खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच कसला थंड अभिनय केलाय मानसीने
तिच्या दंडाला धरून गदागदा हलवावं असंच वाटतं मला... (कायम)

मा ने ठण्डाक्का ला मागे टाकले >>> + १११११११११११११११११

आपलं लग्न होतंय म्हणजे काय ते मानसीला कळलं नव्हतं. आता आपलं लग्न मोडलंय हेही तिला कळलेलं दिसत नाही.>>>>> Proud

का मोडतयं ते सांगितले का ?. मो त्याला जाब विचारणार आहे . तिला काय सांगणार ? मग तर वि च घोंगड कायम भिजतं.

काल "अस्स सासर सुरेख बाई" या मालिकेत संतोष जुवेकर सुद्धा त्या जुई ला एका चहाच्या टपरीवर घेऊन जातो आणि इथे खूप भारी चहा मिळतो वगैरे सांगून चहा पाजतो.

हि तीच टपरी आहे जिथे सलील एक दिवस मा ला दिवसभर फिरायला म्हणून घेऊन घराबाहेर पडतो आणि या टपरीवर चहा घेत असताना ईशा रडतेय असा फोन आल्यावर ते फिरणं कॅन्सल करून मुकाट घरी जातात.

बहुतेक फिल्मसिटी मधला कोणीतरी बराच फेमस चहावाला असावा. सगळे तिकडेच जातात सारखे सारखे. Uhoh

बाकी काल सलील आधी म्हणाला की तुमच्यात काय नातं आहे मला माहित नाही. आणि नंतर ठामपणे म्हणाला की तुमच्यात प्रेम आहे पण ते तुम्हाला कळत नाहीये. मानसी आणि विक्रांतला खरंतर कश्यातलंच काहीच कळत नाहीये.

ही कथा ४०-५० च्या काळातली असायला हवी होती. ना सी फडके किंवा वि स खांडेकरांच्या नायक नायिकेसारखे अजाण आणि अबोध दोघे जण. Proud इतके एकत्र राहुन आणि या वयात सुद्धा या दोघांना आपल्या मनातल्या भावना कळत नाहीत? इमोशनली चॅलेंज्ड लोक.

असं दाखवलं असतं तर आस्त पटलं असतं कि भावना कळल्या आहेत पण त्यांच्या नात्यामुळे ते हेजिटेट करतात . पण टीनएजर्स सारखे आपल्याला काय वाटतं हेच कळत नसेल तर दोन्ही तिशीतले डॉक्टर्स मंदबुद्धीच म्हणायला हवेत.

ओ, मानसीचं वय वाढवू नका. साडेबावीसव्या वर्षी एमबीबीएस होतो माणूस , असं आताच कळलंय. सहा महिने हॉस्पिटलातला प्रसन्न वावर म्हणजे फारतर २३.
विक्रांत असेल ३०.

पण खांडेकरांच्या कादंबर्‍यांतून पडले असतील - आदर्शवादी. फडकेंची पात्र रोमँटिक असायची म्हणे.

तो इक्रान्त तर केवळ दगडा सारखा मख्ख जणू त्या वि आणि मा सांगितलयं तुम्हा दोघांपैकी जो जास्त मख्ख चेहरा दाखवेल त्याला विशेष पारितोषिकाने गौरविण्यात येईल आपल्याच झी गौरव मध्ये!

तर दोन्ही तिशीतले डॉक्टर्स मंदबुद्धीच म्हणायला हवेत.>>> डॉ झालेच कसे भावना कळत नाहीत तर! Wink

पण खांडेकरांच्या कादंबर्‍यांतून पडले असतील - आदर्शवादी. फडकेंची पात्र रोमँटिक असायची म्हणे. >>> मी या दोन लेखकांची प्रत्येकी फार तर २ पुस्तकं वाचली आहेत. त्या जोरावर मी स्टेटमेंट करायला नको होतं. मला एवढंच म्हणायचं होतं कि ते दोघं हल्लीच्या काळात एवढे अजाण दाखवले आहेत हे फारच झालं.

तो इक्रान्त तर केवळ दगडा सारखा मख्ख जणू त्या वि आणि मा सांगितलयं तुम्हा दोघांपैकी जो जास्त मख्ख चेहरा दाखवेल त्याला विशेष पारितोषिकाने गौरविण्यात येईल आपल्याच झी गौरव मध्ये! >>> 'मेड फॉर इच अदर' जोडी आहे.

>>>>>>असं दाखवलं असतं तर आस्त पटलं असतं कि भावना कळल्या आहेत पण त्यांच्या नात्यामुळे ते हेजिटेट करतात >>>>. एक्झॅॅक्टली.... असचं तर मेन सूत्र आहे (होतं??? )आणि ते कधी ना कधी एक दिवस तरी दाखवतील या आशेनेच तर मालिका बघतायेत पामर प्रेक्षक....

मनिमाऊ, एवढं मनाला लावून घेऊ नका. मी दोघांची एकही कादंबरी वाचलेली नाही. पण त्यांच्या कादंबर्‍यांबद्दल मात्र वाचलेलं.

१) अरे, त्या सलीलचं काम करणार्‍यांबद्दल चांगले म्हणा की काही. निरोपाच्या वेळचा अभिनय चांगला होता त्यांचा.

२) @ भरत. -- ओ, मानसीचं वय वाढवू नका. साडेबावीसव्या वर्षी एमबीबीएस होतो माणूस , >>>>> ते सामान्यतः,... इथे मानसी आहे. तिचा एकंदर आलेख बघता, आपल्याला एखादा विषय कळलेला नाही हे पण तिला वर्षाच्या शेवटी नापास झाल्यावर कळणार... मग १८ + ४.५ + ४ = २६.५ +/- धरायला हरकत नाही.

३) माझा नियमित विमानप्रवास नसतो. म्हणून विचारते --- सौदी अरेबिया एअरलाईन्सची मुंबई-बंगलोर वाहतूक सेवा असू शकेल काय? काल निरोपानंतर विमान जाताना दाखवले ते सलीलचेच असणार बहुतेक.

आपल्याला एखादा विषय कळलेला नाही हे पण तिला वर्षाच्या शेवटी नापास झाल्यावर कळणार... >>>> Lol Lol
माझा नियमित विमानप्रवास नसतो. म्हणून विचारते --- सौदी अरेबिया एअरलाईन्सची मुंबई-बंगलोर वाहतूक सेवा असू शकेल काय? >>>> Proud

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही
जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही
मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…
-सुरेश भट
#खुलताकळीखुलेना #सलील #मानसी

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही >>> छान आहे ही गझल आणि खुप सुरेल नसली तरी छान गायला सलील. त्याचं इमोशनल होणं पण छान दाखवलं. त्यामानाने मानसी मख्ख होती. ( आताच झी अ‍ॅप वर पाहिला कालचा भाग. ) एक रहस्य कळालं नाही कि सलीलने निर्णय घेतला होता तर तो सगळ्यांना शेवटचं लग्ना आधीचं भेटायला का गेला? चक्क मानसीच्या आजी-आजोबांना सुद्धा अंधारात ठेवलं त्याने. त्यांचा लग्न मोडल्यावर किती विरस होणार आहे असा काही उल्लेख सुद्धा सलीलने नाही केला, खरं तर हे एकमेव कॅरेक्टर सेन्सिबल दाखवलं होतं. काल तो जरा विअर्ड वागला पण अ‍ॅक्टिंग मस्त केलं.

बाकी त्या सलील ने निरोपाच्या वेळचा अभिनय खरंच छान केलाय.
आधी त्याने एकाच मालिकेत काम केलं होत नंतर त्याला मालिकेत कामच मिळाली नाहीत बिचार्याला

त्याला इतरांनी मानसीला ओरडणं, किंवा काही बोलणं नको होतं म्हणून तो कोणालाचं काही न सांगता गेला असावा.

मा चा पुतळा झाला असं वाटत होतं पण ती कायमच मख्ख असते त्यामुळे वेगळा अभिनय करावा लागला नाही तिला. आता ती अचानक वि बरोबर बोलणं टाकेल. त्यावरून तरी कोणी क्लू घ्यावा लग्न मोडण्याचं कारण काय असू शकतं.

तसं तर वि जबबदार नाहीये लग्न मोडण्याला, ही मा च सारखी त्याच्या मागे मागे जायची, अति भोचक.

सईलचा अभिनय आवडला संवादही चांगला होता त्याचा. लग्नाचा हिशेब काहीतरी गंडलाच आहे पण उद्या लग्न तर आज सी मांत पूजन की काय विधी, कढिभाता चे जेवण हवे कि नाही म्हण्जे हे काही इंग्रजी लग्न नाही. आज यायचे की लगेच लग्न. शिवाय आधी मेहेंदी संगीत असते मुलीक डे. इतर चार नातेवाईक बोलावलेले असतात. फराळ दागिने साड्या आहेर किती तरी असते. ह्यातले काहीच दाखवले नाही. लग्न कँन्सल होणार अशीच हवा होती साधारण. खप्पड सुंदरी तिच्या तारेत. मान्शी तिच्या धून मध्ये. अज्जी आबा जे जे होईल तेते पाहावे. मोड मध्ये. इशा कुठेच नाही. दुसरे म्हणजे बाळ असले की बाळाचे सामान घर भर विखुरलेले असते. खेळणी दुपटी कपडे, बाटल्या दुधाच्या हे अन ते जॉनसनच्या तेलाच्य बाटल्या. पावडर चे डब्बे. ते काहीही पण नाही. कौन प्रोड्यूस करता यार ये.

हा हा.... एकदम बरोबर प्राजक्ता_शिरीन अमा... आणि
सुंदर आणि रसरशीतं नातं असं म्हणाला का सईल.. तो आक्टिंग चांगली करत होता पण या वाक्यावर मला हसायलाचं आलं...वि आणि मा चं दोघं मुळात पोटात मुरडा घेयुन फिरणार् असतील तर नात रसरशीतं कसं कॉय बुवा...

दुसरे म्हणजे बाळ असले की बाळाचे सामान घर भर विखुरलेले असते. खेळणी दुपटी कपडे, बाटल्या दुधाच्या हे अन ते जॉनसनच्या तेलाच्य बाटल्या. पावडर चे डब्बे. ते काहीही पण नाही. > +१ आणि पहिल्या काही महिन्यांम्धे होणारी बाळाची वाढ दाखवली तर नाहीचे पण त्याची किती चर्चा आणि कौतुक अस्तं घरात तेही नाही

ही सिरीयल आहे ते सोडून द्या...पण अशा बाळाचं कौतुक कोण व किती करणार..? ते आनंदा पेक्षा फक्त जबाबदारीच आहे ना..... आजी आजोबांनाही मर्यादा आहेत, मा-मा तर लग्न करुन चालली, वि नक्की काय करणारे बाळाचं ते माहिती नाही, बाळाची आई तर कायम कुर्यात, ..........
बाळ आता वि कडे आहे ना? मग ? आजी आजोबांकडे पसारा कसा असेल?
आणि त्यातून लेखक मुळात लॉजिक आणि संगती लावणे पार विसरुन गेलेला................................. काय भवितव्य देणार असा लेखक त्या बाळाला?

बाळ आता वि कडे आहे ना? मग ? आजी आजोबांकडे पसारा कसा असेल?
>> वि च्या घरी पण नाही दिसत काही बाळ सापेक्ष. त्याने एकदा दूध दिले तर रात्री बाटली तशीच होती उकळलेली पण नव्हती. आपल्याकडे एक वापरायला व एक उकळलेल्या पाण्यात अशी असते किचन मध्ये. तरी हा डॉक्टर. नुसते गोश्टी सांगून काय पोरे वाढणार. कदाचित सिरीअल अश्या मुलांवर असू शकते. खरे तर विचे मुळात चुकले आहे. सप्तपदीतच हात सोडून लग्न मोडायला हवे होते. घोर चूक.

कथेशी सुसंगत जे काही दाखवायला हवं तेच दाखवता येत नाहीये नीट तर पावडरी/ तेल, बाटल्या कसल्या उकळलेल्या दाखवणारेत?
दिग्द. मंजुळे नाहित ह्याचे.

खरे तर विचे मुळात चुकले आहे >>> हो ना त्यापेक्शा सईल परवडला .
आजी आजोबाना किती धक्का बसेल वगैरे करत नाहे बसला . अर्थात त्याच लग २ दिवसावर होत , त्या दिवशी नाही .

दिग्द. मंजुळे नाहित ह्याचे.>> मंजुळेंचा काय संबंध ?
प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या जागी. तुलना कशाला पाहिजे जिथे तिथे ?

खरे तर विचे मुळात चुकले आहे. सप्तपदीतच हात सोडून लग्न मोडायला हवे होते. घोर चूक. >>>> काहिही हां.... तेव्हाच जर लग्न मोडले असते तर मालिका सुरु व्हायच्या आधिच संपली असती

Pages