खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि कोणत्या डॉक्टर ला laptop र इतके काम असते? Lol आज मानसी सापसाप टायपिंग करत होती.>>>>> सिरियसली !! एमबीएच वाटते डॉक्टरपेक्षा :प

सइलच्या ऐ चं अवघडेय. लोकांना काही कामधामं नसतात का? का आपलं होणारी सून आहे म्हणून मानसीने हातातलं सगळं सोडून कधीही धावत जायचं? आणि याला प्रायॉरिटी देणं म्हणताहेत त्या? बरं इमर्जन्सी कसली तर हे बोलायचंय की लग्न कधी ठरवायचं?! बावळटपणा!! बरं तिने कॉल घेतला नाही तर यात मानभंग कसला? काहीतरी जेन्युइन असू शकतं की! असल्या अपेक्षा ठेवायच्या आणि स्वतःला समजूतदार म्हणायचं म्हणजे कहर आहे काकूंचा. Angry

@morpankhis<<< आता तिच या सिरीयलची हिरो आहे माझ्यासाठी....!!!>>>
खरच...मी तर फक्त मोनिका आहे म्हणूनच पाहू शकते ही मालिका...नाहीतर त्यां कळकट (मा ) नसी आणी पोटात मुरडा घेऊन फिरण्यार्या( वि ) क्रांत ला कोण सहन करू शकणारे... मोनिका नसेल तर मी या मालिकेच्या वाटेला जात नाही... आणी ती नसेल तर मालिका फार पुढे ही जात नाही त्यामु़ळे ती च आहे या मालीकेची हिरवीण खलनायकी आणी हीरो सुद्धा...
>>>>
मानसी डॉक्टर आहे... अरे बाप्रे.... मी तर इतके दिवस समजत होतो ती कॉम्प्युटर ओपरेटर आहे...!!! Lol ++++१००००

मानसी कळकट का वाटते तुम्हा लोकांना? म्हणाजे तिचे उच्चार वगैरे मी समजू शकते...पण तिचे ड्रेसेस व ओव्हरऑल गेट अप ठीके. दिसायलाही बरी आहे . ( मोनिका अर्थातच जास्त छान आहे. )

केसांचे तेच ते वळण नेहमी दाखवतात...अती पातळ असल्याने असेल बहुधा...आणि सगळे अनारकली ड्रेसेस! का? ::राग::

सइलच्या ऐ चं अवघडेय. लोकांना काही कामधामं नसतात का? का आपलं होणारी सून आहे म्हणून मानसीने हातातलं सगळं सोडून कधीही धावत जायचं? आणि याला प्रायॉरिटी देणं म्हणताहेत त्या? बरं इमर्जन्सी कसली तर हे बोलायचंय की लग्न कधी ठरवायचं?! बावळटपणा!! बरं तिने कॉल घेतला नाही तर यात मानभंग कसला? काहीतरी जेन्युइन असू शकतं की! असल्या अपेक्षा ठेवायच्या आणि स्वतःला समजूतदार म्हणायचं म्हणजे कहर आहे काकूंचा.>> +११११
अगदी अगदी अरे ती अजून काम करतेय हॉस्पिटल मध्ये. तुम्हाला वाटेल तेव्हा हातातली काम सोडून यायला मोकळी नाहीये ती. सलिलची आई एक टोक आणि सलिल समजूतदारपणा च दुसरं टोक. मध्यच नाही .पण दोघांमध्ये सलील परवडला Wink

विचार करा की मोनिका नाहीये मालिकेत... फक्त क्रांत आणि मान्शी.. मग काय होईल ह्या कोमेज्लेल्या कळ्याच...

@नटुकाकी
पोटात मुरडा घेऊन फिरण्यार्या( वि ) क्रांत >>>>>>
>>>>

हा हा.. Lol अगदी परफेक्ट निरीक्षण...
तो बोलताना एवढ तोंड वेडवाकड का करतो काय माहीत ? एक एक शब्द जिवावर आल्याप्रमाणे बोलतो..

पण तिचे ड्रेसेस व ओव्हरऑल गेट अप ठीके. >> हो ! ठिकच म्हणाव लागेल नाहितर फ्रॉकस्टाइल ड्रेसेस , त्यावर झोळण्याची पिशवी आणी हातात आयफोन, बहुधा प्रवासात महागाचा फोन चोरला जाउ नये म्हणून ती पिशवी घेवुन डिस्गाइज करत असावी.. . मानसी आणी विक्रात दोघाचीही मो पुढे मात्र सट्टी-पिट्टि गुम अस्ते , सतापले की सवादच बोलता येत नाही त्याना, त्याउलट मोनिका अगदी क्लिअर , खणखणित डायलॉन्ग हाणत अस्ते.

सगळ्या कळ्या तर आधीच खुललेल्या आहेत मग सिरीयलच नवा कळी खुले ना असे का?

हा भैताड क्रांत ने काय लावलय सारख मी ईशा ला सम्भालणार....अरे 24 तास हा असतो हॉस्पिटल मध्ये शेकडो मुलांना जन्म देत..म्हणजे खर सम्भालणार कोण तर अग बाई काकी....ती 2 मूल हिच्या सोबत खेळणार मग नानू मामा चिडनार.. आणि म्हणे मी साम्भालणार.... मग 24 तास घरी बस डॉक्टरकी सोडून.... हे म्हणजे तिला घरच्यावर थोपवल्यासर्ख आहे.... म्हणून सगळे विरोध कर्तायेत ना.. नाहीतर मग दूसरे लग्न करायला तयार हो आणि अशी अट घाल की माज्या पहिल्या बायकोच अनैतिक बाळ तिला साम्भालायला लागेल च.... एवढे 3-3 लेखक आहेत ना मालीकेचे.... थोडे तरी डोक्याने विचार करावा त्यानी....

त्याची आजी त्याला विचारते ना , ईशाला इथे सांभाळणार कोण ? या दोघी?
तर म्हण्तो , ते मला आता नाकी माहित नाही. मी अजून त्याचा विचार केला नाही .

ईशाला तो पाळणाघरात ठेवेल. सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत डे केयर्स /पाळणाघर चालू असतात. पाळणाघरात पोचवायला आणि घरी आणायला एखादी गरजू बाई ठेवता येईल त्यात काय एवढं ? काही लोकांना पर्याय असतो का ? . ईच्छा असली कि मार्ग सापडतोच . त्यात एवढी ३-३ लेखकांची अक्कल काढण्यासारखं काय आहे ? ज्यांना दुसरा पर्यायच नाहीये ते असेच करणार ना ? निदान तिला अनाथाश्रमात ठेवण्यापेक्षा हे वागणं माणुसकीच नाहीये का ? आणि विक्रांत कशाने भैताड ? तो तर माणुसकीने विचार करतोय

सुजा तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर... पाळणाघर आहे बाई ठेवता येईल क्रांत ची एवढी ईछ्या आहे म्हणून...पण त्याच्या घरच्या लोकांचा हळवा स्वभाव बघता घरचे त्याला तसे करू देतील की नाही शंका आहे..म्हणजे अग बाई ला तिचा अल्रेडि लळा आहेच... मग ती म्हणाल अगं बाई, बाई कशाला ठेवायची ??? ती करेल का बाळाच व्यवस्थित??? मी आहे ना.. मग ती करतीये सगळ म्हटल्यावर बाकी च्याना पण थोड़ का होईना बाळाच कराव लागेल..जरी देशपांड्यांशी त्यांना काहीही सम्बंध ठेवायचा नाहीये तरीही...आणि क्रांत ला कधीतरी सेटल व्हावच लागेल ना... मग होणारी दूसरी बायको (मा सोडली तर ) पहिल्या बायकोच्या अनीतैक बाळाला स्वीकारेल का??? आणि बाळाचे सगळे नातेवाईक मावशी आजी आजोबा आणि मुख्य म्हणजे आई जिवंत असताना क्रांत ने त्याला साम्भालायचे (???)असे प्रश्न त्याच्या घरच्यांना पडले असतील म्हणून ते त्याला माणुसकी असूनही विरोध करत असतील...

हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. जिच मुल आहे ती सांभाळायला तयार नाहिये आणि हा चांगुलपणाचे धडे देणार का? असोच.
त्या मो कडे व्हाटसॅप नाहिये का? माया ममता, मायेचा पाझर. माणुसकी तत्सम फॉरवर्ड येत नाहियेत तिला बहुदा. नाहितर अशी तुसड्यासारखी वागली नसती ती. Wink

त्या मो कडे व्हाटसॅप नाहिये का? माया ममता, मायेचा पाझर. माणुसकी तत्सम फॉरवर्ड येत नाहियेत तिला बहुदा. नाहितर अशी तुसड्यासारखी वागली नसती ती >>>>>>> :-ड :-ड :-ड

हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र >> कोण ठेवताय हलवयाच्या घरावर तुळशीपत्र ?
पदराला खार न लावतां दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देणें असा वरील म्हणीचा अर्थ होतो . इथे तर विक्रांत स्वतःच्या पदराला खार लावून बायकोच मूल सांभाळायची तयारी दाखवतोय . तो थोडाच दुसरीच मूल तिसऱ्याला सांभाळायला देतोय ? उलट ईशाला पूर्ण पणे सांभाळण्याची त्याची तयारी आहेच . त्याच्या आईने उद्या सांभाळण्याची तयारी दाखवली तर ती त्याच्या आईची ईछा असेल . तो सांगत नाहीये तुम्ही सांभाळा म्हणून

मला ईशाला सांभाळायचं आहे . तुम्हाला साथ द्यायची असेल तरी तुमची ईछा आणि साथ द्यायची नसेल तरी तुमची ईछा . असच त्याच घरच्यांना सांगण आहे. घरच्यांनी पण न बोलता त्या मिटिंग मधून निघून जाऊन आमची ईछा नाही असं दर्शवलेलं आहेच . आता बघेल ना तो तिला कस सांभाळायचं ते Happy

हे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. जिच मुल आहे ती सांभाळायला तयार नाहिये आणि हा चांगुलपणाचे धडे देणार का? असोच.>>>>>>> ++++++++100000 अगदी अगदी.....

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र >> या म्हणीचा अर्थ वेगळा होतो नटुकाकी
इथे या उदाहरणात या म्हणीचा अर्थ बसत नाही>> बरोबर म्हणताय तुम्ही ... मग तसे बरेच अर्थ निघू शकतात ... Lol
याचा असा हि अर्थ निघू शकतो कि हि म्हण मोनिकाला लागु केलि तर .. ( मोनिका स्वतःच्या )पदराला खार न लावतां दुसर्‍याची वस्तु(ज्याचं बाळ आहे त्याची (?? ती त्या बाळाला आपलं मानत नाही )) तिसर्‍याला ( क्रांत ला ) देणें .. Lol .. आणि क्रांत ला मग ती कुठली हिंदी म्हण आहे ना खाया पिया कुछ नाही ग्लास फोडा बारा आणा हि लागू होऊ शकेल ...
>>> इथे तर विक्रांत स्वतःच्या पदराला खार लावून बायकोच मूल सांभाळायची तयारी दाखवतोय . तो थोडाच दुसरीच मूल तिसऱ्याला सांभाळायला देतोय ? उलट ईशाला पूर्ण पणे सांभाळण्याची त्याची तयारी आहेच . त्याच्या आईने उद्या सांभाळण्याची तयारी दाखवली तर ती त्याच्या आईची ईछा असेल . तो सांगत नाहीये तुम्ही सांभाळा म्हणून >> ..स्वतःच्या पदरा सोबत घरच्यांचा पदराला पण खार .. Wink
नाहीतर घरचे पदर देणार नसतील तर ईशाला घेऊन वेगळं राहून दाखवावं त्याने ... म्हणजे मग ईशाला "पूर्ण पणे" सांभाळण्याची त्याची ईछा हि पूर्ण होईल ...

विक्रांत जै करतोय त्याला लष्करच्या.भाकऱ्या भाजणे म्हणता येईल.
इथै गर्भपाताबद्दल खूप चर्चा झाली होती.
अनाथाश्रमात फॉर्म भरून बाळ भरती करता येतं का?

नटुकाकी नो कॉमेंट्स . तुम्हाला अर्थ नीट समजूनच घायचा नसेल तर बोलण्यात काहीच अर्थ नाही.
तुमच आपलं चालू द्या निरर्थक किव्वा वेगळे वेगळे अर्थ काढत. लगे रहो Lol

त्यापेक्षा मोनिकाने ईशाचा खरा बाप शोधुन (माहित असल्यास) त्याला विचारावे ना
>> हेच तर वैशिष्ट्य आहे झी च्या शिरेलिंचे ना. साप सोडून भुई धोपटत बसतात.
खरा बाप शोधणे राहिले बाजूला बाकिच्यांचाच दन्गा सुरू आहे.

तू मला बाहेर भेट? ?
हे काय ? (संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या न) बर्याच दिवसात एकही मालिका पाहिली नाही...

Pages