शतशब्दकथा : आम्ही येतोय

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 March, 2017 - 03:38

तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला.
“आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात.

“आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ

“सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका

“जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन

“ते आपले मित्र असावेत.” भारत

“ही भारताची चाल.” पाकिस्तान

काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला-
“लढायला तयार रहा.”
यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला.

जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून जागे झाले, धार्मिक स्थळी जाणाऱ्यांची संख्या शेकडो पटींनी वाढली. अन दुसऱ्या दिवसापासून-

किण्वनाशी संबंधित उद्योगधंदे बंद पडू लागले. जिवाणू विषाणूंमुळे होणारे रोग जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे छुमंतर झाले.

ते अतिप्रगत मायक्रो-एलीयन्स पृथ्वीवरच्या सुक्ष्मजिवांना मारून केव्हाच निघून गेले होते.

---------------------------------------------------------
ह्या कथेला नुकत्याच मिसळपाववर घेण्यात आलेल्या शतशब्दकथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
----------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

अरे मस्त आहे !!!
पहिला क्रमांकाबद्दल अभिनंदन !!

छान आहे.
प्रथम क्रमांकाबद्दल अभिनंदन !

छान आहे कथा. अभिनंदन
------------------------------------
काही प्रश्न अनुत्तरित राहतात. तो संदेश दोन सुक्ष्म जीव यांच्यातला असेल तर तो मानवाला कसा कळला.? ज्यायंत्राद्वारे त्यांचा संदेश कळाला त्याच द्वारे पृथ्वीवरुन सुक्ष्म जीवांतर्फे जाणारे संदेश मानवास कसे सापडले नाही? संदेशाची देवाणघेवाणी मधे एकाच पार्टीचे कसे मिळाले.?

संदेश पकडण्याचे काम उपग्रहांचे की रडारचे ? Uhoh

पृथ्वीवरची सर्वात प्रगत जमात म्हणजे माणूस. अवकाशातून येणाऱ्या संदेशांना पकडण्याचं तंत्र फक्त त्यालाच अवगत.म्हणून aliens नी पाठवलेले संदेश त्यालाच पकडता आले. पृथ्वीवरच्या सूक्ष्मजिवांना याची अजिबात कल्पना नाही. पृथ्वीवरील सूक्ष्मजीव कसेकाय संदेश पाठवणार न ? त्यांना universal language मध्ये पाठवलेले electronics संदेश कसे कळणार. SETI Project चे मेँबर आहे का ते ?

हे बघा, समजा मी माझं यान घेऊन क्ष ग्रहावर गेलो आणि संदेश पाठवला तर त्या ग्रहावर electronics संदेश ग्रहण करण्याचं ज्यांच्याकडे तंत्र असेल तेच पकडणार. मग कदाचित ते किडे असतील किंवा डायनासोअर सारखे विशाल प्राणी.

मस्त!

संदेश पकडण्याचे काम उपग्रहांचे की रडारचे ?
>> उपग्रहांचे.
Radar is an object-detection system that uses radio waves to determine the range, angle, or velocity of objects. It can be used to detect aircraft, ships, spacecraft, guided missiles, motor vehicles, weather formations, and terrain.

TRDS (Tracking & Relay Data Satellites) sit about 35400 kms above the earth and transfer any information coming from outer space to the nearest spce station. These radio signals are then captured by antennas.
There are three earth stations of NASA viz at white sands, new mexico & guam island.

पुन्हा लढायाला तयार रहा? असा संदेश पाठवला म्हणून संशय आला की पृथ्वीवरच्या कुणाशी तरी कम्युनिकेशन झाले. जे माहीती असतील त्यांच्याशीच लढायाला तयार रहा असा मेसेज करू ना.? Uhoh

असो.. किस नको पाडायला Happy

communication झालं असा उल्लेख मी केलेला नाही कारण communication झालंच नाही.

त्यांचा संदेश आल्यानंतर अर्थातच NASA ने उत्तरादाखल संदेश पाठवले असणार ते receive केले असते तर माणसांना ना कळालं असतं की समोर micro aliens आहेत. पण त्यांनी communication (संवाद) साधलाच नाही म्हणून गडबड झाली.

दोन्ही वेळी संदेश आला असाच उल्लेख आहे. Happy

प्राणीजीवन पण राहणार नाही. हो ना ?
>> बरोबर. सूक्ष्मजीव अन्नसाखळीतला एक महत्वाचा घटक आहे. ते नसले तर साखळी तुटेल. पर्यायाने त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राणीजीवन राहणार नाही. मेलेले प्राणी कुजणार नाहीत. मनुष्याच्या बाबतीत बोलायचं तर, दहीसुद्धा लागणार नाही अशी परिस्थिती येईल. अर्थात ही apocalypse (end of life ) आणणारी समस्या आहे असं मला वाटत नाही कारण मनुष्यप्राणी स्वतःला वाचवेल.

मदिरापान करणाऱ्यांची पंचाईत होईल पण :))

नाही आवडली. काय वाटेल ते झालं तरी शेवटच्या वाक्यात वाचकांना उल्लू बनवायचंच, असं आधी ठरवून लिहिल्यासारखी वाटली.

अर्थात ही apocalypse (end of life ) आणणारी समस्या आहे असं मला वाटत नाही कारण मनुष्यप्राणी स्वतःला वाचवेल.

मग त्यावर एक कथा येऊ द्या.. खरंच काय पर्याय असतील ?

Lol

सायंटिफिक पेपर नाही पब्लिश केलेला Wink

100 शब्दात रिसर्च पेपर म्हणजे 100 शब्द = पीएचडी Proud ही पण आइडिया भारी आहे

नमस्कार मला आपला नंबर हवा आहे माझ नंम्बर ९१७५६६९४३१ तुमच्या एका कथेवर शार्ट फिल्म करायची। आहे plz रिप्लाई फ़ास्ट

मला एका कवितेच्या काही ओळी आठवत नाहीत. मधल्या ओळी खालीलप्रमाणे
हि लाजलाजरी जादू नजरेत तुझ्या भिरभिरली , तव गुपित उमलले गहिरे गुलजार गुलाबी गाली
देहावर प्राजक्ताचा हा बहार तुझ्या ग सजला, पुनवेची चंद्रकला तू मृगचंचल सोज्वळ बाला
कुणाला हि कविता किंवा गाणे येत असेल तर कृपया पूर्ण गाणे पाठवाल का? माझ्या अंदाजानुसार हे कवी सुरेश भटांनी लिहिले आहे

अंदाज आलेलाच पण तरीही आवडली.

चरप्स यांचा प्रतिसाद सर्वोत्तम. बेफिकीर यांचे प्रवासवर्णन आठवले त्यांचा प्रतिसाद वाचून. Happy

मस्त.

१०० शब्दांच्या कथेसाठी २०० शब्दांच एक्स्प्लनेशन. >>> Happy

Pages