मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते. नंतर मधून मधून छोटे बदल आपण नेहमीच करत आलो आहोत. पण गेल्या १० वर्षात मायबोली वापरत असलेल्या संगणक प्रणालीच्या गाभ्यात काही मूलभूत बदल झाले आणि त्यामुळे आपल्यालाही हे बदल करणे आवश्यक झाले. यातले मुख्य बदल सभासदांना दिसणारही नाहीत. पण मायबोलीच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. किंवा सभासदांना फारसे बदल न जाणवू न देता , हा मुख्य बदल कसा करता येईल हे एक महत्वाचे उद्दीष्ट या प्रकल्पामागे होते. एकदम खूप नवीन सुविधा उपलब्ध होतील अशी काही सभासदांची अपेक्षा असेल आणि आम्ही ती पूर्ण केली नसेल तर त्याबद्दल दिलगीर आहोत.

सभासदांना लक्षात येणारे मुख्य बदलः
१. मोबाईलवरून मायबोली पाहणे सुलभ झाले आहे.
२. सदस्याना आपली संपूर्ण विचारपूस अप्रकाशीत करायची सोय सध्या तांत्रीक कारणामुळे उपलब्ध नाही. पण आता स्वत:ची विचारपूस तुम्ही मॉडरेट करू शकता. नको असलेले प्रतिसाद काढून टाकायची सोय दिली आहे.

खालील गोष्टींवर अजून काम चालू आहे:.
१. Smileys (स्मीतचित्रे) देता येत नाही आहेत.
२. ग्रूपमधल्या सदस्यांची संख्या आणि यादी दिसत नाही आहे.
३. ग्रूपमधल्या लेखांची विषयवार यादी दिसत नाही आहे पण शब्दखुणांचा वापर करून किंवा शोध सुविधा वापरून कुठल्याही धाग्यावर जाता येईल.
४. निवडक १० मध्ये नोंद केलेले धागे दिसत नाहीत.
५. ग्रूपच्या नावावरून ग्रूपच्या मुख्य पानावर जात येत नाही : पण धाग्याखाली ग्रूपचे नाव दिलेले आहे. त्या दुव्यावरून तुम्ही ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊ शकता.
६. तांत्रीक कारणांमुळे मायबोली बखर सध्या चालत नाही आहे. त्यामुळे एका विशीष्ट दिवशीच्या धाग्यांचा शोध घेण्याची सुविधा नाही. त्या ऐवजी प्रत्येक पानावर असलेल्या शोध सुविधेचा वापर करू शकता. लेखक स्वतःच्या व्यक्तिरेखेतूनही त्यांच्या जुन्या लेखनावर जाऊ शकतात.

चाचणी समितीत काम केलेल्या खालील मायबोलीकरांचे खूप आभार. त्यांनी वेळोवेळी तत्परतेने केलेल्या सुचनांमुळे आणि शोधलेल्या चुकांमुळेच आम्ही हा मोठा प्रकल्प पार पाडू शकलो.
rmd, चिन्नु, प्रिंसेस, राया, वैद्यबुवा, श्री, संपदा, स्वप्ना_राज, हर्पेन

अजून काही चुका राहून गेल्या आहेत. चाचणी समितीने काढलेल्या सगळ्याच चुकांवर काम करणे वेळेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे काही चुका तशाच ठेवून मायबोली पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागला. येत्या काही दिवसात या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील..

या व्यतिरिक्त काही चुका /अडचणी / नवीन प्रश्न आढळते तर कृपया याच पानावर खाली प्रतिसादांमधे लिहा.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.

प्रकार: 

अभिनंदन

परंतू बरीच जागा मोकळी दिसत आहे.

नविन माबो आवडले.
प्रतिसादकर्त्याचे नाव कृपया सुरूवातीस आणि जरा ठळक फाँट मध्ये येऊ द्या. >>> प्रतिसादकर्त्याचे नाव खालती असले तरी हरकत नाही पण जरा ठळक फाँट मध्ये येऊ द्या.
नवीन लेखन पानावर गेल्यावर उजव्या बाजुचा सदस्य प्रवेशचा पुर्ण भाग थोडासा अरुंद करून डाव्या भागाची रुंदी वाढवता येईल का?
धाग्याच्या पानावरचे खालचे चौकान थोडे लहान आणि त्यातले आकडे मराठीत करता येतिल का?
ब्राऊझर टॅबवर माबोचा लोगो दिसत नाही आहे.

अय्या! रंगित अक्षरांची सोय आली का परत? >>> म्हणजे काय? आपल्याला बॅक ग्राऊंड आणि अक्षरांचा कलर बदलता येतो का?

माबोवर नवीन लिस्टमध्ये धाग्याच्या शीर्षकाचा फॉन्ट मोबाईल व्ह्यूमध्ये थोडा मोठा हवा.

आज मोबाईल वरून लॉगीन केले, मस्त आहे. सुटसुटीत!
पूर्वी बॅकस्पेस दिल्यावर येणारे प्रॉब्लेम्स अजून तरी आले नाहीत. नाहीतर एखादा शब्द गेलेला पोस्ट केल्या वर लक्षात यायचे.

आवडले नवीन मायबोली.

एवढ्या मोठ्या वेबसाईट्चं upgrade यशस्वीरित्या केल्याबद्दल मायबोली टीमचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!!
बाकी सगळ्यांच्या सूचनांना 'मम' Happy

मला जाणवलेले विशेष म्हणजे आता अवलोकनात हलती चित्रे (GIF इमेजेस) असतील तर ती हलायला लागली आहेत जे पुर्वी होत नव्हते. उदाहरणादाखल माझी प्रोफाईल पहा.

नवीन लूक आवडायला जरा वेळ लागेलच म्हणा, तरी फर्स्ट इंप्रेशन्स -
खूप जास्त स्पेसिंग झालंय. एकाच पानाला फारच स्क्रॉलिंग करायला लागतंय, त्यामुळे अ‍ॅनॉईंग...
एका पेज वर अजून खूप जास्त डेटा सामावता आला असता

फाँट आधीच्या माबोचा जास्त चांगला होता - क्रोमवर
फाँट या माबोचा चांगला आहे - आयईवर
फाँट आणि पंक्च्युएशन मार्क्स चं प्रपोर्शन गंडलेलं आहे - फायरफॉक्स वर

फोन ब्राऊजर मधून नंतर...

छान आणि सुटसुटीत दिसतेय मायबोली. डोळ्यांना , हातांना सवय व्हायला जरा वेळ लागेल. पण एकंदरीत स्मार्ट दिसतेय.

मोबाइल वर खुप हळू येत आहे नवीन पान. खुप वेळ तर फक्त चित्र दिसत राह्ते. distorted and word wrap प्रमाणे नवीन लेख दिसत आहेत. बाकी mozilla browser चा अडचण आहेच.

@ पियू, मला वाटतं तुमचं प्रोफाइल पिक्चर अगोदरपासूनच gif होतं ना? पण तेव्हा ते हलत नव्हतं. आता ते अचानक हलायला लागल्यावर कोण आनंद झाला असेल नाही तुम्हाला!

नविन लेखनाच्या पेजवरुन एखादा धागा उघडला/वाचल्यानंतर परत मागे (बॅक पेज की - "<") गेल्यावर नविन वाचनाचं पेज रिफ्रेश होत नाहि; वर मुखप्रुष्ठ/मेनु मध्ये जाउन नविन लेखनाची लिंक क्लिक करावी लागते. बॅक पेज की दाबुन रिफ्रेश करणं कठिण असेल तर नविन लेखनाची लिंक हेडरमध्येच (पुर्विप्रमाणे) देण्यात यावी. सध्या मुखप्रुष्ठ... इ. ची लिंक असल्यामुळे पेज रिफ्रेश करायला दोन क्लिक्स लागतात (मेनु, नविन लेखन); प्रत्येक धाग्याच्या पेजवर नविन लेखनाची लिंक देउन नंबर आॅफ क्लिक्सचं प्रमाण दोन वरुन एकावर आणु शकाल...

आयपॅड, आयोएस १०.२, सफारी

आणि ते प्रतिसादकर्त्याचं नांव सुरुवातीलाच, ठळक करण्याचं जरा मनावर घ्या; काहि यशस्वी प्रेडिक्टेबल आय्डिजचा प्रतिसाद फोर्सफुली वाचण्याचा इमोशनल अत्याचार सहन करावा लागेल. किंवा आधी नांव बघुन मग प्रतिसाद वाचताना डोळ्यांना कसरत करावी लागेल... Wink

सर्वात प्रथम सगळ्या टिमचे अभिनंदन .
नविन लूक क्रोम मध्ये ठीक दिसतोय पण फायरफॉक्स मध्ये मात्र फाँटचे खूप प्रॉब्लेम आहेत. विशेषतः रोमन आणि देवनागरी फाँट एकत्र असतील तर रोमन खूप मोठा दिसतोय आणि देवनागरी खूप लहान.

मी सदस्य नसलेल्या ग्रूपचे लिखाणही मला 'माझ्यासाठी नवीन' मध्ये दिसू लागलय - विशेषतः गझला .

पूर्वी 'माझ्यासाठी नवीन' मधला धागा एकदा उघडल्यावर 'माझ्यासाठी नवीन' मधून उडायचा (नविन प्रतिसाद नसल्यास). आता मला सतत ७ पाने भरून धागे दिसत आहेत - शफल होऊन.
पण नवीन प्रतिसाद / बदल नसलेले धागेही 'माझ्यासाठी नवीन' मध्ये दिसताहेत

पण आता मोबाईलवर फक्त एकाच दिशेत स्क्रोल करावे लागते हा एक फायदा म्हणायला हरकत नाही. आधी उभे आडवे सगळ्या बाजूना स्क्रोल करावे लागत होते.>>>+1

तुम्ही कृपया पान ताजेतवाने (Refresh) करून पाहीले का?
फायरफॉक्सचे सध्याचे वर्जन ५० आहे . रेग्युलर वर्जन ३८ चा फायरफॉक्स टीम कडून मिळणारा सपोर्ट २ वर्षांपूर्वीच संपला. तुमच्या कडे ESR 38 वर्जन असेल तर त्याचा ही सपोर्ट जून २०१६ मधेच संपला.
https://www.mozilla.org/en-US/firefox/organizations/faq/ .

फायरफॉक्सची टीम मुळातच जे वर्जन सपोर्ट करत नाही, त्याबद्दलचे प्रश्न मायबोलीला सोडवता येणे शक्य नाही.

क्लटर फ्री मायबोली मस्त दिसत्येय. आजच्या युगातली साईट वाटत्येय आता. अभिनंदन. Happy
स्ट्राईक आउट tag सपोर्ट दिसतोय, मस्तच. प्रतिसादानंतर नाव हे पण आवडलं. थ्रेड मध्ये नवीन वर क्लिक करून आल्यावर कुठले मेसेज पूर्वीचे आहेत आणि कुठले नवीन आहेत हे पूर्वी जसं लाल रंगात दिसायचं ते कुठे कळत आता?

"शेवटचा प्रतिसाद" या मध्ये तारीख कॉलम ची लांबी वाढवलीत तर लिस्टींग व्यवस्थीत दिसेल..
सध्या ति ३ लाइन मध्ये व्रॅप होतेय...

इकडचे सर्व प्रतिसाद अजून वाचले नाहीत. त्यामुळे आधी कोणी म्हंटलं असेल तर हा दुजोरा. आयफोन वरून मायबोली अ‍ॅक्सेस पहिल्या फटक्यात तरी सोपा झाल्यासारखा वाटला. Happy

अपग्रेडींग चांगले झाले आहे.

काही निरीक्षणे.

१. यूआरेल शेजारी व पानाच्या टायटलमध्ये मायबोलीचा लोगो न येता ड्रुपलचा लोगो येतो आहे.
२. ग्रुपमधल्या मेन पानांवर : [नॅविगेशन मेन्यूमधले गुलमोहरासाठीचे] नवीन लेखन आणि [ग्रुपमधले] नवीन लेखन [ नवीन कार्यक्रम , लेखनाचा धागा, धावते पान] हे वर खाली दिसतात. त्या दोन ठिकाणी वरती ठळक केलेले शब्द जोडता येतील का ?
मला क्रोमवरती नॅविगेशन मधले नवीन लेखन व पुढील , माझे सदस्यत्व यात खूप जागा दिसते आहे.

३. नवीन कमेंट लिहा , या व अशा लिंकमुळे, स्क्रोलिंग कमी झाले आहे. परंतू, कमेंट पेजेस नंबर्स पानावर सर्वात शेवटी आहेत. त्यासाठी खूप स्क्रोलिन्ग करावे लागत आहे.
४. विचारपूसमधले प्रतिसाद आणि धाग्यांवरचे प्रतिसाद यावर आयडी अनुक्रमे, वर आणि खाली दिसतो. योग्य लॉजिक आहे. पण धाग्यांवरचे प्रतिसाद वाचताना फाँटमुळे ठराविक प्रतिसाद वगळायची तारांबळ होत आहे.

पाककृतींमधला लागणारा वेळ, लागणारे जिन्नस, क्रमवार पाककृती, वाढणी/प्रमाण, अधिक टिपा, माहितीचा स्रोत असा पूर्ववत क्रम केला आहे.

क्रोमवरून आणि मुख्य म्हणजे आयफोनवरून जास्त सुटसुटीत झालंय आता. Happy

माझ्याकडे फायरफॉक्स व्हर्जन ५०.१ आहे - पण त्यावरचा view निराळा दिसतो - मी अक्षरं झूम वगैरे करूनही पाहिलं.

संपादनासाठी प्रतिसाद उघडला की वर फॉर्मॅटिंगचा मेनू (बोल्ड्/इटालिक्स इ.) दिसत नाहीये. आणि क्रोममध्ये कन्ट्रोल\ ने स्क्रिप्ट टॉगल होत नाहीये.

अँडृऑईड वापरून बघितला. फाँट चांगला दिसतो आहे. मेन मेन्यू देखील चांगला वाटतो आहे. जसे "गो टू टॉप' फ्लोटिंग आहे पानावर तसा नवीन प्रतिसादाचा मेनू फ्लोटिंग ठेवला तर छान होईल. स्क्रोलिंग अप अँड डाउन वाचेल.

कमेंट लिहील्यावर जो मेसेज येतो "युअर मेसेज हॅज बीन पोस्टॅड " तो पानावर सर्वात वर येतो. स्क्रोल केल्या शिवाय दिसत नाही. सध्या त्याचा काही उपयोग नाही.

विषयवार यादी आणि अवलोकन असे दोन चौकोन दिसतात. ते सध्यातरी काहीच माहिती देत नाहीत.
[जसे की पाककृती मध्ये विषयवार यादी बरीच माहिती देत असे]. वेळ मिळेल तसे फिक्स केले तर बरे होईल.

स्वाती,
>> क्रोममध्ये कन्ट्रोल\ ने स्क्रिप्ट टॉगल होत नाहीये.
तो पूर्वीही होत नव्हता.

Pages