खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अचानक मानसीची मैत्रीण किंवा batchmate जन्मली आणि तिला मानसीची सगळी खबरबात आहे. >>>> विरोधाभास म्हणजे एक दिवस आधी आजोबा वि ला सांगतात की तिला जास्त मित्र मैत्रीणी नाहीत दु:ख हलकं करायला....................

आजोबांना मोनिकाच्या इतक्या मेजर घडामोडींबद्दल माहिती नसतं तर मानसीच्या मैत्रिणींबद्दल काय माहिती असणार?

काल तिची मैत्रीण एकदम होणार्‍या नवर्‍याचं नाव वगैरे सांगायला लागल्यावर 'हाच बाळाचा बाप तर नव्हे' असं उगाच वाटून गेलं Proud पण बहुतेक या मालिकेत त्याला आणणारच नाहीत.

काल तिची मैत्रीण एकदम होणार्‍या नवर्‍याचं नाव वगैरे सांगायला लागल्यावर 'हाच बाळाचा बाप तर नव्हे' असं उगाच वाटून गेलं

>> अगदी अगदी रमड.. कायतरी सातपुते आडनावाचा मुलगा होता. त्या मै ने अगदी ठासून सांगितलं त्याचं नाव.

डॉक्टर लोक युनिव्हरसिटीत जातात का? की मानसी डॉक्टर आहे हेच विसरायचं आता?
मालिकेचा गाभा घटस्फोट आहे तर किमान थोडा बेसिक अभ्यास हवा होता.
मुलीची कस्टडी मिळवायची युक्ती डायव्होर्स नाकारणे. फारच बेसिक झालं. मोनिका घटस्फोट नकोच म्हणत होती ना?
आणि घटस्फोट द्यायचा की नाही हे कौन्सेलर ठरवणार की कुटुंब न्यायालय?

माहेरचं एप्रिलचं संपादकीय या मालिकेवर आहे.
" मोनिका म्हणजे, मोकळीक दिली, की मुली कशा वाहवत जातात'चं 'स्त्रीमुक्ती संकल्पने'चं विकृतपणे सादर केलेलं मूर्तिमंत रूप!......
........ मोनिका ही अत्यंत खुबीन स्त्रीमुक्तीच्या 'आचरट' संकल्पनांचा आविष्कार म्हणून मांडली जाते. आणि मानसी आदर्श स्त्रीत्वाचा नमुना म्हणून मांडली जाते.
.....प्रश्न चलाखीने भूमिका मांडण्याचा आहे. यामागची आणखी एक छुपी लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, व्यक्तिवादी पुरुष हा नियम असतो, तर व्यक्तिवादी स्त्री हा अपवाद! त्यामुळे पुरुषाचा व्यक्तिवाद कधीच डाचत नाही.
या मालिकेत 'माणूस'पणाच्या अंगातून मोनिकाची व्यक्तिवादी व्यक्तिरेखा उभी करण्याऐवजी `तिचा व्यक्तिवाद म्हणजेच स्त्रीचा व्यक्तिवाद, आणि तो कसा घाणेरडा असतो,' असा संदेश कळतनकळतपणे(?) देण्यात येतो आहे का?
परिणामी तिचं निखालस चुकीचं वागणं हे एका `प्रॉब्लेमॅटिक' स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचं वागणं न वाटता स्त्रीमुक्ती चळवळीचं प्रॉडक्ट ठरवलं जाण्याचा धोका आहे.
आजकालच्या शिकलेल्या मुली, त्यांचं स्वातंत्र्य हे कुटुंबसंस्थेला अशा कारणांनी मारक ठरतं आहे, अशा प्रकारचा गैरसमज पद्धतशीरपणे पोचवले जातात, हे आपण पाहतोच."

मालिका पाहताना हा अँगल मला कधीच जाणवला नाही. या धाग्यावर २००० प्रतिसाद होत आलेत, त्यातही कोणाला हा मुद्दा जाणवलेला नाही. कोणाच्या घरच्या मागल्या पिढीतल्या किंवा अन्य प्रेक्षकांना असं जाणवलंय का?
---------
त्याच संपादकीयात म्हटलंय - 'जागतिक महिला दिन' याही वर्षी 'नियमितपणे साजरा' झाला. म्हणजे समाजातल्या आहे रे वर्गानं मोटारबाईक - कार रॅल्या, फॅशन शोज, पुरुषी कपडे घालून समानतेचा पुकारा वगैरे वगैरे कार्यक्रमांतून `स्त्रीमुक्तीचं (!!!)' प्रच्छन्न दर्शन घडवलं.

महिला दिन हा असा साजरा झाल्याचं माझ्या पाहण्या-ऐकण्या-वाचण्यात नाही. मोटारबाईक रॅली गुढीपाडव्याला असतात ना?

इतका डिप विचार केला नाही पण, मालिकेचा पाया एका अती ठिसुळकथालाइनवर आहे पण झिच्या सर्वच मालिका एक नको तितका आदर्शस्त्रिवाद उभा करतात

भरत, तुमचे म्हणणे खरे आहे. मो एक व्यक्तीरेखा म्हणून अतिशय वाईट आहे, पण लगेच याचा संबंध स्त्री मुक्ती वगैरे शी लावता नये. ती एक माणूस म्हणून चुकीची वागत्येय...त्यात तिच्या स्त्री व्यक्तीवादाचा, स्वैर विचारांचा (केवळ स्त्री असल्याने - बंडखोरीचा) वगैरे काही संबंध नाही- नसावा.
आणि हो... ह्या रॅलीज वगैरे काढतात हल्ली......पाडव्याला.
महिला दिना बद्दल तर लोक तो पर्यंत विसरुनही गेलेल असतात!

भरत मा भोचक पणा नव्हती करत, पण मधल्या काही एपिसोडात ती सतत दळवींच्याच घरी पडीक असायची. मो तिला त्यावरून बोललेली पण दाखवली आहे.

मा भोचक पणा नव्हती करत > लग्न करून घरी आल्यावर सर्वांसमोर बहिणीला 'तै तू हा उखाणा घे" म्हणताना दाखवली आहे की! भोचकपणाच की! नानूमामा त्यावर तिरकस टोमणा सुद्धा मारतात!

इतका डिप विचार केला नाही पण, मालिकेचा पाया एका अती ठिसुळकथालाइनवर आहे पण झिच्या सर्वच मालिका एक नको तितका आदर्शस्त्रिवाद उभा करतात >>>> फक्त झीमच नाही, तर सर्व मराठि वाहिन्यावर ( काही स्त्री पात्रान्चा अपवाद वगळल्यास) हिच परिस्थिती आहे. ( झी युवा आमच्याकडे नाही, त्यामुळे त्या वाहिनीवरच्या कार्यक्रमान्बद्दल फक्त जुजबी माहीती मला आहे.) हिन्दी वाहिन्यानवर सुद्दा काही मालिकात हिच परिस्थिती आहे.

आपलं मोडलेलं लग्न आणि विक्रांतचा संबंध जोडून कआहीतरी भयंकर करायचा मोनिकाचा प्लान आहे हे मानसीला चक्क कळलंय.
मोनिकाला नक्की काय हवंय पण? वि आणि माचे संबंध दाखवले तर घटस्फोट मिळेल. पण तिला तो नकोय.
तिला ईशा नकोच. पण विक्रांतलापण द्यायची नाही म्हणून घटस्फोटपण नको.
म्हणजे मला नाही तुला नाही.....असा प्रकार वाटतोय.

मी तर कंटाळून पहायची बंद केली ही सिरियल.
आणि कधी चुकून पहावीच वाटली तर टायटल लागताच झोप येऊ लागते (कारण मी रिपिट पाहते)
त्यात तो विक्र्या आला स्क्रीन वर की दुप्पट झोप येते.

हा हा ... विक्र्या... खरंय... आत्ता प्रोमो मध्ये तर कळ आलीये पण जाता येत नाहीये असे एक्स्प्रेशन देउन बोलत होता...

मा काही सांगत नाहिये म्हणून वि इतके विचित्र हावभाव करतो की "घाईची लागलिये पण टोयलेट सापडत नाहिये" असे वाटते Proud

मा काही बोलत नाही, नुसती गप्प बसते अस सगळे म्हणतात पण मला ती कधीच आनंदी, उत्साही आठवत नाही. ती कायम अशीच होती.

हो नताशा, मा कायम पोटात भूक, समोर सुग्रास अन्न असून कॉन्स्टिपेशन झाल्यासारखी..

जुदा होके भी तु मुझमे कही बाकी है.... Proud

>>>>>मला ती कधीच आनंदी, उत्साही आठवत नाही. ती कायम अशीच होती.>>> हो ... मला पण ती कायम मेंगळटच वाटते... नुसत्या गालावर खळ्या आहेत म्हणून घेतलंय का काय ते कास्टिंग वाल्यालाच ठाऊक... चला उच्चार,अभिनय ,एक्स्प्रेशन, बॉडी लँग्वेज नाही पण आय कँडी पण नाही ना...

अगदी नटुकाकी.
मा फारच मेंगळी, निरूत्साही, निराश अशी वाटते मला.

पुर्वी त्यातल्या त्यात मोनिका जर्रा म्हणजे थोडीच बर का! बरी होती आता तर सतत ती दात ओठ दाबुन चिडुन बोलत असते, तिच ते नाक फुगवुन तोन्ड वेगाडण अतिशय इरिटेटीन्ग आहे. सध्या बेस्ट व्हिलन म्हणजे नन्दिता आणी अम्माजी!
सन्जय मोने, उषा नाडकर्णी आणी अग बाई ह्यानी इतक्या सिरियल, मुव्हिज केल्यात, काही दर्जेदार भुमिकाही केल्यत त्यानाही या सिरियलच्या टृएक पटतोय? का व्यावसायिक गणीतात डायरेक्टरला काही सान्गणे म्हणजे स्वतच्या पायावर धोन्डा पाडुन घेणे असल्याने असेल.
सध्या माझी आवडती कलाकार म्हणजे इशा! कसल गोड बाळ आहे, एक्दम क्युट आहे.

>>>सध्या माझी आवडती कलाकार म्हणजे इशा! कसल गोड बाळ आहे, एक्दम क्युट आहे.>> हो... मस्त हसते ती... आधी पेक्षा छान दिसते आता...

ही आणि काहे दिया परदेस या दोन्ही मालिकांत इतकं काही घडत असताना धागे का ओस पडले?

लोकांची लग्न मोडतात, विक्रांतचा डायव्होर्स मोडला.
विक्रांत बाळाला हॉस्पिटलात घेऊन जायचा, मानसी मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाणार आहे.

सिरियलमध्ये लीप आलीये का? Uhoh ती मानसी चश्मिश दाखवलीये एका प्रोमोमद्ये आणि ती शाळेच्या प्रिन्सिपलला इशाचे पुर्ण नाव 'इशा मानसी देशमुख' असे सान्गते. ईशाचे फक्त डोळे दाखवले.

ती मानसी चश्मिश दाखवलीये एका प्रोमोमद्ये आणि ती शाळेच्या प्रिन्सिपलला इशाचे पुर्ण नाव 'इशा मानसी देशमुख' असे सान्गते. ईशाचे फक्त डोळे दाखवले. >> मराठी मालिकेत लीप येणं जरा वेगळं आहे ना, "उंच माझा झोका" मधे लीप आलेली आठवत्ये, बाकि मालिकांत तर दळणचं चालू होतं.

२ दिवस काय झालं ?>>>
१ दिवसात ३ वर्षे ओलांडली! बिच्चारे काय दाखवावे कळेना!

मनोरुग्ण विक्रान्त आणि ३ वर्षाच्या मुलीची आई मानसी... आता पुढे सुरु होईल सिरेल..

Pages