पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे मायबोलीवर लिहील्या आहेत की नाही माहीत नाही पण फुड नेटवर्कच्या साइट वर बर्‍याच पाककृती सापडतील सफरचंदाच्या पाय, क्रिस्प, स्ट्रुडल बनवायच्या. तुमच्याकडे ओव्हन आहे असे गृहीत धरुन हे उत्तर दिलय.

पियुष म्हणजे पातळ श्रिखंड.... Happy नक्की कस बनवायच?????
त्यात दुध, पाणी, ताक काय घालायच?
एकदा केल होत पण दही आणि पाणी वेगवेगळ झाल ग्लासात....
पियुष सारखे दुसरे काही करता येइल का? दुसरा फ्लेवर किंवा काही दुसरी आयडिया....

पियुष मध्ये गोड ताक(मधुर ताक सकाळी लागलेल्या दहीचच, कारण दुपारी दही आंबट व्हायला लागते) + केसर श्रीखंड घालायचे घुसळून जायफळ,वेलची रोजचेच ते. खूप आंबट असेल तरच थोडे दूध घाल.
पाणी व दूध नाही घालत. Happy

अविवल कसे करायचे ? ( केरळी मिक्स वेज रसम भाजी-आमटी).... रस्सा दाट करायला काय करायचे? कॉर्न फ्लोअर चालते का?

asparagus च्या काही रेसिपीज सांगा ना कोणि प्लिज्..मला स्टीम्ड किंवा स्टर फ्राय च्या पलिकडे काही सुचत नाही...

रोस्ट करायचं असं. त्याबरोबर गाजर, झुकीनी वगैरे भाज्या पण रोस्ट केल्या आणि त्यावर लिंबाचा रस, आवडीचे herbs भुरभुरून खाल्ल्या तरी छान लागतं. asparagus जास्त शिजवलेला मी तरी पाहिला नाहीये कधी.

अवियल ची रेसिपी इथे. केरळी मुलीचा ब्लॉग आहे, म्हणजे बर्‍यापैकी ऑथेंटिक असावी.

अवियलमधे कांदा जरा विचित्र वाटतेय. या भाजीत सहसा परसात उपलब्ध असलेल्या
भाज्याच घेतात. कच्ची केळी, सुरण, तत्सम कंद, शेवग्याच्या शेंगा, कोहळा, सांबार काकडी
वगैरे. या भाज्या हळदीच्या पाण्यात शिजवल्यावर थोड्या गळतात आणि त्याने रस दाट होतोच.
पण वाटलेच, तर वाटणात थोडे तांदूळ घेता येतील. या भाजीला खोबरेल तेलच चांगले लागते.

दहि काकडी म्हणजे खमंग काकडी ना ? त्याची कृति असणार इथे.
पप्फ पेस्ट्री, बन्स मधे फिलिन्ग म्हणून अस्पारगस वापरता येतो.

सखीप्रिया, तुम्ही दिलेली लिन्क पण छान आहे.मला वाटतं , george foreman grill मधे पण करायला हरकत नाही..

मीठाच्या पाण्यात २/३ मिनिटे उकळलेले अस्पारगस, थोडेसे लोण्यात परतून घ्यायचे, त्याला मीठ मिरी लावून, पफ पेस्ट्री मधे गुंडाळायचे आणि बेक करायचे, एवढेच. या भाजीला जास्त मसाले घालू नयेत.
असेच उकळून त्यात टोमॅटॉ, संत्रे, अननस वगैरे घालून सलाद करता येते. थोडे फेटा चीज पण घालायचे.

ग्रिल्ड चीज सँडविच मधे वापरता येइल, मॅक्रोनी चीज मधे घालता येइल,बर्गर मधे किसून घालता येइल.आत्ता एवढेच आठवते आहे.बाकी काही आठवले तर नंतर लिहेन.

उडीदाचे लाडू कसे करयचे..
माझ्याकडे उडीदाचे पीठ आहे..

धन्यवाद, दिनेशदा आणि कराडकर्..मी जरूर करून बघीन्..जुन्या मायबोलीप्रमाणे काल aspargus लसूण मिरची वर परतला आणि त्याच्यामधे टोफु बारीक करून घातले..छान स्टर फ्राय झाले होते.

राजमा, छोले ह्यांचं नेहेमीची आलं-लसुण, कांदा-टॉमेटो, गरम मसाला घालुन भाजीव्यतिरिक्त काही करता येइल का. कंटाळा आला तशा चवीचा. इकडेच आधी कुठे असेल तर लिंक द्या प्लीज.

राजम्याची उडीद डाळ आणि हरबरा डाळ घालून दाल माखनी टाईप करता येईल. इंटरनेटवर शोधल्यास बर्‍याच रेसिपीज सापडतील. इथे आहे की नाही ठाऊक नाही.

फ्रेश हेवी क्रीम उरले आहे (मलई कोफ्ता करुन झालाय आणि मेथी मलई मटर साठी मेथी मिळत नाहिये)
अजुन काय करता येईल?
आणखी एक, इथे मिल्क पावडर कुठे मिळेल? इथे एवॅपोरेटेड मिळतेय फक्त.

न्याती, क्रीममधे दूध घालून घुसळून घे. ताजी फळे किंवा मिक्स फ्रूट कॅन मधील फळे घालून फ्रुटसॅलड बनव आणि मित्रमैत्रिणींना पॉटलकला बोलाव की लगेच फस्त झाले म्हणून समज. आमच्याकडे हमखास खपणारा पदार्थ!

दूधाची पावडर तुला ग्रोसरीच्या दुकानात Carnation whole milk अथवा skim milk मिळेल. आमच्याकडे Giant /Safeway मधे मिळते.

स्वाती धन्यवाद ग लगेच टाकलीस कृती! छान वाटतेय. करुन बघते नी सांगते.
न्याती..क्रिम वापरुन मुस करता येइल. इथे आहे बघ.

न्याती, मेथी नाही मिळाली तर त्याच पद्धतीने पालक-मका-मलइ करायची. छान होते.
फ्रोजन पालक आणि कॉर्न वापरुन झटपट करता येते....

कांदा लसुण वाटणाची मटारची सरबरीत उसळ करायची त्यात क्रिम घालायचे...

मिक्स फ्रोजन/ताज्या भाज्या - शिजवुन त्यावर मीठ, ताजी मिरेपुड व क्रिम घालायचे...

पास्ता उकडुन त्यात क्रिम + किसलेल गाजर + कॅप्सिकम चे बारिक तुकडे + किसलेल चीज + टिन्ड कॉर्न घालुन सॅलॅड बनवायचे....

Pages