मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का

Submitted by आशुचँप on 15 May, 2017 - 03:26

दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.

फार पूर्वी एकत्र मायबोली पद्धती होती. नवीन आयडीला आपल्या लेखनकौशल्याची संधी दाखवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून त्यांच्यासाठी नवे धागे काढले जायचे.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच नवे नवे धागे काढलेच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच गप्पांच्या बाफवर मुक्ताफळे उधळणारे तेवढ्यातच आणखी वेळ खर्च करून नवे धागे काढून येतात. त्यात टवाळ लोकांना जेव्हा समजते की तुम्ही नवा धागा काढायला निघाला आहात तर ते आणखी (थरथर) कापू लागतात. मला मात्र हा एकूणच वेळेचा खर्च वायफळ वाटतो.

हल्लीच्या काळात जर गप्पांच्या धाग्यावर विषय समजून जात असेल किंवा पुरेशी चर्चा होत असेल, अश्यावेळी त्या नव्या धाग्याच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.

मुळात मी ईथे नवे धागे काढण्याच्या विरोधात नाहीते. मानसिक क्षमता असेल तर दिवसा-दोन दिवसातून एकदा धागा काढलाच पाहिजे. पण प्रत्येक नवा विषय आल्यावर लगेचच नवा धागा काढण्याच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.

असो, तर ही प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.
काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, आशिष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या महीन्यात माझे ४ धागे आलेले आहेत. प्रत्येक कौतुकाच्या प्रतिसादानंतर छान वाटते (ब्रेन केमिकल्स) हे जरी खरे असले तरी मी प्रतिक्षिप्त क्रियेसारखे माझे जे धागे निघतात ते थांबवते आजपासून.
माफ करा.
यावर "नाही गं सामो तुझे धागे छान असातत' सुद्धा कमेंटस नकोत ना टिकेच्या.
-------------------
व्हाईटहॅटही म्हणतात ना - ज्योतिष नाहीतर मीमीमी

बरोबर आहे ते. ज्यांच्याकडे व्यासंग नसतो ना ते भारंभार आहे त्यात केविलवाणा उत्सव करतात.

या धाग्यावरचे हेमाशेपो!!

काही बोलायचेच नाही असे धागे असणारे संस्थळ. >>> इतके टोकाला का जावेसे वाटले ? आधी मायबोली मूक होती असा आपला समज आहे का ?

काढला आहे>>>>

आहे नाही सर, काढला होता. हा भूतकाळ झाला, आहे हा वर्तमानकाळ झाला.
मान्य आहे तुमचे मराठी वाईट आहे पण इतकेही नसावे

या संस्थळावरच्या चर्चा पहा.
Submitted by शान्त माणूस on 31 January, 2022 - 13:31
<<
उपक्रम सुरू असतानापासून तिथे मेंबर आहे मी. ऐसीअक्षरे पण बघा एकदा.

>>>>>हा धागा 2017 साली काढलेला आहे इतकंच सांगू शकतो
_/\_
इन जनरल मला वाटले/जाणवले की माझेही अति धागे काढणे होतय म्हणुन .... आपल्यावर रोष नाही ना अन्य कोणावर.
स्वतःलाच दिलेली समज आहे. Happy खरच.

Back in the day entire front page used to be befikir stories plus fan club. Good reading material and fun
There used to be genuine I'd fans of his work.

B I'd used to ask Many specific questions.

Jaagu and dineshda used to write several recipes articles etc. But genuine information and personal experience s.

सामो
धागे अती होणे हा काही नियम नाही. पण त्या धाग्यांवर मला यातले काही माहिती नाही, मी वाचलेले नाही, ते अमक्या तमक्या लोकांचे काम आहे अशी ट्रोलछाप दुरूत्तरे लोक काही काळ सहन करतील. काही काळ एण्जॉय करतील. काही सांगायला जातील. पण त्या एका मोडमधे गेल्यावर त्यातून माघार नसल्याने जे चांगले सांगायला येतात त्यांना चार पाच आयड्यांनी घेरणे , उथळपणा करणे असे प्रकार व्हायला लागले की एकंदरीतच वारंवार धागे काढणे हे सुद्धा नजरेत भरायला लागते.

टीपीसाठीच माबोवर किती तरी धागे आहेत. अ आणि अ सीन्स , चुकीची ऐकू आलेली गाणी. या धाग्यावर एका ओळीची प्रस्तावना असते फक्त. कुणाकडून जर उत्तम माहिती मिळत असेल तर कुणालाच त्रास होणार नाही.

एक कॉलेजचे प्राचार्य होते. ते रोज गझला लिहीत म्हणून मायबोलीकरांनी त्यांना ट्रोल करून हाकलून दिले. अर्थात तिथे जे आयडी होते त्यातले आ ता वेगळी भूमिका घेताना दिसतात हे आश्चर्यकारक आहे. त्यांचा वावरही तसा होता.

नियम करून नाही होणार काही.

बोलायचेच नाही असे धागे असणारे संस्थळ

म्हणजे की फक्त वाचनमात्र धागे असलेलं. प्रतिसाद नाहीच. राजकीय चिकित्सेसाठी तर असावेतच. सरकार/नेते/ आर्थिक धोरण वगैरे . वायफळ वाटले तर मालक तो धागाच उडवतील आणि संस्थळ कसं गुळगुळीत चमकदार राहील.

पूर्वी दाद, वैभव कुलकर्णींच्या कविता यायच्या. त्यावर उत्तमोत्तम चर्चा व्हायच्या की. म्हणजे तो एक आयडी नव्हता म्हणजे मायबोली मृतप्राय थोडीच होती. निंबुडाचे हलकेफुलके धागे असत. चांगल्या कथा यायच्या. रहस्य / संदेह कथा कौतुक शिरवाडकरच्या असायच्या. धुंद रवी ची लुंगी खरेदी आणि इतर काही धमाल धागे. चांगली मौज होती. आजही मायबोलीच्या त्याच ओढीने लोक येतात इथे.

अंधश्रद्धा विरूद्ध विज्ञान अशा काही सकस चर्चा झडून गेल्या आहेत. आता एखादा आयडी आपल्या नावावर हा विषय पाहीजेच या हट्टाने धागा काढत असेल तर ?

नीधप (माफ करा नाव घेतले) आणि इतर स्त्री आयड्यांनी पुरूषांचे शिक्षण करणारे (खरं म्हणजे शाळा घेणारे) लिंगनिरपेक्षता आणि इतर काही भन्नाट उपक्रम चालवले होते. त्यात बहुतेकांच्या विकेटी पडल्या होत्या. त्या वेळी तिथे लिहीता आले नाही पण तिथले मुद्दे घेऊन (ढापून) नंतर आपल्या नावाने धागे काढणारा आयडी उगीच आव आणत असेल तर डोक्यात नाही का जाणार ? आपण हरलो हे सांगण्यात पण मजा असते.

लिंगनिरपेक्षता, स्त्रियांसाठी ड्रेस कोड आणि समलैंगिकता ( असेच काही नाव होते) या तीनही धाग्यावर माझी विकेट पडली होती. या धाग्यांमुळे माझी मतं मला बदलून घेता आली. हे मायबोलीमुळे शक्य झाले. उजव्या विचारसरणीचे आयडी उघड विरोध करायचे, मला ते विचारांशी प्रामाणिक वाटतात. कारण यातल्या काहींनी आपली मते चुकीची आहेत हे नंतर कबूल केले. काही मात्र तसेच राहिले. मतं पटोत ना पटोत हा प्रामाणिकपणा आवडतो.

पण सावध भूमिका घेत, अदमास घेत आपली भूमिका मांडताना गुळमुळीत सबगोलंकारीपणा करणे आणि नंतर डोक्यात घुसल्यावर आमचे घराणे गेल्या सात पिढ्यांपासून पुरोगामी आहे असा आव आणत भूमिका मांडणे हे सर्वांच्या लक्षात येत असते.

Back in the day entire front page used to be befikir stories
>>>>>
बेफिकीर हे मी आजवर पाहिलेले सोशलसाइटवरचे सर्वोत्तम लेखक.

Jaagu and dineshda used to write several recipes articles etc. But genuine information and personal experience s.
>>>>>
दिनेशदा जबर्रदस्त होते. चतुरस्त्र व्यक्तीमत्व.

पण बेफिकीर मायबोलीवर कथा लिहायचे बंद झालेत. आणि दिनेशदा काही कारणास्तव किंबहुना ट्रोलिंगमुळे स्वत:हून सोडून गेले.

डॉ. साती सुद्धा छान माहितीपर लिहायच्या. त्या ही एका वादातून गेल्या.

मी सुद्धा तो एक काळ फार मिस करतो..

त्यानंतर अचानक काय झाले काय माहीत. त्यानंतरही काही चांगले लिहिणारे आले पण नाही टिकले. टोळधाड यावी तसे ट्रोल धाड पडायची आणि चांगले लिहित्या लेखकांना उकसावले जायचे. ते भांडून आयडी उडवून घ्यायचे वा वैतागून ईथले लिखाण सोडून जायचे.

या पॅटर्नवर मी एक धागा सुद्धा काढलेला..

एखादा नवीन धागा आला कि हे अर्ग्युमेण्ट नेहमी येते कि हे आधीच तीन वर्षांपूर्वी डिस्कस करून झाले आहे...
अरे नवीन धागा आला तर वाईट काय- कित्येक लोक नव्याने चर्चा करतात आणि नवीन माहिती मिळते.. आणि जुने धागे कोण शोधात बसणार...

दिलीपकुमार चा देवदास होता म्हणजे शाहरुख ने देवदास करूच नये का... तसा केला म्हणून नवीन जनरेशन ला दिलीप माहित झाले... आणि ते शोधता शोधता के एल सैगल ...

च्रप्स सर, + १ द्यायला आलो होतो. पण बहुतेक आपला सर्वांचा बाजार उठला आहे. आपण काही दिवस तोंड काळे करू.
नंतर फ्रेश झालो, धूळ खाली बसली कि नवीन जोमाने मायबोलीवर हमला करू.
बघा ना कालचा माझा धागाच उडवला. आत्ताच समजले.
आपण सगळे एकत्रच झोपायला गेलेलो ना ?

शाली पण छान लिहायचे... हायझेनबर्ग देखील...
>>>
अजूनही नावे आहेत. बहुतांश जण वादातून आणि ग्रूप ट्रोलिंगमुळे गेलेत. नाव घेणे ऊचित वाटत नाही. पण एक हुमायुन नेचर असते ना. कोणी चांगले लिहिणारा आहे तर त्याच्या चुका काढण्यासाठी आपण टपून बसतो. आणि तशी संधी सापडताच मनातली असूया बाहेर पडून तुटून पडतो. तसे बरेच जणांशी झाले.

Pages