.
-त्याचा स्टॅमिना फारंच कमी आहे. संध्याकाळी जेवणानंतर एक पेग संपायच्या आधीच तो पेंगायला लागतो.

या कंडिशनमधे अरूणला दारू + स्लीपिंग पिल्स दिल्या असतील तर त्याचा अ‍ॅडवर्स इफेक्टच होईल.

आणि जर तो डोस केविनसाठी टार्गेटेड असेल तर नक्कीच

केविन ने आत्महत्या केलि असेल
कारण
१. ग्रूपमध्ये आपल्यामुळे वाढलेला तणाव पाहून त्याने तडकाफडकी दोन आठवड्यांची सुटी टाकली >>> याचा अर्थ तो थोडाफार डिप्रेस होता,
२.केविनने त्याच्या वहिनीबरोबर झालेल्या चुकीबद्दल, त्याच्या लग्नाबद्दल, मुलाबद्दल आणि जेनेलियाशी त्याच्या संबंधाबद्दल सांगितले.
पण केविनचे हे नेहमीचेच असते त्याला खूप चढली की तो असे काहीतरी बरळत राहतो.>>> या गोष्टिचे हि त्याला वाईट वाटत असावे.
३.नेविल खूप कर्जात आहे

इंटरेस्टिंग!!
हाब, शेवटी तुम्ही उकल करणार आहत ना?

- नेविल कर्जात असतानाही २५ लाखाचा चेक आणतो, म्हणजेच त्याला हा चेक द्यायचा नाहिये / वेळ मारून नेण्यापुरता दाखवायचाय.
- नेविल कॅथीला फोन करून बोलतो (नुसता मेसेज देत नाही, काहितरी कॉन्वर्सेशन) अन सांगतो मात्र फॅनीला फोन केल्याचं.
- सुमारे १९ मिनिटं बिल्डिंगमधे असताना दिलेलं विवरण फारसं डीटेल्ड नाही, मेड अप वाटतंय.

-रूममध्ये झोपेच्या गोळ्यांचे ट्रेसेस असलेला एक दारूचा ग्लास मिळाला ज्यावर सिराज सोडून सगळ्यांच्या बोटांचे ठसे आहेत.
>>> दिनेश नी बनवला, केविन ला दिला, केविन नी अरूण ला दिला...
पराग नी कशाला हात लावला या ग्लास ला??

अन सगळे म्हणजे नेविल पण का?? त्याचे ठसे असतील तर त्यानीतरी का हात लावला असेल?? (पण सध्या आपण नेविल चे नवते असं समजू)

सिराज दारू पीत नाही त्यामुळे रोज बाकीचे लोक पिऊन जे काही त्याच्याकडे बोलतात त्यामुळे त्याच्याकडे बरीच सिक्रेटस असावी. सिराजवर संशयाला जागा आहे.
दिनेशचे एका कमेंटवरून एवढे चिडणे पटत नाही त्याला अजून काही किनार असावी.
राहुल ऑफिस मधल्या गैरवर्तनामुळे खून करेल असे वाटत नाही.
परागचे फिंगरप्रिंट ग्लास वर असणे संशय निर्माण करते.
माझ्यामते हा खून पराग, सिराज आणि दिनेश यांनी प्लॅन करून केलेला वाटतो.
नेविलचे वागणे संशयास्पद आहे पण त्याचे त्या वेळी तिथे असणे wrong place at the wrong time वाटते.

स्नॅक्स सेंटरला सिगरेट आणायला नक्की कोण गेलं होतं हे त्या दुकानदाराला विचारलं का पोलीसांनी?
>>
स्नॅक्स सेंटरला कुणी खरंच गेलं होतं असं वाटतंय का तुला?
तो हवाई शर्ट वाला त्यावेळी तिथून फक्त पास झाला असेल अन सुरेशनी त्याचा संबंध केविनशी जोडला असेल
किंवा जर खुनी अन सुरेशचं सेटिंग असेल तर सुरेशनी तसं उगाचच सांगितलं असेल.

केविन साहेब त्यांचे भाऊ येण्याआधी, ते असतांना की ते निघून गेल्यावर सिगरेट आणायला गेले होते ते नक्की आठवत नाही.
-केविन साहेबांचे भाऊ निघतांना फार घाईत होते. मी त्यांना एक्झिटची एंट्री करायला सांगितली तर ते म्हणाले तूच करून घे.
>>>
मला दुसरी शंका जास्ति वाटतिये कारण एक्झिट एंट्री करायच्या आधी केविनला पाहिलं का नंतर ते वॉचमनला अ‍ॅक्शन रेफरन्सनी आठवणं अपेक्षित आहे, पण सुरेश ते विसरतोय.
पण केविनला सिगरेट ओढल्याशिवाय नीट उभं रहाता येत नाही हे मात्र त्याला माहिती आहे

A cigarette is a very efficient and highly engineered drug-delivery system. A smoker can get nicotine to the brain very rapidly with every inhalation. A typical smoker will take 10 puffs on a lit cigarette over a period of five minutes. Thus, a person who smokes about one-and-a-half packs (30 cigarettes) each day gets 300 nicotine hits to the brain daily. These factors contribute considerably to nicotine's highly addictive nature.

Using advanced neuroimaging technology, research is beginning to show that nicotine may not be the only psychoactive ingredient in tobacco. Scientists can see the dramatic effect of cigarette smoking on the brain and are finding a marked decrease in the levels of monoamineoxidase (MAO), an enzyme responsible for breaking down dopamine.

Dopamine (DA, contracted from 3,4-dihydroxyphenethylamine) is an organic chemical of the catecholamine and phenethylamine families that plays several important roles in the brain and body. In the brain, dopamine functions as a neurotransmitter—a chemical released by neurons (nerve cells) to send signals to other nerve cells.

The dopamine system plays a central role in several significant medical conditions, including Parkinson's disease, attention deficit hyperactivity disorder, schizophrenia, and addiction.

Parkinson's disease
Parkinson's disease is an age-related disorder characterized by movement disorders such as stiffness of the body, slowing of movement, and trembling of limbs when they are not in use. In advanced stages it progresses to dementia and eventually death

--------------------------------
बर्ग , काही रेफरन्स जुळतोय का ह्या थेअरीशि - निकोटीन - सेडेटिव्ह इफेक्ट - डोपामाइन - पार्किंगसन्स

हाब, शेवटी तुम्ही उकल करणार आहत ना?>> हो पण कमीतकमी १०० प्रतिसाद आल्याशिवाय नाही, तसा अलिखित नियमच आहे खेळाचा. Wink Lol

बर्ग , काही रेफरन्स जुळतोय का ह्या थेअरीशि - निकोटीन - सेडेटिव्ह इफेक्ट - डोपामाइन - पार्किंगसन्स >> हो, सायंटिफिकली बरोबर वाटते आहे.

पण सध्या आपण नेविल चे नवते असं समजू >>> हो सिराज, नेविल आणि सुरेश ह्या संशयितांचे सोडून बाके सगळ्यांचे ठसे मिळाले ग्लासवर.

नेव्हिल परेराने एक्झिट एंट्री करायला नकार दिला. वास्तविक पाहता ते जास्तीत जास्त तीसेक सेकंदांचं काम आहे. मग एवढा कसला उशीर होणार होता?

नेव्हिल परेराचे पण हात थरथरतात का की नेव्हिल केव्हीन हे जुळे आहेत?

नेविलची जबानी (खरी मानली तर) - दार नुसते बंद होते पण लॉक/ latched नव्हते, ते ढकलून तो आत गेला
पोलीस आल्यावर - दार आतून latched होते
केविनच्या apartment ची चावी गायब होती.
यात कुठेतरी पाणी मुरतंय Happy

अजून एक प्रश्नः केविनच्या बाल्कनी खालचा आणि बाल्कनीतला कचरा रोज साफ होत होता का?

स्नॅक्स सेंटरला सिगरेट आणायला नक्की कोण गेलं होतं हे त्या दुकानदाराला विचारलं का पोलीसांनी? >> हो , पण त्याच्याकडून ऊपयोगी पडेल अशी काही माहिती मिळाली नाही. मागच्या बिल्डिंगमधून एक साहेब नेहमी रंगीबेरेंगी शर्ट घालून सिगरेट घ्यायला येतात हे त्याने सांगितले. त्यादिवशी आले होते का तर 'आले असतील बहूतेक, हायकर्सची गर्दी असल्याने लक्षात नाही राहिले' असे म्हणाला.

रात्री राहूल गेला तेव्हा तो केविनच्या अपार्टमेंटची किल्ली घेऊन गेला. सकाळी हवाईवरुन आणलेलं शर्ट घालून बाहेर फेरी मारुन सुरेश कुठेय ते बघून आला. त्यानंतर जेव्हा केविन बाल्कनीत सिगारेट ओढत होता तेव्हा तो दार उघडून तिथे गेला आणि बाजीगर स्टाईलमध्ये केविनचे पाय धरुन उचलून त्याला बाल्कनीतून खाली टाकले. ( या पोझीशनमध्ये कोणी कसलाही स्ट्रगल करु शकत नाही.)

Pages