मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का

Submitted by आशुचँप on 15 May, 2017 - 03:26

दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.

फार पूर्वी एकत्र मायबोली पद्धती होती. नवीन आयडीला आपल्या लेखनकौशल्याची संधी दाखवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून त्यांच्यासाठी नवे धागे काढले जायचे.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच नवे नवे धागे काढलेच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच गप्पांच्या बाफवर मुक्ताफळे उधळणारे तेवढ्यातच आणखी वेळ खर्च करून नवे धागे काढून येतात. त्यात टवाळ लोकांना जेव्हा समजते की तुम्ही नवा धागा काढायला निघाला आहात तर ते आणखी (थरथर) कापू लागतात. मला मात्र हा एकूणच वेळेचा खर्च वायफळ वाटतो.

हल्लीच्या काळात जर गप्पांच्या धाग्यावर विषय समजून जात असेल किंवा पुरेशी चर्चा होत असेल, अश्यावेळी त्या नव्या धाग्याच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.

मुळात मी ईथे नवे धागे काढण्याच्या विरोधात नाहीते. मानसिक क्षमता असेल तर दिवसा-दोन दिवसातून एकदा धागा काढलाच पाहिजे. पण प्रत्येक नवा विषय आल्यावर लगेचच नवा धागा काढण्याच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.

असो, तर ही प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.
काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, आशिष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

पण ऑन अ सिरिअस नोट : ज्याच्याकडे भरपूर वेळ आणि नेट अव्हेलेबल आहे त्याला काढू देत की धागा... ज्याच्याकडे नाहीये त्याने इग्नोर करा..

ऑन व्हेरी सिरिअस नोट : गेल्या महिना भरात आलेला वाचनिय धागा मला दाखवा...

काही नसण्यापेक्षा टाईमपास धागे बरे की, वेळ तरी जातो

रिया - दिवे असतील तर दिवे घे

पिसं असतील तर हलकं घे

इथे असंही नंतर धाग्यावेताळ येऊन धुमाकुळ घालणार आहेच, तु आधीच सुरुवात नको करू

सिंजी - सुंदर म्हण...लिहून ठेवतो, वापरीन कधी वेळ आली तर

मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का >>> हो. आणि मायबोली वाचाणाराच्या डोक्याला ताप पण.

मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का?>>>>>>>>>>>>>>>>> म्हणा की. कुणी अडवलंय.

वेळेचा वायफळ खर्च , सर्वरच्या जागेचा वायफळ खर्च, नेटसाठी भरलेल्या पैशांचा वायफळ खर्च काय वाट्टल ते म्हणा

पण तरीही हे सापेक्ष आहे.
कुणाला वायफळ वाटेल तेच कुणासाठी वेळ घालवण्याचं योग्य साधन असेल.

ऋणम्या लोक लैच म्हणजे लैच सिरीयसली घेउन राहलेत.

ऋ, आखिर तेरे फेव्हरेट की एक बात तुझे भी लागु होती है.

'यु कॅन लव हिम यु कॅन हेट हिम बट यु कॅन नॉट इग्नोर हिम' Wink
तु माबोचा शाहरुख खान आहेस.

तु माबोचा शाहरुख खान आहेस.
>>>
प्लिज!!!!!!!!!!!!!!!!!!!!>>>> Rofl
काय हे सस्मित,, तु तर घाव घालत आहेस तिच्यावर असे स्टेंटमेंट करुन.

आशु चॅम्प

ह्या धाग्याला प्रत्युत्तर म्हणून धाग्यावेताळ आणखी एक धागा काढणार
काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते. तुमचं मत एकवेळ बदलेल पण चि . ऋ च कुठलही मत कधीही बदलू शकत नाही कारण त्याच्यामते जगातल्या कुठल्याही गोष्टीला फक्त दोनच बाजू असतात एक त्याची आणि दुसरी चुकीची

इथे धागे काढून माहिती गोळा करून मग ती माहिती इतर ठिकाणी सांगून कॉलर टाइट करणे मला पॅथेटिक वाट्ते(ती मानसिकता . व्यक्तिनव्हे. जनरल वेताळी धाग्यांची क्वालिटी पण एक ना धड भाराभर चिंध्या अशी च असते. नो व्हॅल्यू अ‍ॅडिशन. पूर्वी विविध भार्तीच होते तेव्हा कधीतरी कधीतरी चांगले गाणे लागेल म्हणून रेडिओ लावून ऐकत बसायचो व बोअर गाणी दिवस भर वाजत राहायची तसे आहे. माझे ऑटोमेशन ला पूर्ण समर्थन आहे त्यामुळे वायफळ नेटवापरा वरही कंट्रोल येइल. सो मच द बेटर.
एक उदाहरण रॅन्समवेअर अ‍ॅटॅक वर सी एन एन व रूटर्स वर इतकी माहिती उपलब्ध आहे व अपडेट्स पण. पण इथे धागा काढू काय मिळते. वान्ना क्राय.

स्मिते, म्हणुन काय झालं अगं , आय स्टिल लव्ह हिम... दुसरा त्याचयपेक्षा जास्त आवडतो म्हणून त्याच्यावरचं प्रेम संपलंय असं नाहीये...

अमा २००% अनुमोदन.

जनरल वेताळी धाग्यांची क्वालिटी पण एक ना धड भाराभर चिंध्या अशी च असते. नो व्हॅल्यू अ‍ॅडिशन. >> सो मच ट्रु.
व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे.
अप्रगल्भ लेखन, अप्रगल्भ धागे, भारंभार पोस्टी..
मला वाचताना जनरेशन गॅप जाणवते.
म्हातारी झाले बाबौ Proud

मायबोली वाचाणाराच्या डोक्याला ताप >>>नाही होणार ताप, धाग्याचा लेखक कोण ते बघून आपल्याला फक्त एव्हढेच ठरवायचे आहे कि तो धागा उघडायचा कि नाही.
लेखक कधीच म्हणत नाही कि या माझा धागा वाचा. पण त्याची बालिष बडबड बघता बर्‍याच लोकांना त्याला सल्ले द्यायची, टोमणे मारायची ईच्छा होते. तो कोणावर टिका करत नाही, समोरच्याचा अपमान करत नाही (जी खूप चांगली गोष्ट आहे) पण काहीही उदाहरणे देऊन, काहीही गप्पा ठोकून समोरच्याशी बोलत बसतो. प्रतिसाद देणार्‍याला/वाचणार्‍याला शेवटी कळायला लागते कि ईथे काही सांगून उपयोग नाही. त्यांचा वेळ जातो पण धागालेखकाचा चांगला टाईमपास होतो.

मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का > >>>>> कोणाच्या वेळेचा वायफळ खर्च??? धागे काढणार्‍याच्या की ते वाचणार्‍याच्या???

धागे काढणार्‍याच्या वेळेच्या वायफळ खर्चाशी आपल्याला काय घेणंदेणं आहे? त्याचा / तीचा वेळ आहे तो. आणि वाचणार्‍याचं म्हणाल, तर तुमच्यावर कोणी सक्ती केली आहे का त्याने / तिने काढलेले सगळे धागे वाचायची? नसेल तुम्हाला वेळ तर नका वाचू.

हाकानाका ...............

सोनालिसी +१
मी मूळ धाग्यावर एक उदाहरण दिले आहे याबद्दल.

सोनाली - तुम्ही बरोबर बोलत आहात, पण या धाग्यावर मुद्देसूद बोलण्यास मनाई आहे असा बोर्ड टाकायला विसरलो

भारी जमलंय Lol

अरे लोकहो आणि असे भांडू नका दोन बाजू घेत..
तुम्हा लोकांना जो आनंद हनीमूनला गेल्याने मिळतो तितकाच मला धागा काढल्याने मिळतो.. मी तुमच्या सुखावर उठलो म्हणून माझ्या सुखावर उठता काय..

Lol

तुम्हा लोकांना जो आनंद हनीमूनला गेल्याने मिळतो तितकाच मला धागा काढल्याने मिळतो.. मी तुमच्या सुखावर उठलो म्हणून माझ्या सुखावर उठता काय..>> ऋ.. अरे काय.... Biggrin

Pages