फ्लॉवरचे पराठे

Submitted by टवणे सर on 30 March, 2017 - 16:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारण
१ माध्यम आकाराचा बारीक किसलेला फ्लॉवर
फोडणी साठी तेल (मी मोहरीचे तेल वापरते )
२ चमचे जिरे
चिमूट हिंग
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ छोटा चमचा हळद
१ १/२ चमचा ओवा
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवी पुरते मीठ
२-३ अमूल चीज क्युब्ज किसलेले

कव्हर
२ कप कणीक
चवीपुरते मीठ
छोटा चमचा हळद
२-३ चमचे तीळ
२-३ चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

सारण कृती
१. तेल गरम झाल्यावर जिरे, हिंग , हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी
२. किसलेला फ्लॉवर घालून झाकण न ठेवता परतून शिजवावा. साधारण ६-७ मिनटे लागतात. फ्लॉवर मधले पाणी परतून कोरडे व्हायला हवे (उडून जायला पाहिजे). सारण बऱ्यापैकी कोरडे झाले पाहिजे.
३. ओवा हातावर चुरडून घालावा. चवीपुरते मीठ , धने पूड , जिरे पूड घालून २ मिनिटे वाफ द्यावी .
४. एका डिश मध्ये काढून चीज व कोथिंबीर घालून सारण मिक्स करावे.

कव्हर
कणिक , मीठ , हळद , तेल व तीळ घालून पोळीची कणीक भिजवतो तसा गोळा करावा

पराठा
इतर जसे स्टफ्ड पराठे करतो तसे करावे. तेल किंवा बटर सोडून भाजावे .

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
बायको
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, छान आहे रेसिपी. फ्लॉवरची भाजी कधीतरी पूर्ण कोरडी होते का परतून असा प्रश्न पडला. मी कधी फ्लॉवरची फारशी सुकी भाजी केली/खाल्लेली नाही म्हणून.

(फोन वरून ही रेसिपी वाचण्यासाठी उघडली तर माझा फोन रँडमली $१००० च्या गिफ्ट कार्ड साठी सिलेक्ट झाला आहे असा मेसेज आला, एक सोडून दोनदा एक ब्राऊजर बंद करून दुसरा उघडला तरी. टण्याच्या रेसिपीत काय जादू आहे! जोक्स अपार्ट, मायबोलीवरच्या अ‍ॅड्स परत नोटोरियस झाल्या काय)

छान !!!
अरे फोटो मध्ये नुसता फ्लवर गड्डा? अरे पराठ्याचे फोटो लाव की! >>> मला तो सुद्धा दिसत नाहीये Uhoh

<< (मी मोहरीचे तेल वापरते )
हे वाक्य वाचून लेखक कोण आहे हे परत वाचले मग स्क्रोल डाऊन केले. उलगडा झाल्यावर पूर्ण रेसिपी वाचली Proud
रेसिपी छान आहे Happy

अरे फोटो मध्ये नुसता फ्लवर गड्डा? अरे पराठ्याचे फोटो लाव की!>> मला तो सुद्धा दिसत नाहीये>> ओ बुवांनी टण्यांनाच फ्लाॅवरचा गड्डा म्हणलंय. Biggrin

मी असे पराठे करताना थोडे खमण्ग भाजलेले बेसन पीठ घालते, त्याने सारण चान्गले होते आणि लाटायला ही सोप्पे जाते.... Light 1

@ nidhi Biggrin तरी वाटलेलंच तो फोटो बघून, पण म्हटलं फायरफॉक्समुळे दिसत नसला तर......

चीज घालून कधी पाहिल नव्हतं.
मी बरेच्वेळा ट्राय केले फ्लॉवरचे पराठे . पण पाणी सुटून ते सारण कधीच गोळ्यांमध्ये नीट भरल जात नाही आणि पसारा होतो.:अलिकडे सरळ चपाटी लाटून अर्ध्या भागात सारण पसरते आणि त्यावर अर्धी भाजून झाकून थोडस लाटते. बरे होतात.
गोळ्ञा मध्ये सारण भरून नक्कीच जास्त छान होत असणार आहेत.

सीमा! त्यापेक्षा फ्लॉवरच्या सारणात मावेल तस पीठ मळुन चान्गले होतात जास्त... मळुन ठेवुन देता येत नाही ,लगेच करावे लागतात.

आमच्या कडे सासरी गोबी आणि मुळ्याचे पराठे आलु प्रमाणे स्टफ करून कधीच बनत नाहीत.
गोबी, मुळा किसायचा, हाताने दाबून पाणी काढायचे, त्यात मीठ, मसाले, अद्रक इ इ घालायचे आणि सारण दोन छोट्या फुलक्यांच्यामध्ये पसरून पराठा लाटायचा. भरपूर करायचे असतिल तर असे पराठे आधी कोरडेच ( तेल तुप न लावता) भाजून ठेवतात आणि मग वाढायच्या वेळी भरपूर घी मध्ये तळून/ भाजून वाढायचे. हल्ली याच प्रकारे मशरूमचे पराठे पण खाल्ले मी गावाकडे.

चीझ घालून करून बघेन. लेकाला नक्कीच आवडेल.