आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bingo = There you are! Happy

काका क्लु हवेत का???

मला काही मोजकी नविन गाणी माहिती असली तरी केवळ अक्षरांवरून डोळ्यासमोर येत नाहीत!
जुनी गाणी कशी सहज गुणगुणली जातात आणि अक्षरे पाहून लगेच डोळ्यापुढे येतात बर्‍याचदा!

मला काही मोजकी नविन गाणी माहिती असली तरी केवळ अक्षरांवरून डोळ्यासमोर येत नाहीत!
जुनी गाणी कशी सहज गुणगुणली जातात आणि अक्षरे पाहून लगेच डोळ्यापुढे येतात बर्‍याचदा!>>>> मी क्लु देते...येइल तुम्हला...
१)२००२
२)या गान्यात भारताबद्दल सगल काही सान्गितल आहे...(ताज्महल,कुतुब्मिनार्,लैला-मजनु.....)
आता फक्त लिरिक्स द्यायचे ठेवलेत...येइल ना??

कोडे क्र.:५२०
(हिन्दि/नविन(२००२- जीना सिर्फ मेरे लिये मेरे लिये...))
स म क ह य ह ज र प,
त म अ क द ए ब त इ अ द,
क इ स द ल क द,
ह त इ म ह क इ म....
उत्तर--->
सच मैं कहती हू यार,
हो जायेगा रे प्यार तू मुझको आजमाके देखणा,
एकबार तो इंडिया आके देखणा,
किसी इंडियन से दिल लगा के देखणा..
है ताजमहल इन्डिया मे है कुतुब्मिनार इन्डिया मे लेला मजनु इन्डिया मे,
दिन गिन्के दिल लगा के देखना...

https://www.youtube.com/watch?v=GP0PO9YAzPo
हे पहा..
हे गाणंच माहिती नाही>>>काय हो ताई मी एवढे क्लु दिले तरि तुम्हि ओल्खल नाहि...निशेध...
मला माहिती आहे तुम्हि जास्त नविन गाणि नाही ऐकली ..म्हणून तर मी क्लीयर कट कल्यु देते...तरी..

कोडे क्र.:५२०
(हिन्दी/जुना)
स क म प क स ,
ज र झ ए ज ब न म...

काय हो ताई मी एवढे क्लु दिले तरि तुम्हि ओल्खल नाहि...निशेध... >>>> पण एकदाही न ऐकलेल गाणं कितीही क्लु दिले तरी कसं ओळखेन बरं

पण एकदाही न ऐकलेल गाणं कितीही क्लु दिले तरी कसं ओळखेन बरं>>>तुम्ही दि लेली बरिच्शी गानि मला माहित नसतात...तरिहि मी तुम्चा क्लु फॉलो कर्ते....मग तुम्हि प्रयत्न करयचा ना...अस मला म्हनायच होत... Happy

५२०
सावन का महीना, पवन करे सोर
जियारा रे झूमें ऐसे, जैसे बनमां नाचे मोर

Lol
५२१ - हिंदी

त अ र अ ग अ प म द द
त ग क क इ द क व म द द

मागे रेणु आणि आता कारवी यांनी सांगितल्याप्रमाणे, कोडे देताना गाणे कुठल्या दशकातले हे सांगावे असा नियम करावा का?

मागे रेणु आणि आता कारवी यांनी सांगितल्याप्रमाणे, कोडे देताना गाणे कुठल्या दशकातले हे सांगावे असा नियम करावा का?>>>मन कि बात बोली...करा ना अस...

अरे वा, बर्‍याच दिवसांनी आले या धाग्यावर, मज्जा चालु आहे इथे. नवीन मंडळी...लगे रहो.
असो,

५२१:
तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम, इस दिल की वीरानी मुझे दे दो

मागे रेणु आणि आता कारवी यांनी सांगितल्याप्रमाणे, कोडे देताना गाणे कुठल्या दशकातले हे सांगावे असा नियम करावा का?
मागे ज्यांनी विरोध केला होता, त्यांनी उत्तर द्यावे.

५२२ नविन गाणे, माझा पास

नियम अपडेट केला आहे:

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५२२ साठी क्ल्यू:

१.ज्या ओळींवरुन हे गाणे ओळखले जाते ती आद्याक्षरे :

च ज अ स स क ह
अ स ब ह म त प ह
य न म त ज द ह
अ स ब ह म त प ह

२. चित्रपट एका प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे

Pages