तीन वर्षांपूर्वी ऊटी जवळच्या नयनरम्य टेकड्यांवर 'प्रोटीआ' ग्रूपने वीकेंड होम धर्तीवर 'कॉटेजेस आणि चॅले' स्टाईलघरांचा 'डॅफोडिल वॅली सिटी' हा ६५०० घरांचा प्लान जसजसा प्रत्यक्षात ऊतरावयाला सुरूवात केली तशी वॅलीतली एकंदर वर्दळ आणि डॅफोडिल सिटीला भेट देणार्या कुटंबांमध्ये पर्यटनाबरोबरच घरखरेदी अशी टूम निघू लागली. प्रोटीआ ग्रूपची शहरातली ऑफिसेस बंगळूर, मैसूर, कोची मधल्या नवश्रीमंत ग्राहकांना हेरून शहरातूनच लक्झ्युरी बसेसमधून अश्या ग्राहकांची पाठवणी डेफोडिल वॅली सिटीला करू लागली. सिटीला भेट देणार्या ग्राहकांची वाढती संख्या बघून बिझनेस मिळवण्यासाठी देशातली आघाडीची 'टेनिसन' बँकही कशी मागे राहिल? बँकेनेही वॅली मध्ये आपले ऑफिस ऊघडले आणि पाच होम लोन ऑफिसर्स कम सेल्स एजंट्स ची तिथे नेमणूक केली. पराग कामत, दिनेश शर्मा, केविन परेरा, सिराज कांचवाला आणि राहूल त्रिपाठी. कामाचा वाढता लोड पाहून सगळ्यांच्या मदतीसाठी वर्षापूर्वी अरूण राव ह्या ज्युनिअरलाही ट्रेनिंग साठी पाठवले होते. बँकेने ह्या सहा जणांच्या राहण्यासाठी स्टाफ क्वार्टर्स म्हणून डॅफोडिल सिटीतच वर्षभरापूर्वीच तयार झालेली तीन मजली 'मॅग्नोलिया हेरिटेज' सध्यापुरती पाच वर्षांच्या भाडे करारावर प्रोटीआ ग्रूपकडून बांधून घेतली होती. पाच वर्षानंतर हा करार वाढवता येणार होता किंवा बिल्डिंग पुन्हा प्रोटीआ ग्रूपकडे ह्स्तांतरित करता येणार होती.
डॅफोडिल्स वॅली मध्ये शाळा,मॉल्स वगैरेंची गरज नसल्याने वीकेंडला येणार्या ग्राहकांना राहण्यासाठी 'ग्रीनलॅंड ईन' हे थ्री स्टार हॉटेल, काही रेस्टॉरंट्स, एक छोटेसे क्लिनिक व एका डिपार्टमेंटल कम मेडिकल स्टोर शिवाय फार काही नव्हते. या पूर्ण एरियाला वॅली सिटीच्या प्लान मध्ये 'बिझनेस सेंटर' नाव होते. प्रत्येकी दोन बेडरूम्सच्या सहा फ्लॅट्सची 'मॅग्नोलिया हेरिटेज', बिझनेस सेंटरमध्येच असलेल्या प्रोटीआ ग्रूपच्या मॉडेल हाऊसेस, ऑफिसेस आणि त्याला लागूनच असलेल्या टेनिसनच्या ऑफिसपासून साधारणतः चार किलोमीटर अंतरावर असावी. चोहो बाजूंनी दाट झाडींनी वेढलेली मॅग्नोलिया हेरिटेज, बिझनेस सेंटरपासून वॅली सिटीचे प्रमुख आकर्षण असलेल्या 'मिल्किवे फॉल्स आणि 'बोटॅनिकल गार्डन' कडे जाणार्या एकमेव रस्त्यावर होती. ह्या निसर्गरम्य परिसरात येणार्या पर्यटकांछ्या डोळ्यात खुपू नये म्हणून मोठ्या शिताफिने मॅग्नोलिया हेरिटेज दाट झाडींमध्ये लपवण्यात आली होती. ट्रेकिंग, हायकिंग ची ईच्छा असणारे बरेच ग्राहक बिझनेस सेंटर वरून डॅफोडिल सिटीची 'वॅली टूर' बस न घेता ह्याच रस्त्याने चालत फॉल आणि गार्डनकडे जाणे पसंत करत. अश्या ग्राहकांची संख्या वाढू लागली तसे प्रोटीआ ग्रूपने त्यांच्या सोयीसाठी ज्यूस, पाणी, फळे, कोल्ड्रिंक, स्नॅक्स विकणारे 'लिली'ज स्नॅक्स सेंटर' ह्या रस्त्यावर ऊभारले. स्नॅक्स सेंटर मध्ये थांबणार्याला मागच्या झाडींमध्ये केवळ फर्लांगभर अंतरावर तीन मजली मॅग्नोलिया हेरिटेज ऊभी आहे हे सांगूनही खरे वाटले नसते.
टेनिसनच्या सगळ्याच ऑफिसर्सकडे आपापल्या कार्स असल्याने जाण्यायेण्याच्या बाबतीत कोणी असे खास एकमेकांवर अवलंबून नव्हते. ऊटी शहर ही दोन तासांवरच असल्याने गरज पडल्यास जाऊन येणेही अगदीच सोपे होते. पाचही ऑफिसर्स तसे तिशी पस्तीशीचेच असावेत आणि सहा महिन्यांपूर्वीच रुजू झालेला अरूण साधारणतः पंचवीशीचा. पण ऑफिस टायमिंगनंतर वेळ घालवण्यासाठी मात्रं त्यांना एकमेकांच्या सोबतीशिवाय पर्यायच नव्हता. करमणूकीची साधने वॅली सिटी मध्ये फारशी नव्हतीच, शाळा/कॉलेजही नसल्याने कुणाला कुटुंब-कबिल्यासहित वॅली सिटीमध्ये राहणे जमण्यासारखे नव्हते. टेनिसनचे सगळेच ऑफिसर्स बॅचलर असण्यामागे कदाचित तेही एक कारण होतेच. वॅली सिटीमधल्या एका रेस्टॉरंटने सहाही जणांची तीनवेळा खाण्यापिण्याची सोय केली होती पण महिन्यागणिक खाण्याच्या बिलापेक्षा जोमाने वाढणारे 'पिण्याचे' बिल टेनिसनच्या ऑफिसर्सचे एकमेकांच्या सोबतीने वेळ घालवण्यासाठीचे दररोजच्या करमणूकीचे एकमेव साधन होते. सहा पैकी कुठल्याही एका फ्लॅटमध्ये आठाच्या ठोक्याला एकत्रं जेवायला बसलेली टेनिसनची ही मंडळी एकेक घोट रिचवत एकेमेकांचा निरोप घेवून आपापल्या फ्लॅटमध्ये बेडवर जाऊन पडेपर्यंत रात्रीचे किमान ११:३०-१२ तरी होत. स्नॅक सेंटर झाल्यापासून मॅग्नोलिया वासियांच्या खासकरून केविनच्या आधीच वाढत्या 'पिण्याच्या' ब्रँड्समध्ये अजून काही 'ब्रँडसची' भर पडली... फोर-स्क्वेअर, मार्लबोरो, विल्स, गोल्ड फ्लेक.
मॅग्नोलिया वासियांचे हे असेच रुटीन मागच्या तीन वर्षांपासून चालू होते. 'डॅफोडिल वॅली सिटीची' वाढती लोकप्रियता आणि भेट देण्यास येणार्या ग्राहकांचा वाढता ओघ वाढत राहिला तसे टेनिसनच्या ऑफिसर्सना प्रत्येक लोन केसमागे मिळणारे कमिशनही महिन्याकाठी वाढतंच होते. वॅली सिटीमध्ये राहणे अतिशय बोरिंग असूनही वाढत्या सॅलरी/कमिशनने सगळ्यांच्या पायात जणू बेडीच घातली होती. नेमके वीकेंड आणि सुट्यांचा मोसम हेच बिझनेसच्या दृष्टीने महत्वाचे दिवस असल्या कारणाने टेनिसन ऑफिसर्सना गरज पडल्यास आठवड्याच्या ईतर दिवसातंच सुट्या घ्याव्या लागत. तसेही सगळे ऑफिसर्स मूळ पुण्या मुंबईचेच असल्या कारणाने एक-दोन दिवसांची सुटी न घेता वर्षातून दोन-तीन वेळा दोन आठवड्यांची सुटी घेवून जाणेच सगळ्यांना पसंत होते. थोडक्यात मागच्या तीन वर्षांपासून टेनिसनच्या ऑफिसर्सचे आजिबात रंग नसलेले, कंटाळवाणे आयुष्य नयनरम्य, रंगीबेरेंगी डॅफोडिल वॅली मध्ये अव्याहतपणे चालू होते.
सहा महिन्यांपूर्वी आलेल्या वसंत ऋतूमध्ये डॅफोडिल वॅलीने डेफोडिल्स, मॅग्नोलिया, डेलिया आणि पिट्युनिया चा नवा रंगीबेरंगी चेहरा ओढला आणि मॅग्नोलियावासियांच्या कंटाळवाण्या आयुष्यात थोडा बदल घडून आला. पराग त्याची बर्याच काळापासूनची गर्लफ्रेंड जेनेलियाशी डिंसेबर मध्ये एंगेज होणार होता. डॅफोडिल वॅली सिटीमध्ये येण्यापूर्वी तो सिनेसॄष्टीत रिपोर्टर असलेल्या जेनेलियाबरोबर मुंबईमध्ये काही काळ लिव-ईन रिलेशनशिपमध्येही रहात होता. मार्च दरम्यान वसंतात फुलणार्या फुलांचा पीक मोसम असतांना जेनिलिया महिनाभर मॅग्नोलियामध्ये राहून गेली आणि त्यादरम्यान ती सगळ्या ग्रूपमध्ये चटकन मिसळून गेलीसुद्धा. त्यांच्या लेट नाईट पर्यंत चालणार्या सिटिंग्स मध्येही तिच्या सिनेजगतांच्या गप्पांनी सॉलिड रंगत येत असे. सहा पुरुषांच्या कंपनीत बरळणं चालू होऊन आधाराशिवाय चालता न येण्याईतपत ड्रिंक्स करतांनाही ती अजिबात लाजत वा बुजत नसे. बाकीचेही तिची 'मित्राची होणारी बायको' अशी भीड न ठेवता तिला 'सेवंथ मॅन ईन द रूम' असे मित्रासारखेच समजत. त्यांच्या 'फॉर मेन ओन्ली' टाईपच्या विनोदांची लेवलही ती होती म्हणून कधी चेंज झाली नाही, तिलाही कधी ह्या विनोदांमध्ये वावगे वाटले नाही. तिच्या संसर्गजन्य हसण्यातून ती ही ह्या विनोदांना हातभारंच लावत असे.
पण जेनेलिया आल्या पासून अरूणची चांगलीच पंचाईत होऊन बसली होती. ईथे येण्याआधी अगदी साधे सरळ आयुष्य जगलेल्या अरूणने नुकताच कुठे 'पहिला पेला' हातात घेतला होता. कॉलेजात गर्लफ्रेंड वा ऑफिसमध्ये स्त्री सहकार्यांशी संवादाचा आजिबातंच अनुभव नसल्याने तो जेनेलिया असतांना बुजूनच जाई. तिच्याशी नजर देवून दोन शब्दं बोलणेही त्याला शक्य होत नसे. मुलींच्या बाबतीत त्याचा हा लो-कॉन्फिडन्स ईतर मॅग्नोलिया वासियांच्या विनोदाचा विषय झाला नसता तर नवलंच. दोन पेग पोटात जातांच त्याची फिरकी घेण्याचा सगळ्यांचाच ऊत्साह १० पट वाढत असे आणि जेनेलियाही ह्यात मागे नसे. जेनेलियाला प्रपोज करण्याचे नाटक करण्यापासून, स्त्री-पुरूष संबंधांबद्दल त्याला नको-नको ते प्रश्न विचारून त्याची खिल्ली ऊडवण्यात त्यांना कोण मजा वाटत असे. त्याला त्रास देण्यात सगळ्यात आघाडीवर कोण असेल तर केविन, बाकींच्यांनी त्याला दोन तीन वेळा अजून जोक्स करण्यास आडकाठी करेपर्यंत त्याचे अरूणची खिल्ली ऊडवणे थांबत नसे. पण अरूणने केविनचे किंवा ईतर कुणाचे बोलणे कधी मनावर घेतल्यासारखे वाटले नाही, तो नेहमी हसत लाजतच राही. दिवसेंदिवस ग्रूपमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढत होता, जेनेलियानेही त्याच्याशी गप्पा वाढवत त्याला मुलींशी संवाद साधण्याच्या कलेचे मंत्र शिकवत त्याच्या वाढत्या आत्मविश्वासाला हातभार लावला होता. ती परत जातांना अरूणने तिला मनापासून दिलेले गिफ्ट त्याला तिच्याबद्दल वाटत असलेली कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतिकंच होते जणू. जेनेलियाला असेपर्यंत जमेल तेव्हा परागचे काम आपल्या अंगावर घेत बाकीच्यांनी त्याला तिच्याबरोबर वेळ घालवण्याची सोय करून दिली. कायम मुंबईतल्या गर्दीची आणि माणसांच्या संपर्काची सवय असलेली जेनेलियाला जेव्हा पहिल्या आठवड्यातच बोअरडमने वैतागून परत जाण्याबद्दल बोलू लागली तेव्हा मग सगळ्यांनी आपल्या आठवड्यातल्या सुट्या अॅडजस्ट करत दररोज कोणीना कोणी तिला कंपनी द्यायची असे ठरवले.
जेनेलिया गेल्यावर दिनेशही दोन आठवड्यांच्या सुटीत पुण्याला जावून आला होता. त्याचे खूप वर्षांपासूनचे प्रेम असणार्या बंगाली मुलीशी 'देबोलिनाशी' लग्नं करण्यासाठी बरेच दिवसांपासून तो त्याच्या कर्मठ आईबाबांची मनधरणी करीत होता. ह्या खेपेला मात्रं त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नाला मान्यता मिळाली. अर्थात दिनेशच्या आयुष्यात असे काही चालू आहे ह्याची ईतर मॅग्नोलिया वासियांना आजिबात कल्पना नव्हती. त्याने जेव्हा लग्नं करत असल्याचा गौप्यस्फोट सुटीवरून आल्यावर पहिल्याच रात्रीच्या जेवणादरम्यान केला तेव्हा सगळ्यांनी पहिल्याने तर त्याला हे लपवून ठेवल्याबद्दल खूप बोलून घेतले आणि नंतर मिठी मारत त्याचे अभिनंदन केले. केविन तर देबोलिनाचा फोटो दाखवच म्हणत दिनेशच्या मागेच पडला. एक दोघे जण म्हणालेही 'अरे जाऊदे त्याला वाटेल तेव्हा दाखवेल' पण केविनने जेनेलियाचा दाखला देत त्यात काय एवढे लपवायचे म्हणत पिच्छाच पुरवल्यावर शेवटी नाईलाज होवून दिनेशने फोनवरचा फोटो दाखवला. फोटो बघून केविन म्हणाला 'अहाहा! बॉस एवढी मालदार पार्टी असेल तर मी कोणी कितीही आग्रह केला असता तरी फोटो दाखवला नसता'. केविनच्या जोकवर सगळ्यांनी अवघडून हसल्यासारखे केले आणि दिनेश तडकाफडकी जेवण सोडून निघून गेला. दुसर्या दिवशी दिनेश ऑफिसमध्येही कुणाशी फार काही बोलला नाही. तो रात्री सिराजच्या रूमवरही जेवण्यासाठी आला नाही तेव्हा पराग स्वतः दिनेशकडे गेला आणि त्याला घेवून जेवायला आला. त्यांचे नेमके काय बोलणे झाले कळाले नाही पण आला तेव्हा दिनेशचा मूड बरा दिसत होता. केविन आणि दिनेशमध्ये आलेल्या तणावाची परिणिती जेवणानंतर त्याने पिण्याला न थांबता काढता पाय घेण्याने होऊ लागली. बाकीच्यांचाही मूड कमी होऊ लागला आणि त्याबरोबरीने ग्रूपमध्ये पिणे कमी होत गेले ते गेलेच, पण सगळ्यांचे आपापल्या रूममध्येच बसून पिणे मात्रं चालूच राहिले.
सर्वात जास्तं लोन केसेस क्लोज करणार्या आणि ग्राहकांकडून हाय सॅटिस्फॅक्शन रेटिंग्ज मिळवणार्या ऑफिसरला टेनिसन मॅनेजमेंटचा पगाराच्या १०% एक्स्ट्रा ईन्सेंटिव पगार / बोनस देण्याचा नियम होता. ऑफिसर्स मध्ये हेल्दी काँपिटिशन वाढीस लागावी असा मॅनेजमेंट चा सरळ सरळ हेतू असावा. केस बेसिस वर फिक्स्ड कमिशन तर होतेच आणि १०% ईन्सेंटिव थोडक्यात पर्फॉर्मन्स बोनस, मॅनेजमेंटचा होरा बरोबर निघाला. नियम अंमलात आणल्या पासून सगळेच ऑफिसर्स प्रत्येक केस वर जास्तं मेहनत घेवू लागले. १०६ केसेस क्लोज करत पहिल्या वर्षी केविननेच हा बोनस पट्कावला आणि त्यापाठोपाठ राहूलने ९४ केसेस क्लोज केल्या होत्या. केविनची ईंप्रेसिव पर्सनॅलिटी, त्याचे पॉलिश्ड बोलणे, समोरच्याचा ईंट्रेस्ट लक्षात घेवून त्यावर गप्पा मारत आपली छाप पाडणे, लोनची किचकट प्रकिया सोप्या पद्धतीने सांगणे, घराच्या पसंतीनंतर शक्यतो लोन प्रोसेस पासून लांब राहणार्या ग्राहकांच्या 'पत्नी' वर्गालाही महत्व देत त्यांना प्रोसेस समजावून सांगणे अश्या सगळ्या सॉफ्ट स्कील्स आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्याच्या कौशल्यामुळे राहूलसहित सर्वांनाच केविनशी स्पर्धा करणे पहिल्या वर्षी जड गेले. पण दुसर्यावर्षी मात्रं आशर्यकारक रित्या राहूलने केविनच्या ११४ केसेसच्या तुलनेत ११६ केसस क्लोज करत 'बेस्ट परफॉर्मर' चा बोनस पटकावला. त्या पूर्ण वर्षात राहूलने स्वतःवर खूपच मेहनत घेतली होती. रात्रं रात्रं जागून ऑनलाईन कोर्सच्या असाईनमेंटसचे कंप्लिशन, ग्राहकांची मानसिकता समजण्यासाठी तज्ञ लोकांशी पत्रव्यवहार, दोन आठवड्यांच्या सुटीमध्ये घरी न जाता तज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे, सेमिनार, कार्यशाळा अटेंड करणे असे आणि बरेच काही.
मात्रं चालू असलेल्या पूर्ण वर्षभर केविनने राहूलच्या कामावर त्याच्या क्लायंटस समोरच काहीतरी खुस्पटं काढून अपूर्ण पेपरवर्क, चुकलेले नंबर्स आणि डेड्लाईन्स, मॅनेजमेंटकडे वजन नाही ह्या आणि अश्या अनेक कारणांनी ताशेरे ओढले होते. एक दोन क्लायंट्सना परस्पर फोन करून लोन ऑफिसर चेंज करून घ्या असेही सुचवले होते. हे कमी की काय म्हणून त्याने अजून ऑफिसर नसलेल्या अरूणच्या सगळ्या केसेसवर ऑफिसर म्हणून आपलेच नाव घालत त्या केसेस वरती रिपोर्ट केल्या होत्या. क्लोज झालेल्या केसेस ची संख्या बघता, अगदी थोड्या फरकाने 'बेस्ट पर्फॉर्मर' केविनच असणार ह्यावर आता जवळ जवळ शिक्का मोर्तब झाले होते. राहूलने ह्यावर फार काही रिअॅक्ट न होण्याचेच धोरण स्वीकारले. केविनच्या ह्या अनप्रोफेशनल आणि चीड आणाणर्या कृती नंतरही कमालीच्या शांत असलेल्या राहूलला पाहून बाकी सगळेच अचंबित झाले होते.
एक लग्नं झालेला भाऊ सोडला तर केविनला कोणी नातेवाईक नव्हते त्यामुळे देश विदेशातली पर्यटन स्थळे भटकणे हाच केविनचा प्रत्येक सुटीचा प्लॅन. ग्रूपमध्ये आपल्यामुळे वाढलेला तणाव पाहून त्याने तडकाफडकी दोन आठवड्यांची सुटी टाकली आणि तो हवाई बेटांची सफर करून आला. त्याचे असे जाणे बहुधा चांगल्यासाठीच झाले असावे कारण तो आला तेव्हा मॅग्नोलिया वासियांचे खाणेपिणे पुन्हा सुरळीत सुरू झाले होते. त्यालाही चांगले वाटले. तो येताच दिनेशसहित सगळ्यांनी त्याच्या ट्रीपबद्दल भरपूर गप्पा मारल्या. केविनही आपल्या ट्रीपबद्दल भरभरून सांगत राहिला, फोटो, विडिओ दाखवत राहिला. त्याला भेटलेल्या एका ऑस्ट्रेलियन मुलीबद्दल, तिच्याबरोबर केलेल्या मजेबद्दल रंगवून काहीबाही सांगत राहिला. पण हे केविनचे नेहमीचेच म्हणत सगळ्यांनी त्याचे बोलणे हसण्यावारी नेले. केविनने सगळ्यांसाठी आणलेले एकाच साईझचे हवाईयन शर्ट्स सगळ्यांनी घालून पाहिले तेव्हा ती एकंच साईझ सगळ्यांना व्यवस्थित फिट बसली. पुढचा अर्धा तास सगळ्यांनी आपल्याला हवी असलेली डिझाईन दुसर्याच्या हातात असल्यास ती त्याच्याकडून मिळवण्यात एकमेकांची मनधरणी चालू केली. सिराज आणि राहूल दोघांचे शर्ट अदलाबदली करण्याचे डील तडीस गेले. अरूण आणि परागला, परागच्या हाताला लागलेली एकंच डिझाईन आवड्ल्याने आणि पराग हटून बसल्याने अरूणला हातात आलेल्या डिझाईनवरच समाधान मानावे लागले. शेवटी ऊरलेल्या दोन सारख्याच डिझाईनच्या शर्टपैकी एकावर दिनेशने समाधान मानले आणि ऊरलेला दुसरा केविनने ठेऊन घेतला.
प्रेमाचाच व्यवहार होता सगळा, टेनिसनच्या मॅग्नोलियावासियांमध्ये सगळे आलबेल असल्याची नांदी होती जणू.
पण मॅग्नोलियाच्या नशिबात कदाचित ऑगस्टची ती सकाळ 'ऑल ईज नॉट वेल' चा पुकारा करतंच ऊगवली. मॅग्नोलियाच्या मागच्या बाजूच्या फरशीवर पाण्याची मोटार चालू करायला गेलेल्या मॅग्नोलियाच्या सिक्युरिटी गार्ड सुरेशला हवाईयन शर्ट घातलेल्या केविनचे डोके फुटलेले निष्प्राण शरीर सापडले.
पोलिस डायरीतल्या नोंदी
मेडिकल रिपोर्ट
केविन
- ऊंचावरून पडल्याने डोके फुटून मृत्यू
- रक्तामध्ये प्रचंड प्रमाणात अल्कोहोल सापडले
-एवढे अल्कोहोल प्राशन केलेल्या अॅवरेज मनुष्याला स्वतःचा तोल सावरत ऊभे राहणे अशक्य. पण अट्टल दारूबाज असल्यास असा मनुष्य जवळचे अंतर व्यवस्थित चालून जाऊ-येवू शकतो
-विक्टिम काही वर्षांपासून चेन स्मोकर असावा
-बाल्कनी आणि खाली फरशीवर सापडलेल्या सिगरेट बट्सवर केवळ विक्टिमचेच डीएनए मिळाले आहेत
-स्ट्र्गल झाल्याचे शरीरावर कुठलेही पुरावे नाहीत
-अॅक्सिडेंट की आत्महत्या किंवा खून स्पष्टं अनुमान सांगता येत नाही
-मृत्यू सकाळी ७:३० ते ८:३० दरम्यान झाला असावा
अरूण
- शरीरात अल्कोहोल आणि झोपेच्या गोळ्यांच्या अतिशय स्ट्राँग डोसेसचे ट्रेसेस
- शरीरावर ईतर जखमा वा स्ट्रगलचे पुरावे नाहीत
टाईमलाईन
-सकाळी ७:०४ सिक्युरिटी गार्ड सुरेश ड्युटीवर हजर
-सकाळी ७:५० 'नेविल परेरा' ची 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये एंट्री
-सकाळी ८:०१ 'नेविल परेरा' चा कॅथी डिसुझाला १ मिनिट ३ सेकंदांचा फोन
-सकाळी ८:०९ 'नेविल परेरा' ची 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये एक्झिट
-सकाळी ९:५५ सिराज कांचवालाचा पोलिसांना फोन
-सकाळी १०:२२ पोलिस 'मॅग्नोलिया हेरिटेज' मध्ये दाखल.
क्राईम सीन (केविनचे अपार्टमेंट)
-केविनच्या अपार्टमेंटचे दार ओढलेले आणि लॅच्ड होते पण आतून लॉक नव्हते.
-सोफ्यावर अरूण गाढ झोपलेला होता, क्राईमसीन वर सापडल्याने त्याचेही मेडिकल चेक-अप करवले.
-बेडरूममध्ये वा बाल्कनीत स्ट्र्गलचे पुरावे मिळाले नाहीत.
-घरात केविनची त्याच्या अपार्टॅमेंटची चावी मिळाली नाही.
-रूममध्ये झोपेच्या गोळ्यांचे ट्रेसेस असलेला एक दारूचा ग्लास मिळाला ज्यावर सिराज सोडून सगळ्यांच्या बोटांचे ठसे आहेत.
प्रासंगिक माहिती
- नेविलच्या अकाऊंटमध्ये जेमतेम अडीच लाख रुपये आहेत.
- केविन दर महिन्याला कॅथी डिसुझाला पैसे पाठवतो.
-बॉडी सापड्ल्यावर सुरेशने सगळ्यांना बोलावून आणले. अरूणने त्याच्या अपार्टमेंटचा दरवाजा ऊघडला नाही.
मॅग्नोलियाचा सिक्युरिटी गार्ड सुरेश
-मी रोज सकाळी सातच्या आसपास येतो आणि संध्याकाळी साहेब लोक आले की सातच्या आसपास निघून जातो.
-स्नॅक्स सेंटरचं बांधकाम चालू होतो तेव्हा बिल्डिंगमध्ये दोन-तीन साहेबांच्या घरात चोरी झाली म्हणून माझी ड्युटी ईथे लागली.
-मी दहाच्या आसपास बिल्डिंगच्या मागच्या बाजूला पाण्याची मोटर चालू करायला गेलो तेव्हा केविन साहेब पडलेले दिसले. मला वाटलं ते सकाळी कधी तरी सिगरेट पितांना बाल्कनीतून पडले असतील.
-बाजूच्या टेकडीवर सपाटीकरणासाठी ड्रिलिंगचे काम चालू आहे. त्या ड्रिलचा आवाज खूप मोठा असतो म्हणून केविन साहेब पडल्याचा आवाज मला आलाच नाही. साहेब लोकांनीही तिथल्या कन्स्ट्रक्शन मॅनेजरला ड्रिलच्या आवाजामुळे झोपमोड होते म्हणून दोन-तीन वेळा कंप्लेंट केली आहे.
-पण मी सकाळी केविन साहेबांना स्नॅक्स सेंटरला सिगरेट आणायला जातांना पाहिले होते. म्हणजे मी पेपर वाचत होतो म्हणून चेहरा दिसला नाही पण रंगीबेरंगी शर्ट दिसला म्हणजे ते केविन साहेबंच असले पाहिजे. ते जवळजवळ रोजच सकाळीच स्नॅक सेंटरमध्ये सिगरेट आणायला जातात.
-हवाहवाईका कुठे फिरून आलापासून ते नेहमीच त्यांचा रंगीबेरंगी शर्ट घालून सकाळी सिगरेट आणायला जातात. सवयच आहे त्यांची ती, मी ओळखतो ना त्यांचा तो नारळांच्या झाडावाला लाल-निळा शर्ट.
-केविन साहेबांना सकाळी ऊठल्या ऊठल्या सिगरेट ओठांत पाहिजे म्हणजे पाहिजेच असते. त्याशिवाय त्यांचे हात पाय थरथर कापतात त्यांना एक वाक्य ही नीट बोलता येत नाही. ते सकाळीच सात-आठ ला ऊठून सिगरेट घेऊन येतात आणि मग बाल्कनीत ऊभे राहून भकाभका चारपाच सिगरेट ओढतात. बर्याचवेळा पुन्हा झोपूनही जातात.
-सुरूवातीला मीच त्यांना रोज एक पाकीट आणून द्यायचो पण आता तेच जातात.
-केविन साहेब त्यांचे भाऊ येण्याआधी, ते असतांना की ते निघून गेल्यावर सिगरेट आणायला गेले होते ते नक्की आठवत नाही.
-केविन साहेबांचे भाऊ निघतांना फार घाईत होते. मी त्यांना एक्झिटची एंट्री करायला सांगितली तर ते म्हणाले तूच करून घे.
-पराग साहेबांच्या त्या जेनेलिया मॅडम आल्या होत्या तेव्हा सगळे साहेब लोक रोज बारी लावून मॅडमला फिरायला घेवून जात पण केविन साहेबांची बारी असली की ते दोघं कधी बिल्डिंगमधून बाहेर पडलेच नाही.
-सगळे साहेब लोक दहाच्या आसपास ऊठतात आणि अकरा वाजता बँकेत जातात.
-बिल्डिंगमधल्या साहेब लोकांची विजिटर लॉग मध्ये एंट्री करत नाही.
सिराज कांचवाला
-सुरेश धावतपळत केविन पडल्याचे सांगायला आला तेव्हा अरूण सोडून आम्ही सगळे खाली जमलो आणि तुम्हाला फोन केला. तुम्ही येईपर्यंत केविनच्या फ्लॅटमध्ये जायचे नाही असे आम्ही ठरवले.
-आम्ही रात्री केविनच्या रूममध्येच आठ वाजता जेवायला जमलो आणि नंतर सगळे दारू पित बसले.
-रात्री दोनच्या आसपास मीच सर्वात शेवटी गेलो. दिनेश, पराग आणि राहूल माझ्या आधी निघून गेले होते. दिनेश आणि राहूलला तर मी जातांना पाहिले पण पराग कधी निघून गेला मला कळालेच नाही. सगळे नेहमी निरोप घेवूनच जातात पण पराग बहूतेक तसाच निघून गेला असावा.
-अरूणला काल बहूतेक खूप जास्तं झाली असावी. तो जेवण झाल्यानंतर तासाभरातंच केविनच्या फ्लॅटमध्येच सोफ्यावर झोपून गेला. तसेही त्याने हल्लीच पिणे चालू केल्याने त्याचा स्टॅमिना फारंच कमी आहे. तो ज्युनिअर असल्याने दिवसभर त्याला बरीच धावपळ करावी लागते. संध्याकाळी जेवणानंतर एक पेग संपायच्या आधीच तो पेंगायला लागतो. काल केविनने 'आता तुझा स्टॅमिना वाढवायला हवा' म्हणत अरूणला स्वतःचा ग्लास देत दुसरा पेगही जबरदस्तीनेच संपवायला लावला आणि बाकी सगळ्यांपेक्षा केविनचे पेग खूप स्ट्राँग असतात असं ऐकून आहे.
- धार्मिक कारणामुळे मी तर कधीच दारू पीत नाही पण बाकीचे पीत असतांना मला गप्पा मारत बसायला आवडते. नाही तरी थ्रिलिंग वाटावे असे दुसरे काही करण्यासारखे ईथे नाही. प्रचंड बोरिंग आयुष्य आहे ईथले.
-केविनने अरूणला दिला तो ग्लास त्याला दिनेशने भरून दिला होता हे मी पाहिले होते. माझ्यामते बाकी कोणी पाहिले नसावे. दिनेश आणि केविन मधले ताणलेले संबंध बघता दिनेशने असे करणे मला चांगलेच वाटले पण त्याच्या कृतीचे खूप आश्चर्यही वाटले.
-दिनेश बाराच्या आसपास गेला असावा आणि पराग त्यानंतर कधी तरी पण मी त्याला जातांना बघितले नाही. पण तो कदाचित दिनेशबरोबच गेला असावा असे मला वाटते. महिन्यापासून ते दोघे एकमेकांबरोबर खूपच वेळ घालवत आहेत, सारखे काहीतरी सिरियस बोलणे चालू असते.
-मध्येच दारू संपल्याने राहूल त्याच्या रूममधून विस्की, वोडका, रम आणि टकिला शॉट्स घेवून आला. केविन विस्की शिवाय बाकी काही पीत नाही आणि राहूलही काल नेहमी पेक्षा कमी पीत होता त्यामुळे तो केविनसाठी एवढ्या सगळ्या बाटल्या घेवून आल्याचे मला आश्चर्य वाटले.
त्याने एक दोन वेळा केविनला 'टकिला शॉट्स' ट्राय करण्यासाठी आग्रहसुद्धा केला पण केविन विस्कीच पीत बसला.
-एक वाजला तेव्हा केविनने पुन्हा त्याचा हवाईमधला ऑस्ट्रेलियन मुलीचा किस्सा सांगायला घेतला तेव्हा राहूल कंटाळून निघून गेला.
-राहूल गेल्यावर केविनने मला त्याने त्याच्या वहिनीबरोबर झालेल्या चुकीबद्दल, त्याच्या लग्नाबद्दल, मुलाबद्दल आणि जेनेलियाशी त्याच्या संबंधाबद्दल सांगितले. पण केविनचे हे नेहमीचेच असते त्याला खूप चढली की तो असे काहीतरी बरळत राहतो. दुसर्यादिवशी त्याला त्यातले काहीही आठवत नाही. मी त्याच्या बरळण्याला त्याच्या डोक्यातले हवामहल समजून एका कानाने ऐकून दुसर्याने सोडून देतो.
-राहूलने एकदा माझ्याकडे केविन ऑफिसमध्ये करीत असलेल्या चिटिंगबदाल मन मोकळे केले होते. त्याच्या मनात केविनबद्दल प्रचंड राग धुमसत होता आणि केविनला आयुष्यभराचा धडा शिकवण्याचे त्याने ठाम ठरवले होते.
-सुरेशने केविनच्या चेन स्मोकिंग बद्दल संगितलेले सगळे खरे आहे.
-एकदा केविनच्या घरात चोरी झाली तेव्हा त्याने सुरेशवर आळ घेतला होता. सिगरेट द्यायला आला तेव्हा सुरेशने त्याची नाईट स्टँडच्या ड्रॉवर मधली सोन्याची वेडिंग रिंग चोरली असे केविनचे म्हणणे होते. त्याने सुरेशला पोलिसांत द्यायची धमकी दिली होती पण परागने मध्ये पडून सुरेशची नोकरी वाचवली. तेव्हापासून केविनने सुरेश कडून सिगरेट मागवणे बंद केले.
-केविनचे कधी लग्न झालेले असल्याचेच आम्हाला माहित नव्हते त्यामुळे आम्ही तो केवळ केविनचा त्रागा असावा म्हणत सोडून दिले.
नेविल परेरा(केविनचा भाऊ)
-आमच्या वडिलोपार्जित घरावरचा हक्कं सोडण्यासाठी केविनने २५ लाख रुपये मागितले होते. त्याचा चेक देण्यासाठी आणि पेपर्सवर त्याची सही घेण्यासाठीच मी आलो होतो.
-मी दारावर क्नॉक केले तेव्हा कोणी दार ऊघडले नाही म्हणून मी हँडल फिरवले तर ते ऊघडले. मी आत गेलो तेव्हा सोफ्यावर एक जण झोपला होता. मी आत बेडरूममध्ये जाऊन केविनला ऊठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऊठलाच नाही.
-तेव्हा मला कळले की त्याची सही घेण्यासाठी मला आता थांबावे लागणार आणि माझी कोईंबतूर वरून रिटर्न फ्लाईट चुकणार म्हणून मी फॅनीला- माझ्या बायकोला लागलीच फोन करून सांगितले. मग मी ग्रीनलँड ईन मध्ये आलो आणि ईथे रूम बूक केली.
-केविनच्या अंगावर पांघरून होते म्हणून त्याने कोणता शर्ट घातला होता ते मला दिसले नाही.
-मी काल रात्री मुंबईवरून कोईंबतूरला आलो आणि रेंटल कार घेवून पहाटेच ईथे येण्यासाठी निघालो.
खबरींकडून मिळालेली माहिती
-मुंबईमधले सध्या केविनचा लहान भाऊ 'नेविल' रहात असलेले वडिलोपार्जित घर सोडले तर केविनला तसे कोणी नातेवाईक नव्हते. नेविलच्या लग्नानंतर, फॅनी घरात आली आणि काही तरी 'कारण' होवून भावाभावात वितुष्टं आले. नेविल ने केविनला दुसरीकडे रहायला जायला सांगितले. फॅनीने -केविनच्या कॅरॅक्टर वरून त्याच्यावर आरोप केले होते. पण पोलिस केस झाली नाही.
-नेविल खूप कर्जात आहे आणि ते भागवण्यासाठी त्याला त्याचे वडिलोपार्जित घर विकायचे आहे.
-नेविलच्या लग्नाआधी केविनचे 'कॅथी डिसुझा'शी लग्न झाले होते आणि त्यांना साडेचार वर्षांचा मुलगा 'रॉनी' आहे. ते वेगळे राहतात पण अजून डिवोर्स झालेला नाही
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
काय कारण असेल केविनच्या मृत्यूमागे - अॅक्सिडेंट, आत्महत्या की खून? खून झाला असल्यास कोणी व कसा केला असेल?
तुमच्या एकापेक्षा अनेक थिअरीज असतील तरी हरकत नाही पण घटनाक्रम आणि थोडी कारणीमीमांसा द्यावी अशी अपेक्षा. यावेळी क्लू देता येणार नाहीत किंवा देण्याची गरज पडणार नाही. पण काही कन्फ्युझिंग वाटत असल्यास आणि फॅक्ट्सचे क्लॅरिफिकेशन हवे असल्यास बोल्ड ईटालिक फाँट मध्ये लिहिले तर मला त्या पोस्ट्स ना ऊत्तर देणं सोपं जाईल. बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे रेग्यूलर फाँटमध्ये चालूदेत.
100
100
नेव्हील ला केविन चा काटा
नेव्हील ला केविन चा काटा काढायचा असता तर तो व्यवस्थीत प्लॅन करून आला असता.
मला वाटत पराग आणी अरूण ने
मला वाटत पराग आणी अरूण ने प्लॅन करून केविन चा काटा काढलाय. त्यांच्या कडे स्ट्राँग मोटिव्ह आहे.
नेव्हीलने बेल नाही वाजवली,
नेव्हीलने बेल नाही वाजवली, दार नॉक केले. कदाचित केविनला ही भेट अपेक्षित असावी. जर नेव्हीलचे 'मी त्याला उठवायचा खूप प्रयत्न केला पण तो उठला नाही' हे वाक्य खरं मानलं तर केविन झोपेतच गेला होता. ते जाणवून नेव्हिल गडबडीने निघून गेला व ही माहिती त्याने केविनच्या बायकोपर्यंत पोचवली.
मध्येच दारू संपणे व राहुलने नवा स्टॉक आणून केविनला ऑफर करणे यावरून हा त्याचा प्लॅन वाटतो. त्यात भरपूर प्रमाणात झोपेचे औषध होते. स्वतः राहुल कमी पीत होता, अरुण प्यायला पण त्याची कपॅसिटी कमी असल्याने त्याचे गाढ झोपेवर निभावले
चीकु ने ह्या पूर्ण केसला
चीकु ने ह्या पूर्ण केसला लागलेल्या कुलूपाची चावी पर्फेक्ट शोधून काढली होती, आणि ती चावी म्हणजे 'केविनच्या फ्लॅटच्या दाराचे लॅच्/लॉक'. सगळी गम्मंत ह्या दारात आणि त्याच्या कुलूपात लपलेली आहे.
पराग आणि राहुलच्या हातांचे
पराग आणि राहुलच्या हातांचे ठसे त्या झोपेच्या गोळ्या आणि दारू असलेल्या ग्लास वर कसे? ग्लास दिनेशने बनवला केविन साठी, केविनने तो अरुणला दिला. या तिघांचे ठसे असणारच. सिराजचे नाहीत कारण तो पीत नाही.
बरं, दिनेशने ग्लास भरून दिला जो अरुण प्यायला. सो दिनेशने त्यात काही टाकलेलं असेल तर त्याला तो ग्लास अरुण प्यायला हे माहित आहे. मग एकतर तो अडवेल किंवा केविन मारणे प्लान बी साठी काही तरी करेल. आणखी एक पेग केविनला भरून देईल पण तसे झालेलं नाही, कारण केविनच्या पोटात फक्त दारू आहे.
चावी राहुल, पराग, दिनेश किंवा
चावी राहुल, पराग, दिनेश किंवा सिराज यांनी चोरलेली आहे. अरुण शक्य नाही कारण तो आताच पडलेला आहे.
रात्री झोपताना केविनने दार लॉक केले असं अझ्युम करून चालू. नेविल आला तेव्हा दार लॉक न्हवते, आणि तेव्हा केविन बेडवर होता.
केविनच्या मृत्यू नंतर पोलीस आले तेव्हाही दार लॉक न्हवतेच.
सो किल्लीवाला आदमी / औरत नेविल येण्या आधी येऊन काहीतरी करून पसार झाली आहे.
मेला आहे तो केविन आहे का
मेला आहे तो केविन आहे का नक्की? का मेला तो नेविल आहे आणि बाहेर पडलेला केविन? दाराची किल्ली त्याच्यासोबतच असेल मग.
लुक अलाईक नाहीयेत भाऊ.
लुक अलाईक नाहीयेत भाऊ.
सो किल्लीवाला आदमी / औरत
सो किल्लीवाला आदमी / औरत नेविल येण्या आधी येऊन काहीतरी करून पसार झाली आहे.>> पण मग तो खाली कसा पडला??
निवडुंग्या अजगराला एकदाचा
निवडुंग्या अजगराला इकडचा पत्ता नाही ना दिला हाब ?
निवडुंग्या अजगराला इकडचा
निवडुंग्या अजगराला इकडचा पत्ता नाही ना दिला हाब ? Biggrin >>> नाही नाही त्याची बीच पार्टी अजून संपली कुठे
१२५ झाले की सांगून टाकू का?
१२५ झाले की सांगून टाकू का?
हो असल्यास पटापट आपले लास्ट मिनिट प्रेडिक्शन, डिडक्शन येवू द्यात.
अजून एक hint द्या. आज काही
अजून एक hint द्या. आज काही फार डोकं चालत नाहीये
सान्गु नका. हिंट द्या.
सान्गु नका. हिंट द्या.
शर्टच्या डिझाईन च पण काही
शर्टच्या डिझाईन च पण काही तरी असणार कारण फार फरक नाहीये
माझ्या मते १२५ नन्तर सांगून
माझ्या मते १२५ नन्तर सांगून टाकावं।।
केथी आणिजेनेलिया एकच व्यक्ती
केथी आणिजेनेलिया एकच व्यक्ती आहे का हाब?
दिनेश असेल त्याला डोक्यावर
दिनेश असेल त्याला डोक्यावर पाडणारा. झोपला असताना केविन कशाला हवाई शर्ट घालून झोपेल? चावी त्या हवाई शर्टच्या खिशात असेल. (कारण सकाळी सिगारेट्स आणायला जाताना स्वतःचे घर लॉक करून हवाई शर्ट घालून केविन खाली जायचा) दिनेशने दोघांचे शर्ट अदलाबदल केले व चावी त्याच्याकडे गेली.
हिंट - नेविलने कॅथीला फोन
हिंट - नेविलने कॅथीला फोन केला तेव्हा नक्की काय बोलणे झाले असावे असे वाटते ?
ओ चीकू, चावी तुमच्या
ओ चीकू, चावी तुमच्या प्रतिसादात आहे. अशी हिंट दिलीय की त्यांनी.
केथी आणिजेनेलिया एकच व्यक्ती
केथी आणिजेनेलिया एकच व्यक्ती आहे का हाब? >>> नाही. देबोलिना, फॅनी, कॅथी सहित सगळी पात्रं वेगवेगळी आहेत कोणीच कोणासारखे दिसत नाही.
हिंट - नेविलने कॅथीला फोन
हिंट - नेविलने कॅथीला फोन केला तेव्हा नक्की काय बोलणे झाले असावे असे वाटते ?>> घ्या डोसक्याचा भुगा करुन.
हिंट - नेविलने कॅथीला फोन
हिंट - नेविलने कॅथीला फोन केला तेव्हा नक्की काय बोलणे झाले असावे असे वाटते ?<<<<<
केविन मेलाय ऑलरेडी असं.
तुझा नवरा लय पितो।
तुझा नवरा लय पितो।
दोसक्यात जातो माझ्या।
वर्ण पैशेबी मागतो।
दार वोपन हाय।
उडवू का
तुझ्या फारकटीचा खर्चबी वाचल।
ह्याघडिला मोकळी व्हशील ।
हिंट - नेविलने कॅथीला फोन
हिंट - नेविलने कॅथीला फोन केला तेव्हा नक्की काय बोलणे झाले असावे असे वाटते ?<<<<<
केविन मेलाय ऑलरेडी असं.>>>
असू शकेल. पण मग केविन खाली कसा पडेल? केविन निकोटीन आणि अल्कोहोल यांच्या combo मुळे रात्री झोपेतच गचकला की काय
असू शकेल. पण मग केविन खाली
असू शकेल. पण मग केविन खाली कसा पडेल?<<<<<
चावी घेऊन गेलेल्या दिनेशने खाली आलबेल आहे असं पाहून त्याची आत्महत्या/ऍकॅसिडेंट वाटावी म्हणून त्याला खाली लोटून दिले.
चावी घेऊन गेलेल्या दिनेशने
चावी घेऊन गेलेल्या दिनेशने खाली आलबेल आहे असं पाहून त्याची आत्महत्या वाटावी म्हणून त्याला खाली लोटून दिले.>> पण त्यांनी काही न करताच तो मेला असेल तर उगाच बाल्कनीतून खाली ढकलण्याची रिस्क का घेईल तो.
नेविलने कॅथीला फोन केला
नेविलने कॅथीला फोन केला तेव्हा नक्की काय बोलणे झाले असावे असे वाटते ? >>> मला माहिती आहे केविनचा खून तू केला आहेस. मी तोंड उघडायला नको असेल तर पैशात वाटा मागू नकोस.
केविनच्या घराची किल्ली कॅथीकडे आहे का?
जेनेलिया च्या सांगन्यावरून
जेनेलिया च्या सांगन्यावरून पराग ने खून केला असावा। त्याला सामील अरूण आहे। त्याचा allibi म्हणून झोपेच्या गोल्यांचा डोस घेतला त्याने। त्याआधी पराग ला खोलीत येता यावे यासाठी लैच उघडून ठेवले। पराग ने केविन ला ढक्लून दिले व परत गेला।
नेविलने केविनला सही
नेविलने केविनला सही घेण्यापूर्वीच मारले तर जायदादचे वाटेकरी cathy आणि रॉनी असे वाढतील.
cathy ला केविन पासून सुटका हव्येय. केविन झोपलाय सो त्याची सही नेविलला मिळणार नाही. नेविल ने cathyला फोन करून डील केलं असेल की तुला परत केविन त्रास देणार नाही पर उसके लिये तुम्हे जायदाद से हक छोडना पडेंगा.
मग केविनला वरून नेविलनेच ढकललं आणि धावत पळत निघून गेला. सिक्युरिटीने बघितलेलं सो गाव सोडून गेला नाही नाहीतर संशयाची सुई त्याच्यावर येईल. त्याच्याकडे पैसे नाहीत आणि त्याला सही हव्येय. हे होणं कदापि शक्य नाही.
पैशाची नीड आहे. सो ही has वेरी स्त्रोंग मोटिव्ह
हाब, किल्लीसाठी कोणाकोणाची
हाब, किल्लीसाठी कोणाकोणाची झडती घेतली आहे? अरूण आणि केविनची झडती घेतली आहे का?
हाब, किल्लीसाठी कोणाकोणाची
हाब, किल्लीसाठी कोणाकोणाची झडती घेतली आहे? अरूण आणि केविनची झडती घेतली आहे का? >> हो! पण मिळाली नाही म्हणूनच ती मिसिंग असल्याचे म्हंटले आहे.
अजून hint द्या आता.
अजून hint द्या आता.
अरूण आणि नेविल सामील आहेत.
अरूण आणि नेविल सामील आहेत. नेविलने केविनला मारायचे ठरवले होते. नेविलकडे २.५ लाख आहेत तर तो २५ लाखाचा चेक कसा देणार?
अजून hint द्या आता. >>
अजून hint द्या आता. >> पोलिसांनी सगळ्या फ्लॅट्सची कसून झडती घेतली तेव्हा चावी राहूलकडे सापड्ली.
१५० झाले की सांगून टाकणार.
अरूण आणि नेविल सामील आहेत. >
अरूण आणि नेविल सामील आहेत. >> आधी कधीही न भेटलेले लोक अचानक पाच मिनिटात खुनाचा प्लॅन कसा करतील ?
पोलिसांनी सगळ्या फ्लॅट्सची
पोलिसांनी सगळ्या फ्लॅट्सची कसून झडती घेतली तेव्हा चावी राहूलकडे सापड्ली.<<<<<
आदल्या रात्री दारू आणायला गेला तेव्हा तो केव्हीनच्या फ्लॅटची चावी घेऊन गेला असावा. म्हणजे येताना त्याला दार उघडून येता येईल. नंतर कंटाळून निघून गेला तेव्हा त्याच्याकडेच राहिली.
बाल्कनी आणि खाली फरशीवरची
बाल्कनी आणि खाली फरशीवरची cigarette stubs फ्रेश होती का? म्हणजे त्या दिवशी केविन बाल्कनीत उभा राहून सिगारेट फुंकत होता असे मानता येइल का?
पराग निघून गेलेला दिसला नाही
पराग निघून गेलेला दिसला नाही म्हणजे तो केविनच्या फ्लॅटच्या वॉर्डरोब किंवा इतर कुठे लपून बसला असावा.
बाल्कनी आणि खाली फरशीवरची
बाल्कनी आणि खाली फरशीवरची cigarette stubs फ्रेश होती का? म्हणजे त्या दिवशी केविन बाल्कनीत उभा राहून सिगारेट फुंकत होता असे मानता येइल का? >>> खूप चांगला प्रश्नं, सहा-आठ तासांपूर्वी (रात्री दोन वाजता) आणि दोन तासांपूर्वी (सकाळी आठ च्या आसपास) पिऊन टाकलेल्या बट्सचा पिन पॉईंट टाईम शोधून काढण्याएवढी टेक्नॉलॉजी नाहीये अजून आपल्याकडे.
पटकन १५० होतील असे वाटत नाही
पटकन १५० होतील असे वाटत नाही म्हणून निर्लज्ज्य होत थोडी भर टाकतो आहे.
पराग की नेव्हिल!
पराग की नेव्हिल!
कोणी तरी म्हणा रे सांगून टाक
कोणी तरी म्हणा रे सांगून टाक म्हणून म्हणजे मी पडत्या फळाची आज्ञा घेत सांगून टाकतो. अजूनही काम करत आहे का कोणी केस वर?
केविनने स्वतच उडी मारली.
केविनने स्वतच उडी मारली.
केविन हळवा असेल असं वाटतं. दिनेश बरोबर भांडण झाल्यावर स्वत:च निघुन जाणे, बायको बरोबर काही बिनसल्याने परत तिला त्रास न देणे, वहिनी बरोबर चूक झाली कबुल करणे, जेनेलिआ शी पण संबंध असणे आणि हे सगळं नशेत त्याच रात्री सांगणे. भाउ आलाय, त्याच्याकडे पैसे नाहीत. आपण गुड फॉर नथिंग आहोत. दिनेशला बोल्लो, राहुलला दुखावले, परागच्या फियॉन्से बरोबर फ्लर्ट केले, बायको पासुन दूर, पोरगा आहे पण तो पण रहात नाही, भावाकडे पैसे नाहीत, तो घर विकू ही शकत नाही, फ्रस्ट्रेट होउन आपण जीव दिला तर यातून सुटू. आणि जग आनंदी होईल. असे निराशाजनक विचारांनी उचल खाल्ली आणि खुदखुशी कर ली.
सांगून टाका हायझेनबर्ग...
सांगून टाका हायझेनबर्ग...
चीकू ने ह्या पूर्ण केसला
चीकू ने ह्या पूर्ण केसला लागलेल्या कुलूपाची चावी पर्फेक्ट शोधून काढली होती, आणि ती चावी म्हणजे 'केविनच्या फ्लॅटच्या दाराचे लॅच्/लॉक'. सगळी गम्मंत ह्या दारात आणि त्याच्या कुलूपात लपलेली आहे.
सुरूवातीपासूनचा घटनाक्रम पाहू.
त्या रात्री केविनला सर्वात शेवटी 'जिवंत' बघणारा सिराज होता. त्याने कदाचित केविनला मी दार फक्तं लॅच केले आहे आणि ते आतून लॉक कर असे सांगितलेही असेल किवा नसेलही. नेविलने तो दार ऊघडून आत गेला आणि त्याने केविनला ऊठवले, सोफ्यावर झोपलेल्या कुणाला तरी पाहिले हे सांगितले. ह्याचा अर्थ केविन त्या रात्री नक्कीच दार लॉक करायला विसरला किंवा नेविल आल्यावर त्याने स्वतः दार ऊघडले आणि नेविल आत गेला. नेविल आत गेल्याशिवाय त्याला सोफ्यावरचा अरूण दिसणार नाही हे नक्की. आता दार केविनने ऊघडले की ते नेविल म्हणतो तसे फक्तं लॅचच होते हे शोधणे जरूरी आहे.
जर केविनने स्वतः दार ऊघडले असते तर त्याला नेविलशी काहीही बोलण्याआधी सिगरेटची जरूरी पडली असती आणि तो सिगरेट आणायला गेला असता. पण जर असे झाले असते तर पोलिसांना तसे सांगणे नेविलच्या फायद्याचे ठरले असते, कारण तो असतांना केविन झोपला होता पेक्षा केविन सिगरेट आणायला गेला होता म्हणजे जिवंत होता हे सिद्धं झाले असते. त्यानंतर कदाचित केविनशी त्याचे बोलणेही झाले असते, पेपर्सवर सही सुद्धा मिळाली असती किंवा भांडण झाले असते. पण ह्या सगळ्या शक्यतांमध्ये नेविलला केविनच्या फ्लॅटमध्ये खूप जास्तं वेळ लागला असता. १९ मिनिटे हे सगळे होण्यास पुरेशी नाहीत. त्यात मध्येच त्याने कॅथीलाही कॉल केला होता. त्यामुळे नेविल आत गेला पण केविन झोपला होता हे नेविलचे म्हणने सुसंगत/संयुक्तिक वाटते.
सगळी केस सिराज आणि सुरेशच्या जबाबावर आधारलेली आहे. सिराजकडे केविनला मारण्याचे किंवा दुसर्या कुणाला अडकवण्याचे काहीच मोटिव नसल्याने आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकतो. सुरेशने केविनबद्दल दिलेली माहितीची बाकीच्यांकडून पडताळणी करता येवू शकतेच त्यामुळे सुरेशच्या जबानीवरही विश्वास ठेवू शकतो. त्याने नेविलचे कवर घेवून खून केला असल्यास तो नेविलची एक्झिट जेवढी शक्य असेल तेवढी ऊशीरा करेल , लवकर करणार नाही. पण त्याला असे करता येणे शक्य नव्हते का ते पुढे बघू.
केविनच्या 'वुमनायझर' टाईपच्या वागण्यामुळे, त्याच्या देबोलिनावरच्या एखाद्याला प्रचंड राग येईल अश्या चीप कमेंटमुळे आणि केविनचे जेनिलियाबरोबर संबंध असावेत जे सुरेशकरवी पराग ला कळाले असे गृहीत धरल्यास, सारख्याच दु:खाने होरपळणार्या आणि रागाने चडफडणार्या, दिनेश आणि पराग ह्या दोघांनी मिळून खुनाचा घाट घातला असे समजू शकतो. ज्यामध्ये परागने केविनचे ड्रिंक स्पाईक करावे मग दिनेशने ते केविनच्या हातात द्यावे मग परागने दुसर्या बेडरूममध्ये लपून राहून रात्री सगळे गेल्यावर केविनचा गेम करावा आणि दिनेशने पराग आणि मी बरोबरंच बाहेर पडलो होतो अशी साक्षं द्यावी असा घटनाक्रम असावा असे वाटते ( लपून राहिलेला पराग खून नक्की कसा करणार होता? तर स्पाईक केलेल्या ड्रिंकच्या रिअॅक्शननंतर केविन वाचल्यास त्याला वरतून ढकलून, गळा दाबून, किंवा अजून कसा तरी). पण असे घडायचे नव्हते बहुधा. ड्रिंक स्पाईक केलेले होते असे गृहीत धरल्यास नेमके ते ड्रिंक अरूण प्यायल्याने, केविनला आधी झोपवण्याचा दिनेश आणि परागचा पूर्ण प्लॅनच फसला. त्यामुळे परागला लपून राहण्यासाठी काही करणंच मिळाले नाही आणि तो दिनेशबरोबरंच निघून गेला असावा हे सिराजचे म्हणणे सुसंगत/योग्य वाटते. पण समजा त्या दोघांचा किंवा त्या दोघांपैकी एकाचा ड्रिंक स्पाईक वगैरे करण्याचा कुठलाही प्लॅन नव्हता असे आणि ते सहज नेहमीप्रमाणे १२ वाजता निघून गेले असेही होऊ शकते. ते एकदा निघून गेले की रात्री 'केविनचे अपार्टमेंट लॉक नव्हते' हे त्यांना माहित असण्याचे काही कारणंच नाही. त्यामुळे ते एकटे वा जोडीने रात्री वा सकाळी परत येतील ह्याची शक्यताही नाहीच. आणि आलेच तर सोफ्यावर अरूणला बघून जागेपणी दरवाजा ऊघडणार्या केविनला मारण्याची रिस्क ते नक्कीच घेणार नाहीत आरडाओरड, झटापटीची खूपच शक्यता आहे.
राहूलचाही केविनवर ऑफिसमधल्या चिटिंग प्रकरणावरून डूख होताच. स्वतः कमी दारू पिऊन, केविनला भरपूर दारू पाजून रात्रीतून येवून काही दगाफटका करण्याचे त्याचे कारस्थान असावे असे त्याच्या केविनला दारूचा आग्रह करतांनाच्या सिराजच्या नोंदीवरून निश्चितंच वाटते. आधी दारू पाजून आणि रात्रीतून येवून केविनचा खात्मा करण्याचा त्याचा प्लॅन असेल तर त्यासाठी त्याला केविनची चावीही चोरावी लागणारंच. कारण केविन रात्री दरवाजा लॉक करणार हे तो गृहीत धरणार. पण केविनने त्याने आणलेली जास्तीची व अल्कोहोलचं प्रमाण जास्तं असलेली दारू प्यायलीच नाही त्यामुळे कंटाळून तो निघून गेला. तो समजा रात्री वा सकाळी त्याने चोरलेली केविनची चावी वापरून आला असता तर त्याला अरूण आपल्या रूममध्ये न जाता तिथेच झोपलेला दिसला असता. पराग आणि दिनेशच्या प्लॅनमुळे अरूण ड्रग्ड झालेला आहे किंवा नाही ह्याची राहूलला कल्पना असण्याचे काही कारणच नाही. ईथे अरूण झोपला आहे आणि आता केविन दारू प्यायलेला असला तरी त्याला दगा फटका करणे अरूणच्या ऊपस्थितीमुळे रिस्की आहे असा विचार करत तोच काय पण कोणीही परत गेला असता.
राहिला सुरेश !! तर सुरेशचाही केविनवर चोरीच्या प्रकरणापासून राग असणारंच. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने केविनला सिगरेट घ्यायला जातांना पाहिले. म्हणजे केविन आता परत आल्यावर कदाचित जागाच असणार हे त्याला माहित होते. नेविलही आत्ताच येऊन गेल्याने केविन जागाच असण्याची शक्यता अधिकच होती. ( नेविलला केविन झोपलेलाच सापडला आणि ऊठलाच नाही हे सुरेशला माहित असणेशक्यंच नाही ) नेविल गेल्यानंतर पुन्हा केविनच्या घरात जायचे म्हणजे त्याला दार वाजवूनच जावे लागले असते ( दार अनलॉक्ड आहे हे सुरेशला माहित असण्याची शक्यता नाहीच ). केविनने त्याच्याशी दारातंच काय ते बोलणे केले असते. समजा सुरेश कसा तरी घरात गेला असता तर त्याला अरूण दिसला असता. पुन्हा केविनला बाल्कनीतून खाली फेकण्यासाठी त्याला अरूण असतांना केविनशी झटापट करावी लागली असती ती वेगळीच. नेविल येण्याआधी केविनचा खून होण्याची शक्यताही नाहीच. त्या केस मध्ये नेविल केविन नाही म्हणून एका मिनिटातंच सुरेशला विचारायला खाली आला असता.
नेविल ठरवून केविनचा खून करणार नाही कारण तो तिथे एकमेव विजिटर होता, सुरेशने त्याला पाहिले होतेच आणि त्याच्या नावाची विजिटर लॉगबुक मध्ये एंट्र्रीही होतीच. दोघा भावांमध्ये वितुष्टंही असतांना, नेविल आला आणि त्याच २०-३० मिनिटात केविन मेला, पोलिसांनी आजिबात दुसरीकडे न बघता नेविलला पकडले असते. पुन्हा केविन मरूनही नेविलच्या हाती प्रॉपर्टीमधले काही लागण्यासारखे नव्हतेच कारण ' कॅथी आणि रॉनी' केविनचे वारसदार होते. कॅथी कदाचित केविन आणि नेविल मध्ये प्रॉपर्टी डीलवरून मध्यस्ती करत असावी आणि केविनविषयी तिच्याकडे तक्रार करण्यासाठी किंवा 'मी आत्ता केविनला मारले तर तू मला प्रॉपर्टी देशील का' असे विचारण्यासाठी नेविलने कॅथीला फोन केला असावा. फोनवरच्या संभाषणाचा विषय काहीही असू शकतो, तो काय होता सांगता येणे कठीण. पण एवढ्या तडकाफडकी फोन करून तो केविनबद्दल निश्चितंच चांगले बोलला नसणार हे नक्की. 'आयर्नमॅन' ह्यांनी संभाषणाची एक शक्यता बोलून दाखवली आहेच. पण कॅथीचे केविनशी अजूनही थोडे सूर जुळत असावे आणि तिने नेविलला केविनला मारण्याची परवानगी देण्यास नकार दिला असावा. कारणे दोन.. एक तर त्यांचा डिवोर्स झाला नव्हता आणि तो दर महिन्याला 'मुलासाठी' का असेना पैसेही पाठवत होता. सांभाळून ठेवलेली वेडिंग रिंग हरवल्यावरच्या केविनच्या त्राग्यातूनही त्याला डिवोर्स नको असावा असे वाटते. समजा कॅथीने नेविलला 'हो मार' म्हणून होकार दिला असता तरी वरती दिलेल्या कारणांमुळे नेविलने असा मूर्खपणा केला नसता असे वरतून, वरतून कॅथी शब्दं फिरवण्याचाही धोका होताच. पुन्हा तो ग्रीनलॅंडमध्ये रूम घेवून तिथे वॅली सिटीतंच राहिला होता पळून गेला नाही. केविन ऑफिसला आल्यावर त्याला भेटण्याचा त्याचा प्लॅन असेल. त्याचे घाईत निघून जाणे त्याला केविन न ऊठल्याने आलेल्या रागामुळे/चिडचिडीमुळे झाले असावे. अकाऊंट मध्ये पैसे नसतांना केविनची सही घेण्यासाठी येण्याचे कारण त्याच्याकडे पैसे नव्हते पण त्याला केविनशी बोलून आपली कर्जबाजारी झाल्याची आणि पैशांच्या प्रचंड निकडीची कहानी सांगून रक्ताच्या नात्याचा हवाला देत प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची होती. त्याच्याकडे खरेच पैसे असते आणि फक्तं प्रॉपर्टी पाहिजे असती तर सही आणि पैशाची देवाण घेवाण वकिला मार्फतही होऊ शकली असती त्यासाठी त्याला मुंबईवरून त्या आडगावात येण्याची काही गरज नव्हती.
तर आता शेवटी प्रश्नं ऊरतो खुनी कोण? तर माझ्या मते खुनी अरूण आहे.
एकवेळ असे समजले की 'पराग आणि दिनेशचा' ड्रिंक स्पाईक करून केविनला मारण्याचा काही प्लॅन नव्हता. त्यांच्या आपसात वाढलेल्या गप्पा केवळ दोघेही लवकरंच एंगेज होऊन लग्नं करणार होते आणि कदाचित त्यासाठी वॅली सिटितून बदली वगैरे घेणार असावेत त्याबद्दलच्या असाव्यात. केविनचा स्वभाव माहित असल्याने आपल्या बायकांबद्दलचा विषय सगळ्यांसमोर काढणे ते टाळत असावेत, म्हणूनही त्यांचे आजकाल एकमेकांतंच जास्त बोलणे होत असावे. जेनिलिया आणि केविनचे बिल्डिंगबाहेर न पडणे हे त्या दोघांच्यात 'काहीतरी' संबंध असल्याची नसून जेनिलियाला केविनची कंपनी आवडत नसल्याचीही शक्यता असू शकते, ज्याची कल्पना परागलाही असू शकतेच.
तर अरूणला जाग असतांना त्याने नेविलचे कॅथीशी फोनवर बोलणे ऐकले असणार आणि एकंदर ह्या दोघा भावांचे काही पटत नाही असे त्याला कळाले. वर लिहिलेल्या फोनवरच्या संभाषणाच्या विषयाच्या शक्यतेवरून नेविल पैशांसाठी डेस्परेट आहे हे ही त्याला ह्या लक्षात आले. दिनेशने केविनला ग्लास दिला हे सिराजने पाहिल्याचे आणि आश्चर्यचकित झाल्याचे त्याने पाहिले असावे. नेविल आत आला म्हणजे घराचा दरवाजाही लॉक नव्हता हेही त्याच्या लक्षात आले. आणि त्याने ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा ठरवले.
नेविल असतांना केविन ऊठला नाही हे त्याने ऐकले होते त्याअर्थी केविन खूप नशेमध्ये आहे आणि गाढ झोपलेला आहे हे त्याने ताडले. तो केविनचा हवाई शर्ट घालून ( त्याला केविनची सकाळची सिगरेट आणून बाल्कनीत ऊभे राहून सिगरेट पिण्याची सवय, खाली सुरेश पेपर वाचत असल्याची माहिती आणि दिनेशकडे सेम शर्ट असल्याचे फॅक्ट ही माहित होतेच ) स्नॅक सेंटरपर्यंत जाऊन येण्याचा बनाव रचला. त्याने असे करण्याचे कारण की सुरेशकडून केविन जागा होता ह्याची पावती मिळवणे. असे करतांना त्याचा चेहरा कोणी पाहिला असे त्याला वाटले असते किंवा रस्त्यात त्याला कोणे भेटले असते तर त्याने सिंपली केविनला मारण्याचा प्लॅन कॅंसल केला असता. तर तसे काही न झाल्याने परत आल्यानंतर त्याने झोपेतल्या केविनला त्याचा हवाई शर्ट चढवला आणि ड्रीलचा आवाज येत असतांना खाली ढकलून दिले. खाली केविन रोज पीत असलेल्या सिगरेटचा बटसचा कचरा होताच. अॅक्सिडेंट, दिनेश आणि नेविल असे तीन प्राईम सस्पेक्ट तयार करून, झोपेच्या गोळीचा डोस घेऊन (गोळी कदाचित त्याने वर येतांना त्याच्या रूममधूनही आणली असेल) थोडा ट्रेस त्याच्या दारूच्या ग्लासात टाकून अरूण शांत झोपी गेला. त्याचे काही पोस्टमॉर्टेम झाले नाही तर नुसती ब्लड टेस्ट झाली असणार ज्यातून झोपेच्या स्ट्राँग डोसचे ट्रेसेस मिळाले. माझ्या मते ब्लड टेस्ट डोस कधी घेतला होता हे नाही सांगू शकणार. खून करून क्राईम सीनवरंच झोपून जाणे... कोण विचार करेल असा?
मुलीसमोर एखाद्याचा अपमान होणे, त्याचा आत्मसन्मान दुखावला जाणे हे एखाद्याला खुनासाठी ऊद्युक्त होणास नक्कीच पुरेसे आहे. मी आधीही म्हणालो तसे कोणालाही खुनासारखे एक्स्ट्रीम पाऊल ऊचलण्यासाठी काय कारण पुरेल हे फारंच सबजेक्टिव मेजर (व्यक्तीसापेक्ष मोजमाप) आहे. कुणाचा दुखावलेला आत्मसन्मान, राग, मत्सर, स्वार्थ, स्पर्धा, द्वेष, अहंकार ह्यांचा टॉलरंस/ थ्रेशोल्ड लेवल किती कमी वा जास्तं आहे ह्याचे अनुमान आपल्याला लावता येणे कठीण आहे.
अरूण जर दिनेश आणि परागच्या प्लॅननुसार खरंच ड्रग्ड झाला असता तर वरती लिहिले तसे केविनचा खून झाला नसता. अमितव ने हे ऑलमोस्ट डिड्यूस केले होते.
ह्यातल्या जवळपास सगळ्याच शक्यता तुकड्या तुकड्यांमध्ये सगळ्यांनी बोलून दाखवल्या आहेत पण दुर्दैवाने कोणीही त्या एकसंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही. अँकी ने अरूण खुनी असल्याची शक्यता पहिल्यांदा बोलून दाखवली होती पण त्याने दिलेले त्यामागचे रिझनिंग अपुरे होते कारण पोलिस आले तेव्हा अरूण झोपेतंच होता आणि स्लीप ड्रगच्या स्ट्राँग अंमलाखाली सापडला होता . मी अँकीचे सर्वोत्तम प्रतिसादासाठी अभिनंदन करतो.
ज्या सगळ्यांनी अरूण खुनी आहे किंवा बाकीचे खुनी का नाहीत त्याबद्दल लिहिले त्या सगळ्यांचे प्रतिसाद बरोबरंच आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण योग्य दिशेने विचार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
नेव्हील नक्कीच नाही कारण
नेव्हील नक्कीच नाही कारण त्याचे फ्लाईट डिटेल्स, बिल्डिंगमधली एंट्री सगळंच ट्रेस होईल. तो खून करण्यासाठी आलेला नाही.
ह्म्म.. फायनल गेस.
ह्म्म.. फायनल गेस.
राहुलने केविनला संपवण्याचे ठरवले होते. अरुण तिथेच झोपला हा त्याच्या मते advantagous point होता कारण त्यामुळे केविनच्या खुनाची रिस्क कोणी घेणार नाही आणि हा अपघात होता असे दाखवता येईल. अरुणच्या पहिल्या drink मधे त्याने स्लीप drugs मिसळले कोणाच्या नकळत. जाताना तो चावी घेऊन गेला. सकाळी ७.३० वाजता तो केविनच्या घरी आला. दार लॉक होतं पण त्याने चावीने उघडले. केविन जेमतेम जागा होत असेल, त्याला उभं राहायलाही cigarette अभावी त्रास होतो हे त्याला माहिती आहे. काही मिषाने त्याने त्याला बाल्कनीत आणले आणि खाली ढकलले. ड्रिलच्या आवाजात त्याचा पडण्याचा/ ओरडण्याचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही. हवाईयन शर्ट घालून तो snack centre वर गेला. म्हणजे केविन नेहमीसारखा सिगरेट आणायला बाहेर पडला हे कोणी बघितलं दुरून तर लक्षात राहावं म्हणून. आणि त्याचा मृत्यु हा अपघात असल्याच्या शकयतेला पुष्टी मिळावी म्हणून.
नेविल आला तेव्हा त्याने केविनचा मृतदेह बघितला आणि तो घाबरला, काय करावं न सुचून त्याने cathy ला फोन करून हे साम्गितलं, तिने त्याला ताबडतोब बाहेर पडण्याचा सल्ला दिला.
ह्म्म..
ह्म्म..
अरुणच्या रक्तात स्लीप मेडिकेशनचे स्ट्रॉन्ग ट्रेसेस सापडले. अरुण रात्री १० च्या सुमारास झोपला असावा. सो १२ तासांनी इतके स्ट्रॉन्ग ट्रेसेस रक्तात सापडणार नाहीत. अन्लेस त्याने नंतर ते मेडिकेशन घेतलं असेल. अल्कोहोलही १२ तासाने नक्कीच रहात नसेल ना? (एका तासानेच ०.०८% पेक्षा कमी होतं ) मग त्याने मुद्दाम ते दोन्ही घेतलं असेल.
Pages