दादाच्या फर्माईशीनुसार कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. पूर्वतयारी झाली आहे. म्हणजेच घरच्या सर्वांची मनाची तयारी झाली आहे. कारण आमच्याकडे पर्यायच नाही. आईबाबांनी दादाकडून एक वचन घेतले आहे. सून आम्ही आमच्या पसंतीची आनणार. बाकी तू कोणालाही घरी घेऊन ये. म्हणून दादाचे मित्रमैत्रीणी अधूनमधून आमच्या घरी येत जात राहतात. पण बहुधा आता त्याचे कुठेतरी जुळले असावे. म्हणून घरच्यांनी वैतागून स्वत:च्या पसंतीची सून ही अट मागे घ्यावी यासाठी त्याने घरच्यांना त्रास द्यायला कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. मुक्या प्राण्यांचा वापर लोक कसे करतील सांगता येत नाही. तरी खाण्यासाठी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच.
तर आता रस्त्यावर कुत्रा दिसला तर फूटपाथ बदलून चालणारी, आणि दोन कुत्रे दिसल्यावर आल्या पावली परत फिरणारी आमच्या घरची साधीभोळी माणसं. त्यांनीही बहुधा दादासाठी कुठेतरी मुलगी शोधून ठेवली असावी. कारण ते दादाचा हा प्लान हाणून पाडायाच्या पुर्ण तयारीत आहेत. घरी एखादे नवीन बाळ, वा गेला बाजार आयुष्यातील पहिली कार घ्यावी तश्या उत्साहात हल्ली रोज कुत्र्याच्या आगमनाची चर्चा चालते. ती एक मजेशीर असते. पुन्हा कधीतरी सांगते. पण परवा मात्र येणार्या कुत्र्याला / कुत्रीला नाव काय ठेवायचे याची चर्चा चालू होती. हो, कुत्रा की कुत्री अजून ठरलेले नाही. ते तितकेसे महत्वाचेही नाही. आमच्यासाठी दोन्ही सारखेच. तर त्याचे नाव काय ठेवायचे याचा विचार करता नेहमीची आपली टॉम-टॉमी-टायगर, निकी-मिकी-सूझी, जिमी-जॉनी-जेनी ईत्यादी भारतात प्रचलित असलेली ईंग्रजी नावे एकेकाच्या तोंडावर आली. ते ऐकून आमची आज्जी पटकन म्हणाली, मेल्यांनो ईंग्रजी नाव काय ठेवता रे. मराठी नाव ठेवा एखादे. आपल्या बाळांना आपण अशी ईंग्रजी नावे ठेवतो का? मग कुत्र्यांना तरी का ते इंग्रजी नाव ठेवायचे?
पॉंईंट आहे आज्जी. आम्ही एकसूरात म्हणालो आणि मराठी नावे शोधायला लागलो.
बाबा म्हणाले, मोती ?
आम्ही म्हणालो - श्या, तो तर साबण असतो.
आई म्हणाली - टिपू ?
आम्ही म्हणालो - नाह, त्यापेक्षा सुलतान नाव चांगलेय.
आजोबा म्हणाले - शेरू ?
ओये शेरू पाजी, कि गलं करतंया. मराठी नावं सुचवा ... हे आज्जी म्हणाली, आणि आमची गाडी ईथेच अडकली.
तर बघा, जरा धक्का द्या. आमच्याकडे येणार्या छानश्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाला तितकेच गोडुले मराठी नाव सुचवा.
पत्रिका त्याची बनवायचा विचार नाहीये. त्यामुळे अक्षर कुठलेही चालायला हरकत नाही.
तेवढे पुढे आडनाव सरकार शोभेल असे बघा 
अॅडवान्समध्ये धन्यवाद म्हणते,
अर्चना सरकार
माझ्या कॉकर स्पानिअल चं नाव
माझ्या कॉकर स्पानिअल चं नाव "प्रिन्सेस" आहे.. ती दिसते सुद्धा राजकुमारीसारखी. तसं तिच्या मऊ मऊ स्पर्शामुळे आम्ही तिला "मखमल" सुद्धा म्हणतो.. शिवाय लाडाची असंख्य नावे आहेतच.
नाव ठेवताना कुत्र्याचे ब्रीड, रंग, आकारमान इ. बघुन ठेवायला हवे.
मोदी ठेवा. म्हणजे मोदी सरकार
मोदी ठेवा. म्हणजे मोदी सरकार म्हणायला सोपे.
आणि तुमचा दादा ही तुमच्या घरच्यांना सतवायला, अबकी बार, मोदी सरकार असे म्हणू शकेन. बाकी तुमच्या दादाची, घरच्यांना त्रास द्यायची आयडिया भारी आहे.
पण काय हो, तुम्ही सरकार आडनावाला शोभेल असे नाव ठेवायचे असे म्हणाला आहात, ते का?
त्यावरून उगीच मला तुम्ही घरी सगळे मिळून मग, "सरकार एक सोच है" असे फॅमिली गाणे एकत्र आला की, ( रोज संध्याकाळी जेवताना, प्रार्थने ऐवजी वगैरे ) म्हणत असाल असे वाटले.
पण मी काय म्हणते, एवढा
पण मी काय म्हणते, एवढा कुत्र्याचा ससेमीरा (!) लावून घेण्यापेक्षा दादाला हवी ती मुलगी सून म्हणून आणा घरी.
आणि सूनेला काहिही नाव ठेवा.
'वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो' असा प्रकार असतो सूनेच्या बाबतीत, मग आपण पसंत केलेली असो की मुलाने स्वतः!
माझ्या एका मित्राच्या
माझ्या एका मित्राच्या कुत्र्याचे नाव 'कुत्रा' होते.
आप ठेवा ना आर्चि + परश्या
आप ठेवा ना आर्चि + परश्या
Ye laga sixer satitai!
Ye laga sixer satitai!
साती, ससेमिरा नाव पण चालेल
साती, ससेमिरा नाव पण चालेल चक्क.
बाकी माझ्या एका मित्राकडे कुत्रा-कुत्री होते.
कुत्रीचं नाव शिवानी आणि कुत्र्याचं नाव संजुबाबा (खुबसुरत )
सर्जा आणि राणा आवडली , साम्बा
सर्जा आणि राणा आवडली , साम्बा कसं आहे ? गब्बर पण चालेल की
कुत्रीचं नाव शिवानी आणि
कुत्रीचं नाव शिवानी आणि कुत्र्याचं नाव संजुबाबा (खुबसुरत ) >>> दोघं मिळुन गाणी म्हणतात का ?
ए शिवानी .....
ए शिवानी .....
दोघं मिळुन गाणी म्हणतात का ?>
दोघं मिळुन गाणी म्हणतात का ?> म्हणत असतील. आम्हाला नाही समजत.
माझ्या सासरघरी माझं लग्न व्हायच्या आधी कुत्रा-कुत्री होते. कुत्रा पुर्ण काळा. त्याचं नाव ब्लॅकी. कुत्री पुर्ण पांढरी. ती अलिशा. ब्लॅकी माझ्या लग्नाआधीच देवाघरी गेला होता. अलिशा माझ्या लग्नानंतर ४ वर्षांनी गेली.
बंट्या चिंगू यमी. चिंगी ठमी ठ
बंट्या
चिंगू
यमी.
चिंगी
ठमी
ठक्या
ढोमश्या
ढम्या
ढासू
कुत्री नवीन कोणी घरात आलं कि
कुत्री नवीन कोणी घरात आलं कि चाटायला बघतात म्हुणुन "चाटू"

(अस्सल मराठी नाव )
झालंच तर
राणी
राणा
गवत्या
भाले
गाणी म्हणत असेल तर हिमेश
गाणी म्हणत असेल तर हिमेश ठेवा. त्याचे ऊंउss आणि यांचे भूंऊss सेमच वाटते.
आमच्या ओळखीत एकांच्या
आमच्या ओळखीत एकांच्या कुत्रीची नावे सखू आणि चंपा होती.
आमच्या घरात दोन बोके
आमच्या घरात दोन बोके होते,आम्ही त्यांचे नोकर असल्यासारखे आम्हाला वागवायचे ते,म्हणून त्यांची नावं ठेवली होती,एकाचं तात्यासाहेब व दुसर्याचं नानासाहेब.
I can't believe I'm posting
I can't believe I'm posting here
हे घ्या :
राणा , सिकंदर , साहेब, बाजीराव.
डिज्जे
डिज्जे
चिनू मणि ठिपक्या मत आहे..पण
चिनू
मणि
ठिपक्या मत आहे..पण तो खरेच ठिपक्या असायला हवा
चितचोर
रुही
सीआयडी
पोलीस
जान
हा धागा आवडला. मज्जा आली
हा धागा आवडला. मज्जा आली सजेशन्स वाचताना

सातीची पोस्ट भारीये
आमच्याकडे "गंपु" होता
आमच्याकडे "गंपु" होता
सखाराम!
सखाराम!
धम्माल प्रतिसाद आलेत. साती
धम्माल प्रतिसाद आलेत.
साती मस्त सजेशन!
आमच्या गल्लीत एकाकडे 'खन्ड्या' आहे.
आमचा 'गुड्ड' होता (गुड्ड्या म्हणायचो आम्ही) . त्याच काळात शा खा चा 'गुड्ड' सिनेमा आला होता. त्यानंतर जितक्या वेळा कुत्रे पाळले तितक्यांदा तेच नाव ठेवलं.
:पळा:
शा खा चा 'गुड्ड' सिनेमा आला
शा खा चा 'गुड्ड' सिनेमा आला होता.. >>> गुड्डु नाव ना त्याचे.. थंडी मे पसीना छुटे ना भूक ना प्यास लगे..
डिज्जे. मला पण तसचं वाटत होत
डिज्जे. मला पण तसचं वाटत होत पण केलं पोस्ट
धम्माल चाललेय इथे सगळेच
धम्माल चाललेय इथे
सगळेच प्रतिसाद मस्त. साती, ऋन्मेष भारीच
माझ्या आकूचे नाव फुंतरू आहे
माझ्या आकूचे नाव फुंतरू आहे .
http://www.maayboli.com/node/6139014448851_345530692462493_5603772635179527368_n.jpg (13.3 KB)
दुष्यंत हे ही आहे..आणण्याआधी
दुष्यंत हे ही आहे..आणण्याआधी मी आणि माझा शत्रूपक्ष जरुर वाचा
धमाल प्रतिसाद आलेत. नावेही
धमाल प्रतिसाद आलेत. नावेही तशीच भारी. मोबाईलवरून वाचत होते आणि आवडलेली नावे आणि प्रतिसाद कॉपीपेस्ट करत आमच्या फॅमिली व्हॉटस अॅप ग्रूपवर पेस्ट करत होते. you guys made our day
केजरी ठेवा नाव !!!
केजरी ठेवा नाव !!!
Pages