खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थकले मी आता मेन विषय काय होता हे समजावून समजावून....>> मी पण .
कारण तुम्ही मुख्य मुद्दा लक्षात न घेता घोळवून घोळवून दुसरच काही बाही बोलता आहात
मुख्य मुद्दा द्यायचा सोडून दुसरच काही तरी गोल गोल गोल गोल Happy

बापरे Lol
नटु, सुजा टेक अ चिल पिल

विक्र्याचे बाबा जास्त अपसेट आहेत लग्न तुटल्या मुळे, ते आजीआजोबांकडे आले व मी प्रयत्न करतो. ही मुले काहीही निर्णय घेतात. आम्ही लग्नाचे सर्व ठरवले होते असे कसे कॅन्सल होईल असे बडबडत होते. अज्जीअजोबा मान्शी मख्ख बसून होते. पण ही जर त्यांची मुलगी मानली तर विक्य्राची मानशी बहीण होईल ना? लोच्या होईल. काय हे घोटाळे? आता बघा आणि दोन तीन दिवसात ते बाळ / बाहुली कुठेच नाही.

चला, चर्चा मालिकेवर आली!

काल दिसलं ते बाळ.
मानसीला मुलगी मानली, तर मोनिकाही मुलगी. त्यामुळे बहीणभावाचे लग्न आधीच झाले आहे. नो वरीज. Happy

आजीआजोबा भारी कूल आहेत. विक्रांत उगाच घाबरत होता लग्नात की मोनिकाच्या प्रेग्नंसीचे कळल्यावर आजोबांना काही होईल.

मानसीने आपल्या डोक्यातले टेन्शन काढून विक्रांतच्या बाबांच्या डोक्यात घातले. ते काही ते विक्रांतच्या डोक्यात घालू शकणार नाहीत.
विक्रांतला सगळे कळीचे प्रश्न पडलेय. मानसीचा असा मित्र कोण? पण त्याला उत्तर दिसणार नाही.

शेवटी, काल विक्रांतचे बाबा मधुकाकांना दोनतीनदा नुसतं मधू म्हणाले. मानलेला का होईना, आतापर्यंत तो काका होता ना त्यांचा?

अय्या खरंच की. सईलने खूप चांगला निर्णय व वेळेवर घेतला अ‍ॅज अपोज्ड टू विकी. नाहीतर अश्या नात्यात अडकलेल्या इनोसंट पार्टीची फार मानसिक वाताहत होते. आणि फर्मली तो कन्व्हे पण केला. अगेन अ‍ॅज अपोज्ड टु विकी.

भरत.. Happy
हो ना..... ना आजीला काही झाले, ना अगंबाईंना, ना आजी आजोबांना....मो च्या प्रेग्नंसीची वार्ता कळून...!! त्यापेक्षा लग्नातच सांगितले अस्ते तर...? आणि जसं ते हुंडा मागताहेत म्हणून लग्न मोडलं तर तिथल्या तिथेच दुसरा वर शोधतात ना मांडवातलाच कुणी मोठ्या मनाचा....तसं मा ला प्रपोज करायचं...... म्हणजे लगेच सगळ्या कळ्या खुलल्या असत्या आणि प्रेक्षकांचीही लवकर सुटका झाली असती !

मो आता शिरा ताणून ताणून प्ली ss ज प्लीज .... असं कुणाला अन का बोलत्येय ? कुणाचं हित साधायचंय तिला? मा चं?

मी कालचा भाग नाही पाहिला.
सईल ने लग्न मोडलं त्यावर त्याच्या स्वतःच्या आईची प्रतिक्रिया काय दाखवली आहे?
की काहीच नाही? सगळं ओके ओके? Uhoh

बर सुजा.... माझी चूक झाली.... मोठ्या मनाने मला माफ करा....

सस्मित ... हा हा...घेतली हो चील पिल..

मान्शी दुःखात बुडाल्याचा अभिनय करतीये का मोकाट फिरत असलेल्या भुतिणिचा.... हातात मेण्बत्ति द्यायची पण गरज नाही...
फक्त सईल उगाच गेला बिचारा.. जरा तरी चांगला अभिनय करत होता...

लोक्स काही वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबांनी व्यावसायिक नाटकांची निर्मिती केली होती त्या अनुषंगाने मी काही सांगू इच्छिते आणि मला वाटत इथेच थांबते.
नाटक , मालिका आणि चित्रपट हि तीनही माध्यम वेगवेगळी आहेत . चित्रपटाचा आणि नाटकाचा दिग्दर्शक बहुतांशी ( अगदी ९९% एकच असतो पण नेमकी नाटकाची तालीम चालू असताना किव्वा सिनेमाचं शूटिंग चालू असतानाच दिग्दर्शकाचं निधन झालं तरच दुसरा दिग्दर्शक येऊ शकतो. .सिनेमाच्या बाबतीत सुद्धा मुख्य दिग्दर्शकाला काही काही वेळा असिस्टंट असतो पण नाटकाच्या बाबतीत शक्यतो एकच एक दिग्दर्शक असतो ) पण मालिकांच्या बाबतीत तसं नाहीये. मालिकेचे प्रत्येक एपिसोडचे दिग्दर्शक वेगवेगळे असू शकतात . एकेक मालिकेला दोन तीन दिग्दर्शक पण असू शकतात किव्वा मुख्य दिग्दर्शक एक आणि त्याचे असिस्टंट काही एपिसोडचे दिग्दर्शन करतात . आता ज्या गोष्टीवरून वाद किव्वा चर्चा म्हणूया हवं तर सुरु झाली कि बाळाच कुठेच नसणं त्याबाबतीत. प्रत्येक माध्यमात प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी असते. दिग्दर्शक हा फक्त दिग्दर्शनच करतो . त्या त्या एपिसोडच्या वेळी बाळ पाहिजे का /नको का ( डिटेलिंग करता ) हे तो फक्त सांगू शकतो पण बाळ किव्वा काही निर्जीव वस्तू शूटिंग पुरत्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हि त्याची नसते.

सेटवर त्या त्या वेळी काय काय गोष्टी ( निर्जीव गोष्टी ) पाहिजेत कोण कोण कलाकार पाहिजेत हे फक्त तो सांगू शकतो पण त्या गोष्टी किव्वा कलाकारांनी त्या त्या वेळी येण ना येण हे त्याच्या हातात नाहीये. आता राहता राहिली या बाबतीत बाळाची गोष्ट कि ते कुठेच दिसलं नाही . निदान बाहुलं तरी आणायला पाहिजे होत असं आपण म्हणतोय पण ती पण दिग्दर्शकाची जबाबदारी नाहीये. प्रत्यक्ष बाळ आणून देणं किव्वा बाळ म्हणून बाहुलं आणून ठेवणं किव्वा बाळाच्या संदर्भातल्या इतर गोष्टी हि गोष्ट प्रॉपर्टी संभाळणाऱ्याची जबाबदारी असते. त्या करता वेगवेगळी माणसं नेमलेली असतात. ते काम दिग्दर्शकाचं नाही आता दिग्दर्शकांनी सांगूनही त्या त्या वेळी प्रत्यक्ष बाळ किव्वा बाहुलं किव्वा इतर गोष्टी जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर दिग्दर्शक काही करू शकत नाही. तो फक्त चीड चीड करू शकतो "मी सांगूनही तुम्हीं कोणी का आणलं नाही? " इत्यादी इत्यादी पण शूटिंग तर त्याला करावच लागत कारण निर्मात्याचे पैसे लागलेले असतात . मग त्याने काय करावं ? तो त्याची जबाबदारी तर चोख पाडतोच आहे पण दुसऱ्याच्या चुकीची जबाबदारी त्यांनी का घ्यावी किव्वा आपण तरी त्याच्या माथ्यावर का मारावी ? हा आपण कथानकाच्या बाबतीत बोलू शकतो .किती टुकार कथानक आहे किव्वा लेखनाच्या बाबतीत किव्वा अभिनयाच्या बाबतीत हि पण ज्या प्रसंगाच्या बाबतीत ( बाळाचं तिथे नसणं ) आपण एवढी चर्चा केली त्यात दिग्दर्शकाची काही चुकी नसताना आपण त्याला का बोलावं ?
आता चालूदे पुढील चर्चा

दिग्दर्शकं म्हणून नाव लागत असेल, तर जबाबदारी पण पडणारच . शिवाय इथे आपण दिग्दर्शक म्हणत असलो तरी वाहिनी, production house हे ही आले त्यात. सगळा चमू.

विक्र्याचे बाबा जास्त अपसेट आहेत लग्न तुटल्या मुळे, ते आजीआजोबांकडे आले व मी प्रयत्न करतो. ही मुले काहीही निर्णय घेतात. >>> मो शी काहिहि चौकशी न करता वि शी लग्न ठरवण्याचा निर्णय कुणी घेतला होता?

Submitted by सुजा :
दिग्दर्शक हा फक्त दिग्दर्शनच करतो . त्या त्या एपिसोडच्या वेळी बाळ पाहिजे का /नको का ( डिटेलिंग करता ) हे तो फक्त सांगू शकतो पण बाळ किव्वा काही निर्जीव वस्तू शूटिंग पुरत्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हि त्याची नसते.
>>>>>

हे पहा.. गणित अगदी साध आहे.. एक प्रेक्षक म्हणुन आम्हाला फायनल प्रोडक्ट कस झालय हे महत्वाच आहे. ते प्रोडक्ट बनवायची पुर्ण जबाबदारी दिग्दर्शकची आहे.

जर प्रोडक्ट टुकार झाल असेल व त्या मागे कोणची चुक आहे, कोण आजारी पडल होत, पैसेच नव्हते.. याच्याशी प्रेक्षकाला काडीच देण घेण नसत.
पडद्या मागे काय होत हे जाणुन घेणे ही त्याची जबाबदारी नसते.

निदान बाहुलं तरी आणायला पाहिजे होत असं आपण म्हणतोय पण ती पण दिग्दर्शकाची जबाबदारी नाहीये. ....
>>>>>>
पुर्ण असहमत.. काही पण काय..
दिग्दर्शक हा film किंवा tv soap चा पुर्ण artistic आणि dramatic aspects control करत असतो. ती त्याची पुर्ण जबाबदारी असते.
दिग्दर्शकवर Production design व creative aspect निवडण्यची पुर्ण जबाबदारी असते.

मंजुळेचा मुद्दा हा दिग्दर्शक च्या व्हिजन वर आधारीत होत. त्यातील डिटेलींग व लॉजीकल कंट्युनीटीशी निगडीत होत.. (ते सिनेमा की मालिका हे गौण आहे) डिटेलींग साठी प्रत्येक वेळी पैसे वा मटेरीयलिस्टीक गोष्टी लागतात अस नाही..

( बाळाचं तिथे नसणं ) आपण एवढी चर्चा केली त्यात दिग्दर्शकाची काही चुकी नसताना आपण त्याला का बोलावं ?
>>>>>>>>>>>>
आहो तिथे दिग्दर्शका नाहीतर काय लाईट / स्पॉट बॉय ची चुक आहे मग.
- बाळा दाखवायला नुसता पाळण दाखवता आला असता जो बाकग्राउंड मध्ये (out of focus) असु शकतो.
- किंवा बाळाचा प्रेझेंस डायलॉग मधुन पण दाखवता येउ शकतो...

हे पहा ... माध्यम कोणतही असो.. फायनल इम्पॅक्ट काय होतो याची जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. तो कसा घडवायची हेच तर मुळी दिग्दर्शन आहे.

>>>कोणाला कशाच तर काकीला अंगठीच....>> हा हा.... Blush
आस्कसं आस्कसं ... Biggrin
अतिशीत घरात थोड़ी हिट येईल ना त्या निम्मिताने... Proud पण कसच काय न काय... थंड भुतिणिलाच बघाव लागेल.... Sad

मोरपखिस ची पोस्ट पटली, सुजा तुमचा डिफेण्ड चान्गला असला तरी पटण्यासारखा नाहिये, प्र्त्येक एपिसोड जरी वेगवेग्ळ्या डायरेक्टर्स ने हॅन्डल केला तरी पुर्वसुत्र काय आहे, कन्टीन्युटी कशी राखायची हे त्या वेळी त्याचच काम आहे , त्यासाठी लागणार्‍या गोस्टी उपलब्ध आहेत का, नसल्यास त्या योग्य प्द्धतिने हॅण्डल करण सहज शक्य आहे
धरुन चला की बाळ उपलब्ध नाहिये , अगदी बाहुली सुद्धा नाहिये तरी आतल्या खोलित बाळ रडतय अशी टेप वाजवुन कुणीतरी एका सिन मधे आत-बाहेर केलय अस दाखवुन सुद्धा हे सहज शक्य आहे, ती ताकद सवान्द लेखनात , डायरेकशन मधे सहज शक्य आहे...
बाकी मन्जुळेचा याच्याशी काहिच सबध नाही कारण त्याने त्याच नाण खणखणित वाजवुन दाखवलय, उत्तम निर्मितिचा वस्तुपाठ घालुन दिलाय ,
उदयोन्मुख डायरेक्टर म्हणून त्याची याच्याशी तुलना होवु शकते,
या मालिकेची पहिल्या पानापसुन काढलेली पिस बघितली तर कळेल ह्याच ( तस तर झिच्या सगळ्याच मालिकान्च) डायरेक्शन काय लेवलवर गन्डलय.

हो ना, बाहुली \ बाळं दाखवलच पाहीजे असं नाही, नुसता उल्लेख पुरला असता की अग्गबाई बघत आहेत बाळाकडे किंवा सारिकाला सांगितलयं इशाला ताप आला होता तर बघायला.

वि इतका कसा बावळट ? नशीब सईलने सांगितल्यावर मा का तरी जाणीव झाली नाहीतर सगळीचं बोंब होती.

आज्जीबाईंना पण अगंबाई हो का ची बाधा झाली वाटतं.
आजोबा म्हणाले की मानसी घरात दिसत नाहिये..
आज्जीबाई : - अगं बाई हो का? Uhoh

सगळ्याला एकच रीअ‍ॅक्शन.. कठिण आहे झी चं..

अगं बाई हो का >>> हो ना किती थंड प्रतिक्रिया Uhoh काही आश्चर्य, काळजी, भीती काही नाही. आवाजात चढ-उतार नाही. जस काही वेळीअवेळी घराबाहेर असणे नोर्मल आहे.

नंतर आजी थांबा तिला हाक मारु नका / डिस्टर्ब करुन नका अश्या अर्थाच काहीतरी म्हणाल्या. मी मनात म्हणलं "भॉक करायच आहे का" Proud

ही मालिका संपतेय वाटतंय…. अचानक पटापट फास्ट फॉरवर्डच... आत्याने वि ला डायरेक्ट सांगितलं मो ला घटस्फोट दे अन मा शी लग्न कर…. मग अगबाई ला किंचित डाऊट आला की वि मा मुळे अपसेट आहे ….. मो ला तर आधी पासूनच डाऊट होता तिने ही वि ला टोकलं…. वि च्या बाबांना पण माहितीये …. बाकीच्यांना तर मा आवडतेच ऑलरेडी...

छे! इतक्यात कुठे संपायला? आता आधी वि आणि मा चं डीनायल. मग त्यांना कळणार की आपण खरंच प्रेमात पडलो आहोत. मग ते कबूल करायला अजून थोडा काळ. तोवर घटस्फोट झाला नसेलच. मग मो ला समजेल की हे प्रेमात पडले आहेत. मग त्यांचं लग्न होऊ नये म्हणून ती घटस्फोटाला नकार देणार, त्यात अडथळे आणणार. इतकं सगळं झाल्यावर वि ला घरच्यांना हे पटवून द्यायला अजून वेळ लागणार.

ही कळी कारवीच्या फुलांपेक्षा जास्त वेळ घेणार बहुतेक. खरंतर बांबूची फूलं म्हणणार होते पण ती जरा जास्तच वेळ घेतात Wink

या सिरीयल मध्ये कळीच काय पण बाकी इतर काही पण खुलत नाहिये, इतक उदास आणि भकास दाखवतात ...!!
बहुदा कळी नसावीच इथे.. !!!

मला तर हि कळी उंबराच्या फुलाची वाटतेय... Happy

प्रेम आहे पण कळत नाहीये वगैरे कैच्याकै घेतलंय.
मानसी तर मोनिका-विक्रांतमधील बेबनाव माहीत नव्हता तेव्हापासूनच भोचकपणे त्याच्या आयुष्यात व घरात शिरु पाहतेय. अशी बहिण मोनिकासारख्या वाईट मुलीलाही असू नये!

प्रेम आहे पण कळत नाहीये वगैरे कैच्याकै घेतलंय. >>>>>>> +१११

मानसी तर मोनिका-विक्रांतमधील बेबनाव माहीत नव्हता तेव्हापासूनच भोचकपणे त्याच्या आयुष्यात व घरात शिरु पाहतेय. अशी बहिण
मोनिकासारख्या वाईट मुलीलाही असू नये!
नवीन Submitted by सनव
>>>

अगदी अगदी ... ८ वी , ९ वी तल्या शेंबड्या पोरांना पण सांगता येइल हे प्रेम आहे म्हणुन... हि मानसी कमीत कमी २४ ते २६ वयाची नक्की असणार ( १६+२+४+३).. तिला असा धक्का बसलाय अस दाखवतात... कैच्या काही पण !!!

>>>मानसी तर मोनिका-विक्रांतमधील बेबनाव माहीत नव्हता तेव्हापासूनच भोचकपणे त्याच्या आयुष्यात व घरात शिरु पाहतेय. अशी बहिण मोनिकासारख्या वाईट मुलीलाही असू नये!---- अगदी. माझे सुरुवातीपासुनच हे मत आहे.

मानसीला आपण विक्रांतच्या प्रेमात आहोत हे कळल्यावर अपराधी वाटतंय.

बाकी, ती मोनिकाच्या संसारात शिरू पाहतेय वगैरे मला पटलं नाही. अगदी सुरुवातीला हनीमूनला जाणार्‍या बहिणीला विश करायला फोन करणं भोचकपणा ठरत असेल तर माहीत नाही. नंतर मोनिकाचं गर्भारपण घरातल्यांपासून लपवण्यासाठी मोनिकालाच तिची गरज होती. आता अशा वेळी तिने घरातल्या इतरांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवावेत असं म्हणणं (मोनिकाचं तसंच म्हणणं असलं तरी) तुसडेपणात मोडलं असतं. मोनिकाचं गर्भारपण तिला आणि विक्रांतला जवळ आणायला कारण ठरले आणि मग तिच्या डॉक्टर असल्याचं निमित्त करून तिला हॉस्पिटलात कामाला लावणं, कथानकाची गरज. बायकोच्या बहिणीशी छान संबंध असणं हे काही अगदीच जगावेगळं नाही.

उलट मोनिकाने केलेले प्रकार पहा - मॅरेज ब्युरोत फोन करून सलिलला होकार कळवणं, मानसीला सलिलला होकार कळवण्यासाठी फोर्स करणं, आजीआजोबांना लग्नासाठी घाई करणं आणि मग थेट सलिलच्या आईला फोन करून लग्न लवकर लावा असं सांगणं , सलिलला फोन करून मानसीने त्याला वेळ आणि लक्ष देणं आवश्यक आहे असं सांगणं. हा अस्सल भोचकपणा.

Pages