'मॅग्नोलिया हेरिटेज' केस

Submitted by हायझेनबर्ग on 12 June, 2017 - 23:05

तीन वर्षांपूर्वी ऊटी जवळच्या नयनरम्य टेकड्यांवर 'प्रोटीआ' ग्रूपने वीकेंड होम धर्तीवर 'कॉटेजेस आणि चॅले' स्टाईलघरांचा 'डॅफोडिल वॅली सिटी' हा ६५०० घरांचा प्लान जसजसा प्रत्यक्षात ऊतरावयाला सुरूवात केली तशी वॅलीतली एकंदर वर्दळ आणि डॅफोडिल सिटीला भेट देणार्‍या कुटंबांमध्ये पर्यटनाबरोबरच घरखरेदी अशी टूम निघू लागली. प्रोटीआ ग्रूपची शहरातली ऑफिसेस बंगळूर, मैसूर, कोची मधल्या नवश्रीमंत ग्राहकांना हेरून शहरातूनच लक्झ्युरी बसेसमधून अश्या ग्राहकांची पाठवणी डेफोडिल वॅली सिटीला करू लागली. सिटीला भेट देणार्‍या ग्राहकांची वाढती संख्या बघून बिझनेस मिळवण्यासाठी देशातली आघाडीची 'टेनिसन' बँकही कशी मागे राहिल? बँकेनेही वॅली मध्ये आपले ऑफिस ऊघडले आणि पाच होम लोन ऑफिसर्स कम सेल्स एजंट्स ची तिथे नेमणूक केली. पराग कामत, दिनेश शर्मा, केविन परेरा, सिराज कांचवाला आणि राहूल त्रिपाठी. कामाचा वाढता लोड पाहून सगळ्यांच्या मदतीसाठी वर्षापूर्वी अरूण राव ह्या ज्युनिअरलाही ट्रेनिंग साठी पाठवले होते. बँकेने ह्या सहा जणांच्या राहण्यासाठी स्टाफ क्वार्टर्स म्हणून डॅफोडिल सिटीतच वर्षभरापूर्वीच तयार झालेली तीन मजली 'मॅग्नोलिया हेरिटेज' सध्यापुरती पाच वर्षांच्या भाडे करारावर प्रोटीआ ग्रूपकडून बांधून घेतली होती. पाच वर्षानंतर हा करार वाढवता येणार होता किंवा बिल्डिंग पुन्हा प्रोटीआ ग्रूपकडे ह्स्तांतरित करता येणार होती.

डॅफोडिल्स वॅली मध्ये शाळा,मॉल्स वगैरेंची गरज नसल्याने वीकेंडला येणार्‍या ग्राहकांना राहण्यासाठी 'ग्रीनलॅंड ईन' हे थ्री स्टार हॉटेल, काही रेस्टॉरंट्स, एक छोटेसे क्लिनिक व एका डिपार्टमेंटल कम मेडिकल स्टोर शिवाय फार काही नव्हते. या पूर्ण एरियाला वॅली सिटीच्या प्लान मध्ये 'बिझनेस सेंटर' नाव होते. प्रत्येकी दोन बेडरूम्सच्या सहा फ्लॅट्सची 'मॅग्नोलिया हेरिटेज', बिझनेस सेंटरमध्येच असलेल्या प्रोटीआ ग्रूपच्या मॉडेल हाऊसेस, ऑफिसेस आणि त्याला लागूनच असलेल्या टेनिसनच्या ऑफिसपासून साधारणतः चार किलोमीटर अंतरावर असावी. चोहो बाजूंनी दाट झाडींनी वेढलेली मॅग्नोलिया हेरिटेज, बिझनेस सेंटरपासून वॅली सिटीचे प्रमुख आकर्षण असलेल्या 'मिल्किवे फॉल्स आणि 'बोटॅनिकल गार्डन' कडे जाणार्‍या एकमेव रस्त्यावर होती. ह्या निसर्गरम्य परिसरात येणार्‍या पर्यटकांछ्या डोळ्यात खुपू नये म्हणून मोठ्या शिताफिने मॅग्नोलिया हेरिटेज दाट झाडींमध्ये लपवण्यात आली होती. ट्रेकिंग, हायकिंग ची ईच्छा असणारे बरेच ग्राहक बिझनेस सेंटर वरून डॅफोडिल सिटीची 'वॅली टूर' बस न घेता ह्याच रस्त्याने चालत फॉल आणि गार्डनकडे जाणे पसंत करत. अश्या ग्राहकांची संख्या वाढू लागली तसे प्रोटीआ ग्रूपने त्यांच्या सोयीसाठी ज्यूस, पाणी, फळे, कोल्ड्रिंक, स्नॅक्स विकणारे 'लिली'ज स्नॅक्स सेंटर' ह्या रस्त्यावर ऊभारले. स्नॅक्स सेंटर मध्ये थांबणार्‍याला मागच्या झाडींमध्ये केवळ फर्लांगभर अंतरावर तीन मजली मॅग्नोलिया हेरिटेज ऊभी आहे हे सांगूनही खरे वाटले नसते.

टेनिसनच्या सगळ्याच ऑफिसर्सकडे आपापल्या कार्स असल्याने जाण्यायेण्याच्या बाबतीत कोणी असे खास एकमेकांवर अवलंबून नव्हते. ऊटी शहर ही दोन तासांवरच असल्याने गरज पडल्यास जाऊन येणेही अगदीच सोपे होते. पाचही ऑफिसर्स तसे तिशी पस्तीशीचेच असावेत आणि सहा महिन्यांपूर्वीच रुजू झालेला अरूण साधारणतः पंचवीशीचा. पण ऑफिस टायमिंगनंतर वेळ घालवण्यासाठी मात्रं त्यांना एकमेकांच्या सोबतीशिवाय पर्यायच नव्हता. करमणूकीची साधने वॅली सिटी मध्ये फारशी नव्हतीच, शाळा/कॉलेजही नसल्याने कुणाला कुटुंब-कबिल्यासहित वॅली सिटीमध्ये राहणे जमण्यासारखे नव्हते. टेनिसनचे सगळेच ऑफिसर्स बॅचलर असण्यामागे कदाचित तेही एक कारण होतेच. वॅली सिटीमधल्या एका रेस्टॉरंटने सहाही जणांची तीनवेळा खाण्यापिण्याची सोय केली होती पण महिन्यागणिक खाण्याच्या बिलापेक्षा जोमाने वाढणारे 'पिण्याचे' बिल टेनिसनच्या ऑफिसर्सचे एकमेकांच्या सोबतीने वेळ घालवण्यासाठीचे दररोजच्या करमणूकीचे एकमेव साधन होते. सहा पैकी कुठल्याही एका फ्लॅटमध्ये आठाच्या ठोक्याला एकत्रं जेवायला बसलेली टेनिसनची ही मंडळी एकेक घोट रिचवत एकेमेकांचा निरोप घेवून आपापल्या फ्लॅटमध्ये बेडवर जाऊन पडेपर्यंत रात्रीचे किमान ११:३०-१२ तरी होत. स्नॅक सेंटर झाल्यापासून मॅग्नोलिया वासियांच्या खासकरून केविनच्या आधीच वाढत्या 'पिण्याच्या' ब्रँड्समध्ये अजून काही 'ब्रँडसची' भर पडली... फोर-स्क्वेअर, मार्लबोरो, विल्स, गोल्ड फ्लेक.

मॅग्नोलिया वासियांचे हे असेच रुटीन मागच्या तीन वर्षांपासून चालू होते. 'डॅफोडिल वॅली सिटीची' वाढती लोकप्रियता आणि भेट देण्यास येणार्‍या ग्राहकांचा वाढता ओघ वाढत राहिला तसे टेनिसनच्या ऑफिसर्सना प्रत्येक लोन केसमागे मिळणारे कमिशनही महिन्याकाठी वाढतंच होते. वॅली सिटीमध्ये राहणे अतिशय बोरिंग असूनही वाढत्या सॅलरी/कमिशनने सगळ्यांच्या पायात जणू बेडीच घातली होती. नेमके वीकेंड आणि सुट्यांचा मोसम हेच बिझनेसच्या दृष्टीने महत्वाचे दिवस असल्या कारणाने टेनिसन ऑफिसर्सना गरज पडल्यास आठवड्याच्या ईतर दिवसातंच सुट्या घ्याव्या लागत. तसेही सगळे ऑफिसर्स मूळ पुण्या मुंबईचेच असल्या कारणाने एक-दोन दिवसांची सुटी न घेता वर्षातून दोन-तीन वेळा दोन आठवड्यांची सुटी घेवून जाणेच सगळ्यांना पसंत होते. थोडक्यात मागच्या तीन वर्षांपासून टेनिसनच्या ऑफिसर्सचे आजिबात रंग नसलेले, कंटाळवाणे आयुष्य नयनरम्य, रंगीबेरेंगी डॅफोडिल वॅली मध्ये अव्याहतपणे चालू होते.

सहा महिन्यांपूर्वी आलेल्या वसंत ऋतूमध्ये डॅफोडिल वॅलीने डेफोडिल्स, मॅग्नोलिया, डेलिया आणि पिट्युनिया चा नवा रंगीबेरंगी चेहरा ओढला आणि मॅग्नोलियावासियांच्या कंटाळवाण्या आयुष्यात थोडा बदल घडून आला. पराग त्याची बर्‍याच काळापासूनची गर्लफ्रेंड जेनेलियाशी डिंसेबर मध्ये एंगेज होणार होता. डॅफोडिल वॅली सिटीमध्ये येण्यापूर्वी तो सिनेसॄष्टीत रिपोर्टर असलेल्या जेनेलियाबरोबर मुंबईमध्ये काही काळ लिव-ईन रिलेशनशिपमध्येही रहात होता. मार्च दरम्यान वसंतात फुलणार्‍या फुलांचा पीक मोसम असतांना जेनिलिया महिनाभर मॅग्नोलियामध्ये राहून गेली आणि त्यादरम्यान ती सगळ्या ग्रूपमध्ये चटकन मिसळून गेलीसुद्धा. त्यांच्या लेट नाईट पर्यंत चालणार्‍या सिटिंग्स मध्येही तिच्या सिनेजगतांच्या गप्पांनी सॉलिड रंगत येत असे. सहा पुरुषांच्या कंपनीत बरळणं चालू होऊन आधाराशिवाय चालता न येण्याईतपत ड्रिंक्स करतांनाही ती अजिबात लाजत वा बुजत नसे. बाकीचेही तिची 'मित्राची होणारी बायको' अशी भीड न ठेवता तिला 'सेवंथ मॅन ईन द रूम' असे मित्रासारखेच समजत. त्यांच्या 'फॉर मेन ओन्ली' टाईपच्या विनोदांची लेवलही ती होती म्हणून कधी चेंज झाली नाही, तिलाही कधी ह्या विनोदांमध्ये वावगे वाटले नाही. तिच्या संसर्गजन्य हसण्यातून ती ही ह्या विनोदांना हातभारंच लावत असे.
पण जेनेलिया आल्या पासून अरूणची चांगलीच पंचाईत होऊन बसली होती. ईथे येण्याआधी अगदी साधे सरळ आयुष्य जगलेल्या अरूणने नुकताच कुठे 'पहिला पेला' हातात घेतला होता. कॉलेजात गर्लफ्रेंड वा ऑफिसमध्ये स्त्री सहकार्‍यांशी संवादाचा आजिबातंच अनुभव नसल्याने तो जेनेलिया असतांना बुजूनच जाई. तिच्याशी नजर देवून दोन शब्दं बोलणेही त्याला शक्य होत नसे. मुलींच्या बाबतीत त्याचा हा लो-कॉन्फिडन्स ईतर मॅग्नोलिया वासियांच्या विनोदाचा विषय झाला नसता तर नवलंच. दोन पेग पोटात जातांच त्याची फिरकी घेण्याचा सगळ्यांचाच ऊत्साह १० पट वाढत असे आणि जेनेलियाही ह्यात मागे नसे. जेनेलियाला प्रपोज करण्याचे नाटक करण्यापासून, स्त्री-पुरूष संबंधांबद्दल त्याला नको-नको ते प्रश्न विचारून त्याची खिल्ली ऊडवण्यात त्यांना कोण मजा वाटत असे. त्याला त्रास देण्यात सगळ्यात आघाडीवर कोण असेल तर केविन, बाकींच्यांनी त्याला दोन तीन वेळा अजून जोक्स करण्यास आडकाठी करेपर्यंत त्याचे अरूणची खिल्ली ऊडवणे थांबत नसे. पण अरूणने केविनचे किंवा ईतर कुणाचे बोलणे कधी मनावर घेतल्यासारखे वाटले नाही, तो नेहमी हसत लाजतच राही. दिवसेंदिवस ग्रूपमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढत होता, जेनेलियानेही त्याच्याशी गप्पा वाढवत त्याला मुलींशी संवाद साधण्याच्या कलेचे मंत्र शिकवत त्याच्या वाढत्या आत्मविश्वासाला हातभार लावला होता. ती परत जातांना अरूणने तिला मनापासून दिलेले गिफ्ट त्याला तिच्याबद्दल वाटत असलेली कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतिकंच होते जणू. जेनेलियाला असेपर्यंत जमेल तेव्हा परागचे काम आपल्या अंगावर घेत बाकीच्यांनी त्याला तिच्याबरोबर वेळ घालवण्याची सोय करून दिली. कायम मुंबईतल्या गर्दीची आणि माणसांच्या संपर्काची सवय असलेली जेनेलियाला जेव्हा पहिल्या आठवड्यातच बोअरडमने वैतागून परत जाण्याबद्दल बोलू लागली तेव्हा मग सगळ्यांनी आपल्या आठवड्यातल्या सुट्या अ‍ॅडजस्ट करत दररोज कोणीना कोणी तिला कंपनी द्यायची असे ठरवले.

जेनेलिया गेल्यावर दिनेशही दोन आठवड्यांच्या सुटीत पुण्याला जावून आला होता. त्याचे खूप वर्षांपासूनचे प्रेम असणार्‍या बंगाली मुलीशी 'देबोलिनाशी' लग्नं करण्यासाठी बरेच दिवसांपासून तो त्याच्या कर्मठ आईबाबांची मनधरणी करीत होता. ह्या खेपेला मात्रं त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नाला मान्यता मिळाली. अर्थात दिनेशच्या आयुष्यात असे काही चालू आहे ह्याची ईतर मॅग्नोलिया वासियांना आजिबात कल्पना नव्हती. त्याने जेव्हा लग्नं करत असल्याचा गौप्यस्फोट सुटीवरून आल्यावर पहिल्याच रात्रीच्या जेवणादरम्यान केला तेव्हा सगळ्यांनी पहिल्याने तर त्याला हे लपवून ठेवल्याबद्दल खूप बोलून घेतले आणि नंतर मिठी मारत त्याचे अभिनंदन केले. केविन तर देबोलिनाचा फोटो दाखवच म्हणत दिनेशच्या मागेच पडला. एक दोघे जण म्हणालेही 'अरे जाऊदे त्याला वाटेल तेव्हा दाखवेल' पण केविनने जेनेलियाचा दाखला देत त्यात काय एवढे लपवायचे म्हणत पिच्छाच पुरवल्यावर शेवटी नाईलाज होवून दिनेशने फोनवरचा फोटो दाखवला. फोटो बघून केविन म्हणाला 'अहाहा! बॉस एवढी मालदार पार्टी असेल तर मी कोणी कितीही आग्रह केला असता तरी फोटो दाखवला नसता'. केविनच्या जोकवर सगळ्यांनी अवघडून हसल्यासारखे केले आणि दिनेश तडकाफडकी जेवण सोडून निघून गेला. दुसर्‍या दिवशी दिनेश ऑफिसमध्येही कुणाशी फार काही बोलला नाही. तो रात्री सिराजच्या रूमवरही जेवण्यासाठी आला नाही तेव्हा पराग स्वतः दिनेशकडे गेला आणि त्याला घेवून जेवायला आला. त्यांचे नेमके काय बोलणे झाले कळाले नाही पण आला तेव्हा दिनेशचा मूड बरा दिसत होता. केविन आणि दिनेशमध्ये आलेल्या तणावाची परिणिती जेवणानंतर त्याने पिण्याला न थांबता काढता पाय घेण्याने होऊ लागली. बाकीच्यांचाही मूड कमी होऊ लागला आणि त्याबरोबरीने ग्रूपमध्ये पिणे कमी होत गेले ते गेलेच, पण सगळ्यांचे आपापल्या रूममध्येच बसून पिणे मात्रं चालूच राहिले.

सर्वात जास्तं लोन केसेस क्लोज करणार्‍या आणि ग्राहकांकडून हाय सॅटिस्फॅक्शन रेटिंग्ज मिळवणार्‍या ऑफिसरला टेनिसन मॅनेजमेंटचा पगाराच्या १०% एक्स्ट्रा ईन्सेंटिव पगार / बोनस देण्याचा नियम होता. ऑफिसर्स मध्ये हेल्दी काँपिटिशन वाढीस लागावी असा मॅनेजमेंट चा सरळ सरळ हेतू असावा. केस बेसिस वर फिक्स्ड कमिशन तर होतेच आणि १०% ईन्सेंटिव थोडक्यात पर्फॉर्मन्स बोनस, मॅनेजमेंटचा होरा बरोबर निघाला. नियम अंमलात आणल्या पासून सगळेच ऑफिसर्स प्रत्येक केस वर जास्तं मेहनत घेवू लागले. १०६ केसेस क्लोज करत पहिल्या वर्षी केविननेच हा बोनस पट्कावला आणि त्यापाठोपाठ राहूलने ९४ केसेस क्लोज केल्या होत्या. केविनची ईंप्रेसिव पर्सनॅलिटी, त्याचे पॉलिश्ड बोलणे, समोरच्याचा ईंट्रेस्ट लक्षात घेवून त्यावर गप्पा मारत आपली छाप पाडणे, लोनची किचकट प्रकिया सोप्या पद्धतीने सांगणे, घराच्या पसंतीनंतर शक्यतो लोन प्रोसेस पासून लांब राहणार्‍या ग्राहकांच्या 'पत्नी' वर्गालाही महत्व देत त्यांना प्रोसेस समजावून सांगणे अश्या सगळ्या सॉफ्ट स्कील्स आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्याच्या कौशल्यामुळे राहूलसहित सर्वांनाच केविनशी स्पर्धा करणे पहिल्या वर्षी जड गेले. पण दुसर्‍यावर्षी मात्रं आशर्यकारक रित्या राहूलने केविनच्या ११४ केसेसच्या तुलनेत ११६ केसस क्लोज करत 'बेस्ट परफॉर्मर' चा बोनस पटकावला. त्या पूर्ण वर्षात राहूलने स्वतःवर खूपच मेहनत घेतली होती. रात्रं रात्रं जागून ऑनलाईन कोर्सच्या असाईनमेंटसचे कंप्लिशन, ग्राहकांची मानसिकता समजण्यासाठी तज्ञ लोकांशी पत्रव्यवहार, दोन आठवड्यांच्या सुटीमध्ये घरी न जाता तज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे, सेमिनार, कार्यशाळा अटेंड करणे असे आणि बरेच काही.
मात्रं चालू असलेल्या पूर्ण वर्षभर केविनने राहूलच्या कामावर त्याच्या क्लायंटस समोरच काहीतरी खुस्पटं काढून अपूर्ण पेपरवर्क, चुकलेले नंबर्स आणि डेड्लाईन्स, मॅनेजमेंटकडे वजन नाही ह्या आणि अश्या अनेक कारणांनी ताशेरे ओढले होते. एक दोन क्लायंट्सना परस्पर फोन करून लोन ऑफिसर चेंज करून घ्या असेही सुचवले होते. हे कमी की काय म्हणून त्याने अजून ऑफिसर नसलेल्या अरूणच्या सगळ्या केसेसवर ऑफिसर म्हणून आपलेच नाव घालत त्या केसेस वरती रिपोर्ट केल्या होत्या. क्लोज झालेल्या केसेस ची संख्या बघता, अगदी थोड्या फरकाने 'बेस्ट पर्फॉर्मर' केविनच असणार ह्यावर आता जवळ जवळ शिक्का मोर्तब झाले होते. राहूलने ह्यावर फार काही रिअ‍ॅक्ट न होण्याचेच धोरण स्वीकारले. केविनच्या ह्या अनप्रोफेशनल आणि चीड आणाणर्‍या कृती नंतरही कमालीच्या शांत असलेल्या राहूलला पाहून बाकी सगळेच अचंबित झाले होते.

एक लग्नं झालेला भाऊ सोडला तर केविनला कोणी नातेवाईक नव्हते त्यामुळे देश विदेशातली पर्यटन स्थळे भटकणे हाच केविनचा प्रत्येक सुटीचा प्लॅन. ग्रूपमध्ये आपल्यामुळे वाढलेला तणाव पाहून त्याने तडकाफडकी दोन आठवड्यांची सुटी टाकली आणि तो हवाई बेटांची सफर करून आला. त्याचे असे जाणे बहुधा चांगल्यासाठीच झाले असावे कारण तो आला तेव्हा मॅग्नोलिया वासियांचे खाणेपिणे पुन्हा सुरळीत सुरू झाले होते. त्यालाही चांगले वाटले. तो येताच दिनेशसहित सगळ्यांनी त्याच्या ट्रीपबद्दल भरपूर गप्पा मारल्या. केविनही आपल्या ट्रीपबद्दल भरभरून सांगत राहिला, फोटो, विडिओ दाखवत राहिला. त्याला भेटलेल्या एका ऑस्ट्रेलियन मुलीबद्दल, तिच्याबरोबर केलेल्या मजेबद्दल रंगवून काहीबाही सांगत राहिला. पण हे केविनचे नेहमीचेच म्हणत सगळ्यांनी त्याचे बोलणे हसण्यावारी नेले. केविनने सगळ्यांसाठी आणलेले एकाच साईझचे हवाईयन शर्ट्स सगळ्यांनी घालून पाहिले तेव्हा ती एकंच साईझ सगळ्यांना व्यवस्थित फिट बसली. पुढचा अर्धा तास सगळ्यांनी आपल्याला हवी असलेली डिझाईन दुसर्‍याच्या हातात असल्यास ती त्याच्याकडून मिळवण्यात एकमेकांची मनधरणी चालू केली. सिराज आणि राहूल दोघांचे शर्ट अदलाबदली करण्याचे डील तडीस गेले. अरूण आणि परागला, परागच्या हाताला लागलेली एकंच डिझाईन आवड्ल्याने आणि पराग हटून बसल्याने अरूणला हातात आलेल्या डिझाईनवरच समाधान मानावे लागले. शेवटी ऊरलेल्या दोन सारख्याच डिझाईनच्या शर्टपैकी एकावर दिनेशने समाधान मानले आणि ऊरलेला दुसरा केविनने ठेऊन घेतला.
प्रेमाचाच व्यवहार होता सगळा, टेनिसनच्या मॅग्नोलियावासियांमध्ये सगळे आलबेल असल्याची नांदी होती जणू.

पण मॅग्नोलियाच्या नशिबात कदाचित ऑगस्टची ती सकाळ 'ऑल ईज नॉट वेल' चा पुकारा करतंच ऊगवली. मॅग्नोलियाच्या मागच्या बाजूच्या फरशीवर पाण्याची मोटार चालू करायला गेलेल्या मॅग्नोलियाच्या सिक्युरिटी गार्ड सुरेशला हवाईयन शर्ट घातलेल्या केविनचे डोके फुटलेले निष्प्राण शरीर सापडले.

पोलिस डायरीतल्या नोंदी

मेडिकल रिपोर्ट
केविन
- ऊंचावरून पडल्याने डोके फुटून मृत्यू
- रक्तामध्ये प्रचंड प्रमाणात अल्कोहोल सापडले
-एवढे अल्कोहोल प्राशन केलेल्या अ‍ॅवरेज मनुष्याला स्वतःचा तोल सावरत ऊभे राहणे अशक्य. पण अट्टल दारूबाज असल्यास असा मनुष्य जवळचे अंतर व्यवस्थित चालून जाऊ-येवू शकतो
-विक्टिम काही वर्षांपासून चेन स्मोकर असावा
-बाल्कनी आणि खाली फरशीवर सापडलेल्या सिगरेट बट्सवर केवळ विक्टिमचेच डीएनए मिळाले आहेत
-स्ट्र्गल झाल्याचे शरीरावर कुठलेही पुरावे नाहीत
-अ‍ॅक्सिडेंट की आत्महत्या किंवा खून स्पष्टं अनुमान सांगता येत नाही
-मृत्यू सकाळी ७:३० ते ८:३० दरम्यान झाला असावा

अरूण
- शरीरात अल्कोहोल आणि झोपेच्या गोळ्यांच्या अतिशय स्ट्राँग डोसेसचे ट्रेसेस
- शरीरावर ईतर जखमा वा स्ट्रगलचे पुरावे नाहीत

टाईमलाईन
-सकाळी ७:०४ सिक्युरिटी गार्ड सुरेश ड्युटीवर हजर
-सकाळी ७:५० 'नेविल परेरा' ची 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये एंट्री
-सकाळी ८:०१ 'नेविल परेरा' चा कॅथी डिसुझाला १ मिनिट ३ सेकंदांचा फोन
-सकाळी ८:०९ 'नेविल परेरा' ची 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये एक्झिट
-सकाळी ९:५५ सिराज कांचवालाचा पोलिसांना फोन
-सकाळी १०:२२ पोलिस 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये दाखल.

क्राईम सीन (केविनचे अपार्टमेंट)
-केविनच्या अपार्टमेंटचे दार ओढलेले आणि लॅच्ड होते पण आतून लॉक नव्हते.
-सोफ्यावर अरूण गाढ झोपलेला होता, क्राईमसीन वर सापडल्याने त्याचेही मेडिकल चेक-अप करवले.
-बेडरूममध्ये वा बाल्कनीत स्ट्र्गलचे पुरावे मिळाले नाहीत.
-घरात केविनची त्याच्या अपार्टॅमेंटची चावी मिळाली नाही.
-रूममध्ये झोपेच्या गोळ्यांचे ट्रेसेस असलेला एक दारूचा ग्लास मिळाला ज्यावर सिराज सोडून सगळ्यांच्या बोटांचे ठसे आहेत.

प्रासंगिक माहिती
- नेविलच्या अकाऊंटमध्ये जेमतेम अडीच लाख रुपये आहेत.
- केविन दर महिन्याला कॅथी डिसुझाला पैसे पाठवतो.
-बॉडी सापड्ल्यावर सुरेशने सगळ्यांना बोलावून आणले. अरूणने त्याच्या अपार्टमेंटचा दरवाजा ऊघडला नाही.

मॅग्नोलियाचा सिक्युरिटी गार्ड सुरेश
-मी रोज सकाळी सातच्या आसपास येतो आणि संध्याकाळी साहेब लोक आले की सातच्या आसपास निघून जातो.
-स्नॅक्स सेंटरचं बांधकाम चालू होतो तेव्हा बिल्डिंगमध्ये दोन-तीन साहेबांच्या घरात चोरी झाली म्हणून माझी ड्युटी ईथे लागली.
-मी दहाच्या आसपास बिल्डिंगच्या मागच्या बाजूला पाण्याची मोटर चालू करायला गेलो तेव्हा केविन साहेब पडलेले दिसले. मला वाटलं ते सकाळी कधी तरी सिगरेट पितांना बाल्कनीतून पडले असतील.
-बाजूच्या टेकडीवर सपाटीकरणासाठी ड्रिलिंगचे काम चालू आहे. त्या ड्रिलचा आवाज खूप मोठा असतो म्हणून केविन साहेब पडल्याचा आवाज मला आलाच नाही. साहेब लोकांनीही तिथल्या कन्स्ट्रक्शन मॅनेजरला ड्रिलच्या आवाजामुळे झोपमोड होते म्हणून दोन-तीन वेळा कंप्लेंट केली आहे.
-पण मी सकाळी केविन साहेबांना स्नॅक्स सेंटरला सिगरेट आणायला जातांना पाहिले होते. म्हणजे मी पेपर वाचत होतो म्हणून चेहरा दिसला नाही पण रंगीबेरंगी शर्ट दिसला म्हणजे ते केविन साहेबंच असले पाहिजे. ते जवळजवळ रोजच सकाळीच स्नॅक सेंटरमध्ये सिगरेट आणायला जातात.
-हवाहवाईका कुठे फिरून आलापासून ते नेहमीच त्यांचा रंगीबेरंगी शर्ट घालून सकाळी सिगरेट आणायला जातात. सवयच आहे त्यांची ती, मी ओळखतो ना त्यांचा तो नारळांच्या झाडावाला लाल-निळा शर्ट.
-केविन साहेबांना सकाळी ऊठल्या ऊठल्या सिगरेट ओठांत पाहिजे म्हणजे पाहिजेच असते. त्याशिवाय त्यांचे हात पाय थरथर कापतात त्यांना एक वाक्य ही नीट बोलता येत नाही. ते सकाळीच सात-आठ ला ऊठून सिगरेट घेऊन येतात आणि मग बाल्कनीत ऊभे राहून भकाभका चारपाच सिगरेट ओढतात. बर्‍याचवेळा पुन्हा झोपूनही जातात.
-सुरूवातीला मीच त्यांना रोज एक पाकीट आणून द्यायचो पण आता तेच जातात.
-केविन साहेब त्यांचे भाऊ येण्याआधी, ते असतांना की ते निघून गेल्यावर सिगरेट आणायला गेले होते ते नक्की आठवत नाही.
-केविन साहेबांचे भाऊ निघतांना फार घाईत होते. मी त्यांना एक्झिटची एंट्री करायला सांगितली तर ते म्हणाले तूच करून घे.
-पराग साहेबांच्या त्या जेनेलिया मॅडम आल्या होत्या तेव्हा सगळे साहेब लोक रोज बारी लावून मॅडमला फिरायला घेवून जात पण केविन साहेबांची बारी असली की ते दोघं कधी बिल्डिंगमधून बाहेर पडलेच नाही.
-सगळे साहेब लोक दहाच्या आसपास ऊठतात आणि अकरा वाजता बँकेत जातात.
-बिल्डिंगमधल्या साहेब लोकांची विजिटर लॉग मध्ये एंट्री करत नाही.

सिराज कांचवाला
-सुरेश धावतपळत केविन पडल्याचे सांगायला आला तेव्हा अरूण सोडून आम्ही सगळे खाली जमलो आणि तुम्हाला फोन केला. तुम्ही येईपर्यंत केविनच्या फ्लॅटमध्ये जायचे नाही असे आम्ही ठरवले.
-आम्ही रात्री केविनच्या रूममध्येच आठ वाजता जेवायला जमलो आणि नंतर सगळे दारू पित बसले.
-रात्री दोनच्या आसपास मीच सर्वात शेवटी गेलो. दिनेश, पराग आणि राहूल माझ्या आधी निघून गेले होते. दिनेश आणि राहूलला तर मी जातांना पाहिले पण पराग कधी निघून गेला मला कळालेच नाही. सगळे नेहमी निरोप घेवूनच जातात पण पराग बहूतेक तसाच निघून गेला असावा.
-अरूणला काल बहूतेक खूप जास्तं झाली असावी. तो जेवण झाल्यानंतर तासाभरातंच केविनच्या फ्लॅटमध्येच सोफ्यावर झोपून गेला. तसेही त्याने हल्लीच पिणे चालू केल्याने त्याचा स्टॅमिना फारंच कमी आहे. तो ज्युनिअर असल्याने दिवसभर त्याला बरीच धावपळ करावी लागते. संध्याकाळी जेवणानंतर एक पेग संपायच्या आधीच तो पेंगायला लागतो. काल केविनने 'आता तुझा स्टॅमिना वाढवायला हवा' म्हणत अरूणला स्वतःचा ग्लास देत दुसरा पेगही जबरदस्तीनेच संपवायला लावला आणि बाकी सगळ्यांपेक्षा केविनचे पेग खूप स्ट्राँग असतात असं ऐकून आहे.
- धार्मिक कारणामुळे मी तर कधीच दारू पीत नाही पण बाकीचे पीत असतांना मला गप्पा मारत बसायला आवडते. नाही तरी थ्रिलिंग वाटावे असे दुसरे काही करण्यासारखे ईथे नाही. प्रचंड बोरिंग आयुष्य आहे ईथले.
-केविनने अरूणला दिला तो ग्लास त्याला दिनेशने भरून दिला होता हे मी पाहिले होते. माझ्यामते बाकी कोणी पाहिले नसावे. दिनेश आणि केविन मधले ताणलेले संबंध बघता दिनेशने असे करणे मला चांगलेच वाटले पण त्याच्या कृतीचे खूप आश्चर्यही वाटले.
-दिनेश बाराच्या आसपास गेला असावा आणि पराग त्यानंतर कधी तरी पण मी त्याला जातांना बघितले नाही. पण तो कदाचित दिनेशबरोबच गेला असावा असे मला वाटते. महिन्यापासून ते दोघे एकमेकांबरोबर खूपच वेळ घालवत आहेत, सारखे काहीतरी सिरियस बोलणे चालू असते.
-मध्येच दारू संपल्याने राहूल त्याच्या रूममधून विस्की, वोडका, रम आणि टकिला शॉट्स घेवून आला. केविन विस्की शिवाय बाकी काही पीत नाही आणि राहूलही काल नेहमी पेक्षा कमी पीत होता त्यामुळे तो केविनसाठी एवढ्या सगळ्या बाटल्या घेवून आल्याचे मला आश्चर्य वाटले.
त्याने एक दोन वेळा केविनला 'टकिला शॉट्स' ट्राय करण्यासाठी आग्रहसुद्धा केला पण केविन विस्कीच पीत बसला.
-एक वाजला तेव्हा केविनने पुन्हा त्याचा हवाईमधला ऑस्ट्रेलियन मुलीचा किस्सा सांगायला घेतला तेव्हा राहूल कंटाळून निघून गेला.
-राहूल गेल्यावर केविनने मला त्याने त्याच्या वहिनीबरोबर झालेल्या चुकीबद्दल, त्याच्या लग्नाबद्दल, मुलाबद्दल आणि जेनेलियाशी त्याच्या संबंधाबद्दल सांगितले. पण केविनचे हे नेहमीचेच असते त्याला खूप चढली की तो असे काहीतरी बरळत राहतो. दुसर्‍यादिवशी त्याला त्यातले काहीही आठवत नाही. मी त्याच्या बरळण्याला त्याच्या डोक्यातले हवामहल समजून एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडून देतो.
-राहूलने एकदा माझ्याकडे केविन ऑफिसमध्ये करीत असलेल्या चिटिंगबदाल मन मोकळे केले होते. त्याच्या मनात केविनबद्दल प्रचंड राग धुमसत होता आणि केविनला आयुष्यभराचा धडा शिकवण्याचे त्याने ठाम ठरवले होते.
-सुरेशने केविनच्या चेन स्मोकिंग बद्दल संगितलेले सगळे खरे आहे.
-एकदा केविनच्या घरात चोरी झाली तेव्हा त्याने सुरेशवर आळ घेतला होता. सिगरेट द्यायला आला तेव्हा सुरेशने त्याची नाईट स्टँडच्या ड्रॉवर मधली सोन्याची वेडिंग रिंग चोरली असे केविनचे म्हणणे होते. त्याने सुरेशला पोलिसांत द्यायची धमकी दिली होती पण परागने मध्ये पडून सुरेशची नोकरी वाचवली. तेव्हापासून केविनने सुरेश कडून सिगरेट मागवणे बंद केले.
-केविनचे कधी लग्न झालेले असल्याचेच आम्हाला माहित नव्हते त्यामुळे आम्ही तो केवळ केविनचा त्रागा असावा म्हणत सोडून दिले.

नेविल परेरा(केविनचा भाऊ)
-आमच्या वडिलोपार्जित घरावरचा हक्कं सोडण्यासाठी केविनने २५ लाख रुपये मागितले होते. त्याचा चेक देण्यासाठी आणि पेपर्सवर त्याची सही घेण्यासाठीच मी आलो होतो.
-मी दारावर क्नॉक केले तेव्हा कोणी दार ऊघडले नाही म्हणून मी हँडल फिरवले तर ते ऊघडले. मी आत गेलो तेव्हा सोफ्यावर एक जण झोपला होता. मी आत बेडरूममध्ये जाऊन केविनला ऊठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऊठलाच नाही.
-तेव्हा मला कळले की त्याची सही घेण्यासाठी मला आता थांबावे लागणार आणि माझी कोईंबतूर वरून रिटर्न फ्लाईट चुकणार म्हणून मी फॅनीला- माझ्या बायकोला लागलीच फोन करून सांगितले. मग मी ग्रीनलँड ईन मध्ये आलो आणि ईथे रूम बूक केली.
-केविनच्या अंगावर पांघरून होते म्हणून त्याने कोणता शर्ट घातला होता ते मला दिसले नाही.
-मी काल रात्री मुंबईवरून कोईंबतूरला आलो आणि रेंटल कार घेवून पहाटेच ईथे येण्यासाठी निघालो.

खबरींकडून मिळालेली माहिती
-मुंबईमधले सध्या केविनचा लहान भाऊ 'नेविल' रहात असलेले वडिलोपार्जित घर सोडले तर केविनला तसे कोणी नातेवाईक नव्हते. नेविलच्या लग्नानंतर, फॅनी घरात आली आणि काही तरी 'कारण' होवून भावाभावात वितुष्टं आले. नेविल ने केविनला दुसरीकडे रहायला जायला सांगितले. फॅनीने -केविनच्या कॅरॅक्टर वरून त्याच्यावर आरोप केले होते. पण पोलिस केस झाली नाही.
-नेविल खूप कर्जात आहे आणि ते भागवण्यासाठी त्याला त्याचे वडिलोपार्जित घर विकायचे आहे.
-नेविलच्या लग्नाआधी केविनचे 'कॅथी डिसुझा'शी लग्न झाले होते आणि त्यांना साडेचार वर्षांचा मुलगा 'रॉनी' आहे. ते वेगळे राहतात पण अजून डिवोर्स झालेला नाही

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
काय कारण असेल केविनच्या मृत्यूमागे - अ‍ॅक्सिडेंट, आत्महत्या की खून? खून झाला असल्यास कोणी व कसा केला असेल?

तुमच्या एकापेक्षा अनेक थिअरीज असतील तरी हरकत नाही पण घटनाक्रम आणि थोडी कारणीमीमांसा द्यावी अशी अपेक्षा. यावेळी क्लू देता येणार नाहीत किंवा देण्याची गरज पडणार नाही. पण काही कन्फ्युझिंग वाटत असल्यास आणि फॅक्ट्सचे क्लॅरिफिकेशन हवे असल्यास बोल्ड ईटालिक फाँट मध्ये लिहिले तर मला त्या पोस्ट्स ना ऊत्तर देणं सोपं जाईल. बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे रेग्यूलर फाँटमध्ये चालूदेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केस चांगली होती पण आधीच्या एमराल्ड पराडाईज आणि अक्वा सेरेनिटी च्या तुलनेत उकल्/स्पष्टीकरण फारसं पटलं नाही. मला वाटणारी कारणे वरती इतरांनी आधीच विचारून झाली आहेत त्यामुळे परत विचारत नाही>>>
सॉरी हायझेनबर्ग, यावेळी केसची उकल आणि ही नंतर आलेली स्पष्टीकरणं अजिबातच पटली नाहीत. >> नानबा, चीकू नेमके काय पटले नाही ते लिहिणार का?
तुमच्या मते कोणी वेगळा खुनी आहे का? त्याने खून कसा केला असेल तुम्हाला वाटते. जरूर लिहा ईथे मागच्या प्रतिसादातून कॉपी पेस्ट करून लिहिले तरी चालेल.
अरूण सोडून ईतर लोक खून करण्यास असमर्थ का होते हे मी आधी लिहिलेच आहे त्यामुळे अरूणने खून केला हे गृहीत धरून,त्याने तो कसा केला ह्याची करणीमीमांसा करणे एवढी एकंच शक्यता ऊरते.

त्यामुळे रात्री २ ला झोपलेला माणूस १२ पर्यंत काही नक्की उठणार नाही हे ही खुन्याच्या डोक्यात आलं असणार.
आणि म्हणूनच त्यानी मौके पे चौका मारायचं ठरवलं असेल.
>>>
ऑब्जेक्शन मायलॉर्ड...
खुनी साडेनऊ ला झोपला असताना मयत इसम २ ला झोपला हे त्याला कसं कळेल??
सो, मयत इसम रोजच्याप्रमाणे १० ला उठेल असं समजून अन गाढ झोपला आहे हे पाहून मगंच त्यानी खुनाचा इंपल्सिव्ह डिसिजन घेतला असं म्हणायला हवं. >>>>> अँकी, अरे अरूण समोर केविन च्या भावाने त्याला साडे सतरा मिनिटं ऊठवायचा प्रयत्न केला तरी तो ऊठला नाही ह्याच्या ऊपर तो गाढ झोपेत असल्याचे अजून काय पुरावा हवा आहे. त्यासाठी केविन किती तास झोपला हे मोजण्याची खरंच गरज आहे का?

हाब, इतके सगळे जण म्हणताहेत की इस बार भट्टी जमी नही तो एक बार मान कर भी देखो. इतक्या अट्टाहासाने तुमचाच मुद्दा पकडून ठेवण्यापेक्षा जनता जनार्दनाच्या भावना लक्षात घ्या.

पुढच्या कोड्याच्या प्रतीक्षेत.…...

हाब, इतके सगळे जण म्हणताहेत की इस बार भट्टी जमी नही तो एक बार मान कर भी देखो. इतक्या अट्टाहासाने तुमचाच मुद्दा पकडून ठेवण्यापेक्षा जनता जनार्दनाच्या भावना लक्षात घ्या. >>> केस भावनाओं के आधार पर नहीं सुबुतों के बिनाह पर लडी जाती है मायलॉर्ड और यह अदालत सुबुत मांगती सुबुत...दलिलें नही. Lol

Lol

मला अरुण खूनी असण्याची कारणे पटली.

पण मला राहूलवर संशय होता. केविन त्याच्याबाबतीत ऑफिसमध्ये अत्यंत घृणास्पद राजकारण खेळत असताना त्याचं अत्यंत शांत असणं. त्याचं अभ्यासू व्यक्तिमत्व वगैरे. सिराजजवळ बदला घेण्याबद्दल बोलणं. दारूच्या बाटल्या आणणं. अति आग्रहाने केविनला दारु पाजायचा प्रयत्न करणं... शेवटी चावी पण त्याच्याकडेच सापडणं वगैरे क्लू वरुन तोच खूनी असेल असं वाटत होतं. Happy

पण अरूण तिथे असताना राहूलसारखा हूशार माणूस ही रिस्क घेणार नाही, हे ही पटणेबल आहेच.
अरूणकडे पण त्याच्या दृष्टीने स्ट्राँग मोटीव होता. आणि संधी मिळताच त्याने खून केला. वर त्यावेळी जितकी प्रिकाॅशन घेता आली तितकी त्याने घेतलेली दिसते आहे.

नवीन केसच्या प्रतिक्षेत. Happy

या सगळ्यावरून होम्सच्या एका प्रसिद्ध quote ची आठवण झाली. "Once you eliminate the impossible, whatever remains, no matter how improbable, must be the truth." ही केस तंतोतंत लागू होते त्याला Happy

पुढच्या केसच्या प्रतीक्षेत!

चीकू एक्झाक्टली तीच 'निगेशन' ची टेक्निक/ स्ट्रॅटेजी वापरली आहे.
जर काय घडले असावे हे सहजासहजी सांगता येणे शक्य नसेल तर काय घडणे शक्य नव्हते तिथे बघायला सुरूवात करू शकतो.

अँकी, अरे अरूण समोर केविन च्या भावाने त्याला साडे सतरा मिनिटं ऊठवायचा प्रयत्न केला तरी तो ऊठला नाही ह्याच्या ऊपर तो गाढ झोपेत असल्याचे अजून काय पुरावा हवा आहे. त्यासाठी केविन किती तास झोपला हे मोजण्याची खरंच गरज आहे का?
>>>
टोटली अ‍ॅग्री, मला असं म्हणायचं होतं की असं जरी गृहित धरलं की नेविल जाईपर्यंत अरूण खरंच झोपला होता, तरी नंतर उठून खून करायला त्याला वाव होता. फक्त त्या केस मधे इम्पल्सिव मोटिव (नेविल / केविनच्या परिस्थितिचा फायदा उचलायचं) नसतं. अन कदाचित अरूणनी खून केला नसता...

जबरद्स्त आहे हा प्रकार. ऊकल करायचा प्रयत्नात ३ तास कसे निघून गेले कळलेच नाही, जणू सिनेमाच बघितला केसचा.
कल्पना आनि डोकॅलिटीला _/\_
आजून आहेत का अश्य केस?

Pages