खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत.....:-) मा चा भारीच पुळका आलेला दिसतोय.....!! आम्ही इथे सगळे सईल च्या बाजूने आहोत बरं..!!!

मान्शिला मराठी वक्तृत्व स्पर्धेत पाठवलं तर मज्जाच मज्जा ...>>>

तिच्या भाषणाचं पहिलं पान नुकतंच हाती लागलं. येणेप्रमाणे:

"तई, मई, अई अणि सर्‍या भई लोकांना मझा प्रणाम. आज मी मराठी भषेत कन्याचं महत्त्व या विषयावर भषण करणार अहे. क्रांत नेहमी म्हणतो की डिक्कीत जसा पना तसा भषेत कना. अगर न हो कना तो बेसूर लगे गना असं सईलही मनतो. कना हा भषेत महाप्रणयुक्त स्वर उच्चारायला लगतो. ..."

>>आदुबाळ ... Biggrin Rofl Lol
तै मै अै आणि भै....

तो मा ला घेउन निघाला होता ना बँगलोर ला ?
मा दळवींकडे निरोप घ्यायला आली होती , तेन्व्हा ईशाला नाही का भेटली?
इशा कुठे आहे ?

वि चा अपघात झाला तेव्हा सगळे दवळी हॉस्पिटल मध्ये आलेले , ईशा ला कुठे ठेवलेले ?
गीता काकू / मोहन काकाने निदान फोन वरून तरी चौकशी करायला हवी होती .

आजी आजोबा जाणार आहेत का लग्नाला? ईशाच काय ? दळवी निघालेत तर वि चं काय ?

आपली मा-मा कुठेही जात नाही याबद्दल निश्चिंत असलेली ईशा मस्त झोपत असेल. गेले दोन तीन एपिसोड दिसलेली नाही. कदाचित विक्रांतने डोस दिल्यावर मानसीच्या बदली आलेल्या मुलीने तिची जबाबदारी घेतली असेल Wink

आजी आजोबांना लग्नाचं आमंत्रण नाही बहुतेक . बरंय फुकटची दगदग वाचली. नंतर मोसोबत येणार असतील तर माहीत नाही. आता दोन दिवसांवरच्या लग्नाला नंतर काय आणि आधी काय? पण मालिका लेखक प्रेक्षकांइतका विचार थोडाच करणार?
मा आणि स चं पॅकिंग व्हायच्या आधीच दळवी मंडळींचं पॅकिंग झालंय. साखरपुड्यालाही ते सगळ्यात आधी तयार झाले होते.

सलिल गाणं बिणं म्हणणार कम रडणार आहे. संकर्षणला मालिका सुटल्याच्या दु:खात अभिनयासाठी जास्त परिश्रम पडणार नाहीत.

काय चाललंय ते नेहमीप्रमाणे मानसीला अजिबात काही कळत नाहीए.
कौन्सेलर समोर मोनिका धडधडीत खोटं बोलत असताना तिला त्यातलं काही कळलं नव्हतं.
आपल्याला हॉस्पिटलमधून डच्चू दिलाय हेही कळलेलं नाही.
शिवाय आपण एम डी करणार होतो, ते कसं करायचं असतं, त्यासाठी मेडिकल कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यायची असते हे कळलेलं नव्हतं. नुसतंच हॉस्पिटलमध्ये फायली शोधून, रिपोर्ट अपडेट करून आणि पेशंटशी गोडगोड बोलून तिला एखादं सर्टिफिकेट मिळेल, पण ते एम डी चं नसेल.

मुख्य म्हणजे आपण लग्न करतोय म्हणजे काय हेच तिला कळलेलं नाही.

भरत, काल काय झालं ते लिहा ना, सईल मा ला "जा सिमरन जी ले अपनी जिंदगी" च्या थाटात वि कडे सोडून गेला का ?

नाही. मानसीने सलीलला म्हटलं, चला आपल्याला फ्लाइट गाठायचीय (किंवा तत्सम)
त्यावर त्याने "आपल्याला नाही, मला" असं म्हटलं. मग मोठा पॉझ. एवढं मोठं धक्कादायक वाक्य ऐकल्यावर अख्ख्या अलकाकाकी स्वतः हातातल्या वस्तूंसकट पडल्या असत्या. पण मानसीने प्रसंगावधान राखून आधी गॅस बंद किंवा कमी केला. मग मागे वळून सलिलला विचारलं. तेवढ्यात आजीआजोबा आले. आजींनी चहा विचारल्यावर, हे काय मानसी करतेच आहे की , असं सलिलने सांगितल्यावर, तिने गॅस पुन्हा चालू केला.
मग सलिलने तिला गंमत करत होतो, असं सांगितलं.
विक्रांत बंगलोरला जाऊ शकणार नाही, पण कुबडी घेऊन हॉस्पिटलात गेलाय. त्यामुळे तिघांची भेट अजून बाकी आहे .हम दिल दे चुके चा सीन बाकी आहे.
परवापासून दाखवताहेत. ताणून ताणून शनिवारीच दाखवतील बहुतेक.

ओके. सईल परीक्षा घेत असेल मा ची. म्हणूनच परवाच्या भागात तो वि मा ला एकत्र सोडून औषधं आणायला गेला.

पर्याय १ - मा इशाच्या आठवणीने कळवळून भर लग्नात चक्कर वगैरे येऊन पडेल आणि लग्न नाही करणार ??

पर्याय २ - मा आणि सईल चे लग्न होईल पण ती वि च्या आठवणीने झुरेल , मग सईल चा हम दिल दे चुके चा अजय देवगण ???

पर्याय ३ - मा कोणाला निवडेल - मित्र का लग्नाचा नवरा ??

हे जाणून घेण्यासाठी बघत रहा - खुलता कळी खुलेना, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त झी मराठी वर

फायनली जे प्रेम विक्र्या आणि मा ला कळायला हवं ते सईल ला कळलं तर.
हे म्हणजे कसं बाळाने शी शू केली की त्याला कळत नाही, बाकि आजूबाजूच्यांना कळतं त्यातलीच गत झाली. Lol

बाळ निदान खरखर तरी शीशू करत...हे वि मा तर खोटा खोटा एक्मेकांच्या प्रेमात पडल्याचा अभिनय पण नाही करत म्हणून बाकीच्यांना कळालं नाहीये अजून.. आणि त्या दोघांची तर तेवढी ही समज नाहीयेच म्हणा.. अबोध... पण मा आणि वि मध्ये काहीच कनेक्शन जाणवत नाही.. मला तर कुठेही अस वाटलं नाही की हे प्रेमात पडलेतं.... उगा लेखकानीं जोड्या जुळवा असा परीक्षेत प्रश्न आल्यावर जे शेवटी दोन ऊरतात त्यांच्याच जोड्या लागतात तशा जुळवल्यासारख वाटत... आणि बहुतेक मा-वि ची अभि़नयातली उंची बघूनच टायटल सॉंग मध्ये सँड आर्टच घेतलय वाटतं... म्हणजे उगा वि मा थोड हलायला ,चेहर्याचे स्नायू थोडे सैल सोडायला ,नाचायला लागणारं... मग ती ब्यादच नको म्हणून लिड पेअर च कटाप टायटल सॉंग मधून...

हो ना.......नुस्ती कॉफी कॉमनली प्यायली की झालं का प्रेम? काहीही...!
मलाही त्यांच्यात काहीच केमिस्ट्री जाणवत नाही. त्या पेक्षा तर गीता काकी- मोहन काका किंवा इव्हन आजी आजोबा जास्त कनेक्टेड वाटतात !!!! प्रॉब्लेम मा चा आहे...ती अशी अलिप्त, इन डिफरंट, रिजीड बॉडीची वाटत्ये. कठपुतल्यांची कशी मान वेगळी हलते व शरीर वेगळे...तसे वाटते हिच्या कडे बघितल्यावर.

>>>>प्रॉब्लेम मा चा आहे...ती अशी अलिप्त, इन डिफरंट, रिजीड बॉडीची वाटत्ये. कठपुतल्यांची कशी मान वेगळी हलते व शरीर वेगळे...तसे वाटते हिच्या कडे बघितल्यावर.>>> अगदी बरोबर.... मला नाही सुचले हे शब्द.... अचूक वर्णन...

पण त्याला तिला गुडबाय म्ह यायचे होते तर आधी पूर्ण दिवस लोकांचे निरोप घेत का फिरत राहिला? आणि ते पण आता लग्नच होणार असे सांगून?

म्हणजे तो या सगळ्यांच्या आयुष्यातून निघून वगैरे जाईल, पण माणसाचे काय? उद्या आम्ही लग्नासाठी निघणार अशी सगळी कडे दवंडी पिटुन संध्याकाळी तिला डम्प केले??

परत कधी भेट होईल, नाही होणार म्हणायला कोणत्या काळात जगतोय? आणि असा कुठे जाणार आहे?
खरं तर विक्रांतला मित्र् आणि मानसीला मैत्रीण म्हटल्यावर त्या दोघांचं लग्न झालं, तर त्या लग्नाला येईन असा अ‍ॅप्रोच हवा सलिलचा.

आपलं लग्न होतंय म्हणजे काय ते मानसीला कळलं नव्हतं. आता आपलं लग्न मोडलंय हेही तिला कळलेलं दिसत नाही.

आपलं लग्न होतंय म्हणजे काय ते मानसीला कळलं नव्हतं. आता आपलं लग्न मोडलंय हेही तिला कळलेलं दिसत नाही.>>>>> Proud

मानसी, डॉक्टर कशी काय झाली हाच मला प्रश्न पडतो .

Pages