कुत्र्याला छानसे "मराठी" नाव सुचवा.

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 12 January, 2017 - 10:41

दादाच्या फर्माईशीनुसार कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. पूर्वतयारी झाली आहे. म्हणजेच घरच्या सर्वांची मनाची तयारी झाली आहे. कारण आमच्याकडे पर्यायच नाही. आईबाबांनी दादाकडून एक वचन घेतले आहे. सून आम्ही आमच्या पसंतीची आनणार. बाकी तू कोणालाही घरी घेऊन ये. म्हणून दादाचे मित्रमैत्रीणी अधूनमधून आमच्या घरी येत जात राहतात. पण बहुधा आता त्याचे कुठेतरी जुळले असावे. म्हणून घरच्यांनी वैतागून स्वत:च्या पसंतीची सून ही अट मागे घ्यावी यासाठी त्याने घरच्यांना त्रास द्यायला कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. मुक्या प्राण्यांचा वापर लोक कसे करतील सांगता येत नाही. तरी खाण्यासाठी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच.

तर आता रस्त्यावर कुत्रा दिसला तर फूटपाथ बदलून चालणारी, आणि दोन कुत्रे दिसल्यावर आल्या पावली परत फिरणारी आमच्या घरची साधीभोळी माणसं. त्यांनीही बहुधा दादासाठी कुठेतरी मुलगी शोधून ठेवली असावी. कारण ते दादाचा हा प्लान हाणून पाडायाच्या पुर्ण तयारीत आहेत. घरी एखादे नवीन बाळ, वा गेला बाजार आयुष्यातील पहिली कार घ्यावी तश्या उत्साहात हल्ली रोज कुत्र्याच्या आगमनाची चर्चा चालते. ती एक मजेशीर असते. पुन्हा कधीतरी सांगते. पण परवा मात्र येणार्‍या कुत्र्याला / कुत्रीला नाव काय ठेवायचे याची चर्चा चालू होती. हो, कुत्रा की कुत्री अजून ठरलेले नाही. ते तितकेसे महत्वाचेही नाही. आमच्यासाठी दोन्ही सारखेच. तर त्याचे नाव काय ठेवायचे याचा विचार करता नेहमीची आपली टॉम-टॉमी-टायगर, निकी-मिकी-सूझी, जिमी-जॉनी-जेनी ईत्यादी भारतात प्रचलित असलेली ईंग्रजी नावे एकेकाच्या तोंडावर आली. ते ऐकून आमची आज्जी पटकन म्हणाली, मेल्यांनो ईंग्रजी नाव काय ठेवता रे. मराठी नाव ठेवा एखादे. आपल्या बाळांना आपण अशी ईंग्रजी नावे ठेवतो का? मग कुत्र्यांना तरी का ते इंग्रजी नाव ठेवायचे?

पॉंईंट आहे आज्जी. आम्ही एकसूरात म्हणालो आणि मराठी नावे शोधायला लागलो.
बाबा म्हणाले, मोती ?
आम्ही म्हणालो - श्या, तो तर साबण असतो.
आई म्हणाली - टिपू ?
आम्ही म्हणालो - नाह, त्यापेक्षा सुलतान नाव चांगलेय.
आजोबा म्हणाले - शेरू ?
ओये शेरू पाजी, कि गलं करतंया. मराठी नावं सुचवा ... हे आज्जी म्हणाली, आणि आमची गाडी ईथेच अडकली.
तर बघा, जरा धक्का द्या. आमच्याकडे येणार्‍या छानश्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाला तितकेच गोडुले मराठी नाव सुचवा.

पत्रिका त्याची बनवायचा विचार नाहीये. त्यामुळे अक्षर कुठलेही चालायला हरकत नाही.
तेवढे पुढे आडनाव सरकार शोभेल असे बघा Happy

अ‍ॅडवान्समध्ये धन्यवाद म्हणते,
अर्चना सरकार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा +१

अगदी ह्याच कारणांमुळे आम्ही कुत्रा घ्यायचे टाळतोय.

पुर्वी घरी दोन पोपट होते, खुप आवडायचे सगळ्यांना, पण पिंजरा साफ करणे अगदी जिवावर यायचे

मला धाग्याचे हसत खेळत रूप छान तसेच ठेवायचे आहे. पण कधी कुत्र्यावर अन्याय नको. लोक अगदी महाग ब्रीड घेतात अन टाकून देतात. पेट ला बाहेर जगता येत नाही उपासमार होते. ते मम्हणते. त नाही म्हणून लिहीले शेव टी. माझा एक स्ट्रे डॉग मित्र आहे त्याचे नाव मी काळू ठेवले आहे. ह्याच्या बरोबर एक वाभरट कुत्री प ण असते तिचे नाव मी शरी ठेवले आहे. म्हणून कधी कधी काळूला शंकर्‍या अणि हिला शरी म्हणते. असामी असामी पुस्तकातली मुले आहेत ही.

फार वेगवान असेल तर फास्टर फेणे नाव द्या. चिंट्या गोट्या तर आहेतच. सोनू मोनू होणारच.

अमा दोन्ही प्रतिसाद मस्त!!! लोकं कुत्रा पाळ्तात आणि कंटाळा आला, झेपत नाही म्हणून सोडून देतात...भटक्या कुत्र्ञांची संख्या उगीच नाही वाढत.
तेव्हा कोणताही प्राणी पाळायच्या आधी आपली मानसिक तयारी आहे की नाही हे तपासावे.

यावर एक उपाय म्हणजे जसे गाडी घेताना आधी हात बसायला सेकंड हॅण्ड घेतात तसे नवीन कुत्रा घेताना आधी भटका कुत्राच घरी आणावा, तो पाळून झेपतोय का हे बघावे, मग त्याला पुन्हा भटकायला सोडावे आणि नवीन ब्राण्डेड कुत्रा घ्यायचा की नाही हे ठरवावे.

तरी मला वाटते की पैसे खर्च करून आणलेला कुत्रा हौस फिटल्यावर कोणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढवायला सोडत नसावे. त्याला आणखी एखादे गिर्हाईक पकडून विकत असावेत. अर्थात असा सेकंड हॅण्ड कुत्र्याला गिर्हाईक मिळते का नाही याची कल्पना नाही.

माझ्यामते बेस्ट आयडीया, जर दादा घरच्यांना त्रास द्यायलाच काही पाळणार असेल तर बोकड पाळावे.
दादाचे लग्नही होणारच आहे, तर हळदी नाहीतर पाचपर्तावनची सोय होईल Happy

कुठ गेल्या या सरकार बाई... गायबच !!! Happy

ऋन्मेऽऽष कल्पना छान आहे.. आणि बोकड चावल तर २१ इन्जेक्श्न पण घ्याव लागत नसतील.. Lol

मी आमच्या बोक्याचे नाव वासू ठेवले आहे. बघेल तेंव्हा कान टवकारून सारखा कशाचा न कशाचा वास घेत असतो तो नेहमी. वास घेणारा म्हणून वासू Proud

मुंबईमध्ये नाक्यावर उभे राहून आसपास कुठे मुली आढळताहेत का हे हुंगणार्‍या पोरांना वासू बोलतात, आणि त्यांच्या या करनाम्याला वासूगिरी Happy

मायबोलीच्या अपग्रेड नंतर प्रतिसाद देणार्‍याचे नाव खाली आलेय तरी ऋन्मेषचे प्रतिसाद वाचुनच कळतं हा ऋन्मेषचं म्हणून

मायबोलीच्या अपग्रेड नंतर प्रतिसाद देणार्‍याचे नाव खाली आलेय तरी ऋन्मेषचे प्रतिसाद वाचुनच कळतं हा ऋन्मेषचं म्हणून>>> +७८६ हो ना!!!! Rofl

मी तर म्हणतो फक्त ऋन्मेषच्या बाबतीत प्रतिसादाखालीे त्याचे नांव नाही आले तरी चालेल. आम्ही बरोबर ओळखुन जाऊ, कोणी लिहिलंय ते!!! Wink

ऋन्मेषच्या प्रतिसादाखाली त्याचे नाव आले तरी तो कोणी लिहीला आहे हे माहितीच आहे!
असो, कुत्र्याला श्वानू नाव कसे आहे?

आमच्या ओळखीच्यांकडे शिकारी हाऊंड होता. त्याचं नाव त्यांनी "जालीम" ठेवलं होतं.
>>>>
आमच्या एका ओळखीच्यांकडे "बालम" नावाचा कुत्रा आहे. या जालीम नावावरून पटकन तो आठवला.

लखन....आमच्या कुत्र्याचे नांव होते.
>>>>
आम्हाला मराठी हवे आहे. याचे लक्ष्मण करावे का?
अवांतर - मराठीतला राम हा हिंदीत रामच राहतो. लक्ष्मणचे का लखन करतात?

लोकांना (पाहुण्यांना) चकवायचं असेल तर "बोक्या" नाव ठेवा.
>>>>
हा हा.. तसे "टायगर" हे देखील चकवायचेच नाव झाले मग Happy

अमा, आपल्या सूचना दादाला फॉर्वर्ड केल्या आहेत. बिचार्‍याला एवढे टेंशन आले की बायकोची जबाबदारी घेण्याच्या भितीने तो लग्नही करायला घाबरतोय आता Happy

माझ्यामते बेस्ट आयडीया, जर दादा घरच्यांना त्रास द्यायलाच काही पाळणार असेल तर बोकड पाळावे.
दादाचे लग्नही होणारच आहे, तर हळदी नाहीतर पाचपर्तावनची सोय होईल Happy
>>>>>
आमच्या गावाला कोंबड्या आणि बकर्‍या अमाप आहेत. शहरातल्या प्रदूषणात वाढलेल्या कोंबड्याबकर्‍यांमध्ये ती मजा नाही. समुद्रातील वा गोड्या पाण्यातील मासे खाणे ऐवजी एखाद्या नाल्यातील मासे खाणे असे झाले ते Happy

Pages