दादाच्या फर्माईशीनुसार कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. पूर्वतयारी झाली आहे. म्हणजेच घरच्या सर्वांची मनाची तयारी झाली आहे. कारण आमच्याकडे पर्यायच नाही. आईबाबांनी दादाकडून एक वचन घेतले आहे. सून आम्ही आमच्या पसंतीची आनणार. बाकी तू कोणालाही घरी घेऊन ये. म्हणून दादाचे मित्रमैत्रीणी अधूनमधून आमच्या घरी येत जात राहतात. पण बहुधा आता त्याचे कुठेतरी जुळले असावे. म्हणून घरच्यांनी वैतागून स्वत:च्या पसंतीची सून ही अट मागे घ्यावी यासाठी त्याने घरच्यांना त्रास द्यायला कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. मुक्या प्राण्यांचा वापर लोक कसे करतील सांगता येत नाही. तरी खाण्यासाठी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच.
तर आता रस्त्यावर कुत्रा दिसला तर फूटपाथ बदलून चालणारी, आणि दोन कुत्रे दिसल्यावर आल्या पावली परत फिरणारी आमच्या घरची साधीभोळी माणसं. त्यांनीही बहुधा दादासाठी कुठेतरी मुलगी शोधून ठेवली असावी. कारण ते दादाचा हा प्लान हाणून पाडायाच्या पुर्ण तयारीत आहेत. घरी एखादे नवीन बाळ, वा गेला बाजार आयुष्यातील पहिली कार घ्यावी तश्या उत्साहात हल्ली रोज कुत्र्याच्या आगमनाची चर्चा चालते. ती एक मजेशीर असते. पुन्हा कधीतरी सांगते. पण परवा मात्र येणार्या कुत्र्याला / कुत्रीला नाव काय ठेवायचे याची चर्चा चालू होती. हो, कुत्रा की कुत्री अजून ठरलेले नाही. ते तितकेसे महत्वाचेही नाही. आमच्यासाठी दोन्ही सारखेच. तर त्याचे नाव काय ठेवायचे याचा विचार करता नेहमीची आपली टॉम-टॉमी-टायगर, निकी-मिकी-सूझी, जिमी-जॉनी-जेनी ईत्यादी भारतात प्रचलित असलेली ईंग्रजी नावे एकेकाच्या तोंडावर आली. ते ऐकून आमची आज्जी पटकन म्हणाली, मेल्यांनो ईंग्रजी नाव काय ठेवता रे. मराठी नाव ठेवा एखादे. आपल्या बाळांना आपण अशी ईंग्रजी नावे ठेवतो का? मग कुत्र्यांना तरी का ते इंग्रजी नाव ठेवायचे?
पॉंईंट आहे आज्जी. आम्ही एकसूरात म्हणालो आणि मराठी नावे शोधायला लागलो.
बाबा म्हणाले, मोती ?
आम्ही म्हणालो - श्या, तो तर साबण असतो.
आई म्हणाली - टिपू ?
आम्ही म्हणालो - नाह, त्यापेक्षा सुलतान नाव चांगलेय.
आजोबा म्हणाले - शेरू ?
ओये शेरू पाजी, कि गलं करतंया. मराठी नावं सुचवा ... हे आज्जी म्हणाली, आणि आमची गाडी ईथेच अडकली.
तर बघा, जरा धक्का द्या. आमच्याकडे येणार्या छानश्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाला तितकेच गोडुले मराठी नाव सुचवा.
पत्रिका त्याची बनवायचा विचार नाहीये. त्यामुळे अक्षर कुठलेही चालायला हरकत नाही.
तेवढे पुढे आडनाव सरकार शोभेल असे बघा 
अॅडवान्समध्ये धन्यवाद म्हणते,
अर्चना सरकार
माझ्या एका मित्राच्या
माझ्या एका मित्राच्या कुत्र्याचं नाव "कूक" होतं.
पिल्लु म्हणुन आणलं तेव्हा त्याला पकडा-पकडी खेळायला आवडायचं. आम्ही "कुकडी-कूक" म्हणत त्याच्याबरोबर लपाछपी खेळायचो. अगदी १-२ महीन्याचं पिल्लु होतं ते तेव्हा. त्याच्या घरचे दुसर्या कुठल्यातरी नावाने पण हाक मारयचे त्याला. पण आम्ही "क्क्क्क" आवाज काढला तरी पळत यायचा.
फुंतरू
फुंतरू

I can't believe I'm posting
I can't believe I'm posting here फिदीफिदी

हे घ्या :>>>>+१
धमाल चालु आहे इथे.
काही नावे-
बाळु, काळु, पप्पु, पिल्लु,--आमच्या सोसा. कॉमन श्वानांची नावे.
एक लुब्री पण होती...या शब्दाच्या अर्थाला ही कुत्री पुर्ण पणे जागायची. जसे काही तीला अर्थ माहीत होता.
काही इंग्रजी नावे माहित आहेत त्याचे मराठी रुपांतर ठेवु शकता तुम्ही..जसे की,
ब्रॉउनी=तपकिरी..किरकीरी असली तरी शोभेल हे नाव
व्हाइटी=पांढर्या/पांढरी, ब्लाकी= काळ्या/काळी,
स्नोई= बर्फ़ाळ, गारेगार , गार्या
पिंकी=गुलाबी/गुलाबो/गुलब्या
बिट्टू ठेवा नाव! माझ्या
बिट्टू ठेवा नाव! माझ्या भुभ्याच होत.
माझ्याकडे डॉबरमॅन आहे. त्याच
माझ्याकडे डॉबरमॅन आहे. त्याच नाव आम्ही ठेवल आहे टायसन.
आमचा कुत्रा आहे दगडू नावचा
आमचा कुत्रा आहे दगडू नावचा
खरच धमाल प्रतीसाद आहेत
खरच धमाल प्रतीसाद आहेत एकेक..
गाणी म्हणत असेल तर हिमेश ठेवा. त्याचे ऊंउss आणि यांचे भूंऊss सेमच वाटते. >>>>> ईमॅजीन करुन वाट लागली.. अक्षरशः पोट दुखायला लागले हसुन
माझ्या आजोळच्य कुत्र्याचे नाव खंडु होते.
मजा म्हणजे माझ्या मावशिच्या कुत्र्याचे नाव पंकज आहे आणी माझ्या जुन्या बॉसचे सुद्धा
वा वा अर्चना, कमाल. छानपैकी
वा वा अर्चना, कमाल. छानपैकी दत्ताजी ठेवा नाव
दत्ताच्या आसपास असतातच कुत्रे, आणि शिवाय दत्ताजी सरकार म्हणजे पानिपतातले हीरो एकदम! मुलगी असेल तर विठाई.
हल्ली ऐकलेली मराठी मुलांची नावंसुद्धा पाळलेल्या सश्याची, पोपटाची किंवा टेडी बेअरची वाटतात. शायरा, मायरा, साशा, मिशा वगैरे. तुमच्याकडे कुत्र्याच्या नावाबद्दल इतका मनापासून विचार होतोय बघून काय मस्त वाटलं!
दगडू सरकार !!!!!!!
दगडू सरकार !!!!!!!
शंभर ! प्रतिसाद संख्या आहे
शंभर !
प्रतिसाद संख्या आहे हा ही, नाहीतर पटकन नाव ठेवाल कुत्र्याचे
शंभर.... हे पण मस्त नाव
शंभर....
हे पण मस्त नाव आहे...सध्या याचीच चलती आहे
आमच्या ओळखीच्यांकडे शिकारी
आमच्या ओळखीच्यांकडे शिकारी हाऊंड होता. त्याचं नाव त्यांनी "जालीम" ठेवलं होतं.
माझ्या कडे निळ्या शार डोळ्यांचं पांढरं शुभ्र मांजर होतं. त्याचं नाव मी "परांजपे" ठेवलं होतं. हे १००% खरं आहे. पण प्लिज मला जातीयवादी वादात पकडू नका. कारण तेव्हा मी पाचवीत होते आणि मला माहिती असलेले एकमेव परांजपे काका सेम माझ्या मांजरासारखे दिसायचे!
आणि तो कुत्रा कोणाच्या
आणि तो कुत्रा कोणाच्या अन्गावर धावून गेला की म्हणायचे, "शंभरी भरली त्याची"
मस्त धागा आहे! सेन्स ऑफ
मस्त धागा आहे! सेन्स ऑफ हुय्मर जबरी आहे माबोकरांचा
सरकार बाई मला वाटत तुम्ही
सरकार बाई मला वाटत तुम्ही कुत्र्याच्या दिसण्या व सवई नुसार पण नंतर नाव ठेवु शकता..
अगोदरच ठेवाव अस काही नाही..
माझ्या एका मित्राकडे जो शेती करायचा त्याच्या जवळ ४, ५ कुत्री होती..
त्यातल्या एका कुत्र्याच नाव होत "ढेकळ्या"... त्याच कारण त्याची एक सवय होती.
नांगर मारुन झाल्यवर तो नांगरा मागे चालायचा..व उकरलेली ढेकळे तोंडात धरुन खेळायचा, खायचा ..!!!
" वाघ्या " कसे वाटते !
" वाघ्या " कसे वाटते !
शिंडरेला
शिंडरेला
स्वप्नील /सई
स्वप्नील /सई
>>स्वप्नील /सई
>>स्वप्नील /सई
" वाघ्या " कसे वाटते !>>>>
" वाघ्या " कसे वाटते !>>>>
मस्तच. आमचा होता एक वाघ्या:
http://www.maayboli.com/node/57910
मिठ्या, मोमो, वाघ्या, बिजली,
मिठ्या, मोमो, वाघ्या, बिजली, जब्या, बिट्टू, जिल्ब्या, जेलि...
आर्चे, तुला नाव मिळेलच एखाद
आर्चे, तुला नाव मिळेलच एखाद छान कुत्रा आणलात घरी तर..
पण धागाचा एक मोठा फायदा झाला. छान छान भुभु लेख वाचायला मिळालेत.
मी सांगितलेले बिट्टु छान आहे.
मी सांगितलेले बिट्टु छान आहे. बाकी कोणाच ऐकू नका माझच ऐका!
नाव ठेवणे हा सोपा भाग झाला.
नाव ठेवणे हा सोपा भाग झाला. पण कुत्रा पाळायची मानसिक व शारिरिक तयारी आहे का? तितकी वेळाची व भावनिक कमिट मेंट करणार आहात का? कारण लेख वाचता असे वा टते की सून आपल्या पसंतीची येउ घातली आहे. मग ते झाले की दादाचे कुत्र्यावरचे लक्ष उडूनच जाऊ शकते. व नव्या सुनेला कुत्रे आव डत नसेल तर कुत्रे रस्त्यावर टाकले जाउ शकते. कुत्र्याला दिवसातून दोन दा एक एक तास फिरव णे, त्याचे शी शू साफ करणे( घरात केल्यास/ बाहेर केल्यास उच ल णे व डस्ट बिन मध्ये टाकणे इत्यादि.
त्याने घरात केलेल्या उलथापालथी, फाडलेली पुस्तके, कपडे, चपला जनरल पसारा चालतो का? तो फर्निचर वर बेड वर बसला जवळ झोपला तर चालेल का हा विचार केला आहे का? खूप लोक उत्साहाने कुत्रा आणतात. तो जीव लावतो व मग तुमचा उत्साह संपला की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष क रणार नाहीतर बाहेर फेकून देणार. अशी शक्यता असेल तर नीट विचार करा. बत्यापेक्षा दादाच्या मनासारखी व घरच्यांना आव्डेल अशी सूनच आणा. कुत्र्याच्या आगमनाने हा बेसिक प्रश्न सुटणारा नाही. एक फेमली मीटिंग घ्या. कुत्र्याची कामे कोण करेल त्याचा बेसिक मालक कोण असेल इत्यादि. कुत्र्या पा लनाचा खर्चही असतो. इंजेक्षने, व्हेट कडे नेणे, ऑपरेश्न लागल्यास, बेल्ट बोल वगैरेचा खर्च, खेळणी हे सर्व जमेस धरले आहे का? तसे असेल तर माझ्या शुभेच्छा. नाव हा सर्वात सोपा इशू आहे.
जॅमि (jammy) थेवा मला आवड्ते
जॅमि (jammy) थेवा मला आवड्ते हे नाव
अमाच्या प्रतिक्रियेशी सहमत
अमाच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे
लोकांना (पाहुण्यांना) चकवायचं
लोकांना (पाहुण्यांना) चकवायचं असेल तर "बोक्या" नाव ठेवा.
लखन....आमच्या कुत्र्याचे नांव
लखन....आमच्या कुत्र्याचे नांव होते. तसे बरेच पाळून झाले.
वाघ्या, लकी, मोली (हि खूप हूशार होती.)
ठेवले का मग नांव !
ठेवले का मग नांव !
अमाच्या प्रतिक्रियेशी सहमत
अमाच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे>>> +१
Pages