मदतः फूड कंपनी साठी नाव सुचवा

Submitted by नानाकळा on 5 April, 2017 - 09:48

नमस्कार मंडळी,

एका फूड कंपनीसाठी लोगो डिझाइन करायचे काम माझ्याकडे आले आहे. गंमत अशी आहे की क्लायंटला नाव काय ठेवावे हेच गेले काही महिने सुचत नाहीये. ती व्यक्ती महिला उद्योजक आहे, सध्या घरगुती पातळीवर नाचणीचे पदार्थ व इतर तत्सम पदार्थ बनवून विकते. स्थानिक हॉटेल्स व कॅटरर्स तिचे नेहमीचे ग्राहक आहेत. तिने गेले चार-पाच वर्ष संशोधन करुन स्वतःचे असे काही पदार्थ शोधून काढले आहेत. ते तिला आता सामान्य रिटेल ग्राहकांपर्यंत घेऊन जायचे आहे. त्यासाठी एक चांगले, कॅची, लक्षात राहिल असे नाव हवे. मी गेले पंधरा-वीस दिवस शोधतोय पण झाले काय की अनेक जेनेरिक अशी नावे फूड-सेक्टर असल्याने आधीच घेतली गेली आहेत. भारतात ७० टक्क्यांच्या वर स्थानिक ब्रॅण्ड्सचाच धंदा असल्याने या क्षेत्रात ब्रॅण्डनेम आणि ट्रेडमार्क्सची भाऊगर्दी झाली आहे. अशात नवीन काहीतरी नाव शोधणे, ते आपल्या उत्पादनाशी जुळणे वगैरे दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे.

म्हणून मला वाटलं, चला आपण मायबोलीकरांची ब्रेनस्टॉर्मिंगसाठी मदत घेऊया काय...? तर मंडळी करणार काय मदत?

सदर कंपनी जे काही अन्नपदार्थ बनवते ते पूर्णपणे नैसर्गिक घटक वापरुन बनवते, कॄत्रिम रंग किंवा रसायने नाहीत. हे पदार्थ पचायला उत्तम व नेहमीच्या धान्यांपासून बनवलेली आहेत. मैदा वगैरे नाही. चविष्ट आणि आरोग्यास पोषक सर्व वयोगटातल्या व्यक्तींना खाता येण्यासारखे अशी ती उत्पादने आहेत.

नावे सुचत असल्यास नक्की कळवा... इंग्रजी, मराठी, संस्कृत कोणत्याही भाषेत चालतील.

खूप खूप धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कंपनीचे प्रोडक्ट विक्रीसाठी एखाद्या विशिष्ट प्रदेशाला किंवा राज्याला टारगेट करणार आहेत का? जर फक्त महाराष्ट्रात विक्री करणार असतील तर मराठी नाव सुचवणे ठीक आहे असे मला वाटते.
नाचणी = Ragi यावरुन काही सुचते का ते बघा?

कंपनीचे प्रोडक्ट विक्रीसाठी एखाद्या विशिष्ट प्रदेशाला किंवा राज्याला टारगेट करणार आहेत का?

>> नाही. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचे आहे. विशिष्ट भूभाग अपेक्षित नाही.

TRIUMF

Total Rejoice - Indian Ultra Masala Fest

Just ragi
Only millets
Yours healthy

मला वाटते त्यांना ब्रँड नाव हवंय, ज्या ब्रँड खाली नाचणी आणि इतर पदार्थ विकणार आहेत,
फक्त नाचणीच्या पदार्थासाठी नाव नकोय.
Correct me if I am wrong.

Nothing unnatural
Or
Nothing unnatural about it.

Brand name or tagline.

Naturals असा brand आधीच आहे बहुतेक.

मला वाटते त्यांना ब्रँड नाव हवंय, ज्या ब्रँड खाली नाचणी आणि इतर पदार्थ विकणार आहेत,
फक्त नाचणीच्या पदार्थासाठी नाव नकोय.
Correct me if I am wrong.

>> सिम्बा, आपण अगदी योग्य म्हणत आहात.

धन्यवाद मित्रहो, त्वरित प्रतिसादांसाठी... अजून येऊद्या..

मी डेलिकोज असं नाव सुचवलं आहे, पण कुणाच्या माहितीत असे आधीच घेतलं गेले असेल तर तसं ही सुचवा.

सिंपलिशियस,
प्युअर
सिंपली प्युअर ( हे नाव ठेवल तर , Simply pure , Happiness is yours अशी कंपनीची कॅची फ्रेज करता येईल)
प्युअर लाईफ,
बॅलन्स ३६५ (इथे ३६५ आहे)
फ्रीलेशिअस
प्युअर प्लेझर्स,
सिंपल प्लेझर्स
नॅचरेलेशिअस

काही बक्षीस आहे का? Happy

'pure n your'/'purely yours' हा ब्रॅंड,आणि पुढे त्या त्या प्रोडक्टचे नाव!

Ex.
१) 'purely yours'
@ चकली @
{किंवा}
'चकली'
purely yours!

२) 'purely yours'
बाकरवडी
{किंवा}
'बाकरवडी'
purely yours!

Taste + Tonic म्हणून 'Tastonic' असं काही जमतंय का पहा!
शुभेच्छा!

म्हंटलं बघू तरी,भेटतंय का एखादं फूडहॅम्पर वगैरे!!!

स्वादिष्ट
जायकेदार
मॉम्स लव्ह
पुर्णान्न

न्यूट्रीबाईट्स
नेचर्स स्नॅक्स
बाऊंटीफुल निबल
लंच-ओ-मंच
4 O'clock
हंगर काँकरर

MODIfied

Pages