शाळेत शिक्षकांनी मुलाला मारणे हा भारतात गुन्हा आहे का

Submitted by एक मित्र on 30 January, 2017 - 08:53

माझ्या एका मित्राने नुकतेच चर्चा करत असताना सांगितले कि गेले काही दिवस त्याच्या मुलाचे डोके दुखत आहे व ते त्याबाबत डॉक्टरना विचारणार आहेत . कारण विचारले असता तो म्हणाला कि त्याचे (मुलाचे) गणिताचे शिक्षक त्याला गणित आले नाही किंवा गृहपाठ नीट केला नाही तर अधूनमधून डोक्यात फटके मारतात. त्यामुळे डोके दुखत असावे.

हे ऐकून मी सर्द झालो. तो मुलगा लहान आहे. ज्या शाळेत तो जातो ती शाळा सुद्धा खाजगी आहे आणि शहरात प्रसिद्ध आहे. भरपूर फी घेतात. भारतात शाळेत मुलांना मारणे हा अजूनही कायद्याने गुन्हा नाही का? मी काही वर्षांपूर्वी अशी बातमी वाचली होती कि याबाबत लवकरच कायदा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात असा कायदा संसदेने पास केला आहे कि नाही याची कल्पना नाही.

इथे कुणाला त्याबाबत काही कल्पना आहे का? कृपया करून लक्षात घ्या मुलाला शाळेत मारणे योग्य कि अयोग्य असा हा विषय नाही. ते अयोग्यच आहे या वादच नाही. फक्त, सुरवातीला शाळेला तसा लेखी इशारा देणे यावेळी महत्वाचे आहे म्हणून विचारत आहे कि याबाबत भारतात काय कायदे आहेत त्याची कृपया माहिती असल्यास द्यावी जेणेकरून या मुलाच्या पालकांना शाळेत तशी लेखी तक्रार (इशारावजा) करता येईल.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राईट टू एजूकेशन कायद्यानुसार विद्यार्थ्यांना मारणे, अपमानास्पद बोलून मानसिक त्रास देणे हा गुन्हा आहे. त्याबद्दल तक्र्रर करता येइल.

१. शिक्षकांना भेटून त्यांना माझ्या पाल्याला मारू नका हे सभ्यपणे सांगावे.
२. हे करून पण जर शिक्षक पाल्याला मारत असतील तर मुख्याध्यापकांकडे तक्रार करावी, शिक्षकांना सभ्य/असभ्य भाषेत आवाज वाढवून सरळ धमकी द्यावी.
३. शेवटची पायरी म्हणजे सरळ त्या शिक्षकाच्या श्रीमुखात ठेऊन द्यावी किंवा पोलीस कंप्लेंट करावी.

पहिल्या दोन स्टेपचे लेखी पुरावे ठेवावे.

सर्व मुलाच्या अपरोक्ष करावे.

मुलाला घेवून डॉक्टरकडे जा. शाळेत होणार्‍या प्रकाराची कल्पना देवून मुलाच्या डोकेदुखीसंबंधी डॉक्टरशी बोला. डॉक्टरांनी माईल्ड कनकशन आहे वगैरे निदान केल्यास त्याचीही कॉपी घ्या. शक्य झाल्यास मुलाच्या मित्रांशी बोलून नक्की काय घडते आहे याची माहिती काढा. शिक्षकांशी याबद्दल बोला आणि योग्य प्रतिसाद न मिळाल्यास मुख्याध्यापकांशीही बोला. शाळेत शक्यतो लेखी तक्रार द्या म्हणजे नोंद रहाते. त्याच्याकडूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर पोलीसात तक्रार करायची तयारी ठेवा. मात्र कुठल्याही परीस्थितीत शिक्षकांना अपशब्द बोलणे, मारहाण करणे वगैरे करुन कायदा हातात घेवू नका.

स्वाती२ +1. आमच्या ओळखीतल्या एकाने शाळेकडे तक्रार केली तर त्या शिक्षकांनी त्या मुलाकडे कोणत्याही बाबतीत लक्षच देणे बंद केले. जे करायचंय ते करा, आमचं काय जातंय असा प्रकार त्या मुलाच्या बाबतीत सुरु केला. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर किंवा एकूणच भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जे कराल ते जपूनच.

शिक्षक उठसुठ मुलाला शाळेत मारणार, ते कायदा हातात घेणार आणि पालकांनी फक्त इकडे तिकडे तक्रारी करत वाट बघत बसायची कि कधी तरी कोणी तरी ऍक्शन घेईल मग तो शिक्षक पाल्याला मारणे बंद करेल ?????

सभ्य भाषेत सज्जनपणाने सांगून पण एखाद्याला जर ती भाषा कळत नसेल तर त्याला समजेल अशा भाषेतच समजवावे लागते.

मी हा अनुभव पूर्वीही मांडला असेल कदाचित. आता पुसटसा जसा आठवतो तसा लिहितो.
माझा एक मेव्हणा तेव्हा बारावीला होता. घराजवळचेच कॉलेज. नाव सांगत नाही. तर तेथिल पीटी च्या शिक्षकांनी परीक्षेच्या वेळेस एका दमात शंभर जोर काढायला लावले, तितक्याच बैठकाही. दोन दिवस पोरगे आजारी पडले. अंथरुणातुन उठताही येईना. मेव्हण्याला विचारले, की अरे होत नव्हते तर का काढलेस, तर म्हणे मोजायला पोरे उभी केली होती, अन कमी भरले तर नापास करीन म्हणाले. हा प्रकार म्हणजे , कायद्याने अंगाला एक बोटही न लावता, व त्यामुळे कायद्याच्या नजरेतुन निर्दोष शाबित होत, तरीही क्रुरतापूर्वक वागणे होते.

मला हा प्रकार दोन दिवसांनि कळल्यावर मी एक हातभर पत्र (लिगल नोटीस) लिहिले, कॉलेजच्या प्रिन्सिपॉलकडे पाठविले.
दोन दिवसात, सदरहू शिक्षक एकास बरोबर घेऊन घरी भेटायला आले.
सुरवातीस ते मग्रुरीतच होते, शिवाय, "ही दोरीवाली (म्हणजे डाव्या खान्द्यावरुन उजव्या कमरेकडे बोट फिरवुन दाखवायची गोष्ट Proud ), यांना असाच धडा शिकवायला हवा" वगैरे वृत्तीही मलातरी स्पष्टपणे जाणवत होती. फुडारी टाईप खादीचे पांढरे झब्बे वगैरे घालुन आले होते. एकंदर अवतार दबाव टाकुन तक्रार मागे घेण्याकरताचाच होता.
मंग? नै, तुमचे म्हणणे काय आहे? परीक्षेकरता आमी काय मुलांकडून काहीच करून घ्यायचे नै का? तुम्हाला काहि कळत का पीटीतल? वगैरे गुर्मीतली भाषा....
मी ऐकुन घेतले.
मग सरळ भाषेत फैलावर घेतले. कोणत्या कायद्याने पीटी परीक्षेकरता १०० जोर १०० बैठकांचा निकष ठरवलात?
शाळेत देखिल खादिचा झब्बा घालुनच जाता का शिकवायला? की फक्त मला भेटण्यापुरताच घातलाय? Wink
आधी माहिती काढली, तुम्हाला बायका किति/पोरेबाळे किती, अन मग विचारले की तुमच्या स्वतःच्या बायकापोरेमुलिंकडुन १०० जोर १०० बैठका काढून घेणार का? मी येतो आत्ता बघायला.
का माझ्याशीच स्पर्धा करताय? आत्ताच्या आत्ता? (अगदी त्या सिनेमातील "अब्भिके अब्भी" या डॉयलॉग प्रमाणे दंड शड्डू ठोकुनच विचारले). Proud
मग माझे खरे रुपडे रुद्रावतार समोर दिसल्यावर मग मात्र गयावया करू लागले.

पुढे काय झाले ते झाले, पोटावर पाय नको, याचे नालायकपणामुले बायकापोरे उघड्यावर यायला नकोत, म्हणून तसे सांगुन तक्रार मागे घेतली वगैरे, पण नंतरच्या ३ वर्षात मेव्हण्यास काडीचाही त्रास झाला नाही. तशी धमकीच सूचनाच Proud देऊन ठेवलि होती, की जर यदाकदाचित तुम्ही स्वतः किंवा "कुणामार्फत" सूडबुद्धिने त्याचेशी वागाल, तर गाठ माझ्याशी आहे, व पुढच्या वेळेस मी ऑफिसमधे किंवा घरी भेटणार नाही, सरळ "रस्त्यातच गळाभेट घेईन तुमच्याशी, आत्ता तुमच्याशी "शब्दाने" संवाद साधतोय, पण तो कळला नसेल तर तेव्हा तुम्हाला समजेल अशा भाषेतच बोलिन", बघा परवडतय का ते.... ! आम्ही आमचा "व्हाईट्ट कॉलर्डपणा (पांढरपेशेपणा हो) कसोशीने जपतो, पण अशा वेळेस तो टरकावुन फाडुन टाकायलाही आम्ही मागेपुढे बघत नाही हे विसरु नका.

असे असले तरी सर्वच शिक्षक्/शिक्षिका खराब असतात असे मी अजिबात म्हणणार नाही. शिक्षक/शिक्षिका हे गुरुस्थानीच वंदनीय मानले पाहिजेत, व तसे मेव्हण्यासही बजावुन सांगितले, की घडल्या प्रसंगाची चर्चा/माज/आगाऊ वाच्यता नंतर कॉलेजमध्ये इतर मित्रांसमवेत करायची नाही, व या एका अनुभवामुळे बाकी सर्व शिक्षक्/शिक्षिकांबद्दल त्याच पूर्वग्रहाने बघायचेही नाही.
मात्र गेल्या काही वर्षात "शिक्षकीपेशातिल" व्यक्तिंविषयी सहज शंका उपस्थित व्हावी अशी परिस्थिती मात्र नक्कीच आली आहे. ती का आली आहे, हा वेगळा विषय.

स्वतःची ओळख लपवून ठेवून खोडसाळ चिमटे काढणे सोपे असते नै का, पण लिंबूदांसारखे करणे सोपे नाही.

शाळेतच काय पण पालकांनी मुलांना मारणे हा ही गुन्हा आहे याची कृपया नोंद घ्यावी.

>>>> स्वतःची ओळख लपवून ठेवून खोडसाळ चिमटे काढणे सोपे असते नै का, <<<<<
या वाक्याचा अर्थ कळला नाही....
>>>>> पण लिंबूदांसारखे करणे सोपे नाही. <<<<< काय सोपे नाही? सगळे सोपे असते, पूर्वतयारी चांगली पाहिजे फक्त. मी त्या लोकांशी, अन त्यांना पाठीशी घातल्यास वेळेस महाविद्यालयाशी "नडायला" पूर्ण तयार होतो. वेळेस ते कॉलेज बदलुन दुसरीकडे जायची पूर्ण तयारि होती. (हल्लीसारखे नव्हते तेव्हा - अ‍ॅडमिशनचे घोळ अन भरमसाठ क्यापिटेशन फिया)
जाता जाता माझा प्रोफाईलवरील फोटु बघुन घ्या... मग कळेल, किमान पूर्व तयारी कशी हवी ते... Proud
मी तर आता आंदोलन करण्याच्या विचारात आहे की प्रत्येक शाळाकॉलेजमध्ये तालिम / जिम हवे. Happy